तीन साडेतीन वर्षांपूर्वीची एक प्रसन्न शनिवार सकाळ कोपेनहेगन ते स्टोकहोम फ्लाईट आणि मला शेवटून दुसर्या रांगेतली मधली सीट. डाव्या बाजूच्या खिडकीजवळ एक रागीट चेहेर्याचा मिशीवाला आणि उजवीकडे एक साठीतली मावशी ... गुड मोर्निंग वगैरे करून स्थानापन्न झालो..यथासमय विमान हलले आणि कुणीतरी मला हळूच टपलीत मारल्या सारखे वाटले .. भास असेल म्हणून दुर्लक्ष करून मी खिडकी बाहेर बघू लागलो .. विमान रनवे वर धावू लागले आणि पुन्हा एक हलकेच टपलीत .. ह्यावेळी केसही ओढल्यासारखे वाटले...पण मागे वळून बघणे शक्य नव्हते...विमान उडाले आणि मागे गुस्ताव असे कुणीसे दटावले पण त्याचा काही उपयोग व्हायच्या आत तिसरी टपलीत ...
मी कमरेचा बेल्ट सोडला आणि मागे वळून बघितले..एक देखणे जोडपे कमालीचे ओशाळून मला सॉरी सॉरी म्हणत होते आणि त्यंच्या मांडीवर एक ७-८ महिन्याचे गोरेपान बाळ ..आपले मिस्कील निळेशार डोळे माझ्यावर रोखून हात उगारून तयार...गुबगुबीत गाल ..लाल चुटूक ओठ ...सोनेरी केस...
मी त्याच्याकडे दोन्ही हात पसरताच मनसोक्त खिद्ळून त्याने उडी मारली..व तडक माझ्याकडे आला ...त्यच्या आईवडिलांना हे नवल वाटले ... “तो तसा कुणाकडे जात नही नुस्त लांबून खेळतो” इति बाळाचे पिताश्री पिताश्री...मी म्हटले ‘तुमची हरकत नसेल तर खेळतो मी थोडावेळ’ lukily they agreed…
मग काय माझ्या मांडीवर उड्या काय ..माझे केस काय ओढले..गाल काय चाटले..आणि अरे अरे म्हणेस्तोवर बाजूच्या मिशिवाल्याचा पेपर फर्रकन उडवला...ते बेण गुरुगुर्ले पण करतो काय..एव्हापर्यंत बाजूच्या मावशीने मासिक बंद करून त्याच्याशी बोलायला सुरुवात केली ... पण ह्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून हा बाबा त्याच्या अगम्य भाषेत मला हं हुं करून काय काय सांगत होता कि ... नुस्त फुंकर मारली तर खळखळून हसायचा...गळ्याला गुदगुल्या केल्या तर हा आरडाओरडा ..दणादण उड्या काय ..हसून हसून नुसती धमाल...पण १५ -२० मिंट दंगा केल्यावर आली झोप..तर सरळ गळ्यात हात टाकून झोपून गेला...त्याची आई आली व हळूच त्याला घेऊ लागली ... तर जे घट्ट धरलन मला ... त्याच्या आईला म्हटलं असू देत ..तुम्ही बसा मागे ... जेमतेम १ तासाची फ्लाईट त्यात ५० मिनिटे हे चालू...विमान उतरायला लागल्यावर मात्र हवाई सुंदरीने बाळाला आईकडे द्यायला लावले..चाळवलेली झोप आणि त्यात आं ऊ करत गेलं आईकडे...
विमान उतरले ...एरो ब्रिज लागला ...लोकं उठून सामान घेऊन जायला लागले ... माझ्या bag बरोबर मी त्यांची bag पण काढून दिली...’sorry he bothered you a lot!!’ ते दोघेही मला पुन्हा पुनः म्हणू लागले आणि मी मात्र it was a pleasure म्हणत हा पठ्ठ्या उठतोय का बघत होतो...पण नाही..डाराडूर ....
विमाना बाहेर आल्यावर जरा पुढे मागे झालो आम्ही आणि काय कि पण ते एकदम हरवलेच...असतील तिथेच पुढे मागे पण मला एकदम दिसेच्नात...तेचं काय काहीच दिसेना..थांबलो...रुमाल काढला ..डोळे पुसले आणि मार्गस्थ झालो...त्याची पापी घ्यायची राहूनच गेली ...
कुठले ऋणानुबंध असतात देव जाणे ...माडगुळकर म्हणूनच गेलेत...’दोन ओंडक्यांची होते सागरात भेट ...एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ’...
वाचने
8418
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लिहिलंय
किती गोड मुलगा! लेखन आवडले.
छान लिहीले आहे...
धन्यवाद
किती गोडुलं बाळ!सुंदर अनुभव.
आवडले!
हृदयस्पर्शी !
गुटगुटीत गुस्ताव बाळ डोळ्या
वा!
खुपच सुंदर अनुभव आणि भावपुर्ण
अप्रतिम ...
कुठले ऋणानुबंध असतात देव जाणे
मला वाटलं..
काय हे
In reply to मला वाटलं.. by अर्धवटराव
असं वर्णन पूर्वी वाचलं आहे...
In reply to काय हे by अत्रन्गि पाउस
डॉल्फीन्सारखी सुळकी मारतात.
In reply to असं वर्णन पूर्वी वाचलं आहे... by अर्धवटराव
कुठच्या जन्मीच देणं फेडुन
अगदी अस्सच
In reply to कुठच्या जन्मीच देणं फेडुन by स्पंदना
मोरपिशी आठवण
छान लिहिलय्..अ़क्षरशः
अशा गोष्टी कधी कधी फारच
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वरछान लिहिलय
सुखद लेख
खरंय तुमचे
In reply to सुखद लेख by राही
खरच सुंदर
बाळ थोडे मोठे असावे. साधारण
काय गोड लेख. असे एकदोन प्रसंग
बॅट्मॅन भौ
In reply to काय गोड लेख. असे एकदोन प्रसंग by बॅटमॅन
छान अनुभव!
गोड लेख !
.
अनुभव सुंदर, लिखाण अतिसुंदर!!
पुन्हा एकदा हा लेख वाचला
अनुभव आवडला.
मस्त
अनुभवकथन आवडले
नशिबवान आहात. च्यामारी लहान
In reply to अनुभवकथन आवडले by श्रीरंग_जोशी
त्या वेण्या मिश्या अन टोकदार
In reply to नशिबवान आहात. च्यामारी लहान by कॅप्टन जॅक स्पॅरो
चकाचक शेव्हडं असतो कायम =))..
In reply to त्या वेण्या मिश्या अन टोकदार by स्पंदना
मिशी :-)
In reply to चकाचक शेव्हडं असतो कायम =)).. by कॅप्टन जॅक स्पॅरो
एकदा कधी नाही ते दाढी वाढवुन
In reply to मिशी :-) by श्रीरंग_जोशी
छान लिहिलय
बाळाचे नाव असावे
In reply to छान लिहिलय by सस्नेह
हो
In reply to बाळाचे नाव असावे by श्रीरंग_जोशी
गुस्ताव
In reply to छान लिहिलय by सस्नेह
मस्त
खुप गोड अनुभव
(No subject)
ये गुस्ता नही... ये गुस्सा है
In reply to (No subject) by कॅप्टन जॅक स्पॅरो