Skip to main content

गुस्ताव

मंगळवार, 17/02/2015 या दिवशी प्रकाशित केले.
तीन साडेतीन वर्षांपूर्वीची एक प्रसन्न शनिवार सकाळ कोपेनहेगन ते स्टोकहोम फ्लाईट आणि मला शेवटून दुसर्या रांगेतली मधली सीट. डाव्या बाजूच्या खिडकीजवळ एक रागीट चेहेर्याचा मिशीवाला आणि उजवीकडे एक साठीतली मावशी ... गुड मोर्निंग वगैरे करून स्थानापन्न झालो..यथासमय विमान हलले आणि कुणीतरी मला हळूच टपलीत मारल्या सारखे वाटले .. भास असेल म्हणून दुर्लक्ष करून मी खिडकी बाहेर बघू लागलो .. विमान रनवे वर धावू लागले आणि पुन्हा एक हलकेच टपलीत .. ह्यावेळी केसही ओढल्यासारखे वाटले...पण मागे वळून बघणे शक्य नव्हते...विमान उडाले आणि मागे गुस्ताव असे कुणीसे दटावले पण त्याचा काही उपयोग व्हायच्या आत तिसरी टपलीत ... मी कमरेचा बेल्ट सोडला आणि मागे वळून बघितले..एक देखणे जोडपे कमालीचे ओशाळून मला सॉरी सॉरी म्हणत होते आणि त्यंच्या मांडीवर एक ७-८ महिन्याचे गोरेपान बाळ ..आपले मिस्कील निळेशार डोळे माझ्यावर रोखून हात उगारून तयार...गुबगुबीत गाल ..लाल चुटूक ओठ ...सोनेरी केस... मी त्याच्याकडे दोन्ही हात पसरताच मनसोक्त खिद्ळून त्याने उडी मारली..व तडक माझ्याकडे आला ...त्यच्या आईवडिलांना हे नवल वाटले ... “तो तसा कुणाकडे जात नही नुस्त लांबून खेळतो” इति बाळाचे पिताश्री पिताश्री...मी म्हटले ‘तुमची हरकत नसेल तर खेळतो मी थोडावेळ’ lukily they agreed… मग काय माझ्या मांडीवर उड्या काय ..माझे केस काय ओढले..गाल काय चाटले..आणि अरे अरे म्हणेस्तोवर बाजूच्या मिशिवाल्याचा पेपर फर्रकन उडवला...ते बेण गुरुगुर्ले पण करतो काय..एव्हापर्यंत बाजूच्या मावशीने मासिक बंद करून त्याच्याशी बोलायला सुरुवात केली ... पण ह्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून हा बाबा त्याच्या अगम्य भाषेत मला हं हुं करून काय काय सांगत होता कि ... नुस्त फुंकर मारली तर खळखळून हसायचा...गळ्याला गुदगुल्या केल्या तर हा आरडाओरडा ..दणादण उड्या काय ..हसून हसून नुसती धमाल...पण १५ -२० मिंट दंगा केल्यावर आली झोप..तर सरळ गळ्यात हात टाकून झोपून गेला...त्याची आई आली व हळूच त्याला घेऊ लागली ... तर जे घट्ट धरलन मला ... त्याच्या आईला म्हटलं असू देत ..तुम्ही बसा मागे ... जेमतेम १ तासाची फ्लाईट त्यात ५० मिनिटे हे चालू...विमान उतरायला लागल्यावर मात्र हवाई सुंदरीने बाळाला आईकडे द्यायला लावले..चाळवलेली झोप आणि त्यात आं ऊ करत गेलं आईकडे... विमान उतरले ...एरो ब्रिज लागला ...लोकं उठून सामान घेऊन जायला लागले ... माझ्या bag बरोबर मी त्यांची bag पण काढून दिली...’sorry he bothered you a lot!!’ ते दोघेही मला पुन्हा पुनः म्हणू लागले आणि मी मात्र it was a pleasure म्हणत हा पठ्ठ्या उठतोय का बघत होतो...पण नाही..डाराडूर .... विमाना बाहेर आल्यावर जरा पुढे मागे झालो आम्ही आणि काय कि पण ते एकदम हरवलेच...असतील तिथेच पुढे मागे पण मला एकदम दिसेच्नात...तेचं काय काहीच दिसेना..थांबलो...रुमाल काढला ..डोळे पुसले आणि मार्गस्थ झालो...त्याची पापी घ्यायची राहूनच गेली ... कुठले ऋणानुबंध असतात देव जाणे ...माडगुळकर म्हणूनच गेलेत...’दोन ओंडक्यांची होते सागरात भेट ...एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ’...

वाचने 8418
प्रतिक्रिया 50

प्रतिक्रिया

मूवी / रेवती ताई /आदुबाळ

कुठले ऋणानुबंध असतात देव जाणे ...माडगुळकर म्हणूनच गेलेत...’दोन ओंडक्यांची होते सागरात भेट ...एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ’...
:( खरयं.

ते कुत्र्याचं पिलु होतं का काय :) छान जमली गट्टी :)

In reply to by अर्धवटराव

एक ७-८ महिन्याचे गोरेपान बाळ ..आपले मिस्कील निळेशार डोळे माझ्यावर रोखून हात उगारून तयार...गुबगुबीत गाल ..लाल चुटूक ओठ ...सोनेरी केस... मी त्याच्याकडे दोन्ही हात पसरताच मनसोक्त खिद्ळून त्याने उडी मारली..व तडक माझ्याकडे आला
आता हे वर्णन ..

In reply to by अर्धवटराव

डॉल्फीन्सारखी सुळकी मारतात. अहो अर्धवटराव ७-८ महिन्याच बाळ म्हणजे रांगायला लागलेलं बाळ. निदान पोटाने सरकतात तरी ही बाळे पुढे. जाम धावावं लागत घरात या वयाच्या बाळांपाठुन. वर काय आहे या वर नजर आणि तेथे पोहोचायला सगळ धरुन खेचायच. पायात तर कितीदा येतील.

कुठच्या जन्मीच देणं फेडुन गेला पठ्ठ्या !! किती छान वाटत ना लहाण बाळ आपल्या गळ्यात हात टाकून झोपी गेलं की? निर्धास्त असतात ती आणि त्यांचा तो विश्वास पाहून भरुन येतं.

आपल्या छातीवर शांतपणे विसावलेला एक जीव आणि काही क्षणांपुरते तरी आपण त्याचे रक्षणकर्ते, त्याच्या निर्धास्त निद्रेचे आणि त्यात तो कदाचित पाहात असलेल्या स्वप्नांचे रक्षणकर्ते आहोत ही भावना किती सुखद असते!

In reply to by राही

कसलाही 'व्यवहार' नसलेले हे क्षण ... माझ्यापुरते मी अतिशय भरभरून जगतो ...

खूप छान लिहिल आहे. माझ्या लेकींच लहानपण आठवल...

छान अनुभव! अवांतरः लेख काथ्याकुट मधे का टाकला आहे? - (गुस्ता'ख') सोकाजी

डोळ्यासमोर चित्र उभे राहिले . छान लेख

छोटासा अनुभव पण अगदी सुरेख शब्दांत लिहिलाय! वा!

अनुभवकथन आवडले. प्रवासात अनेकदा अशा गोंडस बाळांशी अंतर राखून खेळण्याची संधी मी सोडत नाही. तुमच्या मनात दाटून आलेल्या भावना समजू शकतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

नशिबवान आहात. च्यामारी लहान पोरांना काय माझ्याशी वैर आहे काय माहित. अजिबात जवळ येत नाहीत. :( मी घ्यायला गेलो की ही डायरेक्ट तारसप्तकात रडायलाचं लागतात.

In reply to by स्पंदना

चकाचक शेव्हडं असतो कायम =)) ... का कोण जाणे पण पोरं जामचं घाबरतात मला....आणि नेमकी लहानं मुलं प्रचंड आवडतात मला आणि त्यांना मात्र :(

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

माझे तर असे निरीक्षण आहे की बाळ जर मुलगी असेल तर बिनमिशीच्या मामा किंवा काकाकडे जायला ते नाखुष असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

एकदा कधी नाही ते दाढी वाढवुन माझ्या मामेबहिणीकडे गेलो होतो. त्यादिवशी तिच्या मुलीला रडवायला मला जवळ सुद्धा घ्यायला लागलं नाही =)) बाकी मामा आणि काका...एवढ्या "आत्त्या"चार नको =))

In reply to by श्रीरंग_जोशी

त्या बाळाचे नाव आहे ... स्वीडन मध्ये हे नाव चांगलेच प्रचलित आहे .

In reply to by सस्नेह

'गुस्त'णे म्हणजे आवडणे (स्पॅनीश). त्यावरुन गुस्ताव म्हणजे '( सर्वांच्या ) आवडीचा' असा काहि अर्थ असावा.

अनुभव ...