Skip to main content

१४ फरवरी (प्रेम दिन) - दोन क्षणिका

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 16/02/2015 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमाच्या दिवशी अर्थात (आंग्ल भाषेतील वेलेन्टाईन डे) कार्यालायातून सांयकाळी ५च्या सुमारास बाहेर पडलो, राजपथावर अक्षरश: प्रेमी जोडपे हातात हात घालून फिरत होते. या प्रकरणांचा अंत काय होईल, विचार करताना सुचलेल्या दोन क्षणिका तिच्या साठी सर्व सोडले, पण तिने .... गुलाबी काटा ह्रदयी डसला. जीव भौंऱ्याचा नाहक गेला. बहुतेक मुलींच्या नशिबी .... रस पिउनी भौंरा उडाला. कळीच्या नशिबी विरह वेदना.
लेखनविषय:

वाचने 1781
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

असां काय नाय ओ! व्हॅलेंटाईन असा रस्त्यात साजरा करणारे सगळे पोट्टे पोट्ट्या बरे तयारीचे असतात! प्रेमात फसण्याचे, उसासे टाकण्याचे आणि विरहात गाणी बिणी म्हणायचे दिवस राजकपूर आणि देव आनंदच्या सिनेमांबरोबर गेले कधीच!

In reply to by सूड

अवांतर भौंरा LOL संध्याकाळ नंतर सेंट्रल वर डाऊन लोकल मधे एक माणूस रोज भोवरे विकायला येतो खेळातले. तेंव्हा तो हा शब्द भौंरा (नाकात) असा उच्चारतो. गम्मत वाटते.