✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ऐ....चल न....

ज — ज्योति अळवणी, Mon, 02/23/2015 - 09:46
ऐ चल.... थोडस भटकू... थोड़ी गाणी ऐकू... थोड़े हसू... थोड़े आसू.. हातात हात घालून; एकमेकांचे पुसू! थोड लांब पळु.. एखादा डोंगर चढू.. दमल्यानंतर मात्र; हिरवळीत सोबतिन बसु! मग? गेलेल्या वर्षांच्या.. मनातल्या आठवणी. shear केलेले क्षण; विश्वासाच्या किनारी. ऐ चल... समुद्र किना-यातुन... तळव्याना स्पर्श करणा-या.. नाजुक लाट़ातुन. तारे मोजु.. वाळुच्या कुशीत पडून. ऐ....चल न.... ते सगळ सगळ करू... आणि मग? हातात हात अन् खुप सार हसू!

प्रतिक्रिया द्या
39009 वाचन

💬 प्रतिसाद (193)

'एकमेकांचे पुसू!..' वरून एक

स्वप्नांची राणी
Mon, 02/23/2015 - 19:37 नवीन
'एकमेकांचे पुसू!..' वरून एक अतिशय पांचट ज्योक आठवला..पण ईथे लिहिला तर आयडी जाईल का माझा...??
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आजपर्यंत मिपातीहासात

टवाळ कार्टा
Mon, 02/23/2015 - 19:38 नवीन
आजपर्यंत मिपातीहासात अनाहितेचा आयडी उडाला नसेल....लिवा बिंधास :)
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

एकमेकांचे पुसू! >>>

यसवायजी
Tue, 02/24/2015 - 00:54 नवीन
:)) एकमेकांचे पुसू! >>> सर्फची "दो बकेट पानी अब रोज़ाना है बचाना" आठवली.
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

_/\_

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 02/24/2015 - 08:16 नवीन
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol: _/\_ पाणी वाचवा पण वीतभर कागदासाठी झाडं तोडली नैत तर जास्तं बरं वाटेल बॉ ;)
↩ प्रतिसाद: यसवायजी

सरकार म्हणते पाणी वाचवा..

टवाळ कार्टा
Tue, 02/24/2015 - 10:45 नवीन
सरकार म्हणते पाणी वाचवा...पर्यावरणवादी म्हणतात झाडे वाचवा, कागद वापरू नका...अर्रे मग सामान्य माणसाने धुवायचे कशाने =))
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

डोळे पुसायला टिशु कशाला

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 02/24/2015 - 10:48 नवीन
डोळे पुसायला टिशु कशाला पाहिजे बे. रुमाल चालतो की. बाकी दगड, कापुस, स्पंज, जुनाट कापड वगैरे गोष्टींचाही स्थलानुरुप वापर करायला हरकत नै =))
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

दगड?????

टवाळ कार्टा
Tue, 02/24/2015 - 11:02 नवीन
दगड?????
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

पालापाचोळा / हिरवे गवत

यसवायजी
Tue, 02/24/2015 - 14:31 नवीन
पालापाचोळा / हिरवे गवत वापरावे ऎसे सुचवतो। (नॉन-अनुभवी) SYG
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

दोन मित्र किंवा दोन मैत्रिणी

ज्योति अळवणी
Mon, 02/23/2015 - 11:22 नवीन
दोन मित्र किंवा दोन मैत्रिणी किंवा मित्र मैत्रीण एकमेकांना या कवितेत म्हंटल्याप्रमाणे म्हणू शकत नाहीत का?

आसंय का ते ? आत्ता कळालं.

मितान
Mon, 02/23/2015 - 13:11 नवीन
आसंय का ते ? आत्ता कळालं. @ पैजारबुवा वाचताय नं? @ वल्लीभाऊ आमच्या निरागस प्रतिसादांची वाट नका लावू !
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी

मी असलं काही म्हटलं मित्राला,

सूड
Mon, 02/23/2015 - 14:56 नवीन
मी असलं काही म्हटलं मित्राला, तर येणार्‍या प्रतिक्रिया येणेप्रमाणे, १) डोक्यावर पडलायेस का? २) आज काय सकाळी सकाळीच?? ३) ए बाबा!! उगाच चावू नको, उंडारायला जायचं असेल तर तसं सरळ सांग!! वरील प्रतिसाद उदाहरणादाखल आहेत. खरा मैत्रीपूर्ण संवाद इथे लिहीला तर ती भाषा वाचून वाचणार्‍यांना डोळे येतील. ;)
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी

नाही एका महाकाव्याचे मी असे अवमुल्यन होउ देणार नाही.

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 02/23/2015 - 14:59 नवीन
आम्हाला तर हि कविता वैश्र्विक वाटते आहे. भलताच अमोघ गहन, सखोल आणि प्रत्ययकारी अर्थ या मधे दडलेला आम्हाला दिसत आहे. तुम्ही ती कविता केवळ दोन मित्र किंवा दोन मैत्रिणी किंवा मित्र मैत्रीण यांच्यापूर्ती सिमित करुन टाकु नका, अशा अनेक जोड्या आहेत ज्यांच्या संदर्भात ही कविता गायली तरी ती तेवढीच प्रभावी ठरेल. उदा. आई - बाबा बहिण - भाउ आई - मुलगा / मुलगी बाबा - मुलगी / मुलगा काका - पुतण्या काकु - पुतणी मामा - भाचा मामी - भाची शेजारी- शेजारी शेजारी - शेजारीण शेजारीण - शेजारी सोसायटीचे चेअरमन - सोसायटीचे वॉचमन हापिसातले साहेब- आणि साहेबांचे सहकारी महाराष्ट्राचे साहेब - आणि त्यांचे पुतणे बस कंडक्टर - बस ड्रायव्हर पुण्यातला रिक्षावाला - आणि पुणेकर गिर्‍हाईक मोदी - ओबामा मोदी - अरविंद मोदी- अमित गुरु - शिष्य काळे - गोरे चोर - पोलीस भारतिय - पाकिस्तानी हिंदु - मुसलमान शैव - वैष्णव उच्च - निच धर्मनिरपेक्ष - जातियवादी / मनुवादी वकिल- फिर्यादी / आरोपी वेडा- शहाणा सलमान - संगीता / ऐश्वर्या / कतरीना सचिन - सेहवाग देव -दानव शिकारी - शिकार अजुन आठवेल तसे अ‍ॅडवत जाईन. उदाहरणादाखल वरील पैकी कोणतीही एक जोडी डोळ्यासमोर आणा आणि ही कविता त्यांच्या संदर्भाने म्हणुन बघा एकदम फिट बसेल. नाही बसली तर...... जाउदे कारण असे होणारच नाही. पैजारबुवा,
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी

'जोड्यां'चा चांगला अभ्यास

सस्नेह
Mon, 02/23/2015 - 16:29 नवीन
'जोड्यां'चा चांगला अभ्यास दिसतो हो पैजारबुवा +))
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

यात

हाडक्या
Mon, 02/23/2015 - 17:12 नवीन
यात "महाराष्ट्राचे साहेब - आणि त्यांचे पुतणे" याच बरोबर , "महाराष्ट्राचे साहेब - मोदी" हे पण चालेल आता.. अशे पन सायेबांना महिन्यातून दोन दोन वेळा कॉल करतातच ते.
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

ही कविता आधुनिक काळातील

विशाखा पाटील
Mon, 02/23/2015 - 15:04 नवीन
ही कविता आधुनिक काळातील वास्तववादाचं प्रत्ययकारी दर्शन घडवते. पूर्वी लोक एकमेकांना 'ए' असं संबोधायचे. आता ते पूर्वीचे दिवस राहिले नाहीत, ही जाणीव कवयत्रिला अस्वस्थ करते. अलीकडे लोक उद्धटपणे 'ऐ' असं संबोधतात, हे कवयत्रिला यातून दाखवून द्यायचे आहे. अलीकडे इंग्रजी शब्दांचा (चुकीचा का असेना) वापर करण्यात लोक श्रेष्ठत्व मानतात. ते 'shear' या शब्दकळेतून दाखवून दिले आहे. पूर्वीचे दिवस आणि वर्तमान यांची दोन मित्र किंवा दोन मैत्रिणी किंवा मित्र मैत्रीण यांनी केलेली तुलना त्यामुळे उत्कटपणे वाचकांपर्यंत पोहोचते . अवांतर- कवितेवरच्या प्रतिक्रिया उत्तरआधुनिक काळातल्या आहेत...

थोड लांब पळु..

स्पंदना
Mon, 02/23/2015 - 16:02 नवीन
थोड लांब पळु.. एखादा डोंगर चढू.. दमल्यानंतर मात्र; हिरवळीत सोबतिन बसु! रम्य पहाटेच वर्णन आहे हे. भल्या सकाळी जेंव्हा सुवासीनी सडा संमार्जन करत असतात्म, तेंव्हा सड्यावर चढुन जरा आडोसा शोधायचा म्हणजे डोंगराला शरण जाणे आलेच. मग अस दमल्यावर चौफेर नजर कशी ठेवायची म्हणुन सोबतीने बसायच असावं. ता.क. हिरवळ पुरेशी उंच असावी अशी आपली उगाच एक अपेक्षा!!

कोने एके काळी

बॅटमॅन
Mon, 02/23/2015 - 16:11 नवीन
सडासंमार्जन
या शब्दातला अनुस्वार बाय डिफॉल्ट नेहमीच प्रथमाक्षरावर नेऊन वाचत असू आम्ही. दोन्ही क्रिया सकाळीच होत असल्याने फार वेगळेपणही जानवत नसे, पण पुढे समजलं नीट.
↩ प्रतिसाद: स्पंदना

(No subject)

टवाळ कार्टा
Mon, 02/23/2015 - 16:17 नवीन
=))
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मी लोकं अंगणात जाउन

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 02/23/2015 - 16:32 नवीन
*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =)))))) मी लोकं अंगणात जाउन "सडासंमार्जन" का करतात हे विचारुन थोरामोठ्यांची पंचाईत केल्याचं आठवतयं. *lol* *lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मी लोकं अंगणात जाउन

बॅटमॅन
Mon, 02/23/2015 - 16:34 नवीन
मी लोकं अंगणात जाउन "सडासंमार्जन" का करतात हे विचारुन थोरामोठ्यांची पंचाईत केल्याचं आठवतयं.
ठ्ठो =)) =)) =)) =)) =))
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

अगागागा

सविता००१
Mon, 02/23/2015 - 16:41 नवीन
:)) :)) :))
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मी "मार्जन" म्हणजे काय असे

टवाळ कार्टा
Mon, 02/23/2015 - 16:57 नवीन
मी "मार्जन" म्हणजे काय असे एकदा विचारलेले पण आधीच्या ३ अक्षरांचा घ्यायचा तो अर्थ लावूनच =))
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

(No subject)

स्पंदना
Mon, 02/23/2015 - 17:11 नवीन
:))))
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

(No subject)

सुहास झेले
Tue, 02/24/2015 - 22:29 नवीन
=))
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

(No subject)

सुहास झेले
Tue, 02/24/2015 - 22:30 नवीन
=))
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

(No subject)

अजया
Mon, 02/23/2015 - 16:04 नवीन
=))

काय कमाल प्रतिक्रिया आहेत!

आदूबाळ
Mon, 02/23/2015 - 16:27 नवीन
काय कमाल प्रतिक्रिया आहेत! बेकार हसतोय. आतापर्यंत जोकाकूंचे धागे मी का वाचत नव्हतो काय माहीत! त्या पापाचं परिमार्जन म्हणून शनिवारी डोक्याचे केस shear करुन येईन.

पापाचं परिमार्जन म्हणून

हाडक्या
Mon, 02/23/2015 - 19:15 नवीन
पापाचं परिमार्जन म्हणून शनिवारी डोक्याचे केस shear करुन येईन.
पापांच सडासंमार्जन करायला तुमच्या गावात प्रति-बालाजी है कै, आँ?
↩ प्रतिसाद: आदूबाळ

वा ! वा!! वा !!!

मनीषा
Mon, 02/23/2015 - 17:37 नवीन
वा ! वा!! वा !!! छानच ... मंगल मैत्री आणि निरागस भावना यांचं प्रत्ययकारी चित्रण. अवांतर : उगीच नाही नाही ते प्रतिसाद देणा-या मिपाकरांकडे लक्षं देऊ नका . ते तस्लेच आहेत. *secret* तुम्ही लिहा

ज्योतिताई

इरसाल
Mon, 02/23/2015 - 17:59 नवीन
या वरच्या लोकांकडे लक्ष देवु नका. पुर्वीचे मिपा नाही राहिले चॅक चॅक..... काय वेळ आणलीय नवोदितांवर. म्हणुनच मिपावर " मोकलाया दही दिशा" सारख्या कविता येणं बंद झालय.खंत वाटते हो खंत

ज्योती ताई, मिपा वर अश्याच

विवेकपटाईत
Mon, 02/23/2015 - 19:51 नवीन
ज्योती ताई, मिपा वर अश्याच प्रतिक्रिया येतात. यातून बरेच शिकायला मिळते.

पुसा..

स्वप्नज
Mon, 02/23/2015 - 20:46 नवीन
""थोड़े हसू... थोड़े आसू.. हातात हात घालून; एकमेकांचे पुसू!"" पुसा पुसा... चालू द्या... असं खुलेआम अश्लील बोलणार्यांचे आयडी कसे काय गायब होत नाहीत राव??

असं खुलेआम अश्लील

सूड
Mon, 02/23/2015 - 20:51 नवीन
असं खुलेआम अश्लील बोलणार्यांचे आयडी कसे काय गायब होत नाहीत राव??
हायला, डोळे पुसण्यात काय अश्लील आहे राव?
↩ प्रतिसाद: स्वप्नज

हातात हात घालुन काहीचं नीट

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 02/23/2015 - 23:05 नवीन
हातात हात घालुन काहीचं नीट पुसता येतं नाही. डोळ्यासारखे नाजुन अवयव तर नाहीचं नाही. =)) प्रयत्न करुन बघा...(इजा झाल्यास मं.ज.ना.)
↩ प्रतिसाद: सूड

एकेक हात मोकळा ठेवतील रे

सूड
Tue, 02/24/2015 - 00:35 नवीन
एकेक हात मोकळा ठेवतील रे पुसण्यापुरता!!
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्म्म्म्म!!! पुसो....आपलं असो

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 02/24/2015 - 08:18 नवीन
ह्म्म्म्म!!! पुसो....आपलं असो..!!
↩ प्रतिसाद: सूड

बाबौ. चायला बराचं दंगा केला

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 02/23/2015 - 21:44 नवीन
बाबौ. चायला बराचं दंगा केला आज. दोन दिवस जरा थंड घेतो... =))

कवितेचा इतका प्रभाव ?

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 02/23/2015 - 23:00 नवीन
कवितेचा इतका प्रभाव ? कोणाबरोबर भटकायला जायचा विचार आहे ?! :)
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

वैचारिक अपचनं झालयं.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 02/23/2015 - 23:04 नवीन
वैचारिक अपचनं झालयं. =)) करायचा का मिनि कट्टा पिंपरी-चिंचवडकरांचा?
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

का नाही ? होऊन जाऊ द्या बेत.

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 02/23/2015 - 23:08 नवीन
का नाही ? होऊन जाऊ द्या बेत. फक्त या विकांताला नको. आमच्या बॅचचे व्दैवार्षीक संमेलन आहे दोन दिवस सातार्‍यात. ते सोडून ठरवा.
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ऐ...ठरवु मग..बाकी पिंचिं

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 02/23/2015 - 23:12 नवीन
ऐ...ठरवु मग..बाकी पिंचिं वाल्यांशी उद्या घेतो ऐ बोलुन... =))
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आय आय कॅप्टन

यसवायजी
Tue, 02/24/2015 - 00:30 नवीन
आय आय कॅप्टन
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

लई भारी.

चित्रगुप्त
Tue, 02/24/2015 - 10:53 नवीन
.... हातात हात घालून एकमेकांचे पुसू ... केंव्हाचा विचार करतोय, हे कसे जमत असेल... अत्यंत विचारप्रवर्तक कविता.

कमालच नं म्हणजे?

वेल्लाभट
Tue, 02/24/2015 - 11:08 नवीन
कमालच नं म्हणजे?
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

इथले सगळे जाणकार प्रतिसाद

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 02/24/2015 - 11:03 नवीन
इथले सगळे जाणकार प्रतिसाद पाहता, गेल्या हजार वर्षांत मराठीत (कमीत कमी मिपावर तरी) इतकी विचारप्रवर्तक आणि खळबळजनक कविता झाली नसावी :)

+१.

पलाश
Tue, 02/24/2015 - 11:39 नवीन
+१.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

@इतकी विचारप्रवर्तक आणि

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/24/2015 - 12:57 नवीन
@इतकी विचारप्रवर्तक आणि खळबळजनक कविता झाली नसावी Smile>>> +++++१११११ =)) भयाण विनोदि कविता आहे ही! =)))))
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

बुवा.

नाखु
Wed, 02/25/2015 - 11:32 नवीन
ज्याम आनंद झालेला दिसतोय तुम्हाला!! तुमचे खंदे "समीक्षकांच" काय म्हणन आहे या "साहित्य" प्रकारावर !!! गहन कवीता वर्धीष्णू संघ. हा.मुक्त भरताडवाडी
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

गहन कवीता वर्धीष्णू संघ.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 02/25/2015 - 12:04 नवीन
गहन कवीता वर्धीष्णू संघ. हा.मुक्त भरताडवाडी
अध्यक्ष कोण? मर्ढेकर का?
↩ प्रतिसाद: नाखु

असेल

नाखु
Wed, 02/25/2015 - 12:45 नवीन
पण संघाचे नाव मुद्दाम आद्याक्षरांची अदलाबदल करून लिहिले आहे तेव्हा ते बदला *pleasantry* अपेक्षीत अर्थ सापडेल.
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा