Skip to main content

लग्न.... लिव इन रिलेशन.... डिवोर्स

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 18/02/2015 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
"माझ्या मुलीनी लग्न नाही केल न तरी मी तिला नक्की सपोर्ट करेन. काय मिळतं ग लग्न करून? सतत अपमान! आई-वडिलांचा उद्धार आणि कितीही केल तरी माझा कशावरही हक्क नाही हे सतत एकवून दाखवणं... त्यापेक्षा तुझ्यासारख उत्तम शिक्षण घ्याव आणि चांगली नोकरी करून इंडिपेंडेंट आयुष्य जगाव." आज परत सुरुचिचा.... माझ्या शाळेपासूनच्या मैत्रिणीचा.... पारा चढ़ला होता. सहाजिकच होत ते. ती कितीही खपली तरी सतत दूषणं ऐकावी लागायची तिला. शाळेपासूनच ती खूप हुशार. तिला फ़क्त डॉक्टर नाही तर सर्जन बनायचे होते. पण मग कितीतरी वर्ष फ़क्त शिक्षण. मग तितकाच् शिकलेला नवरा मिळेल का... परवडेल का... असा विचार करून आई-वडिलांनी 12वी नंतर पैथोलॉजीचा कोर्स करायला लाउन मग लग्न उरकुन टाकले होते. लग्नानंतर जसा इतरांचा सर्व साधारण संसार होतो तसा तिचाही चालला होता. सासु अधुन मधून टॉन्ट्स मारायची. नवरा-बायको दोघे कामावरून दमुन आलेले असायचे... मग एखाद्या विषयावारुन दोघांची जुंपायची. मग सगळी पुढची-मागची उणी दूणी काढली जायची.... आणि मग त्या वीकएंडला आमच दोघींच भेटण ठरलेल; आणि तिच स्वतः च्या आयुश्याबद्दल रडणं आणि मी कशी सुखी आहे याच कौतुक क़रण ठरलेल. माझी गोष्ट थोड़ी वेगळी होती. म्हणजे मीच ती ठरवून वेगळी घडवली होती. मी काही अभ्यासात हुशार नव्हते. पण खूप बड़बड़ी होते. प्रचंड मोठा मित्र परिवार. सर्वसाधारणपणे जसे अनेक जण फ़ार करिअरचा विचार न करता ग्रेजुएट होतात तशी मी देखिल झाले होते. पण अजुन नोकरिच जमत नव्हतं. मला इटक्यात लग्न नव्हतं करायच. बाबा माझ्या बाजूनि होत... म्हणून ठिक होत. एकदा बाबांचे एक मित्र घरी आले होते. म्हणाले तू इतकी बोल्ड आहेस, स्मार्ट आहेस मग मिडीयामधे ट्राय कर न. उद्या या पत्यावर जा. माझा मित्रच आहे. मी बोलून ठेवतो. मी दुस-या दिवशी गेले... आणि माझ नशिब अस जोरदार की मला त्या चॅनेलमधे चांगला चान्स मिळाला. आणि मग मी कधीच मागे वळून बघितल नाही. मला लग्नाबद्धल फ़ार उत्सुकता नव्हती. आणि मग करियर करताना राहून गेल. आई मागे लागली काही वर्ष आणि मग तिनेही नाद सोडला. आता मी मस्त कमवून आणि माझा स्वतःचा फ्लॅट घेऊन राहात होते. एक मित्र होता... आम्ही लग्नाचा विचार केला नव्हता. तसे एकत्र होतोही आणि नव्हतोही आम्ही. पण अलीकडे मात्र आमचे खटके उडायला लागले होते. मी कधी कुठे जाते... काय करते ते तो सतत मला विचारायचा. आणि जर मी विचारल तर तू काय माझी बायको आहेस का? अस म्हणून मला गप्प् करायचा. समोर असला तरच माझा... अस वागायचा. मला हे अस राहाण खटकत होत....आवडत नव्हतं. मी सुरुचिला हे माझ्या मनातल अलीकडे एक-दोनदा बोलले देखिल होते. एकदा सुरुचि आणि मी असच एका मॉलमधे बसून गप्पा मारत होतो. अचानक मला सविता दिसली. आमची तिसरी पार्टनर. मला आश्चर्य वाटल. तिला मी हाक मारली. "सविता... अग... तू इथे?" तिने आम्हाला बघितल आणि कड़कडून मिठी मारली. "अग मी इथेच असते आता. कधीच परत आले U. S. हुन. अग मी डिवोर्स घेतला." तिने सहज एखादी सामान्य घटना सांगावी तस सांगितल. आम्ही दोघी अवाक् झालो. कारण तिच्या आवडीच शिक्षण तिने घेतल होत.सविता स्वतः C. A. होती. लग्न सुद्धा प्रेम करून मग केल होत. आणि आज ती घटस्फोट घेऊन परत इथे आली होती. "नाही पटल त्याच आणि माझ. एक्चुअली मला करियरसुद्धा हव होत आणि संसारसुद्धा. दोन मूलं तरी हवित अस माझ मत. करियर करणार तर मुलांना कोण सांभाळणार... आणि मग त्याचं वाया जाण... ते टेन्शन.. त्याला ते नको होत. तो म्हणाला मी नोकरी सोडतो... घर मूलं सांभाळतो तू करियर कर; कमव. ते का कोण जाणे मला नाही पटल. सारखी भांडण... वाद... शेवटी आम्ही डिवोर्सचा निर्णय घेतला. म्यूच्यूअली झाला. त्यामुळे त्रास नाही झाला. And now here I am back ti u both beautiful girls." अस म्हणून सविता हसली.

वाचने 26454
प्रतिक्रिया 91

प्रतिक्रिया

In reply to by बॅटमॅन

कंजूस काकांच्या पोर पोरी एकत्र रहातेत या प्रतिसादाला दिलेला उपप्रतिसाद होता तो. अन सरदारजीला पोरी पटत होत्या, अन माझ्या नवर्‍याला नव्हत्या पटत याचा निव्वळ राग हो तो. त्यात अबलेचे शोषण वगैरे काऽऽऽही नाही बघा!! निव्वळ जेलसी बघा की वो सरदारजीमे क्या है जो मेरे नवरे मे नही है॥। *crazy*

In reply to by स्पंदना

हा प्रतिसाद वाचून आमच्या स्पाला इतकी प्रगत विचारांची आंतरजालीय सासू मिळालेली पाहून जीव भांड्यात पडला. पोरगं घाटावर पाठवायचं कसं हा प्रश्न पडला होता, हा प्रतिसाद वाचून मी डोळे मिटले तरी चालेल असं वाटतंय!!

In reply to by सूड

हा प्रतिसाद वाचून मी डोळे मिटले तरी चालेल असं वाटतंय!!
हापिसात डोळे मिटूनच असतोस म्हणे बहुतेक वेळ.. ;)

In reply to by सूड

म्या घरजावाय करुन घिन आस कदी म्हनलो? काय आटवत न्हाय गा!! म्या आपली मनात सोडे, करंदी तोडतेय. पोरगी दीन, आन निवांत सा सा म्हयने मास्ळी, काजू खाईन. शेवटी चिक्काट कोकणी ती कोकणीच. माझ्याच गळ्यात बांधुन रिकामी, ल्येक ती ल्येक, वर आणि येक!१ न्हाय बा. काय जमल आस वाटत न्हाय बा.

In reply to by सूड

आस कस? आस कस? कोकण्यांनीच कोकण्यांच्यी सासवा पळवुन लावल्या तर कस व्हायच? तशीही मी हटले की पैजारबुवा धामणी घेउन तयार आहेतच. त्या बांधायच्या का गळ्यात?

In reply to by स्पंदना

तशीही मी हटले की पैजारबुवा धामणी घेउन तयार आहेतच. त्या बांधायच्या का गळ्यात?
पैजारबुवा, ते दोन पर्वचनाच्या क्याशेटी लावून दिल्या तं गप बसत्याल. पर कोल्लापूरी सासू? नगं!! तिची क्याशेट कोन आयकायचं आनी!! ;)

In reply to by बॅटमॅन

पोरी अन सरदारजी यांचा राजीखुशीचा मामला असेल तर यात वाईट नक्की काय आहे ते कळालं नाही. असो. खरय. आणि सरदारजी स्वतःचाच बेड आणि बाथरुम (आणी अजुन काय काय) वापरत असेल तर. ;)

In reply to by मृत्युन्जय

बाथरुम वरुन आठवलं. हा सरदारजी आठवड्यातुन एकदा केस ते बुचडं सोडून धुवायचा. आख्खा टब भरायचा म्हणे केसाने. :( अक्षरशः ब्रशने केस गोळा करुन टाकायचा डस्ट्बिन मध्ये. मग ते केस सुकवणे आणि त्याची परत ती बुचडी, आणि मग रुम पार्टनरला (हो. नवराच. माझाच ;) ) दुअसर टोक धरायला लावुन रोज ती पगडी बांधणे!! आणी बेड जरी बेगळा असला तरी रुम वरुन फोन येइस्तो नवर्‍याला बाहेर कुडकुडत रहावं लागायच ना?

हे "अलग" सहसा पचनी पडत नाही पण "अलग"चं अस्तित्व नकारता हि येत नाहि. बाकी उपकार मधले प्राण मुखी मन्ना दा आठवले.

लिव्ह इन हि कल्पना काही काळ ठीक असली तरी स्त्रीच्या कमी फायद्याची आणि पुरुषाच्या जास्त फायद्याची आहे असे स्वानुभवाने सहज सांगू शकते. किमान काही तरी लेखी करार असणे महत्वाचे आहे. २०-२५ वर्षे पर्यंत निव्वळ सौन्दर्य आणि तारुण्याचा जोरावर कुठलीही स्त्री रिलेशनशिप मध्ये वर्चस्व गाजवू शकते पण ३० वर्षे झाली कि स्त्रीची शेल्फ value झपाट्याने कमी होत जाते. बायॉलॉजिकल क्लॉक झपाट्याने "मूल" ह्या गोष्टीसाठी अडॅप्ट होऊ लागते. अशा काळांत पुरुषाची साथ असणे महत्वाचे आहे पण लिव्ह इन मध्ये ३० वर्षे उलटून गेलेल्या पुरुषाने त्या संबंधात राहणे माझ्या दृष्टीकोनातून तरी फार इरेशनल आहे. ३५ वर्षे उलटून गेली कि मॅरेज मार्केट मधील स्त्रीची किंमत शून्य.

In reply to by साहना

अहो ताई सत्य इतकं उघड आणि ढळढळीतपणे लिहू नका. परंपरा विच्छेदक स्त्रीत्ववादी आणि स्त्रीमुक्तीवाद्यांची इ इ ची गोची होते.

In reply to by टवाळ कार्टा

पण वास्तवता आणि समाजाची आज (इतरांकडे)पाहण्याची वस्तुस्थीती (पुस्तकी आदरश्वाद बाजूला ठेऊ) ध्यानात ठेऊन दिलेला प्रतिसाद आवडला आणि त्या प्रांजळपणाबद्दल अभिनंदन.