Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सुहास पाटील on Wed, 02/11/2015 - 11:15
आजच्या सकाळ मध्ये एक बातमी आली आहे. दुवा खाली दिलेला आहे. http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4806917519386850610&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20150211&Provider=-%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%20%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87,%20%E0%A4%AE%E0%A4%97%20%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3?-%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE सकाळ ने सामन्या त आलेल्या अग्र लेखाची बातमी छापली आहे. ह्या बातमी वर मी माझे विचार मांडत अहे. ह्यावर मत मांडतान मी हे सांगू इच्छितो कि मी कोणत्याही राजकारणी पार्टीचा पुरस्कार करणार नाही आहे. मला वाटत जे सामन्यात येते ते शिवसेनेच मत असत. ‘सामना‘च्या अग्रलेखात म्हटले आहे, की राजकारणात कधीच काही चिरंतन नसते. देश जिंकला, पण दिल्ली हातातून निसटली. ‘केजरीवाल पाच साल’ हा नारा दिल्लीने स्वीकारला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने शिकावे. जमल्यास चिंतनही करावे आणि पुढे जावे असा दिल्लीचा निकाल आहे. पण इथे शिवसेना म्हणते आहे कि महाराष्ट्रच्या जनतेने चिंतन करावे , पण मला असे वाटते कि शिवसेनेने स्वतः चिंतन करावे. आम आदमी दिल्लित जिंकले कारण जनतेला एक चांगला पर्याय मिळाला. जातीधर्माच्या राजकारणा पलीकडे जाऊन जनतेने इथे मतदान केलेले दिसत आहे. शिवसेना अजूनही जनतेवर आणि भाजप वाट टीका करण्यात धन्यता मानते अहे. पण आप सारखा पर्याय जर सगळ्या राज्यांना मिळाला तर सर्व जनता ह्या बद्दल नक्कीच विचार करेल. मला वाटत हा पराभव ह्या सर्व राजकारणी पक्षांचा आहे जे फक्त जनतेची दिशाभूल करतात आणि खोटी आश्वासने देतात, जातीपातीचे राजकारण करण्यातच धन्यता मानतात. आप चा हा विजय सगळ्या राजकीय पक्षांना एक मोठा धडा आहे.
  • Log in or register to post comments
  • 14573 views

प्रतिक्रिया

Submitted by हुप्प्या on Fri, 02/13/2015 - 10:52

In reply to असंच म्हटलं तर.... :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

सुरेश भट म्हणून गेले आहेत

उषःकाल होता होता काळरात्र झाली. आश्वासने उषःकाल असेल तर अंमलबजावणी काळरात्र आहे. पाच वर्षांनी आयुष्याच्या मशाली परत पेटवा आणि पुन्हा तेच नव्याने!
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Fri, 02/13/2015 - 21:54

In reply to असंच म्हटलं तर.... :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

अवश्य म्हणायला हवे

असंच म्हटलं तर....विदेशातील काळा पैसा शंभर दिवसात आनु, प्रत्येक भारतीयांच्या खात्यात पंधरा लाख रुपये असतील, ३७० वे कलम रद्द करु, शंभर स्मार्ट शहरं करु. महागाई कमी करु, अशी आमिशं दाखवली आणि जनता मते देण्यास पुढे गेली. पहील्या "आमिशा"वरून बोंबाबोंब चालू केलेली आहेच की पब्लीकने. आणि करायलाच हवे. "प्रत्येक भारतीयांच्या खात्यात पंधरा लाख रुपये असतील, .." हे वाक्य मला जरा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट वाटत आहे. असे कुठेही आश्वासन दिलेले नाही. भाषणात काळा पैसा किती बाहेर आहे आणि तो असला तर "जनतेचा पैसा" म्हणून दरडोई किती असू शकतो वगैरे म्हणलेले असू शकते... पण मला सांगा पब्लीकला काळा पैसा आणू म्हणून आश्वासन दिले आणि फुकट पाणी-वीज म्हणून आश्वासन दिले तर त्यात जास्त आकर्षक काय आहे? बाकी तुम्ही म्हणलेली आश्वासने झालीत का नाही हे बघायला नक्कीच वेळ द्यावा लागेल. या वेळेस एके पण एक गोष्ट शिकलेत आणि ते चांगले आहे. ती म्हणजे दहा दिवसात अमुक करू वगैरे आश्वासन दिलेले नाही. पब्लीकने मोदींना मते दिली ती पूर्ण पणे नेता म्हणून दिली आणि जे काही गेल्या दहा वर्षात झाले होते त्यापासून सुधारणा करण्यासाठी दिलेली आहेत. केजरीवालांच्या बाबतीत पण दिल्लीपुरते काही अंशी असेच आहे. फक्त आमिशं ही राज्याची आणि ती देखील एखाद्या मोठ्या महापालीकेइतक्या राज्याची आश्वासने ही जनतेला प्रत्यक्ष मदत होणारी अशीच असणार. (त्याची तुलना करायची असेल तर महाराष्ट्रात काय आश्वासने दिली गेली आहेत आणि किती आत्तापर्यंत पाळली जाण्याच्या "मार्गावर" आहेत हे पाहीले पाहीजे.) नुसत्या पोतडीची गाठ सोडायचा अवकाश की भारतीयांची गर्दी जमते. अगदी सहमत. पण कुठेतरी आशा आहे की पब्ली़क शहाणे होयला लागले आहे... :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 02/14/2015 - 09:42

In reply to अवश्य म्हणायला हवे by विकास

Permalink

अजून एक पंचवार्षिक लागेल... आश्वासनं अर्धी पुर्ण करायला.

>>>> "प्रत्येक भारतीयांच्या खात्यात पंधरा लाख रुपये असतील, .." हे वाक्य मला जरा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट वाटत आहे. असे कुठेही आश्वासन दिलेले नाही. नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात असे आश्वासन दिले होते की विदेशातील बँकामधुन पैसे शंभर दिवसात आणुन प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करु असे म्हटले होते. (दै.लोकमत दुवा) ( जाहिरनाम्यात असं नाही, हे मला मान्य) >>>>> पब्लीकला काळा पैसा आणू म्हणून आश्वासन दिले आणि फुकट पाणी-वीज म्हणून आश्वासन दिले तर त्यात जास्त आकर्षक काय आहे ? काळा पैसा. >>>> पब्लीकने मोदींना मते दिली ती पूर्ण पणे नेता म्हणून दिली आणि जे काही गेल्या दहा वर्षात झाले होते त्यापासून सुधारणा करण्यासाठी दिलेली आहेत. अगदी मान्य. आणि अशी सुधारणा झाली नाही तर.. लोक अजुन दुसरा काही पर्याय निवडतील हेही तितकेच सत्य आहे. आणि दिल्लीने ती पायवाट पाडून दिली आहे. भविष्यात बहुमताचे सरकार भाजपाचे असेल असं मला आज तरी सरकारचे पाळण्यातले पाय पाहुन वाटत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 02/14/2015 - 10:41

In reply to अजून एक पंचवार्षिक लागेल... आश्वासनं अर्धी पुर्ण करायला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

+/-

दैनिक लोकमत दुव्यात शहा यांनी म्हणल्याप्रमाणे मोदींचे वक्तव्य हे राजकीय वाक्प्रचार समजला पाहीजे. खालील त्यांचे ते वाक्य पहा. पब्लीकला काळा पैसा आकर्षक वाटत असेल असे मलाच काय इतर कुणालाही वाटेल असे वाटत नाही. किंबहूना दिल्लीवाल्यांना नक्कीच वाटत नाही असे जे काही तिथल्या लोकांकडून ऐकले आहे त्यावरून वाटते. आणि अशी सुधारणा झाली नाही तर.. लोक अजुन दुसरा काही पर्याय निवडतील हेही तितकेच सत्य आहे. आणि तस होयलाच हवे या मताचा मी आहे. माझे याच काय याच्या आधीच्या निवडणुकीच्या आधीचे खणून काढले तरी तेच म्हणलेले दिसेल... :) दिल्लीने ती पायवाट पाडून दिली आहे. नक्कीच आणि ते चांगले देखील झाले आहे. आज प्रथमच काहीतरी राजकीय इर्षेने चांगले काम घडण्याची शक्यता आहे. आत्ता पर्यंत काँग्रेसी संस्कृतीने अशा कशाला भावच दिला नव्हता... पण आत्ता भाजपा आणि आप हे दोघेही परफॉर्मन्सच्या बाबतीत सिरीयस वाटत आहेत. काय होते ते पहायला दोघांनाही वेळ देणे गरजेचे आहे. (आप ला पहील्यांदा देखील मी कधी टिकात्मक लिहीले नव्हते, लिहीणार नव्हतो. पण नंतर त्यांनी जो काही तमाशा चालू केला त्यातून दुसरा पर्यायच ठेवला नाही. असो.) भविष्यात बहुमताचे सरकार भाजपाचे असेल असं मला आज तरी सरकारचे पाळण्यातले पाय पाहुन वाटत नाही. फार दूरच्या भविष्याबाबत बोलत असलात तर कदाचीत मान्य ;) पण पुढच्या १० वर्षांसाठी बोलत असलात तर असहमत. :)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 02/14/2015 - 15:21

In reply to अजून एक पंचवार्षिक लागेल... आश्वासनं अर्धी पुर्ण करायला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

>>> नरेंद्र मोदी यांनी लोकसभा

>>> नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात असे आश्वासन दिले होते की विदेशातील बँकामधुन पैसे शंभर दिवसात आणुन प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करु असे म्हटले होते. (दै.लोकमत दुवा) ( जाहिरनाम्यात असं नाही, हे मला मान्य) हे असे कोठून पसरवले गेले असावे? मोदींचे वाक्य असे होते, (मूळ वाक्य हिंदीत आहे) "If we bring back black money, each citizen can get Rs.15-20 lakhs." १०० दिवसात विदेशातला काळा पैसा परत आणू आणि परत आणल्यावर प्रत्येकाला १५ लाख रूपये देऊ असे कोठेही आणि कधीही मोदी म्हणाले नव्हते. त्यांच्या या वाक्याचा असा अर्थ होता की प्रत्येक भारतीयाला १५ लाख रूपये मिळतील इतक्या मोठ्या प्रमाणात विदेशात काळा पैसा आहे. समजा हा सर्व काळा परत भारतात आला तरी तो कर चुकविलेला पैसा आहे. करचुकवेगिरीत सापडलेला पैसा असा नागरिकांमध्ये वाटतात का? त्यांचे मूळ वाक्य खालील चित्रफितीत आहे. https://www.youtube.com/watch?v=EbdFJ2vg3ic >>> >>> >>>>> पब्लीकला काळा पैसा आणू म्हणून आश्वासन दिले आणि फुकट पाणी-वीज म्हणून आश्वासन दिले तर त्यात जास्त आकर्षक काय आहे ? >>> काळा पैसा. काळा पैसा परत आणणे तितकेसे सोपे नाही आणि तो परत आणला तरी तो जनतेत वाटला जात नाही हे जनतेला नक्कीच समजत असणार. त्यापेक्षा फुकट वीज-पाणी अशी टँजिबल आश्वासने जास्त आकर्षक असतात. >>> >>> पब्लीकने मोदींना मते दिली ती पूर्ण पणे नेता म्हणून दिली आणि जे काही गेल्या दहा वर्षात झाले होते त्यापासून सुधारणा करण्यासाठी दिलेली आहेत. >>> अगदी मान्य. आणि अशी सुधारणा झाली नाही तर.. लोक अजुन दुसरा काही पर्याय निवडतील हेही तितकेच सत्य आहे. आणि दिल्लीने ती पायवाट पाडून दिली आहे. भविष्यात बहुमताचे सरकार भाजपाचे असेल असं मला आज तरी सरकारचे पाळण्यातले पाय पाहुन वाटत नाही. भविष्याचे आता तरी सांगता येणार नाही. सध्या तरी भाजपला राष्ट्रीय स्तरावर अजिबात समर्थ पर्याय दिसत नाही. डावे पक्ष संपले आहेत, काँग्रेस अत्यंत गलितगात्र अवस्थेत आहे आणि आआपला अजून स्वतःला सिद्ध करायचे आहे. काही राज्यात राज्यस्तरावर मात्र भाजपला पर्याय उपलब्ध आहेत. ओरिसा, तामिळनाडू, आंध्र, तेलंगण इ. राज्यात भाजपला नक्कीच सबळ पर्याय उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 02/14/2015 - 19:00

In reply to >>> नरेंद्र मोदी यांनी लोकसभा by श्रीगुरुजी

Permalink

सर्व मान्य.

भाजपाला पर्याय नाही, भविष्यात सक्षम असा कोणताच पक्ष पर्याय नाही, हे सर्व सोडून द्या. विषय काय होता, पराभव नक्की कोणाचा ? दिल्लीत सरळ सरळ भाजपाला फटका बसलाय हा फटका नमोंनाही आहे, तेव्हा हा भाजपाचा पराभव आणि आपचा आणि लोकशाहीचा विजय आहे, विषय संपला. आता उगाच यांनी हे फुकट देऊ म्हटलं, ते फुकट देऊ म्हटलं. अहो, लोकांना माहिती आहे, काय काय फुकट मिळु शकतं. भाजपानेही आम्ही दुनियादारी फुकट देऊ म्हणायचं होतं त्यांना कोणी थांबवलं होतं. भाजपाचा नुसता जाहिरनामा वाचला तरी मी डोक्याला हात लावून बसतो की ही आश्वासनं कोणत्या इसविसनात पूर्ण होणारी आहेत. गुरुजी मी असं म्हणतो म्हणजे मी नमोंच्या किंवा भाजपाच्या विरोधी आहे, असं समजु नका. कुछ तो भाजपा और उनके नेतृत्व को करना पडेगा इतनी तो बात सच है. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 02/14/2015 - 20:50

In reply to सर्व मान्य. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

तुम्ही भाजप भविष्यात बहुमत

तुम्ही भाजप भविष्यात बहुमत मिळवेल की नाही याविषयी साशंक होता, म्हणून मी भाजपला सध्या तरी राष्ट्रीय स्तरावर पर्याय नाही असे लिहिले होते. धाग्याचा विषय होता पराभव नक्की कोणाचा? पराभव भाजप पक्षाचा व सर्व मुख्य पदाधिकार्‍यांचा आहे हे उघडच आहे. >>> आता उगाच यांनी हे फुकट देऊ म्हटलं, ते फुकट देऊ म्हटलं. अहो, लोकांना माहिती आहे, काय काय फुकट मिळु शकतं. भाजपानेही आम्ही दुनियादारी फुकट देऊ म्हणायचं होतं त्यांना कोणी थांबवलं होतं. नशीब भाजपने आआपच्या वरताण जाऊन आआपपेक्षा जास्त मोफत गोष्टी देण्याचं वचन नाही दिलं. निदान तेवढी तरी प्रभल्भता दाखविली.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 02/14/2015 - 22:28

In reply to तुम्ही भाजप भविष्यात बहुमत by श्रीगुरुजी

Permalink

बरोबर

नरेन्द्र मोदी यांच्या सहा सभा आणि भाजपची प्रगल्भता यामुळे भाजपच्या अनमोल अशा तीन सीट्स आल्या हे मला मान्य आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sun, 02/15/2015 - 22:51

In reply to बरोबर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

ठ्ठो

ठ्ठो =))
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Fri, 02/13/2015 - 22:59

In reply to असंच म्हटलं तर.... :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

मला यात मूलभूत फरक वाटतो

कलम ३७० तर आमिश म्हणुन कुठेच बसत नाहि. स्मार्ट शहरं हे फुकटचं आमिश नसुन ति आधुनीककाळची गरज आहे व त्याच्या फायद्याकरता जनतेला पैसा/श्रम मोजावेच लागणार आहेत. महागाई कमि करणं हि साठवण आणि दळणवळण यातींल त्रुटींचा सफाया करण्याचं वचन आहे, त्यात जनतेला फुकट काहिही मिळणारं नाहि. काळ्या पैशाबाबत वर विकासभौ म्हणतात तसं जुमलेवाली बात आहे असं मला वाटतं. शक्य असल्यास भाजप सरळ बोली लाऊन मतं विकत घ्यायला मागेपुढे पाहाणार नाहि याची मला खात्री आहे. पण लोकसभा आणि मध्यंतरीच्या विधानसभा निवडणुकांमधे मोदींनी भारताच्या अर्थनितीला उदारीकरणाच्या मार्गावर काहि बाधा येईल असं कुठलं वचन वा पाऊल उचलल्याचं फारसं बघण्यात आलं नाहि. इंधनाचे दर निचांकी गेल्यावर सुद्धा देशांतर्गत दर त्या प्रमाणात उतरवले नाहि. कि कुठल्या अनावष्यक सब्सिड्या द्यायच्या बाता झाल्या नाहित. सध्या एकेजींचे फॉलोवर्स त्यांचच लॉजीक वापरुन म्हणतात कि दिल्लीचं बजेट ४० हजार करोडचं आहे, त्यात अमुक एव्हढी सब्सीडी दिली तर काय बिघडलं... पण त्यातल्या बहुतेकांना हेच माहित नसतं कि ४० हजार करोड सर्प्लस पडीक नसुन त्याची विल्हेवाट अगोदरच लागलेली असते. असो. त्यांना समजवण्याच्या भानगडीत मी सहसा पडत नाहि. काहि महिन्यांपुर्वी अशा लोकांना खात्रीने वाटायचं कि एका इलेक्ट्रोनीक ट्रान्स्फरने सगळा काळा पैसा भारतात येऊ शकतो, पण ममो ते मुद्दाम करत नाहि, व समान नागरी कायदा आणणे म्हणजे फक्त मुस्लीमांना भारताच्या "मूळ" कायद्यात आणणे आहे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on Fri, 02/13/2015 - 21:09

Permalink

केतकर उवाच

ह्या रणधुमाळीत ज्येष्ठ गांधीवंशपूजक कुमार केतकर कुणाची बाजू घेतील ह्याची उत्सुकता होती. त्यांनी आपल्या इमानाला जागून असे विधान केले की: "नीट पाहिले तर असे दिसेल की आपचा विजय हा काँग्रेस विचारांचा विजय आहे. केजरीवाल ह्यांचे बोलणे बारकाईने तपासले तर असे दिसेल की त्यांचे विचार थेट राजमान्य राजश्री राहुलजी गांधीच्या विचारांशी जुळतात.". थोडक्यात वरवर पाहिल्यास हा आपचा विजय आणि भाजपाचा पराभव वाटतो पण केतकरांप्रमाणे दिव्यदृष्टीचा चष्मा घातला तर त्यातून काँग्रेशी विचारांचा (म्हणजेच काँग्रेसचा (म्हणजेच राहुलजींचा)) विजय आहे असे स्पष्ट दिसते! धन्य धन्य त्या इमानी सेवकाची!
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Fri, 02/13/2015 - 21:55

In reply to केतकर उवाच by हुप्प्या

Permalink

मुळातून वाचायला आवडेल

कुमारगीता मुळातून वाचायला आवडेल. :)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 02/13/2015 - 22:19

Permalink

बर्‍याच प्रतिसादांतून आपल्या

बर्‍याच प्रतिसादांतून आपल्या पसंतीच्या नेत्याची पाठराखण सर्वसाधारणपणे "तुमच्या नेत्यांनी असे केलेच होते ना ?" या अर्थांच्या वाक्यांनी केली जात आहे ! सर्वसाधारण शहाणपणा असे सांगतो की, "एकाच्या चुकीचे समर्थन दुसर्‍याच्या चुकीकडे बोट दाखवून करणे शहाणपणाचे नाही. दोन्ही चुका चुकाच असतात आणि दोन्ही सारख्याच असमर्थनिय असतात." बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Mon, 02/16/2015 - 16:20

In reply to बर्‍याच प्रतिसादांतून आपल्या by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

अर्थातच..

अर्थातच.. बहुधा म्हणूनच आता मी एक धाडसी विधान करू इच्छित आहे - ते आहे "एके आता एक परिपूर्ण राजकारणी बनले आहेत". गेल्यावर्षी ते असे होते - "एके एकतर महाधूर्त राजकारणी आहेत किंवा महामूर्ख तरी". रामदेवबाबांनी ज्या चुका राजकारणात उतरताना केल्या त्या तरी एके करत नाहियेत. आणि किमान एकेंच्या राजकारण प्रवेशामुळे भाजपाला आता विकासकेंद्रित राजकारण करावे लागेल अशी अपेक्षा. बाकी ६७/७० एकेंच्या डोक्यात जाऊ नयेत अशी अपेक्षा. जे आत्ता तरी जाताना दिसत नाहियेत. यावेळेसचे एके जरा परिपक्व वाटतात. फायनली इट्स अ पॅकेज. आपण देत असलेले पॅकेज कालसुसंगत नाहिये हे एकेंना लवकरच कळेल. तेव्हा ते काय करतात ते बघायचे.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on गुरुवार, 02/19/2015 - 13:53

In reply to बर्‍याच प्रतिसादांतून आपल्या by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

१०० % खरे

चुकीच्या गोष्टीला चुकच म्हणावे ..
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com