नमस्कार मंडळी!
कादंबरी, आत्मचरित्र, विनोदी साहित्य, कविता असे विविध साहित्यप्रकार हाताळून आता तुमच्या साठी घेऊन येत आहोत एक नवा विषय - मराठी कथा.
आपल्या काही आवडत्या कथांविषयी ह्या धाग्यात बोलूया. जेणेकरुन मराठीतील काही उत्तमोत्तम कथांचा आढावाही घेता येईल.
चला तर मग आपल्या आवडत्या कथांविषयी लिहायला.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
16242
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
रत्नाकर मतकरींच्या सर्वच
दमांच्या माझ्या आवडत्या कथा-
श्री. दा. पानवलकर - सूर्य
अगदी अगदी.
In reply to श्री. दा. पानवलकर - सूर्य by प्रचेतस
तुती - जी ए कुलकर्णी
रत्नाकर मतकरींच्या सर्वच
अरविंद गोखले यांची कथा
अरविंद गोखलेंबद्दलच लिहायला
In reply to अरविंद गोखले यांची कथा by साती
'कातरवेळ' माझी आवडती कथा!!!!
In reply to अरविंद गोखले यांची कथा by साती
आवडलेल्या कथा आठवताना मिलिंद
अगदी सहमत.
In reply to आवडलेल्या कथा आठवताना मिलिंद by कवितानागेश
सुहास शिरवळकरांनी गूढ कादंबर्
विदूषक
आंतरजालावर प्रकाशित झालेल्या
+१
In reply to आंतरजालावर प्रकाशित झालेल्या by गवि
आवडत्या कथांमध्ये अग्रक्रमाने
वड्यांचे दिवस
विनोदी कथा होती ती.सुमेध…
In reply to वड्यांचे दिवस by सिरुसेरि
विनोदी कथा होती ती.
सुमेध रिसबुड यांची कथा होती ती
मि ६ वीत असताना वाचलेली जप्ती
फिक्शन मध्ये कथांचं आणि माझं
अरविंद गोखले जबरदस्त ताकदीचे कथाकार.
' अठरा पावलांचा स्टार्ट ' ही
In reply to अरविंद गोखले जबरदस्त ताकदीचे कथाकार. by बोका-ए-आझम
मराठीत विलास सारंग भारत सासणे श्याम मनोहर
मस्त विषय!
पॅपिलॉन
उत्तरार्धही वाचणीय
In reply to पॅपिलॉन by सौन्दर्य
पॅपिलॉनचा उत्तरार्ध 'बॅंको' जबरदस्त आहे (पण ही दोन्ही पुस्तके कथा नव्हे तर एका अट्टल गुन्हेगाराचे कथित आत्मचरित्र आहे).
बाबुराव बागुलांची
काही पठडीबाहेरच्या कथा
शिळान अधिक आठ कथा - उद्धव ज. शेळके, नागीण - चारूता सागर, सोलेदाद - विलास सारंग, ढग - सखा कलाल
यातल्या जवळपास सगळ्याच कथा आवडत्या आहेत.
मला सस्नेह यांची 'कळते रे'…
मला सस्नेह यांची 'कळते रे' कथा खूप आवडली होती. वाखू मध्ये ठेवून अनेकदा वाचली आहे. आता सगळ्या जुन्या लेखांचे फॉरमॅटिंग गेल्याने बरंच चांगलं साहित्य वाचनीय राहिलं नाही.
अरे वा!
आवडत्या कथा
भयकथा - गानू आज्जींची अंगाई
कादंबरी कथा - रारंग ढांग (ही मला आयन रँडच्या द फाऊंटनहेड इतकी सशक्त वाटत आली आहे कायम)
वेगळा प्रयत्न - मिपाकर आदुबाळ ह्यांची ऐसी अक्षरे मधील पॉर्न ओके प्लीज मधील "जलपर्णीच्या नशिबाचे साडेतीन फेरे". ही कथा
युद्धकथा - द डेझर्टर
अजून आठवतील तशा सांगतो
आवडत्या कथा भयकथा - गानू…
In reply to अरे वा! by वृषभ खोंडे
हृषिकेश गुप्ते यांचीच 'हाकामारी' ही भयकथेच्या अंगाने जात शेवटी हादरवून सोडणारी, अस्वस्थ करणारी लघु कादंबरी आहे.
अच्छा
In reply to आवडत्या कथा भयकथा - गानू… by प्रचेतस
आता ही मिळवून वाचणे आले
धारपांच्या हस्तरवर बेतलेली…
In reply to आवडत्या कथा भयकथा - गानू… by प्रचेतस
धारपांच्या हस्तरवर बेतलेली गुप्तेंची गानू आजींची अंगाई इथे आहे.
@कांदा लिंबू (कांली) भौ.....
In reply to धारपांच्या हस्तरवर बेतलेली… by कांदा लिंबू
"गानू आजींची अंगाई ",
लिंक शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
सगळी गोष्ट एका दमात वाचून काढली. तसेही आज कुंद, ढगाळ पावसाळी हवा, बर्फासारखा बोचरा गारवा. सकाळचे साडेपाच वाजले आहेत. पौणीमा दोन दिवसावर आलीय, खरेतर, पहाटेचे दुधळ चांदणे आणी चंदेरी चंद्र प्रकाश बघत बाल्कनीत वाफाळलेला ,स्वतः च बनवल्या चहाचे घोट भरणे हा नेहमीचाच कार्यक्रम.पण आज काळा भक्क अंधार आणी भोवतालची हिरवट काळी गर्द झाडी..... आणी सोबत गानू अजीची अंगाई ,मेडीटेशन सारखी विलक्षण अनुभूती.सरसर्रुन अंगावर काटा आला.
माझे लहानपण नसरापूर या आजोळच्या गावात गेले. माझी पुष्पा मावशी अशा भारी गोष्ट सांगत असे. तो तीन मजली वाडाही असाच अंधारलेला. माजघरात देवघर. विज नसल्याने मिणमिणता कंदिल आणी त्याच्या भोवतालचा अंधूक पिवळट उजेड माजघराला गुढ रूप द्यायचा. ओसरीवर जाण्यासाठी तेथूनच जावे लागायचे. केवळ विस फुटाचे अंतर, सहसा मी एकटे जाणे टाळायचो पण जावेच लागले तर जीवखाऊन धूम ठोकायचो. वाड्याचा मुख्य दरवाजा कर्र कर्र असा आवाज करायचा. पवारांची संजी (संजना) आणी मी (या जन्मातली पहिली क्रश,इतक्या वर्षानंतर अगदी ताजी अठवण,आमची पहिली भेट वयाच्या दोन किंवा तीन वर्षी झाली ती पुढे पाचवी सहावी पर्यंत. ) पवार, आजोबांचे भाडेकरू,शाळेचे हेडमास्तर) संजी व मी त्या करकरणार्या जोड दरवाजावर झोका घेत गप्पा मारायचो.......दरवाजाचे करकरणे माझ्या मावशीला इरिटेट करायचे ,कधी पाठीत धपाटेही पडत.
आठवणी जोधंळ्याचं पोत साडांल्यावर जसे दाणे घरभर पसरतात तशा मनात पसरू लागल्यात.
नत बसमधून शाळेत गेली, आता ढगाई मातेच्या जंगलात फिरायला जायची वेळ... सध्या खुप फुलपाखरं जंगलाच शोभा वाढवत आहेत. थोड्याच दिवसाचे पाहुणे.
पुन्हा कधी तरी.....लिहायचा प्रयत्न करेन.
हृषिकेश गुप्ते हे ताकदीचे…
In reply to @कांदा लिंबू (कांली) भौ..... by कर्नलतपस्वी
हृषिकेश गुप्ते हे ताकदीचे लेखक आहेत. त्यांची दंशकाल ही कादंबरी देखील जबरदस्त आहे.
गानू आज्जींची अंगाई आवडलीच…
In reply to अरे वा! by वृषभ खोंडे
गानू आज्जींची अंगाई आवडलीच होती. पण पुन्हा पुन्हा वाचण्याची हिंमत होत नाही.
नारायण धारपांची ताईत
नारायण धारपांची ताईत ही कथा अगदी क्लासिक आहे. आपल्या अनेक इच्छा, मनोकामना पूर्ण व्हाव्यात असे सर्वांनाच वाटते, पण त्या पूर्ण होण्याची काय किंमत मोजावी लागेल याची अनेकदा पूर्वकल्पना नसते. साध्या सुखी कामगार कुटुंबाची शोकांतिका प्रभावीपणे मांडली आहे.
अर्थात ताईत ही कथा The Monkey's Paw या मूळ कथेवर आधारलेली आहे.
- (कथावाचक) कांदा लिंबू
नव्याने नारायण...
नव्याने नारायण धारपांची पुस्तके वाचायला सुरवात केली आहे.
साठे फायकस ही प्रचंड आवडते. पन्नास साठ वर्षांनंतरही तेव्हढीच उत्सुकता,वाचायला मजा येते.
साठे फायकस!
In reply to नव्याने नारायण... by कर्नलतपस्वी
साठे फायकसचं तर मी कितीदा वाचन केलंय याची गणती नाही. लहानपणी पहिल्यांदा वाचल्यापासून "फायकस" या शब्दाचीच एक अनामिक अपरिचित भीती मनात दडून बसलेली आहे.
त्यांच्या मला आवडणाऱ्या इतर कथा म्हणजे सदूचे मित्र, हिरवे फाटक, आंधळी कोशिंबीर, स्वप्नांचा राजा कथुलु, आणि अर्थातच समर्थांच्या कथा.
- (गूढकथाप्रेमी) कांदा लिंबू
भारत सासणे, राजन गवस व राजन…
भारत सासणे, राजन गवस व राजन खान या लेखकांच्या कथा प्रभावी आहेत.
नुकताच मिलिंद बोकीलांचा …
नुकताच मिलिंद बोकीलांचा "महानगर" हा कथासंग्रह वाचला. खूप छान कथा आहेत.