Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सुहास पाटील on Wed, 02/11/2015 - 11:15
आजच्या सकाळ मध्ये एक बातमी आली आहे. दुवा खाली दिलेला आहे. http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4806917519386850610&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20150211&Provider=-%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%20%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87,%20%E0%A4%AE%E0%A4%97%20%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3?-%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE सकाळ ने सामन्या त आलेल्या अग्र लेखाची बातमी छापली आहे. ह्या बातमी वर मी माझे विचार मांडत अहे. ह्यावर मत मांडतान मी हे सांगू इच्छितो कि मी कोणत्याही राजकारणी पार्टीचा पुरस्कार करणार नाही आहे. मला वाटत जे सामन्यात येते ते शिवसेनेच मत असत. ‘सामना‘च्या अग्रलेखात म्हटले आहे, की राजकारणात कधीच काही चिरंतन नसते. देश जिंकला, पण दिल्ली हातातून निसटली. ‘केजरीवाल पाच साल’ हा नारा दिल्लीने स्वीकारला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने शिकावे. जमल्यास चिंतनही करावे आणि पुढे जावे असा दिल्लीचा निकाल आहे. पण इथे शिवसेना म्हणते आहे कि महाराष्ट्रच्या जनतेने चिंतन करावे , पण मला असे वाटते कि शिवसेनेने स्वतः चिंतन करावे. आम आदमी दिल्लित जिंकले कारण जनतेला एक चांगला पर्याय मिळाला. जातीधर्माच्या राजकारणा पलीकडे जाऊन जनतेने इथे मतदान केलेले दिसत आहे. शिवसेना अजूनही जनतेवर आणि भाजप वाट टीका करण्यात धन्यता मानते अहे. पण आप सारखा पर्याय जर सगळ्या राज्यांना मिळाला तर सर्व जनता ह्या बद्दल नक्कीच विचार करेल. मला वाटत हा पराभव ह्या सर्व राजकारणी पक्षांचा आहे जे फक्त जनतेची दिशाभूल करतात आणि खोटी आश्वासने देतात, जातीपातीचे राजकारण करण्यातच धन्यता मानतात. आप चा हा विजय सगळ्या राजकीय पक्षांना एक मोठा धडा आहे.
  • Log in or register to post comments
  • 14573 views

प्रतिक्रिया

Submitted by ऋषिकेश on Wed, 02/11/2015 - 11:24

Permalink

आप चा हा विजय सगळ्या राजकीय

आप चा हा विजय सगळ्या राजकीय पक्षांना एक मोठा धडा आहे.
सगळ्या प्रस्थापित राजकीय पक्षांना असा बदल करून सहमत आहे
  • Log in or register to post comments

Submitted by सुहास पाटील on Wed, 02/11/2015 - 11:26

In reply to आप चा हा विजय सगळ्या राजकीय by ऋषिकेश

Permalink

हेच म्हणायचे होते मला.

हेच म्हणायचे होते मला. धन्यवाद
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 02/11/2015 - 11:35

Permalink

हा तर मेक इंडियाचा पराभव आहे

हा तर मेक इंडियाचा पराभव आहे ! ;) एक दुवा :- Was India's most powerful prime minister in 30 years unravelled over price of a pinstripe jacket?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 02/19/2015 - 13:35

In reply to हा तर मेक इंडियाचा पराभव आहे by मदनबाण

Permalink

इति "नमो कोट" पुराण :-मोदींना

इति "नमो कोट" पुराण :- मोदींना ‘तो’ सूट भेट मिळाला होता? 'मोदीसूट'साठी सव्वा कोटीची बोली मोदींच्या भाषण बाजीला आणि प्रत्येक कुठल्या ना कुठल्या नव्या शॉर्ट फॉम करण्याच्या सवईला लोक तर वैतागु लागलेच आहेत पण उध्योग जगताचा पेशन्स पण संपत चालल्याचे चित्र उभे राहत आहे ! पार्टी विथ डिफरर्न्स असे बिरुद मिरवणार्‍या बिजेपी कडुन कुठलाही "डिफरर्न्स" दिसुन येत नाहीये ! हेच चिंतेचे मुख्य कारण आहे ! काही तरी करा ! जनतेचा पेशन्स सुटत चालला आहे ! एक दुवा :- India should open up more to retain foreign interest: Jim Rogers थॅक्स टु जिम रॉजर्स !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?
  • Log in or register to post comments

Submitted by नया है वह on Wed, 02/11/2015 - 12:04

Permalink

आता फक्त TOSS जिंकला आहे आआपने

आता फक्त TOSS जिंकला आहे आआपने, आता खरी कसोटी लागनार आहे. प्रस्थापित काही शिकतील असे वाटत नाही. आआपला शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 02/11/2015 - 12:40

Permalink

शिवसेनेला महाराष्ट्रात स्वत

शिवसेनेला महाराष्ट्रात स्वत:चं असं काही स्थान राहिलंय काय ? भाजपाने सत्ता स्थापन करतांना शिवसेनेचे काय बेक्कार हाल केलेत हे सर्व महाराष्ट्राने पाहिले. आणि आता शिवसेनेला वाटतं आपल्यालाही भविष्यात 'आप' सारखं घवघवीत यश मिळावं... अरे लोकांनी तुम्हाला संधी दिली तुम्ही किती उजेड पाडलाय तो पाहिलाय आम्ही. शिवसेना महाराष्ट्रातुन समुळ नष्ट तर होणार नाही, त्याबद्दल काही आत्मपरिक्षण करता येतं का पाहा म्हणावं...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल चंदाले on Wed, 02/11/2015 - 12:50

Permalink

मला वाटत हा पराभव ह्या सर्व

मला वाटत हा पराभव ह्या सर्व राजकारणी पक्षांचा आहे जे फक्त जनतेची दिशाभूल करतात आणि खोटी आश्वासने देतात, जातीपातीचे राजकारण करण्यातच धन्यता मानतात. आप चा हा विजय सगळ्या राजकीय पक्षांना एक मोठा धडा आहे. --> +१००
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Wed, 02/11/2015 - 13:50

Permalink

जनतेमध्ये अशीच सकारात्मक विचारपद्धती राहो

आम आदमी दिल्लित जिंकले कारण जनतेला एक चांगला पर्याय मिळाला. जातीधर्माच्या राजकारणा पलीकडे जाऊन जनतेने इथे मतदान केलेले दिसत आहे.
जनतेमध्ये अशीच सकारात्मक विचारपद्धती राहो, आणी देव न करो उद्या आप सुद्धा जातीधर्माच, भाषा प्रांताच राजकारण करू लागलं, तर त्यानाही कोणी सक्षम पर्याय येवो.
  • Log in or register to post comments

Submitted by सुहास पाटील on Wed, 02/11/2015 - 16:56

In reply to जनतेमध्ये अशीच सकारात्मक विचारपद्धती राहो by पगला गजोधर

Permalink

हिच इच्छा

हिच इच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Wed, 02/11/2015 - 13:52

Permalink

शिवसेना ...व चिंतन

चिंतन बिंतन ही काय भानगड आहे ? शिवसेनेचा व तिचा काय संबंध ? एकवेळ आपल्या चुकांबद्द्ल भाजपा चिंतन करेल पण उधोजीराजे सोळाव्या शतकातून बाहेर पडतील तर... ना ? आजचे युग हे लोकशाहीचे आहे. हे शिवसेनेला पटणेच महा कठीण आहे. यात सार्वजनिक नेतुत्व असलेला पक्षच टिकून रहातो. काही वेळेस लायकी नसतानाही बाकीचे अधिक नालायक म्हणून काही टिकून रहातात. यातून धडा हाच की उद्धव, राज, गांधी कुटंब, लालू , जयललिता, ममता. मुलायम,मोदी, मायावती यांच्या जोखडातून त्या त्या पक्षांची मुक्तता होणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर केजरीवाल यानीही आपल्या योग्यतेची एक मोठी नेत्यांची लाईन तयार करणे गरजेचे आहे. नाहीतर आपची अवस्था कोंग्रेस सारखी दयनीय होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 02/11/2015 - 14:30

In reply to शिवसेना ...व चिंतन by चौकटराजा

Permalink

सही बोललात !

+१ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by स्वधर्म on Wed, 02/11/2015 - 14:33

In reply to शिवसेना ...व चिंतन by चौकटराजा

Permalink

सहमत

पण हे यांना काय कळत नसेल काय? काहीही केलं, आपआपल्या पिलांनाच गादीवर जरी बसवलं, तरी ढिम्म जनता निवडून देते म्हटल्यावर ते तरी काय करणार? दिल्लीतल्या जनतेने कळप वृत्ती सोडली, म्हणूनच आपला विजय मिळाला. - स्वधर्म.
  • Log in or register to post comments

Submitted by सुहास पाटील on Wed, 02/11/2015 - 16:54

In reply to शिवसेना ...व चिंतन by चौकटराजा

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by आकाश कंदील on Wed, 02/11/2015 - 14:14

Permalink

सहमत

चौकट राजे साहेब मनातल बोललात
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Wed, 02/11/2015 - 14:30

Permalink

नरेण्द्र

मिडियाचे हे सध्याचे खूळ आहे असे ह्यांचे मत. उद्या पांढरकवड्याला ग्रामपंचायतीची निवडणूक झाली तरी त्याचा संबंध नरेण्द्रशी जोडला जाईल. दिल्लीकरांनी जनादेश दिला आहे.मॅन्डेट का काय म्हणतात ते 'आ.प.' ला आहे.विषय संपला.आता नक्की कोणाचा पराभव हे कटिंग चहा,पॉप्कॉर्न्,सामोसे खात बोलायच्या गोष्टी. अवांतर- संजय(क्षीरसागरांचा) येथे पुन्हा लिहिता होईल अशी अपेक्षा.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 02/11/2015 - 15:34

In reply to नरेण्द्र by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

संक्षिंना कोणितरी निरोप द्या

संक्षिंना कोणितरी निरोप द्या रे...त्यांचा खरा फ्यान मिपावरच आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 02/11/2015 - 22:07

In reply to नरेण्द्र by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

>>> अवांतर- संजय

>>> अवांतर- संजय(क्षीरसागरांचा) येथे पुन्हा लिहिता होईल अशी अपेक्षा. फक्त संजयच(क्षीरसागरांचा) लिहिता व्हायला हवा का? नानासाहेब(नेफळ्यांचा) नको वाट्टं?
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 02/13/2015 - 09:06

In reply to >>> अवांतर- संजय by श्रीगुरुजी

Permalink

माई मोड ऑन-

माई मोड ऑन- श्रीगुर्ज्या. मृतात्मे कधी लिहितं असतात कै रे. नाना जाउन ६-७ महिने झाले की रे. कश्याला मज म्हातारीस रडवतोस. माई मोड ऑफ-
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Wed, 02/11/2015 - 14:45

Permalink

त्सुनामी हि कधीतरी एकदाच येते

त्सुनामी हि कधीतरी एकदाच येते पण लाटा सारख्या धडकत असतात. संत एकनाथांचे एक भारुड आहे. त्यात एक भावजय आपल्या नणंदेच्या पोराला पटकी होऊ दे , म्हणून देवाला प्रार्थना करते. आजचा अग्रलेख वाचून व कालची परिषद त्याचीच आठवण झाली. मित्राचे वाईट होते आहे, म्हणून ज्याला असुरी विकृत आनंद होतो, तो माणूस पक्ष किती विश्वासपात्र?
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 02/11/2015 - 15:09

Permalink

अशक्त भाजपा सशक्त केजरीवाल

अशक्त भाजपा सशक्त केजरीवाल

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on Wed, 02/11/2015 - 15:11

Permalink

आज फिर तुम पे प्यार आया है

आज फिर तुम पे प्यार आया है (रीमिक्स)
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 02/11/2015 - 17:10

Permalink

विजय

गुडीगुडी विधान वाटेल पण मला खरेच वाटते की हा राजकीय पक्षांच्या विजय-पराभवापेक्षा लोकशाही प्रक्रीयेचा विजय आहे. काही अंशी स्थानिक कारणांसाठी स्थानिक राजकारण करू शकणार्‍यांना मते दिली आहेत हे देखील वास्तव आहे. पण जर काम केले नाहीत, नकारात्मक राजकारण केलेत तर जनतेला यापुढे चालणार नाही... म्हणून फेकू म्हणून हिणावले गेलेले मोदी आणि भागोडा म्हणून उगाळले गेलेले केजरीवाल सत्तेवर आले आहेत. ८५च्या राजीव लाटेनंतर राजीव गांधींना देखील प्रामाणिकपणे काहीतरी चांगले करून दाखवायचे होते. काही अंशी त्यांच्या मुळे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन मोकळे होण्यास सुरवात झाली. ते त्यांचे श्रेय नक्कीच असेल. पण बाकी राजकारणाच्या बाबतीत "सत्तेचे दलाल" असे नुसते म्हणून काही बदलता आले नाही...आज तो पक्ष अक्षरशः रसातळाला गेला आहे. यासंदर्भात मला कायम लक्षात राहीलेली एक जुनी बातमी परत लिहीतो: ३/४ बहुमत असलेल्या लोकसभेत गांधी, मधु दंडवतेंना म्हणाले, पुढच्या निवडणुकीच्या वेळेस उरलेले बेंचेस पण काँग्रेसचेच असतील. दंडवते हसून फक्त एव्हढेच म्हणाले, तुम्ही अजून या क्षेत्रात लहान आहात. :) पुढचा इतिहास माहीत आहेच. आपचे असेच होईल असे म्हणत नाही. पण प्रत्येक राजकीय पक्षास आणि नेत्यास आपण कुठे बैल आहोत आणि कुठे बेडकी याचे भान ठेवत काम करावे लागणार आहे. जे करणार नाहीत ते मार खातील. हा मोठा विजयच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Wed, 02/11/2015 - 21:04

In reply to विजय by विकास

Permalink

+१ विकास, अगदी मनातले बोललात.

+१ विकास, अगदी मनातले बोललात. त्याचबरोबर (दुर्दैवाने) व्यक्तिकेंद्रीत राजकारण अजूनही तितकेच प्रबळ आहे असे म्हणावे लागते. तरी अजूनही लोकशाही प्रगल्भ व्हायला बराच वेळ आहे पण वाटचाल योग्य दिशेने सुरु आहे असे म्हणू शकतो (हे जगात तसे दुर्मिळच उदाहरण म्हणावे लागेल).
  • Log in or register to post comments

Submitted by सिरुसेरि on Wed, 02/11/2015 - 22:40

Permalink

ये जो पब्लिक है

ये जो पब्लिक है , ये सब जानती है .. सुत्रुम विझी सुडरे गझनी
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 02/11/2015 - 23:11

Permalink

खरं तर हा पराभव बेदींचा नाही,

खरं तर हा पराभव बेदींचा नाही, भाजपचा नाही, अमित शहांचा नाही, मोदींचा तर नाहीच नाही. हा पराभव खर्‍या अर्थाने ओबामांचा आहे. ते बिचारे भाजपला जिंकविण्यासाठी १०००० मैलावरून दिल्लीत आले आणि तब्बल ३ दिवस दिल्लीत तळ ठोकून होते (असं आआपवाले म्हणतात बुवा). तरीही भाजप हरला. म्हणजे कोणाचा खरोखर पराभव झाला? :YAHOO:
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Wed, 02/11/2015 - 23:53

Permalink

खरा पराभव फुकट्या

खरा पराभव फुकट्या दिल्लीकरांचा आहे आणि चांदी प्रसार माध्यमांची आहे ,
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on गुरुवार, 02/12/2015 - 00:05

In reply to खरा पराभव फुकट्या by निनाद मुक्काम …

Permalink

काय रे

काय रे हे निनाद्या?सग़ळ काही फुकट पाहिजे ही तर आपली भारतिय मानसिकता आहे.त्यात फक्त दिल्लीकरांना का दोष द्यायचा?खुद्द मिपावरच "जे काही फुकट ते सगळे पौष्टिक" असे अनेक मिपाकर म्हणत असतात.असो. आपच्या विजयाने एक बरे झाले असे हे म्हणतात- नरेण्द्र समर्थकांचे (वोट्स अ‍ॅपी) वन लायनर विनोद महिनाभरतरी येणार नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on गुरुवार, 02/12/2015 - 07:00

Permalink

+१

हा राजकीय पक्षांच्या विजय-पराभवापेक्षा लोकशाही प्रक्रीयेचा विजय आहे.

-सहमत! मला वाटतं आणीबाणीनंतर खूप वर्षांनी 'राजकीय पक्षां'पेक्षा 'सजग मतदार' जिंकायला सुरूवात झाली आहे. १९७७ साली जयप्रकाश नारायण यांनी पटण्यात केलेलं विधान आठवलं: "This is a revolution, friends! We are not here merely to see the Vidhan Sabha dissolved. That is only one milestone on our journey. But we have a long way to go... After 27 years of freedom, people of this country are wracked by hunger, rising prices, corruption... oppressed by every kind of injustice... it is a Total Revolution we want, nothing less!" वरच्या विधानात After 27 years of freedom, ऐवजी After 67 years of freedom,इतकाच बदल केला तर जवळजवळ सगळी विधानं आहे तशी आजच्या दिल्लीतल्या (आणि बहुधा भारतातल्या) मतदारांना लागू पडतात. इथे केजरीवालांची जेपींशी तुलना करण्याचा हेतू नाही [तशी लोकनायक म्हणून करायचीच झाली तर कदाचित अण्णा हजारेंची करता येईल], पण तेंव्हा आणीबाणीच्या वेळी जशी जनता कंटाळून जागृत झाली होती, तशीच परिस्थिती इतक्या वर्षांनी अखेर आली आहे, त्यामुळे Total Revolution व्ह्यायला पोषक वातावरण आहे असं वाटतं.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Fri, 02/13/2015 - 13:25

In reply to +१ by बहुगुणी

Permalink

मला वाटते दर पिढी आयुष्यात

मला वाटते दर पिढी आयुष्यात एकदा "जागी" होत असावी. म्हणून १९३०, नंतर १९७० आणि आता २०१० :)
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Fri, 02/13/2015 - 15:20

In reply to मला वाटते दर पिढी आयुष्यात by आनन्दा

Permalink

अहो, ही जागी झालेली पिढी आहे

अहो, ही जागी झालेली पिढी आहे ना ती ४० वर्षांनी आलीये म्हणजे मध्ये आलेल्या पिढ्यांनी घाण केलेली आहे नित्यनेमाने. तेव्हा अति झालं की एक पिढी जागी होतेय. नाहीतर ९० मधल्या बहुतेक पब्लोकने मतदानाच्या दिवशी फिरायला जाणेच केले ना. आणि स्वातंत्र्योत्तर ५० अणि ६० मधल्या लोकांनी तर भ्रष्टाचार हा राजरोस सुरु केला असे ही म्हणू शकतो. बाकी ७० च्या "क्रांती" मधले जे टिकले ते लालू, मुलायम आणि नितिश असावेत ही बाब आपली समाज मानसिकता दर्शवतेय, नाही का ?
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 02/13/2015 - 21:58

In reply to अहो, ही जागी झालेली पिढी आहे by हाडक्या

Permalink

सहमत हाडुकराव.

सहमत हाडुकराव. आणि हेचं म्हातारे कोतारे नव्या पिढीच्या नावानी हाडं मोडतात...आपलं बोटं मोडतात... =))
  • Log in or register to post comments

Submitted by शशिकांत ओक on गुरुवार, 02/12/2015 - 09:31

Permalink

आज रेडीयो पर आपकी फर्माइश

आज रेडीयो पर आपकी फर्माइश कार्यक्रम मे बजनेवाले कुछ गाने... किरण बेदी - करवटे बदलते रहे सारी रात हम... 'आप'की कसम.... शाझिया ईल्मी - 'आप' मुझे अच्छे लगने लगे... केजरीवाल - 'आप'की आंखोमे कुछ मेहेके हुएसे ख्वाब है... दिल्ली की जनता - बेकरार करके हमे यूं ना जाईये 'आप'को हमारी कसम लौट आईये... मोदी - दिल मचलता है मेरा.. 'आप'के आ जानेसे.... अमित शाह - 'आप' यहा आए... किसलिये?? और अंतमे पप्पूकी स्पेशल फर्माईश... जीये तो जीये कैसे.... बीन 'आप'के
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on गुरुवार, 02/12/2015 - 10:58

In reply to आज रेडीयो पर आपकी फर्माइश by शशिकांत ओक

Permalink

छान

छान रे शशी. आता देशातील अनेक शहरांतील लोक म्हणत असतील- 'आप' जैसा कोई मेरे जिण्दगी मे आये, तो बात बन जाये.....
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on गुरुवार, 02/12/2015 - 11:04

In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

पक्षांतर

आणि उद्या आपकडे इतर पक्षातील लोकांची रीघ सुरू झालीच तर, आम्ही म्हणू, "आपके कमरेमें कोई रहता है!" ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 02/12/2015 - 17:33

In reply to आज रेडीयो पर आपकी फर्माइश by शशिकांत ओक

Permalink

किंचीत सुधारणा

दिल मचलता है मेरा... का दिल "धडकता" है मेरा? ;) आणि 'आप'की आंखोमे कुछ मेहेके हुएसे ख्वाब है...पेक्षा त्यातीलच, "आप की बदमाषियोंके ये नये अंदाज है" हे परत खरे झाले नाही म्हणजे मिळवले! :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुनिल सरदेसाई on Fri, 02/13/2015 - 20:45

In reply to आज रेडीयो पर आपकी फर्माइश by शशिकांत ओक

Permalink

मस्त...

मस्त...
  • Log in or register to post comments

Submitted by शशिकांत ओक on गुरुवार, 02/12/2015 - 21:21

Permalink

पप्पू वाले गाणे

भावले. किरण करवटें बदलती रही ... आप की कसम!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 02/13/2015 - 07:04

In reply to पप्पू वाले गाणे by शशिकांत ओक

Permalink

आत्ता च्या कॉंग्रेस चे गाणे

आत्ता च्या कॉंग्रेस चे गाणे -"आप जैसा कोई मेरे जिंन्दगि में आए तो बात बन जांए! :-D आणि मोदी भेटीच्या पार्श्व भूमीवर भाजप चे गाणे -"आप की नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे... :P
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on गुरुवार, 02/12/2015 - 23:28

Permalink

हीन अभिरुची

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Raj-Thackeray-cartoon/articleshow/46210861.cms राज ठाकर्‍यांनी हे अत्यंत हीन वृत्तीचे प्रदर्शन करणारे व्यंगचित्र काढले आहे. कितीही प्रतीकात्मक म्हटले तरी अरविंद केजरीवाल हा आत्मघाती अतिरेक्यासारखा मोदी आणि अमित शहाला नष्ट करत आहे हे फारच खालच्या पातळीवरचे व्यंगचित्र आहे. उद्या पाकिस्तानने २६/११ च्या हल्ल्याच्या धरतीवर कसाबच्या रुपात केजरीवाल दाखवला आणि पेटलेल्या ताज आणि सीएस्टी च्या जागी अमित शहा आणि मोदींचे चेहरे असणारे व्यंगचित्र प्रकाशित केले तर कसे वाटेल? ९/११ चा हा तथाकथित विनोद २६/११ ला विनोदविषय करण्याइतका अश्लाघ्य आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Fri, 02/13/2015 - 00:16

In reply to हीन अभिरुची by हुप्प्या

Permalink

+१ + अजून एक --- काय म्हणावे ?

१००% सहमत. विषय निघालाच आहे म्हणून येथे लिहीतो... काही आप्टार्ड्स त्यांच्या चेपूवर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर आप ने भाजपाची आणि काँग्रेसची कशी जिरवली यावरून विनोद पाठवत होते. त्यात काहीच गैर नाही. किंबहूना काही नक्कीच ज्याला "सेन्स ऑफ ह्युमर" म्हणता येतील असे होते जे मला आवडले आणि हसायला देखील आले. मात्र त्यातील एक विनोद अत्यंत आक्षेपार्ह आणि हीन होता: (मला ते शब्द पूर्णपणे लिहवत नाहीत म्हणून जे काही लिहीले आहे त्यावरून समजून घ्या. इंग्रजी होता तो मराठीत सांगत आहे) "कोण म्हणते दिल्लीत ब*** आणि खू* होत नाहीत म्हणून? आज (म्हणजे निकालाच्या दिवशी) भाजपावर ब*** झाला आणि काँग्रेसचा खू* झाला आणो तो देखील आम आदमी कडून" आपल्या विचारसरणीचा/व्यक्तीचा/टीमचा/पक्षाचा विजय झाला अथवा आपल्याला नावडत्या विचारसरणीचा/व्यक्तीचा/टीमचा/पक्षाचा पराभव झाला तर आनंद वाटणे यात काहीच गैर नाही. त्यावर विनोद करणे देखील गैर नाही. पण ज्यामध्ये अनेक मुली, बायकांवर अत्याचार झाले आहेत अशा कृत्याचा अथवा ज्यात काही जणांना हकनाक जीव गमवावे लागले आहेत अशा कृत्याचा विनोद म्हणून वापर करण्यात, संस्कृती जाउंदेत कारण हे आप्टार्डस संस्कृती मानत नसावेतच, पण सर्वसाधारण जनमान्य असलेली सभ्यतापण विसरलेत का? मोदी जिंकल्यावर देखील अथवा आत्ता पण एकेंच्या विरोधात देखील काही विनोद मी बघितलेत ज्यात सेन्स ऑफ ह्युमर वाटला नाही किंबहूना irritating वाटले. पण असला अभिरूचीशून्य, खालच्या पातळीवरचा विनोद मात्र प्रथमच पाहीला आणि पाहून खेद वाटला. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Fri, 02/13/2015 - 11:43

In reply to +१ + अजून एक --- काय म्हणावे ? by विकास

Permalink

विकास भौ

तुम्ही सोनिया गांधी , मनमोहन सिंघ यांचे मॉर्फ केलेले फोटो पाहिले नाहीत का ?
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on Fri, 02/13/2015 - 19:57

In reply to विकास भौ by कपिलमुनी

Permalink

आक्षेप कशाला आहे हे समजून घ्या

मोदी वा शहांची टिंगल करायला आक्षेप नाही. तो आहे एका अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या हाहा:कारी घटनेचा विनोदाकरता वापर करण्याला. ९/११, २६/११, हिटलरचे होलोकॉस्ट, म्युनिचमधे केले गेलेले इस्रायली खेळाडूंचे अपहरण ह्या काही घटना अशा आहेत की ज्या दीर्घकाळ स्मृतीत रहातील. अनेकांनी आपले आप्त गमावले, कित्येकांचे जन्माचे नुकसान झाले. अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. इतक्या विध्वंसक आणि वेदनाकारक घटनेचा विनोदाकरता वापर करू नये असा संकेत आहे तो राज ठाकरेने पायदळी तुडवून हे असले व्यंगचित्र काढले. आर के लक्ष्मण ह्यांची उणीव जास्त तीव्रतेने जाणवते. मटाने ह्या व्यंगचित्राला इतके डोक्यावर का घ्यावे हे अगम्य आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Fri, 02/13/2015 - 21:27

In reply to विकास भौ by कपिलमुनी

Permalink

ते पण चुकीचेच होते

ते पण चुकीचेच होते पण तुर्तास दोघेही नगण्य झाले आहेत. म्हणून केवळ, "मोदी जिंकल्यावर देखील अथवा आत्ता पण एकेंच्या विरोधात देखील काही विनोद मी बघितलेत ज्यात सेन्स ऑफ ह्युमर वाटला नाही किंबहूना irritating वाटले." इतकेच म्हणले. आणि हो मोदींना अथवा भाजपाच्या इतर कुणाला व्यक्तीगत चीपशॉट वापरत काही म्हणले असते अथवा व्यंगचित्र काढले असते तर वाटले नसते. पण वर राज ठाकरेच्या व्यंगचित्रात एकतर ज्यात हजारो माणसे (त्यात भारतीय पण होते) मेली त्याचा वापर केला, एकेंना अतिरेकी ठरवले हे सगळेच अति वाटले. विनोद करण्यास ना नाही. भारतीय मानसिकतेस (विशेष करून स्वतःवर केलेला) सेन्स ऑफ हुमर शिकणे गरजेचे आहे कारण त्यातून फुकाचा अहंकार जाण्याची शक्यता असते. स्त्रीयांवरील अमानुष अत्याचार आणि निर्घॄण हत्या यांचा उपयोग विनोद म्हणून करणे हे तर निचांक गाठणारे आहे असे वाटते. पण करणारे करतात पण त्याला आपण मान्य करणे, अनुमोदन देणे योग्य आहे का? हा प्रश्न आहे. मोदी सोडाच पण सोनिया - मनमोहन अथवा एकेंच्या वर केलेल्या असल्या चीपशॉट ला मी अनुमोदन देणार नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on Fri, 02/13/2015 - 01:13

In reply to हीन अभिरुची by हुप्प्या

Permalink

असीम त्रिवेदीची चित्रं उच्च

असीम त्रिवेदीची चित्रं उच्च अभिरुचीची होती असं सगळे म्हणत होते.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Fri, 02/13/2015 - 01:18

In reply to हीन अभिरुची by हुप्प्या

Permalink

कोरडे

आजचा लोकसत्तेचा अग्रलेख वाचला आणि "कोरडे ओढणे" या शब्दप्रयोगाचा अर्थ समजला... :) अनुत्तीर्णाचा आनंद
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 02/13/2015 - 09:03

In reply to कोरडे by विकास

Permalink

+१

विनोदाची पातळी वर नेण्यापेक्षा व्याख्याच खालच्या पातळीवर नेऊन ठेवली की "हसे" आणि "हसू" एक्मेकांत अल्गद मिसळून जाते आणि जाणीवा बोथट होऊन आपण पुरोगामी होतो !!!!! जाता जाता : सरकारी/निमसर्कारी/सार्वजनीक जागी जिन्यात लावलेल्या देव देवतांच्या (सर्व धर्माच्या) कोपरा टाइल्सची आठवण झाली. थुंकण्याचा गलीच्छपणा अडवण्याकरीता देवाला त्या पायरीवर आणून ठेवणे आणि संबधीत पाठराखण यात फारसा भेद नाहीच.
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on Fri, 02/13/2015 - 06:26

Permalink

मनसेचा एक आमदार निवडून आला

मनसेचा एक आमदार निवडून आला तेव्हां त्यावर बरेच विनोद वाचनात आले होते. कुठल्या वर्तुळातून आले असावेत हेसांनल.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्योति अळवणी on Fri, 02/13/2015 - 08:22

Permalink

विचार करणे आवश्यक

आज राजकीय पक्षांनी विचार करणे आवश्यक आहे की आता जनता जागरूक झाली आहे. केवळ पैशाच्या जीवावर निवडणूक जिंकणे अवघड आहे. तसेच जनतेने देखिल हा विचार करणे आवश्यक आहे की केवळ नविन पर्याय आहे म्हणून तो निवाडावा की ज्यांच्याकडे विकासाचा ठोस आराखडा आहे त्या पक्षाचा विचार करावा. सर्व सामान्य माणसाला जर भ्रष्टाचार मुक्त राजकारण हव आहे तर मुळात त्याने नियमांचे उल्लंघन करणे बंद केले पाहिजे आणि आपल्या पातळीवरील लाच देणे बंद केले पाहिजे. अवघड आहे.... अशक्य नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Fri, 02/13/2015 - 09:19

In reply to विचार करणे आवश्यक by ज्योति अळवणी

Permalink

सहमत पण कसेहोणार?

सर्व सामान्य माणसाला जर भ्रष्टाचार मुक्त राजकारण हव आहे तर मुळात त्याने नियमांचे उल्लंघन करणे बंद केले पाहिजे आणि आपल्या पातळीवरील लाच देणे बंद केले पाहिजे. सहमतच पण.. सामान्य (पक्षि येथे मतदार) हे केवळ वैयक्तिक आयुष्यात लाच देणारेच नसतात. बर्‍याच वेळेस घेणारे देखील असतात. आता हे बघा ना, अर्ध्या दरात वीज आणि मोफत पाणी देऊ अशी लाच पुढे ठेवल्यावरच जनता मते देण्यास गेली. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 02/13/2015 - 09:36

In reply to सहमत पण कसेहोणार? by विकास

Permalink

असंच म्हटलं तर.... :)

>>>>> आता हे बघा ना, अर्ध्या दरात वीज आणि मोफत पाणी देऊ अशी लाच पुढे ठेवल्यावरच जनता मते देण्यास गेली. असंच म्हटलं तर.... विदेशातील काळा पैसा शंभर दिवसात आनु, प्रत्येक भारतीयांच्या खात्यात पंधरा लाख रुपये असतील, ३७० वे कलम रद्द करु, शंभर स्मार्ट शहरं करु. महागाई कमी करु, अशी आमिशं दाखवली आणि जनता मते देण्यास पुढे गेली. काय करायचं ते या स्वप्नाळु जनतेचं करावं लागेल. नुसत्या पोतडीची गाठ सोडायचा अवकाश की भारतीयांची गर्दी जमते. पोतडी उघडली की काय नसतं.... :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com