✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लग्न.... लिव इन रिलेशन.... डिवोर्स

ज
ज्योति अळवणी यांनी
Wed, 02/18/2015 - 00:21  ·  लेख
लेख
"माझ्या मुलीनी लग्न नाही केल न तरी मी तिला नक्की सपोर्ट करेन. काय मिळतं ग लग्न करून? सतत अपमान! आई-वडिलांचा उद्धार आणि कितीही केल तरी माझा कशावरही हक्क नाही हे सतत एकवून दाखवणं... त्यापेक्षा तुझ्यासारख उत्तम शिक्षण घ्याव आणि चांगली नोकरी करून इंडिपेंडेंट आयुष्य जगाव." आज परत सुरुचिचा.... माझ्या शाळेपासूनच्या मैत्रिणीचा.... पारा चढ़ला होता. सहाजिकच होत ते. ती कितीही खपली तरी सतत दूषणं ऐकावी लागायची तिला. शाळेपासूनच ती खूप हुशार. तिला फ़क्त डॉक्टर नाही तर सर्जन बनायचे होते. पण मग कितीतरी वर्ष फ़क्त शिक्षण. मग तितकाच् शिकलेला नवरा मिळेल का... परवडेल का... असा विचार करून आई-वडिलांनी 12वी नंतर पैथोलॉजीचा कोर्स करायला लाउन मग लग्न उरकुन टाकले होते. लग्नानंतर जसा इतरांचा सर्व साधारण संसार होतो तसा तिचाही चालला होता. सासु अधुन मधून टॉन्ट्स मारायची. नवरा-बायको दोघे कामावरून दमुन आलेले असायचे... मग एखाद्या विषयावारुन दोघांची जुंपायची. मग सगळी पुढची-मागची उणी दूणी काढली जायची.... आणि मग त्या वीकएंडला आमच दोघींच भेटण ठरलेल; आणि तिच स्वतः च्या आयुश्याबद्दल रडणं आणि मी कशी सुखी आहे याच कौतुक क़रण ठरलेल. माझी गोष्ट थोड़ी वेगळी होती. म्हणजे मीच ती ठरवून वेगळी घडवली होती. मी काही अभ्यासात हुशार नव्हते. पण खूप बड़बड़ी होते. प्रचंड मोठा मित्र परिवार. सर्वसाधारणपणे जसे अनेक जण फ़ार करिअरचा विचार न करता ग्रेजुएट होतात तशी मी देखिल झाले होते. पण अजुन नोकरिच जमत नव्हतं. मला इटक्यात लग्न नव्हतं करायच. बाबा माझ्या बाजूनि होत... म्हणून ठिक होत. एकदा बाबांचे एक मित्र घरी आले होते. म्हणाले तू इतकी बोल्ड आहेस, स्मार्ट आहेस मग मिडीयामधे ट्राय कर न. उद्या या पत्यावर जा. माझा मित्रच आहे. मी बोलून ठेवतो. मी दुस-या दिवशी गेले... आणि माझ नशिब अस जोरदार की मला त्या चॅनेलमधे चांगला चान्स मिळाला. आणि मग मी कधीच मागे वळून बघितल नाही. मला लग्नाबद्धल फ़ार उत्सुकता नव्हती. आणि मग करियर करताना राहून गेल. आई मागे लागली काही वर्ष आणि मग तिनेही नाद सोडला. आता मी मस्त कमवून आणि माझा स्वतःचा फ्लॅट घेऊन राहात होते. एक मित्र होता... आम्ही लग्नाचा विचार केला नव्हता. तसे एकत्र होतोही आणि नव्हतोही आम्ही. पण अलीकडे मात्र आमचे खटके उडायला लागले होते. मी कधी कुठे जाते... काय करते ते तो सतत मला विचारायचा. आणि जर मी विचारल तर तू काय माझी बायको आहेस का? अस म्हणून मला गप्प् करायचा. समोर असला तरच माझा... अस वागायचा. मला हे अस राहाण खटकत होत....आवडत नव्हतं. मी सुरुचिला हे माझ्या मनातल अलीकडे एक-दोनदा बोलले देखिल होते. एकदा सुरुचि आणि मी असच एका मॉलमधे बसून गप्पा मारत होतो. अचानक मला सविता दिसली. आमची तिसरी पार्टनर. मला आश्चर्य वाटल. तिला मी हाक मारली. "सविता... अग... तू इथे?" तिने आम्हाला बघितल आणि कड़कडून मिठी मारली. "अग मी इथेच असते आता. कधीच परत आले U. S. हुन. अग मी डिवोर्स घेतला." तिने सहज एखादी सामान्य घटना सांगावी तस सांगितल. आम्ही दोघी अवाक् झालो. कारण तिच्या आवडीच शिक्षण तिने घेतल होत.सविता स्वतः C. A. होती. लग्न सुद्धा प्रेम करून मग केल होत. आणि आज ती घटस्फोट घेऊन परत इथे आली होती. "नाही पटल त्याच आणि माझ. एक्चुअली मला करियरसुद्धा हव होत आणि संसारसुद्धा. दोन मूलं तरी हवित अस माझ मत. करियर करणार तर मुलांना कोण सांभाळणार... आणि मग त्याचं वाया जाण... ते टेन्शन.. त्याला ते नको होत. तो म्हणाला मी नोकरी सोडतो... घर मूलं सांभाळतो तू करियर कर; कमव. ते का कोण जाणे मला नाही पटल. सारखी भांडण... वाद... शेवटी आम्ही डिवोर्सचा निर्णय घेतला. म्यूच्यूअली झाला. त्यामुळे त्रास नाही झाला. And now here I am back ti u both beautiful girls." अस म्हणून सविता हसली.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26390 वाचन

💬 प्रतिसाद (91)

प्रतिक्रिया

(No subject)

एस
Wed, 02/18/2015 - 00:35 नवीन
:-)
  • Log in or register to post comments

क्रमशः राहीलंय का ?

खटपट्या
Wed, 02/18/2015 - 00:39 नवीन
क्रमशः राहीलंय का ?
  • Log in or register to post comments

अरेरे...

ब़जरबट्टू
Wed, 02/18/2015 - 09:03 नवीन
एकंदरीत कथेतील मुंलीना कोणत्याही परीस्थितीत स्वत:ला सांभाळणे व लवचिकता दाखवणे कठिण जातेय तर.. ना लग्न झालेली सुखी आहे, ना लिव्ह इन वाली.. तिसरी तर कहर आहे, प्रेमविवाह करून आणि वर इतका सोशिक व सामंज्यसपणा असलेला नवरा भेटल्यावर पण ये हाल ? रब्बा... :(
  • Log in or register to post comments

तिसरी तर कहर आहे

प्रशांत बच्छाव
Tue, 03/06/2018 - 13:54 नवीन
तिसरी तर कहर आहे हाहाहाहा भारी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

हा लेख लिहिण्यामागे एक

ज्योति अळवणी
Wed, 02/18/2015 - 09:15 नवीन
हा लेख लिहिण्यामागे एक उद्देश् असा आहे की सिचुएशन कशीही असली तरी आपली मानसिकता आपल्याला समजणे आवश्यक आहे. अजूनही आपले अनेक निर्णय हे इतरांवर अवलंबून असतात. स्वाभाविक आहे कारण आपण कुटुंब व्यवस्थेत राहतो. परंतु तरीही... premarital Councelling आवश्यक आहे. त्याशिवाय आपण घेतलेला निर्णय जर अयोग्य वाटला तर तो बदलावा; कदाचित् त्यात जास्त मोकळ जगण्याचे chances आहेत.
  • Log in or register to post comments

परंतु तरीही... premarital

हाडक्या
Wed, 02/18/2015 - 16:29 नवीन
परंतु तरीही... premarital Councelling आवश्यक आहे.
काय हो काकू, तुम्ही "विवाहपूर्व समुपदेशन" करता काय ? नै म्हंजे बर्‍याचदा राम-बाण उपाय असल्यागत सांगत असताय म्हणून विचारलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी

छान

ऋषिकेश
Wed, 02/18/2015 - 10:00 नवीन
तीन कथाबीजांना एकत्र गुंफण्याची कल्पना आवडली. अधिक तपशीलवार आणि धीमेपणाने प्रसंग फुलवले असते तर बहार आली असती. पुलेशु.
  • Log in or register to post comments

काळ बदलला आहे असं म्हणतात .

चिनार
Wed, 02/18/2015 - 10:56 नवीन
काळ बदलला आहे असं म्हणतात . पण मनुष्य स्वभाव बदलला नसावा. ह्या २ गोष्टी गृहीत धरून माझ मत मांडतो १. चार लोकं लग्न करतात म्हणून आपणही करावं हे चुकीचं आहे. तरीही लग्न करायचेच असल्यास ,त्या चार लोकांच्या आयुष्यात जर त्रयस्थ पणे डोकावून बघा. त्यांची लग्न यशस्वी झाली असं वाटत असेल तर त्यामागची कारणं पडताळून बघा. लग्न ही खूप मोठी जबाबदारी आहे. स्वत:च्या जोडीदाराला समजून घेणं आणि प्रसंगी समजावून सांगणं किंवा गरज पडलीच तर समज देणं खूप महत्वाच असतं. कुठलाही एक नियम लावून संसार करणं शक्य नाही. प्रसंगनिष्ठ निर्णय घेत आले पाहीजे. काही निर्णय चुकतात. चुकू द्या. जोडीदाराच्या प्रत्येक कृतीवरून निष्कर्ष काढणं योग्य नाही. कधी कधी परिस्थितीपुढे सगळेच हतबल असतात. संसारात "मी" थोडासा बाजूला ठेवावा. २. फक्त लग्न न करण्याला पर्याय म्हणून लिव्ह इन राहणे योग्य नाही. काही लोकांचा स्वभावानुसार त्यांनी एकटेच राहिलेले बरे असते. आजकाल फक्त शरीरसुखासाठी लिव्ह इन राहण्याची पद्धत आहे.ते पटत असेल असेल तरच राहा. लिव्ह इन मध्ये जोडीदाराकडून कुठलीही अपेक्षा ठेवता येत नाही. "मी तुझा/तुझी नवरा/बायको नाही" एवढं म्हटलं की झालं.खरं म्हणजे लिव्ह इन ही कल्पना पूर्ण समजावून न घेता ती अंगीकारण्यात आली आहे असं वाटते. लग्न असो किंवा लिव्ह इन, कोणतंही नातं निभावण्यासाठी तशी तयारी हवीच. ३. घटस्फोट होणं खरोखर दुर्दैवी आहे. काही नवरे किंवा बायका खरच सहवासाच्या लायकीचे नसतात. तिथे घटस्फोटा शीवाय पर्याय नाही. पण बऱ्याच केसेस अश्या आढळतात जिथे नवरा बायको मध्ये पटत नसल्यामुळे त्यांच्यातला संवाद च बंद होतो. त्यामुळे दरी निर्माण होते. शेवटी घटस्फोट घेतल्या जातो. अश्या ठिकाणी कोणी मध्यस्थी केल्यास संसार वाचू शकतो.
  • Log in or register to post comments

आवडला

राही
Wed, 02/18/2015 - 17:06 नवीन
प्रतिसाद आवडला. कधी कधी तत्त्वे बाजूला ठेवून प्रसंगनिष्ठ निर्णय घ्यावे लागतात. जज्मेंटल न होणे, उपदेश न करणे आणि लवचिकता या तीन गोष्टी दृढ नात्यासाठी आवश्यक असाव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

दोन्ही प्रतिसादांना +१!

बहुगुणी
Wed, 02/18/2015 - 17:52 नवीन
दोन्ही प्रतिसादांना +१!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

ब़जरबट्टूशी

आकाश कंदील
Wed, 02/18/2015 - 11:01 नवीन
ब़जरबट्टूशी पूर्ण सहमत
  • Log in or register to post comments

पहिल्या दोन केसेस ठिक आहेत.

अन्या दातार
Wed, 02/18/2015 - 14:53 नवीन
पहिल्या दोन केसेस ठिक आहेत. तिसरी केस अक्षरशः गॉन केस आहे.
नाही पटल त्याच आणि माझ. एक्चुअली मला करियरसुद्धा हव होत आणि संसारसुद्धा. दोन मूलं तरी हवित अस माझ मत. करियर करणार तर मुलांना कोण सांभाळणार... आणि मग त्याचं वाया जाण... ते टेन्शन.. त्याला ते नको होत. तो म्हणाला मी नोकरी सोडतो... घर मूलं सांभाळतो तू करियर कर; कमव. ते का कोण जाणे मला नाही पटल.
You want to eat the cake and have it too! असे काहिसे आहे. पण त्यावर घटस्फोट हा उपाय वाटत नाही. समजा करीअर हवे आणि मुले नकोत यासाठी घटस्फोट समजू शकतो. पण मुलेही हवीत, त्यांची जबाबदारी तर नको, नवरा कमावणार नाही हेही नको म्हणून घटस्फोट? काय लॉजिक काय आहे यामागे?
  • Log in or register to post comments

२+२=४ एवढं सरळं गणित जर का

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 02/18/2015 - 15:36 नवीन
२+२=४ एवढं सरळं गणित जर का मुलींच्या डोक्यानी निघालं असतं तर समस्तं पुरुष जमात सुखी झाली नसती का? नको तिथे कॉम्प्लेक्सीटी वाढवण्यामधे त्यांचा हात कोणं धरणार? =)) चला पॉपकॉर्न, पिझ्झा, कोक आणि बर्गर मागवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

२+२=४ एवढं सरळं गणित जर का

मदनबाण
Wed, 02/18/2015 - 15:38 नवीन
२+२=४ एवढं सरळं गणित जर का मुलींच्या डोक्यानी निघालं असतं तर समस्तं पुरुष जमात सुखी झाली नसती का? प्रचंड अनुमोदन ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

तेल, तूप, सरपण, पेट्रोल घेउन

टवाळ कार्टा
Wed, 02/18/2015 - 17:36 नवीन
तेल, तूप, सरपण, पेट्रोल घेउन बसू का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

Kharay

प्रशांत बच्छाव
Tue, 03/06/2018 - 13:58 नवीन
Kharay
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मी सुधा लिव इन रिलेशन मध्ये रहिलो आहे

यमगर्निकर
Wed, 02/18/2015 - 14:57 नवीन
मि सुद्धा लिव इन रिलेशन मध्ये राहिलो आहे, ते हि ३ वेळा, पण एक वेळ अशी येते कि स्त्रि पुरुषान्च्य नात्याला काहितरी बन्धन हे लागतेच नाहितर काचेच्या पेल्या सारखे नाते फुटुन जाते, वरिल लेखामध्ये एक स्त्रि तिच्या जोडिदाराला विचारते तेव्हा तो तिला म्हनतो कि तू काय माझी बायको आहेस का? अस म्हणून मला गप्प् करायचा. ह्या वाक्यातच लिव्ह इन रिलेशन चा पोकळ्पना लक्षात येतो, आणि तो कितपत टिकु शकतो, हे समजते,
  • Log in or register to post comments

मि सुद्धा लिव इन रिलेशन मध्ये

सूड
Wed, 02/18/2015 - 15:51 नवीन
मि सुद्धा लिव इन रिलेशन मध्ये राहिलो आहे, ते हि ३ वेळा
बरं मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यमगर्निकर

ते ३ वेळा पस्तावले असे

टवाळ कार्टा
Wed, 02/18/2015 - 17:37 नवीन
ते ३ वेळा पस्तावले असे लिहायचे आहे त्यांना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

+1111111111111111

पाणक्या
गुरुवार, 10/27/2016 - 10:27 नवीन
+1111111111111111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

काय सूड?

स्पंदना
गुरुवार, 02/19/2015 - 13:22 नवीन
काय सूड? यमगर्नीसारख्या गावातला मुलगा अस काही करतो याच कौतुक राहीलं बाजूला वर आणि "बरं मग?" काय? आधी कौतुक कर, थोड कुतुहल दाखव, जरा स्वतःला इन्फेरीअ‍ॅरीटी आल्याच दाखव, क्या है उसमे जो मुझमे नहे है? वगैरे फिल्मी स्टायल ओरडुन घे... ते राहीलं बाजूला बरं मग? म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

यमगर्नीसारख्या गावातला मुलगा

सूड
गुरुवार, 02/19/2015 - 14:42 नवीन
यमगर्नीसारख्या गावातला मुलगा अस काही करतो याच कौतुक राहीलं बाजूला वर आणि "बरं मग?" काय? आधी कौतुक कर, थोड कुतुहल दाखव, जरा स्वतःला इन्फेरीअ‍ॅरीटी आल्याच दाखव, क्या है उसमे जो मुझमे नहे है? वगैरे फिल्मी स्टायल ओरडुन घे... ते राहीलं बाजूला बरं मग? म्हणे
अर्र!! चुकलंच की!! आता केलं तर उसनं अवसान आणून केल्यागत वाटेल. आता नेक्स्ट टाईम प्रयत्न करतो. पुण्यातलं पाणी पितोय म्हणून की काय देव जाणे; शिंचं दुसर्‍याचं कौतुक, स्वतःबद्दल इन्फेरीअ‍ॅरीटी वैगरे काही वाटतच नाही हो आताशा!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

पुण्यातलं पाणी पितोय म्हणून

टवाळ कार्टा
गुरुवार, 02/19/2015 - 14:49 नवीन
पुण्यातलं पाणी पितोय म्हणून की काय देव जाणे; शिंचं दुसर्‍याचं कौतुक, स्वतःबद्दल इन्फेरीअ‍ॅरीटी वैगरे काही वाटतच नाही हो आताशा!!
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:

चिनार
गुरुवार, 02/19/2015 - 15:01 नवीन
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

पुण्यातलं पाणी

मदनबाण
गुरुवार, 02/19/2015 - 15:11 नवीन
*LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

किमान दोन-चार खोटे क्लेम

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 02/19/2015 - 17:25 नवीन
=)) किमान दोन-चार खोटे क्लेम टाकले असतेत तरं जास्तं बरं वाटलं असतं. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

पुण्यातलं पाणी पितोय म्हणून

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 02/19/2015 - 23:23 नवीन
पुण्यातलं पाणी पितोय म्हणून की काय देव जाणे; शिंचं दुसर्‍याचं कौतुक, स्वतःबद्दल इन्फेरीअ‍ॅरीटी वैगरे काही वाटतच नाही हो आताशा!! या असल्या रॉकेटचं इंधन भरलेल्या समिधा कोणत्या दुकानात मिळतात हो ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

या असल्या रॉकेटचं इंधन

पिवळा डांबिस
Fri, 02/20/2015 - 01:55 नवीन
या असल्या रॉकेटचं इंधन भरलेल्या समिधा कोणत्या दुकानात मिळतात हो ?
'सदाशिव समिधा भांडार' आमचेकडे रॉकेटचे इंधन भरलेल्या समिधा (आणि परकर!) माफक भावात मिळतात!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

इंधन भरलेल्या समिधा (आणि परकर

खटपट्या
Fri, 02/20/2015 - 02:17 नवीन
इंधन भरलेल्या समिधा (आणि परकर!)
बाबौ. "झेरोक्स आणी घाउक कांदे बटाटे" असा फलक प्रत्यक्ष पाहीलेला... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

(No subject)

अजया
Fri, 02/20/2015 - 07:46 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

समिधा (आणि परकर!)

सूड
Fri, 02/20/2015 - 18:02 नवीन
समिधा (आणि परकर!)
झालंच तर दणकट पायजमे, आमसुलं, आंब्याची साटं आणि काही ठिकाणी १०व्या-१२व्याचं जेवण!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

दहाव्या-बाराव्याच्या जेवणाची

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/20/2015 - 20:35 नवीन
दहाव्या-बाराव्याच्या जेवणाची ऑर्डर कमीतं कमी १५ दिवस आधी द्यावी हे लियायचं विसरलात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

रंगार्‍याला द्यायचे पैसे आणि

सूड
Fri, 02/20/2015 - 20:36 नवीन
रंगार्‍याला द्यायचे पैसे आणि बोर्डावरची जागा यात येवढंच मावलं !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

खाली कागद लावायचा ना मग!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/20/2015 - 20:37 नवीन
=)) खाली कागद लावायचा ना मग!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

वरच्या प्रतिसादातल्या ३ हा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 02/18/2015 - 15:53 नवीन
वरच्या प्रतिसादातल्या ३ हा आकडा लिव्ह इन रिलेशनशिपची व्यवहार्यता दर्शवतं नै काय? तिथेचं एक आकडा असता आणि रहातोय असां व्याकरणिक बदल असता तर मी पाठिंबा दिला असता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यमगर्निकर

जर लिव्ह इन नसतं तर तुम्हाला

ऋषिकेश
Wed, 02/18/2015 - 17:15 नवीन
जर लिव्ह इन नसतं तर तुम्हाला हा प्रयोग ३ वेळा करणं किती सुलभ राहिलं असतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यमगर्निकर

तीन वेळा ?

खटासि खट
Tue, 02/24/2015 - 07:11 नवीन
तीन वेळा ? आयला तुमची नेमणूक एआयबी चा होस्ट म्हणून करणेत येत आहे. जोहार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यमगर्निकर

तीन तर्‍हेच्या व्यक्तिरेखा

सूड
Wed, 02/18/2015 - 15:52 नवीन
तीन तर्‍हेच्या व्यक्तिरेखा एकत्र मांडणं आवडलं!!
  • Log in or register to post comments

अशी काही करायचं हे

कंजूस
Wed, 02/18/2015 - 20:30 नवीन
अशी काही करायचं हे ठरवणाऱ्याचं गणित, होय गणित चुकतंच. कर्मकांड, विधि, कोर्टमैरैजपेक्षाही केवळ एका शब्दावर बायको म्हणून वागवण्याइतकी निष्ठा दाखवणारे पुरूष होतील तेव्हा खरे लग्न होते. कागदोपत्री लिखापढी एक गरज म्हणून ,जगाला पुराव्यासाठी असते.
  • Log in or register to post comments

मस्त हो कंजूस काका. मानलं.

स्पंदना
गुरुवार, 02/19/2015 - 13:23 नवीन
मस्त हो कंजूस काका. मानलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

फालतु लेख..

जेपी
Wed, 02/18/2015 - 20:34 नवीन
फालतु लेख.. तिसरा तर टोटल फालतु
  • Log in or register to post comments

+१ ..

हाडक्या
Wed, 02/18/2015 - 22:37 नवीन
+१ .. म्हणूनच जास्त शिरेस घेउ नका. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

सारांश

नाखु
गुरुवार, 02/19/2015 - 11:45 नवीन
लग्न लिव्ह इन रिलेशन घटस्फोट हे तीनही वेगवेगळ्या व्यक्तीबरोबर व्हावेत म्हणजे आपण लग्न,प्रपंच,बांधीलकी अशा पुरोगामी जोखडातून बाहेर पडून नवमतवादी,क्रांतीकारी वैगरे होतो आणि समाजसुधारणेची धुरा फक्त आपल्यालाच वहायची आहे असा "संक्षी-प्त" साक्षात्कार लवकरच होतो. चिर्कूट पुरोगामी नाखु.
  • Log in or register to post comments

नाद खुळा!!!!!! ==))

लॉरी टांगटूंगकर
गुरुवार, 02/19/2015 - 14:51 नवीन
नाद खुळा!!!!!! ==))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

अहं

सोत्रि
गुरुवार, 02/19/2015 - 21:53 नवीन
काही पटले नाही आणि झेपलेही नाही! - (कमिटेड) सोकाजी
  • Log in or register to post comments

मला फक्त एव्हडेच सांगायचे होते कि.

यमगर्निकर
Fri, 02/20/2015 - 17:25 नवीन
मला फक्त एव्हडेच सान्गायचे होते कि लिव्ह इन रिलेशन हे फक्त सुरुवातिलाच खुप छान वाटते पण कालानतराने त्यातिल गोडवा सम्पुन जातो, आणि लग्नाच्या बाबतित सुधा हेच होते पण लग्नच्या नात्यात सासु सासरे, दिर, ननन्द, भावजय इत्यदि नाति इन्वोल असतात सगळे हसत खेळत, रडत भान्डत एकमेकाना साम्भाळत असतात त्यामुळे आयुष्यातिल गोडवा कधिहि सम्पत नाहि. पण लिव्ह इन रिलेशन मध्ये हि सर्व नाति नसतात आणि मुख्य म्हणजे नात्याला बन्धन नसते त्यामुळे आकर्षन सम्पले कि नाते लवकरच संपुष्तात यायला सुरुवात होते. त्यामुळे लिव्ह इन रिलेशन वर पुर्ण आयुष्य निघन्याचि स्वप्ने कधिच बघु नये. त्यासाठि लग्नाला पर्याय नाहि, पण तरिहि आयुष्यात एकदा का होइना लिव्ह इन रिलेशन चा अनुभव घ्यावा. ( ते हि लग्नच्या आधि आणि ते हि हिंमत असेल तरच ) त्या नात्यातुन जो आनन्द मिळतो त्याचि तुम्हि आयुष्यात कोण्त्याहि नात्याबरोबर तुलना करु शकनर नाहि.
  • Log in or register to post comments

त्या नात्यातुन जो आनन्द मिळतो

सूड
Fri, 02/20/2015 - 18:05 नवीन
त्या नात्यातुन जो आनन्द मिळतो त्याचि तुम्हि आयुष्यात कोण्त्याहि नात्याबरोबर तुलना करु शकनर नाहि.
हो तर !! आता तुम्हाला तीन-तीनदा तो अनुभव घ्यावासा वाटला म्हणजे खरंच काहीतरी आनंद असणार त्यात, हे ओळखण्याइतके हुश्शांर आहेत मिपाकर. स्वगतः चला, आता लिव्हईन साठी कोणीतरी शोधणे आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यमगर्निकर

त्यांचं तात्पर्य आहे की लगीन

हाडक्या
Fri, 02/20/2015 - 19:51 नवीन
त्यांचं तात्पर्य आहे की लगीन करा म्हणजे दोघांनाही सासू-सासरे (आणि तुमाला म्हेवण्या, करवल्या इ.इ.) वगैरे नवीन गोग्गोड नाती मिळतात आणि त्यांच्यासोबत हसत-खेळत (लिव-इन मध्ये हे काय हसत-"खेळत" नव्हते काय मग?) उरलेले आयुष्य व्यतित (व्यथित?) होते. (शंका : हे कोणत्या मालिका बगतेत?). सूडा, यातून योग्य तो बोध घे. [अवांतर : यांनी ३-३ लिव-इन मध्ये राहून पण त्यांना सहचार्याचा अर्थच नाय कळाला तर लग्न करुन काय वेगळे होणारे. त्यांनी जे लग्नाच्या संदर्भात मुद्दे मांडलेत ते अत्यंत तकलादू आहेत आणि समाजात लिव-इनला सढळ मान्यता मिळाली तर टिकणारे नाहीत असे नमूद करतो.]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सूडा, यातून योग्य तो बोध घे.

सूड
Fri, 02/20/2015 - 19:56 नवीन
सूडा, यातून योग्य तो बोध घे.
काय बोध घ्यावा ते समजवून सांगा गुरुवर्य!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

ह्या ह्या ह्या.. आमचीच खेचा

हाडक्या
Fri, 02/20/2015 - 21:59 नवीन
ह्या ह्या ह्या.. आमचीच खेचा राव. ;) खाली पैसातैनी सांगितलाय बघ..
शादी का लड्डू, खाए वो पछताए, ना खाए वो भी पछताए.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा