Skip to main content

कोण जिंकणार दिल्ली?

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 29/01/2015 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
अवघ्या १४ महिन्यांच्या अवधीत राजधानी दिल्ली पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. डिसेंबर २०१३ पासून ७ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या १४ महिन्यात दिल्लीकर तिसर्‍यांदा मतदान करणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजपला ३२, आआपला २८, काँग्रेसला ८, जदयुला १ व अपक्षांना १ अशा जागा मिळाल्या होत्या. कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी आघाडी करावीच लागणार होती. भाजप, आआप व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले होते. सलग १५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या शीला दिक्षितांना पराभूत करून केजरीवालांनी सामनावीराचा किताब पटकाविला होता, परंतु सामना जिंकण्यात त्यांना अपयश आले होते. प्रचारात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध प्रचंड राळ उठविणार्‍या केजरीवालांनी निकाल लागल्यावर एकदम टोपी फिरविली. काही दिवस चर्चेचे नाटक करून व नंगर नागरिकांकडून एसेमेस मागविण्याची नौटंकी करून शेवटी चक्क काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आणि त्यानंतर लगेचच ४९ दिवसात राजीनामा देऊन मोकळेही झाले. त्या ४९ दिवसात जे झाले त्याचा सभ्य शब्दात "तमाशा" असाच उल्लेख करावा लागेल. आआप सरकारमधील मंत्र्यांने गाडीवर खेळणार्‍या मुलाचा फुटबॉल आदळल्यावर माझ्यावर दगडफेक झाली हा थेट आरोप करणे, अजून एका दुसर्‍या मंत्र्याने अधिकार नसताना व कोणतेही वॉरंट नसताना परदेशी नागरिकांच्या घरावर धाड घालणे, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रात्रभर फुटपाथवर धरणे धरून नागरिकांना वेठीस धरणे, राज्यपालांची परवानगी नसताना जनलोकपाल विधेयक मांडण्याचा हट्ट धरणे व त्या कारणावरून राजीनामा देणे ... हे व असे अनेक वादग्रस्त प्रकार त्या ४९ दिवसात घडले. शेवटी त्यांच्याच अट्टाहासामुळे दिल्लीला पुन्हा एकदा निवडणुक होत आहे. दरम्यानच्या काळात यमुनेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व ७ मतदारसंघात भाजपचा विजय झाला. दस्तुरखुद्द केजरीवालांनी मोदींविरूद्ध निवडणुक लढण्यासाठी वाराणशीला जाउन उंटाच्या **चा मुका घ्यायचा प्रयत्न केला व त्यात साफ पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीच्या काळात आआपच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःला थोबाडीत मारून घ्यायचे व स्वतःवर शाई उडविण्याचे कार्यक्रम त्यांनी मॅनेज केले व स्वतःला सहानुभूती मिळविण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. त्यांच्या दुर्दैवाने हे सर्व प्रयत्न फसले. परंतु फेब्रुवारी २०१५ मध्ये परिस्थिती बदललेली आहे. आआपचे काही मुख्य नेते आआप सोडून भाजपमध्ये गेले आहेत (शाझिया इल्मी, विनोद बिन्नी इ.). आआपचे एक संस्थापक असलेले शांतीभूषण यांनी केजरीवालांवरच टीका करून किरण बेदींचे कौतुक केले आहे. आआप तर्फे अजूनही केजरीवाल हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जगदीश मुखी असतील हे गृहीत धरून केजरीवालांनी त्यांना लक्ष्य करून प्रचाराला सुरूवात केली होती. नंतर भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सतीश उपाध्याय आहे अशी समजूत करून घेऊन त्यांनी सतीश उपाध्याय यांच्याविरूद्ध राळ उठवायला सुरूवात केली. नंतर भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच नाही व मोदी स्वतःच दिल्लीचे मुख्यमंत्री होणार अशा तर्‍हेने भाजप प्रचार करीत आहे असेही आआपने सांगायला सुरूवात केली. परंतु भाजपने अगदी आयत्या वेळी केजरीवालांच्याच सहकारी माजी पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना भाजपत आणून त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून ही लढत केजरीवाल विरूद्ध बेदी अशी कलाटणी देऊन टाकली. बेदींना भाजपत आणून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करणे हा काही जणांच्या मते भाजपचा मास्टरस्ट्रोक आहे. खरे काय ते दिल्लीकरच ठरवतील. दिल्लीचे मतदार अत्यंत जागृत आहेत. त्यांनी निवडणुकीत भल्याभल्यांना हिसका दाखविलेला आहे. त्यामुळे नक्की काय निकाल लागेल हे सांगता येत नाही. सध्या तरी आआपचे पारडे काही प्रमाणात जड आहे असे वाटते. भाजप व आआपमध्ये तुल्यबल लढत होऊन भाजपच्या तुलनेत आआपला अगदी थोड्या जागा जास्त मिळतील असा बर्‍याच मतदार सर्वेक्षणांचा अंदाज आहे. परंतु पुन्हा एकदा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असे वाटत नाही. या दोन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेस व इतर कोणतेही पक्ष मतदारांच्या खिजगणीतही नाहीत. दुर्दैवाने पुन्हा एकदा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर मागील वर्षीच्याच तमाशाची पुनरावृत्ती होईल. जर आआपला स्पष्ट बहुमत मिळाले तरी केजरीवालांसारख्या अत्यंत बेभरवशाच्या व विचित्र स्वभावाच्या व्यक्तीमुळे ते सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही.

वाचने 150353
प्रतिक्रिया 452

प्रतिक्रिया

In reply to by गणेशा

त्या यंत्रात तांत्रिक बिघाड होता व तो दुरूस्त करण्यात आला हे निवडणुक आयोगानेच जाहीर केले होते. एक साधा विचार करा. जर भाजपला ४ मतदान यंत्रात फेरफार करता येत असेल तर उर्वरीत यंत्रात का नाही करता येणार? जर मतदान यंत्रात भाजपला फेरफार करता येत असता तर भाजपने स्वतःची इतकी दारूण अवस्था करून घेतली असती का? उलट भाजपने स्वतःला दोन तृतीयांश जागांची बेगमी करून ठेवली असती.

In reply to by श्रीगुरुजी

मी असे म्हणत नाही की भाजप ने तेथे केले आहे, मी हे फक्त सांगत आहे की तसे करता येते. तुम्ही तांत्रीक बिघाड ज्याला म्हणता तो मॅन्युअली पण करता येते. मी एक सोफ्ट इंजिनिअर आहे . तो प्रोग्रॅम चेंज करुन मी दाखवु शकतो. कृपया येथे तुम्ही विचारले असे कोठे होते का म्हणुन मी सांगितले. आता सआंगितल्यावर त्याला पाठपुरवठा मी करु शकत नाही म्हणुन मी चुकच असे नाही. ठिक आहे भविष्यात कधी असे निदर्शनास आल्यावरच बोलता येईल. आणि सर्व ठिकाणी असे केले तरी सर्वांना पैसे चारायला लागतील तसे शक्यतो होत नाही. आणि सगळीकडे भाजपच आल्यावर मशीन चेक करण्याचे आदेश नंतर सर्व पक्ष देवु शकतील . असो या मुद्द्यावर मी जास्त बोलु शकणार नाही. दिल्लीत भाजप न्मे तसे नसेल केले ही, पण आप मुर्खच आहे असे समजलात म्हणुन सांगितले असे होउ शकते. वरती जो तुम्ही तांत्रीक बिघाड म्हणता आहे त्यात सर्व वोट भाजप ला जात होते

In reply to by गणेशा

मला फक्त एवढंच सांगा की मतदान झाल्यावर आआप कार्यकर्त्यांना व उमेदवारांना गेले ३ दिवसरात्र मतदानमोजणी यंत्रावर पहारा ठेवायला सांगण्याचा भंपकपणा करण्याचे कारण काय? निवडणुक आयोगाची स्वतःची सुरक्षा यंत्रणा नसते का? प्रत्येक मतदान यंत्राला सील नसते का? या सगळ्यावर अविश्वास दाखवून आणि जणू काही भाजप प्रत्येक मतदान यंत्रातले सॉफ्टवेअर बदलून निकाल बदलणार आहे म्हणून स्वतःच तिथे वेगळा पहारा ठेवण्याचे प्रयोजन काय? हे सगळे करून केजरीवाल काय साध्य करणार होते? भाजपबद्दल लोकांच्या मनात विनाकारण संशय निर्माण करण्याचे कारण काय? आआपचा पहारा नसता तर भाजप असे खरोखरच करू शकला असता का? आज विजय मिळाल्यावर सुद्धा माझी बायको केंद्र सरकारी नोकरीत आहे व सरकार तिच्यावर सूड उगवू शकते हे जाहीर मेळाव्यात सांगण्याचे कारण काय? भाजपवर विनाकारण कपोलकल्पित आरोप करणे केजरीवाल कधी थांबविणार खुदा जाने.

In reply to by गणेशा

धन्यवाद! भाजप वाईट पक्ष असेल, पण विनाकारण या पक्षाचा बागुलबुवा उभा करू नका हे केजरीवालांना कोणीतरी समजावण्याची गरज आहे. असो.

In reply to by श्रीगुरुजी

पंप्र मोदींच्या पत्नीची बातमी दाखवल्याची शिक्षा म्हणून गुजरात सरकारने तिथल्या दूरदर्शन संचालकाची बदली तात्काळ अंदमानला केली ! हा सूड नाहीतर काय आहे ?? आता यात मोदी कदाचित डायरेक्ट इन्वोल्व नसतील पण त्यांचे भक्त तर आहेत ना ? आणि त्यांनी याच्यावर सोयीस्कर मौन पाळले आहे . बाकी हागल्या मुतल्यावर ट्वीट करतात पण अशा घटनांवर नाही ! ( हागल्या मुतल्यावर हा देखील * चा मुका घेणे या प्रमाणे वाक् प्रचार आहे) म्हणून केजरीवाल यांचे सर्व आरोप निराधार नसतात

In reply to by कपिलमुनी

मुख्यमंत्री राहिलेले आणि भावी मुख्यमंत्री असलेले केजरीवाल आणि गुजरात मधील दूरदर्शनचा संचालक यांच्यात काहीच फरक नाही का? केजरीवालांच्या पत्नीला त्रास द्यायचा असता तर पूर्वीच्या काँग्रेस सरकारने आणि आताच्या भाजप सरकारने यापूर्वीच त्रास दिला नसता का? इतका वेळ कशाला वाट पाहतील ते?

In reply to by श्रीगुरुजी

थांक्यू ! कमीतकमी त्या संचालिकेला त्रास दिला हे कबूल केल्याबद्दल ! यापूर्वीच त्रास दिला नसता का? अहो यापूर्वी केजरीवाल यांनी कुठे मोदी-शहा द्वयीला माती चारली होती ? ( पुन्हा वाक् प्रचार) .. पूर्वीच्या आणि आताच्या परीस्थितीमधे बराच फरक पडला आहे . एका काळजी करणार्‍या नवर्‍याने बायकोची काळजी बोलून दाखवली.

In reply to by कपिलमुनी

>>> यापूर्वीच त्रास दिला नसता का? अहो यापूर्वी केजरीवाल यांनी कुठे मोदी-शहा द्वयीला माती चारली होती ? ( पुन्हा वाक् प्रचार) .. केजरीवालांनी त्रास देऊ नये म्हणून आधीच पत्नीला त्रास दिला नसता का? इतका वेळ वाट पाहण्याची गरज काय? >>> थांक्यू ! कमीतकमी त्या संचालिकेला त्रास दिला हे कबूल केल्याबद्दल ! आपल्या धोरणांविरूद्ध बातमी दिल्यास कारवाई करण्याची दूरदर्शनची फार जुनी परंपरा आहे. १९७९ मध्ये जयप्रकाश नारायण यांचे निधन झाल्याची बातमी देणार्‍या वृत्तनिवेदिकेस निलंबित केले गेले होते (त्यावेळी जयप्रकाश नारायण गेलेच नव्हते). २-३ महिन्यांपूर्वी चीनच्या पंतप्रधानांचे नाव झी (XI) असे उच्चारण्याऐवजी इलेव्हन असे उच्चारल्याबद्दल गोव्यातील वृत्तनिवेदिकेस निलंबित केले गेले होते. >>> एका काळजी करणार्‍या नवर्‍याने बायकोची काळजी बोलून दाखवली. काळजीबिळजी काही नाही, हा शुद्ध भंपकपणा आहे. जे होणे शक्यच नाही ते भाजप करणार असल्याची विनाकारण ओरड आहे ही. स्वतः साळसूद राहून भाजपचा बागुलबुवा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे हा. मतमोजणी केंद्रावर पहारा ठेवून हेच केलं होतं त्यांनी.

In reply to by श्रीगुरुजी

>>केजरीवालांनी त्रास देऊ नये म्हणून आधीच पत्नीला त्रास दिला नसता का? इतका वेळ वाट पाहण्याची गरज काय? तेव्हा केजरीवाल यांना एवढा यश मिळेल अशी अपेक्षा नव्हती ! >>आपल्या धोरणांविरूद्ध बातमी दिल्यास कारवाई करण्याची दूरदर्शनची फार जुनी परंपरा आहे. १९७९ मध्ये जयप्रकाश >>नारायण यांचे निधन झाल्याची बातमी देणार्‍या वृत्तनिवेदिकेस निलंबित केले गेले होते (त्यावेळी जयप्रकाश नारायण >>गेलेच नव्हते). २-३ महिन्यांपूर्वी चीनच्या पंतप्रधानांचे नाव झी (XI) असे उच्चारण्याऐवजी इलेव्हन असे >>उच्चारल्याबद्दल गोव्यातील वृत्तनिवेदिकेस निलंबित केले गेले होते. तुम्ही सांगत आहात त्या शुद्ध चुका आहेत ! त्याबद्दल निलंबित करणे योग्य कारण ते चुकीची शिक्षा आहे . पण योग्य आणि खरी बातमी दाखवल्याची शिक्षा ? कारण ती बदली रेग्युलर नव्हती. बाकी मोदींचा १० लाखाचा सुट हा तुम्हाला भंपकपणा वाटणार नाही .. दिखाउ पणा वाटणार नाही .. तिथे मेक इन इंडिया आठवणार नाही .. याला दुसर्‍याच्या डोळ्यातला कुसळ दिसता पण स्वतःच्या डोळ्यामधला मुसळ दिसत नाही असे म्हणतात . बाकी तुम्ही भक्त त्यामुळे तुम्हाला सर्व चालते

In reply to by कपिलमुनी

>>> तेव्हा केजरीवाल यांना एवढा यश मिळेल अशी अपेक्षा नव्हती ! जाहीर सभेत कितीही दावे केले तरी प्रत्येक पक्षाला आपली व इतर पक्षांची परिस्थिती माहित असते. >>> तुम्ही सांगत आहात त्या शुद्ध चुका आहेत ! त्याबद्दल निलंबित करणे योग्य कारण ते चुकीची शिक्षा आहे . पण योग्य आणि खरी बातमी दाखवल्याची शिक्षा ? कारण ती बदली रेग्युलर नव्हती. दूरदर्शनची स्वतःचे नियम व धोरणे आहेत. त्याविरूद्ध वर्तन केल्यास कारवाई होते. हे निर्णय दूरदर्शन स्वतःच्या अखत्यारीतच घेते. प्रसारभारती आल्यावरसुद्धा या धोरणात बदल झालेला नाही. दूरदर्शनचे अनेक निर्णय हे विचित्र असतात. १९९३ मध्ये दूरदर्शनवर 'खून भरी मांग' हा चित्रपट दाखविला गेला होता त्यावेळी त्या चित्रपटातील शत्रुघ्न सिन्हाचे चित्रीकरण असलेली दृश्ये जाणूनबुजून कापली होती (कारण तो भाजपमध्ये होता). आणिबाणीच्या काळात दूरदर्शनने 'आंधी' चित्रपटावर बंदी आणली होती व त्या चित्रपटातील गायक किशोरकुमारची गाणी छायागीतमध्ये बराच काळ दाखवित नव्हते. >>> बाकी मोदींचा १० लाखाचा सुट हा तुम्हाला भंपकपणा वाटणार नाही .. दिखाउ पणा वाटणार नाही .. तिथे मेक इन इंडिया आठवणार नाही .. याला दुसर्‍याच्या डोळ्यातला कुसळ दिसता पण स्वतःच्या डोळ्यामधला मुसळ दिसत नाही असे म्हणतात . या सुटाची किंमत १० लाख कोणी सांगितली तुम्हाला? तुमच्याकडे काय शिंप्याची किंवा कपड्याची पावती आहे का? पुरावा असेल तर द्या. >>> बाकी तुम्ही भक्त त्यामुळे तुम्हाला सर्व चालते तुम्हा द्वेष्ट्यांना काहीच चालत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

>>दूरदर्शनची स्वतःचे नियम व धोरणे आहेत. त्याविरूद्ध वर्तन केल्यास कारवाई होते. हे निर्णय दूरदर्शन स्वतःच्या >>अखत्यारीतच घेते. प्रसारभारती आल्यावरसुद्धा या धोरणात बदल झालेला नाही. दूरदर्शनचे अनेक निर्णय हे विचित्र >>असतात. १९९३ मध्ये दूरदर्शनवर 'खून भरी मांग' हा चित्रपट दाखविला गेला होता त्यावेळी त्या चित्रपटातील >>शत्रुघ्न सिन्हाचे चित्रीकरण असलेली दृश्ये जाणूनबुजून कापली होती (कारण तो भाजपमध्ये होता). आणिबाणीच्या >>काळात दूरदर्शनने 'आंधी' चित्रपटावर बंदी आणली होती व त्या चित्रपटातील गायक किशोरकुमारची गाणी >>छायागीतमध्ये बराच काळ दाखवित नव्हते. खून भरी मांग दाखवला तेव्हा मला आठवता तसा इलेक्शन चालू होता त्यामुळे इनडायरेक्ट प्रचार होइल अशी धारणा झाल्यामुळे त्याचा पात्र कापला होता. बाकी जे झाले त्याला चूक न म्हणता तुम्ही दुसर्‍याच मुद्द्यावर बोलत आहात . काँग्रेसच्या कालवधीमधल्या चुका दाखवून आता काय साध्य होणार आहे ? भाजपा त्याच चुका करणार असेल तर फरक तो काय ?? त्यामुळे मोदींविषयी बातमी दाखवून जर निष्कारण बदली होत असेल तर हे चूकच आहे हे मान्य करा . काँग्रेसच्या राजवटीमध्ये पण चुका होत होत्या म्हणूनच लोकांनी त्यांना घरी बसवला आहे. ते चुकले म्हणून ही चूक जस्टीफाय होत नाही.

In reply to by कपिलमुनी

>>> खून भरी मांग दाखवला तेव्हा मला आठवता तसा इलेक्शन चालू होता त्यामुळे इनडायरेक्ट प्रचार होइल अशी धारणा झाल्यामुळे त्याचा पात्र कापला होता. त्यावेळी जवळपास कोणतीच निवडणुक नव्हती असे आठवत आहे. समजा असली तरी शत्रुघ्न सिन्हा चित्रपटात दिसल्यामुळे कसा काय प्रचार झाला असता? राजेश खन्ना त्यावेळी काँग्रेसचा खासदार होता व त्याचे चित्रपट मात्र सुरूच होते. आणि महत्त्वाचे म्हणजे केबलवर शत्रुघ्न सिन्हाचे चित्रपट कसे थांबविता येणार होते? >>> बाकी जे झाले त्याला चूक न म्हणता तुम्ही दुसर्‍याच मुद्द्यावर बोलत आहात . काँग्रेसच्या कालवधीमधल्या चुका दाखवून आता काय साध्य होणार आहे ? भाजपा त्याच चुका करणार असेल तर फरक तो काय ?? त्यामुळे मोदींविषयी बातमी दाखवून जर निष्कारण बदली होत असेल तर हे चूकच आहे हे मान्य करा . काँग्रेसच्या राजवटीमध्ये पण चुका होत होत्या म्हणूनच लोकांनी त्यांना घरी बसवला आहे. ते चुकले म्हणून ही चूक जस्टीफाय होत नाही. दूरदर्शनवाले आपल्या धोरणानुसार अशी कारवाई करत असतात. मोदींचा त्याच्याशी संबंध नाही.

In reply to by श्रीगुरुजी

दूरदर्शनवाले आपल्या धोरणानुसार अशी कारवाई करत असतात. मोदींचा त्याच्याशी संबंध नाही.
हा तर कळस आहे ! रेल्वे अपघात झाला तेव्हा लालबहादूर शास्त्री स्वतः रेल्वे चालवत नव्हते किंवा सिग्नल दाखवत नव्हते पण त्यांनी नैतिक जबाब्दारी घेउन राजीनामा दिला . दूरदर्शनवाले पण सरकारचा एक भाग आहे . मग दूरदर्शनचे धोरण हेच सरकारी धोरण .. त्यामुळे ही बातमी प्रसारीत झाल्यानंतर ती बदली रद्द करणे किंवा त्याचा निषेध करायला हवा होता. पण तो केला गेला नाही याचा अर्थ सरळ आहे की याला मोदींची हरकत नाहिये . त्यांना मेसेज पास करायचा आहे माझ्याविरूद्ध झापाल तर घरी जाल . त्यांची विरोधकांना संपवायची वृत्ती यातून दिसून येते जसा की संजय जोशी !

In reply to by कपिलमुनी

पंतप्रधानांनी प्रत्येक स्तरावरल्या नियुक्त्यात किंवा बदल्यांमध्ये लक्ष घातलं किंवा निषेध करत बसले तर देश कधी चालविणार? उद्या ग्रामपंचायतीतल्या एखाद्याची पाणीखात्यातून उंदीर मारायच्या विभागात बदली झाली तरी यात पंतप्रधानांनी लक्ष घातलं पाहिजे अशी तुम्ही अपेक्षा ठेवाल.

In reply to by श्रीगुरुजी

भ्रष्टाचाराचे आरोप झाले की पावत्या मागायच्या असा विनोदी प्रकार भक्तांनी सुरु केलेला दिसतोय .

In reply to by श्रीगुरुजी

http://www.abplive.in/india/2015/01/27/article486403.ece/How-costly-is-… http://www.bbc.com/news/world-asia-india-31034110 http://www.dnaindia.com/india/report-pm-modi-s-name-suit-estimated-cost… http://www.standard.co.uk/news/londoners-diary/londoners-diary-only-sav… बाकी आता तुम्ही शिंप्याची पावती मागताय तर ज्या काळ्या पैशा बद्दल मोदी सरकार आणि भाजपा गळा काधत आहे त्या सर्व अकाउंटचे नाव नंबर आणि बॅलन्सशीट असतीलच तुमच्याकडे.. तेवढ्या द्या म्हणजे झाला

In reply to by कपिलमुनी

हे सगळं स्पेक्युलेशन आहे हो. प्रत्येक जण आपल्या मनाने सूटची किंमत ठरवत असतो. आआपवाले तर सांगत होते की सूटवर जी पिवळ्या रंगाची शिवण दिसत होती तो प्रत्यक्षात सोन्याचा धागा आहे. आआपवाल्यांनी काय गाडगीळांकडे जाऊन सोन्याची शुद्धता तपासली होती की काय? एकजण उठतो आणि सूट १० लाखाचा सांगतो, लगेच दुसरा उठतो आणि सूट १५ लाखाचा सांगतो, ... याला काही अर्थ आहे का? सूटच्या कापडाची आणि शिंप्याची पावती असेल तरच विश्वास ठेवता येईल.

In reply to by श्रीगुरुजी

एका भक्ताने नमोंना ते कापड भेट दिलं होतं. नमोंनी त्याचा कोट शिवला. नमोंच्या लेखी त्याची किंमत केवळ शिलाईचा खर्च. १५ लाखाची शिलाई आकारणारा शिंपी मनिष मलहोत्रा असावा काय? ;)

In reply to by श्रीगुरुजी

अशे आरोप झाल्यानंतर पंप्र किंवा त्यांच्या कार्यालयाने किंवा भाजपाने उत्तर देणे गरजेचे होते . पण आरोपांचे खंडन केले नाही. बाकी गोलमेज परीषदेला उघडे जाणारे गांधीजी किती महान होते ते पुन्हा एकदा रीयलाइ़ज झाले .

In reply to by कपिलमुनी

अशे आरोप झाल्यानंतर पंप्र किंवा त्यांच्या कार्यालयाने किंवा भाजपाने उत्तर देणे गरजेचे होते .
पंतप्रधान व्यक्तीने काय कपडे घातले, त्याची किंमत किती होती, कुठुन शिवले, कोणि ते कापड भेट दिलं याचं स्पष्टीकरण पंप्र कार्यालय किंवा भाजपने द्यायला हवं होतं? आय काण्ट बिलीव्ह इट. तसंही आपल्या देशकारणाला आणि राजकारणाला गरिबीचं उदात्तीकरण करण्याची विचित्र हौस आहेच. बाकी बापुंबद्दल काय बोलणार... त्यांच्या साध्या लाईफस्टाईलच्या महागड्या किंमतीबद्दल सरोजनी नायडुंचे उद्गार प्रसिद्ध आहेतच. असो.

In reply to by अर्धवटराव

नक्कीच आहे . पण दोन्ही बाजूंना आहे चायवाला पासून ते मोदी किती गरीबीतून कष्ट करून वाढले आहेत हे गरिबीचं उदात्तीकरण भाजपावाले पण करतात .. राग " गिरे तो भी टांग उप्पर " या वृत्तीचा आहे . पोकळ समर्थन आणि दुसर्‍यांवर आरोप ! बाकी रागां ला शहजादे म्हणायचे आणि आपण सुद्धा तसेच वागायचे यालाच दुटप्पीपणा म्हणतात

In reply to by कपिलमुनी

गरिबीतुन कष्ट करुन वर येणं आणि दुसर्‍याच्या पैशातुन गरिबी विकत घेणं जर तुम्हाला सारखं वाटत असेल तर त्यावर माझं काहि म्हणणं नाहि. आणि तसंही, या सध्याच्या राजकारणाच्या साठमारीत उगाच त्या गांधीबाबाला घुसडणं मला पटत नाहि. असो.

In reply to by कपिलमुनी

पंतप्रधानांवर गेला बाजार असे अनेक आरोप रोज होत असतात. अशा प्रत्येक आरोपाला उत्तर ते देत बसले तर दिवसाचे ४८ तास करून सुद्धा पुरणार नाहीत. अशा खोडसाळ आणि निराधार आरोपांकडे दुर्लक्ष करणेच योग्य.

In reply to by श्रीगुरुजी

मग हेच उद्या मुख्यमंत्र्यांना पण लागु होणार आहे हे लक्षात राहुद्या. आणि व्यर्थ आरोप करु नका

In reply to by श्रीगुरुजी

सर्व आरोपांना पावत्या मागत असाल तर काळ्या धनाच्या पावत्या , पुरावे कुठे आहेत ? भाजपा नुसते आरोप करत होती . आता ९ महिने झाले .. कुठे आहे काळा पैसा ?? किमान पुरावे तरी जाहिर करा

In reply to by कपिलमुनी

काळ्या धनाच्या 'पावत्या' आणि त्या 'दाखवणे' याबद्दल आपल्या काय अपेक्षा आहेत? किंवा त्याबद्दल आपल्या काय कल्पना आहेत असं विचारणं जास्त सयुक्तीक ठरेल.

In reply to by अर्धवटराव

काय अपेक्षा आहेत
गुर्जींना मोदींच्या कपड्याची पावती किंवा शिंप्याच्या बिलाची पावतीची जी अपेक्षा आहे ना तीच ! कारण मला माहीत आहे पंप्रच्या शिंप्याची आणि काळ्या धनाची कोणतीही खरी पावती अस्तित्वातच नसते !

In reply to by कपिलमुनी

जर शिंप्याची पावतीच अस्तित्वात नसते तर कशाच्या जीवावर तुम्ही सुटाची किंमत १० लाख ठरविलीत? उगाच हवेत काहीतरी निराधार वावड्या उडवायच्या. बादवे, तुम्ही लग्नात सूट घातला होता का? असल्यास त्याला किती खर्च आला होता?

In reply to by कपिलमुनी

वैयक्तिक होत असेल तर क्षमस्व. मुद्दा एवढाच की स्वतःच्या सूटला किती खर्च आला यावरून इतरांच्या सूटच्या किंमतीचा अंदाज येऊ शकेल.

In reply to by श्रीगुरुजी

हे एक भक्ताच लक्षण . थोडी टीका झाली की संतुलन ढासळत . मला खात्री आहे गुर्जी णा मनातल्या मनात या देशद्रोही लोकांना कुठल्या नरकात पाठवू अस झाल असेल *lol* *LOL*

In reply to by कपिलमुनी

बाकी तुम्ही भक्त त्यामुळे तुम्हाला सर्व चालते
कार्यकर्त्यांना भक्त म्हणून तुम्ही कार्यकर्ते किंवा भक्त यापैकी कुणातरी एकाचा अपमान केलाय... ;)

बायको वरून आठवल . जिंकल्यानंतर केजरीवाल प्रथमच आपल्या पत्नीस समोर घेऊन आले. त्यांचे प्रत्येक वेळी संभाळुन घेतल्याबद्दल आणि कायम पाठीशी उभे राहील्याबद्दल जाहीर आभार मानले. कुठे केजरीवाल आणि कुठे आपले ………. . बर ते जाऊ दे . चालायचंच *biggrin*

In reply to by पिंपातला उंदीर

मी आता नेट वर एक लिंक पाहिली, अरविंद केजरीवाल यांनी अहंकार करु नका असे सांगितले आहे त्यात आणि हे चांगले वाटले. सामान्य लोक जिंकु शकतात, हे आप ने दाखवुन दिले आहे, फक्त नेत्यांची मुले , पैसेवाले यांपेक्षा सामन्य लोक जिंकु शक्तात हे दाखवणे खुप आहे असे वाटते

In reply to by पिंपातला उंदीर

हा कमरेखालचा वार आहे. न कळत्या वयात झालेल्या लग्नाची आठवण साठाव्या वर्षी का उगाळायची? बाकी काँग्रेस समर्थकांच्या प्रतिक्रिया पाहताना मजा येतेय. भाजपाच्या पराभवाने थोडा तरी मुद्दा मिळाला आहे त्यांना.

In reply to by पिंपातला उंदीर

दिवसभर दगदग केल्यानंतर, थकूनभागून घरी परतून मग 'ओल्या पिंपात माना मुरगळून पडलेल्या गलितगात्रांचा 'वर्ल्ड व्ह्यू वाचून 'अंमळ करमणूक' होते आहे खरी!

भाजपेयी आत्मपरीक्षण करतील अशी किंचित आशा होती पण हे तर अजून केजरीवाल भंपक आहे .. आक्रस्ताळा आहे ईई मुद्दे उगाळत बसले आहेत . एवढ्या मोठ्या पराभवाची कारणीमीमांसा कोणत्याही पक्षाने , कार्यतर्याने , समर्थकाने नक्कीच करायला हवी. पूर्ण पराभव झाला याचा अर्थ चुकाही तेवढ्याच गंभीर आहेत . आणि मतदारांशी तुटलेली नाळ का तुटली . केजरीवाल कसे का असेना पण आज मतदारांनी त्यांना स्विकारला आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे इथे हातपाय आपटून नावे ठेवण्यात काही हशील नाही. अ पार्टी विथ डिफ्रन्स ने आत्मपरीक्षण करावे आणि पुढे या चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी . बाकी समर्थकाऐवजी भक्त असतील तर मात्र हे अवघड आहे.

In reply to by कपिलमुनी

>>> भाजपेयी आत्मपरीक्षण करतील अशी किंचित आशा होती पण हे तर अजून केजरीवाल भंपक आहे .. आक्रस्ताळा आहे ईई मुद्दे उगाळत बसले आहेत . निवडणुक जिंकली असली तरी लगेच हे दोष गुणात परिवर्तित होत नसतात. >>> एवढ्या मोठ्या पराभवाची कारणीमीमांसा कोणत्याही पक्षाने , कार्यतर्याने , समर्थकाने नक्कीच करायला हवी. पूर्ण पराभव झाला याचा अर्थ चुकाही तेवढ्याच गंभीर आहेत . आणि मतदारांशी तुटलेली नाळ का तुटली . करतील ना. जरा वेळ तर द्या. अजून पूर्ण निकाल सुद्धा जाहीर झालेला नाही. >>> केजरीवाल कसे का असेना पण आज मतदारांनी त्यांना स्विकारला आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे इथे हातपाय आपटून नावे ठेवण्यात काही हशील नाही. अ पार्टी विथ डिफ्रन्स ने आत्मपरीक्षण करावे आणि पुढे या चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी . नक्कीच करेल हे भाजप >>> बाकी समर्थकाऐवजी भक्त असतील तर मात्र हे अवघड आहे. हे केजरीभक्तांनाही लागू पडते.

In reply to by श्रीगुरुजी

त्यांनी सरकार सोडल्यावर चूक मान्य केली .. लोकसभेचा पराभव पचवला .. चुका केल्या हे कबूल केला आणि त्या सुधारल्या म्हणून तर आज विजय प्राप्त झाला . निवडणुक जिंकली असली तरी लगेच हे दोष गुणात परिवर्तित होत नसतात. खरे आहे .. बाकी ते संजय जोशी कुठे असतात हो आज काल ??

In reply to by कपिलमुनी

>>> त्यांनी सरकार सोडल्यावर चूक मान्य केली .. लोकसभेचा पराभव पचवला .. चुका केल्या हे कबूल केला आणि त्या सुधारल्या म्हणून तर आज विजय प्राप्त झाला . मुख्यमंत्रीपद सोडल्यावर अनेक दिवस ही कृती योग्यच कशी आहे आणि आपण कशी मुख्यमंत्रीपदावर लाथ मारली असे केजरीवाल आणि आआपवाले उच्चरवाने सांगत होते. जनलोकपालसाठी अशी हजार मुख्यमंत्रीपदे कुर्बान आहेत अशा फुशारक्या ते मारत होते. आपले हे कृत्य जनतेला अजिबात आवडलेले नाही व आपण करत असलेले समर्थन कोणालाच पटत नाही व या निवडणुकीत हा मोठा इश्यू होईल हे ओळखल्यानंतरच केजरीवालांनी चूक मान्य केली. नाहीतर आधी बरेच महिने मी बरोबरच केलं असे अभिमानाने सांगत होते.

In reply to by श्रीगुरुजी

अश्या फुशारक्या ते मारत असतील ही पण निदान माफी तरी मागितली. पण भाजप शेवट पर्यंत त्यांना भगोडा म्हणत होते आणि आता त्यांना ते म्हणण्याच्या ही लायक ठेवले नाही. मी काय म्ह्णतो श्री गुरुजी, काही वेळेस तात्पुरती माघार घेणॅ किंवा चुक मान्य करणे ही फायदेशीर नसते का ? असो.. तुम्ही जेव्हडे दुसर्यावरती चिखल फेकताल तेव्हडाच चिखल तुमच्याकडे पण फेकला जातो. कट्टरता असावी पण ती इतरांचा पण आदर करुन असावी. दुसरे तुच्छ आणि आपण कसे बरोबर हे योग्य नाही. मी तुमचे लिखान वाचतो, पहिले मुद्दे विश्लेषण योग्य असेन पण प्रत्येक विरोधी मतांवर ते बरोबर असले तरी आपण आपलेच मुद्दे का रेटायचे ? दुसर्‍यांचे अभिनंदन करताना पण बघु आता असे का बोलायचे. असो.. दुसर्‍यांना तुच्छ लेखने बंद करावे. त्यांनी चुक केली तर ते खाली येतील पुढच्यावेळेस आपोआप. आप काय कोणाचे पाहुने नाही की बिजेपी पण. जे तत्त्वाने..सदाचाराणे जनतेची कामे करतील त्यांच्या बाजुने लोक असतील असे नाही का वाटत. असो .. आनखिन काय बोलणार

In reply to by गणेशा

>>> अश्या फुशारक्या ते मारत असतील ही पण निदान माफी तरी मागितली. पण भाजप शेवट पर्यंत त्यांना भगोडा म्हणत होते आणि आता त्यांना ते म्हणण्याच्या ही लायक ठेवले नाही. माफी मागणे ही निवडणुक स्ट्रॅटेजी होती हो. त्यात प्रामाणिकपणा नव्हता. मुख्यमंत्रीपद सोडल्यावर अनेक महिने ते आणि त्यांचे सहकारी हा निर्णय कसा योग्य आणि तात्विक आहे आणि जनलोकपालसाठी मुख्यमंत्रीपद कसे लाथाडले आणि भविष्यात अशी हजारो मुख्यमंत्रीपदे लाथाडू असे जाहीररित्या सांगत होते. आपला निर्णय चुकीचा होता याचा अचानक निवडणुकीच्या तोंडावर कसा काय साक्षात्कार झाला? भविष्यात अशी हजारो मुख्यमंत्रीपदे लाथाडू असे जाहीररित्या सांगत होते आणि आता म्हणताहेत की आता मुख्यमंत्रीपद कधीही सोडणार नाही. एक ठाम भूमिका घ्या ना कधीतरी.

In reply to by श्रीगुरुजी

माफी निवडनुकीच्या तोंडावर मागितली नाही, तुम्ही काय म्हणता, तुम्हाला तेव्हडे कळते आणि दिल्लीतील जनतेला काहीच कळत नाही ? आणि एक ते ठाम भ्रष्टाचार मुक्त राजकारणासाठी आहेत, आणि त्या साठी इतर गोष्टींचा मी कधीच विचार करत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

...ही निवडणुक स्ट्रॅटेजी होती हो.
हॅ हॅ हॅ... भाजपा नेत्यांबरोबर आता कार्यकर्त्यांच्या तोंडात सुद्धा हे वाक्य पक्कं बसलंय बहुतेक. प्रामाणिकपणाच लवलेशही नसलेले वायदे, आश्वासने आणि वक्तव्ये करणे हे प्रस्थापित पक्षांना तरी कुठे नवं आहे? हे म्हणजे चिखलात लोळणार्‍याने शेजारून चाललेल्या माणसाच्या चपलेवरच्या डागाला हसण्यासारखं आहे.
एक ठाम भूमिका घ्या ना कधीतरी.
भाजपाची विरोधी पक्ष असतानाची भूमिका/धोरणे आणि त्यांनी सध्या घेतलेले निर्णय असा धागा कुणी काढेल काय? नै... मला वरची वाक्ये नक्की कुठल्या पक्षासाठी लागू करायची हे कळेना आता. :)

In reply to by श्रीगुरुजी

गुर्जीनी संजय जोशी यांचा उल्लेख कसा खुबीने टाळला हे मंडळीच्या लक्षात आले असेलच *biggrin*

In reply to by पिंपातला उंदीर

स्वतःकडे मुद्दे नसले की विषयाशी संबंध नसलेल्या प्रतिसादातून कमरेखाली वार करून किंवा एक ओळीच्या प्रतिसादांच्या काड्या टाकून धागा भरकटवणे ही तुमची खोड आहे. याबद्दल २ दिवसांपूर्वी मी एक डोस दिलेला होता. वरील एका ओळीच्या प्रतिसादातून परत तोच प्रयत्न सुरू झालेला दिसतोय. धागा भरकटू नये म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष करतोय.

In reply to by श्रीगुरुजी

निवडणुक जिंकली असली तरी लगेच हे दोष गुणात परिवर्तित होत नसतात.
मोदींच्या व्यक्तीकेंद्रीत आणि सूडबुद्धीच्या राजकारणाचे बळी संजय जोशी ठरले होते .. आता मोदी निवडणूक जिंकले आहेत म्हणून निवडणुक जिंकली असली तरी लगेच हे दोष गुणात परिवर्तित होत नसतात.

In reply to by कपिलमुनी

>>> मोदींच्या व्यक्तीकेंद्रीत आणि सूडबुद्धीच्या राजकारणाचे बळी संजय जोशी ठरले होते .. बळी ठरले होते म्हणजे नक्की काय झालं होतं त्यांचं?

In reply to by श्रीगुरुजी

असा त्रागा करू नका हो गुर्जी . तुमचे प्रतिसाद अधिकच विनोदी होत चालले आहेत . बाकी ते डोस वैगेरे जाऊ द्या . तुमसे ना हो पायेगा - Gangs of Wasseypur मधला संवाद *lol*

In reply to by कपिलमुनी

सुधारतील ते भाजपेयी कसले. राममंदिर, ३७० कलम, समान नागरी कायदा हे मुद्दे सोयीनुसार गुंडाळून बसले, आता काला धन विसरत आहेत. महाराष्ट्रात बोलायचं झाल तर टोल मुक्तीवरून यु टर्न , एनसीपीबरोबर फिक्सिंग, संभाजी बिग्रेडशी जवळीक अशी कित्येक उदाहरणे आहेत. केजरीवालवर टीका करायला यांना तोंड आहे का? प्रधानसेवक स्वतः राज्याराज्यात 'मै , मै 'करत प्रचार करत फिरतात. दिल्लीमध्ये विरोधकांना बाजारू, अनार्कीस्ट आहात तर नक्षली बना असले सल्ले देत फिरतात तर भक्त तरी कसे गप्प बसतील. आता भक्त लोक दिल्लीत हिंदुनी एक होवून मते दिली नाही म्हणून आप जिंकली असला प्रचार करत आहेत जणू काही हिंदू मते म्हणजे यांची जहागीर आहे. हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण कारणे हा यांचा जुना धंदा आहे. युपी मध्ये पण सध्या भाजप आणि सपा हेच करत आहेत. मोदिसरकारने भंपक भाषणबाजी कमी करून लोकांची कामे करावीत नाहीतर जनता असे धक्के देत राहणार.

In reply to by दुश्यन्त

>>> सुधारतील ते भाजपेयी कसले. राममंदिर, ३७० कलम, समान नागरी कायदा हे मुद्दे सोयीनुसार गुंडाळून बसले, आता काला धन विसरत आहेत. हे सर्व मुद्दे अजिबात गुंडाळून ठेवलेले नाहीत आणि ते जिवंत आहेत हो. ३७० वे कलम आणि अ‍ॅस्फामुळेच तर यांचं अजून पीडीपीशी जमत नाहीय्ये. हे दोन्ही गुंडाळावेत अशी पीडीपीची इच्छा आहे आणि भाजप त्याला विरोध करतोय म्हणून तर तिथं अजून सरकार स्थापन होत नाहिय्ये. >>> महाराष्ट्रात बोलायचं झाल तर टोल मुक्तीवरून यु टर्न , एनसीपीबरोबर फिक्सिंग, संभाजी बिग्रेडशी जवळीक अशी कित्येक उदाहरणे आहेत. कधी केली संभाजी ब्रिगेडशी जवळीक? कधी केलं एनसीपी बरोबर फिक्सिंग? आजचीच बातमी आहे. शिवसेना युती सरकारमधून बाहेर पडली तर राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देईल असं आजच राकाँ ने जाहीर केलंय. हे फिक्सिंग असतं का? >>> केजरीवालवर टीका करायला यांना तोंड आहे का? प्रधानसेवक स्वतः राज्याराज्यात 'मै , मै 'करत प्रचार करत फिरतात. केजरीवालही तेच करतात ना. मी ४९ दिवसात यँव केलं, त्यँव केलं अशा फुशारक्या मारत होतेच ना. माझ्या ४९ दिवसांच्या कारकीर्दीतल्या तिमाहीत दिल्लीत सर्वाधिक करभरणा झाला अशीही लोणकढी थाप त्यांनी मारून स्वतःकडे नसलेलं श्रेय घेतलं होतंच ना. >>> दिल्लीमध्ये विरोधकांना बाजारू, अनार्कीस्ट आहात तर नक्षली बना असले सल्ले देत फिरतात तर भक्त तरी कसे गप्प बसतील. केजरीवाल स्वतःबद्दलच बोलताना अनार्किस्ट असे म्ह्णाले होते. >>> आता भक्त लोक दिल्लीत हिंदुनी एक होवून मते दिली नाही म्हणून आप जिंकली असला प्रचार करत आहेत जणू काही हिंदू मते म्हणजे यांची जहागीर आहे. असे भाजपने सांगितलेलं नाही. अजून काही दिवसांनी आत्मपरीक्षण केल्यावर भाजपची प्रतिक्रिया येइल. प्रथमदर्शनी असं दिसतंय की भाजपची मते जवळपास तेवढीच आहेत (३२.३%). फक्त २ टक्क्यांनी घटलेली आहेत. काँग्रेसची मते १६-१७% टक्क्यांनी घटलेली असून आआपच्या मतात अंदाजे २४-२५ टक्क्यांची वृद्धी आहे. म्हणजे काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणात आआपकडे वळलेली (की वळविलेली?) आहेत. थोडक्यात म्हणजे या निवडणुकीत आआपच्या मतांना सूज आलेली आहे आणि कोणतीही सूज काही काळाने उतरतेच. २०१६ मधील निवडणुकीत ही सूज उतरलेली दिसेल. >>> हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण कारणे हा यांचा जुना धंदा आहे. युपी मध्ये पण सध्या भाजप आणि सपा हेच करत आहेत. असे करणे हे काँग्रेसचे व्यवच्छेदक लक्षण आहे. भाजपचे नाही. केजरीवालांनी देखील बुखारीला पाठिंबा द्यायला जाहीर करायला लावून तेच केले होते. प्रकरण अंगाशी येताना दिसताच घाईघाईने बुखारीचा पाठिंबा आम्हाला नको असे शहाजोगपणे सांगितले. तोपर्यंत मुस्लिमांपर्यंत योग्य तो संदेश गेला होता. मुस्लिमांनी आआपला मते द्यावीत असे बुखारीने सांगितले होते. पण केजरीवालांनी युक्ती करून मुस्लिम मते नकोत असे न सांगता बुखारीचा पाठिंबा नको असे सांगून चलाखी केली होती. >>> मोदिसरकारने भंपक भाषणबाजी कमी करून लोकांची कामे करावीत नाहीतर जनता असे धक्के देत राहणार. सेम फॉर केजरीवाल

In reply to by श्रीगुरुजी

>>> सुधारतील ते भाजपेयी कसले. राममंदिर, ३७० कलम, समान नागरी कायदा हे मुद्दे सोयीनुसार गुंडाळून बसले, आता काला धन विसरत आहेत. हे सर्व मुद्दे अजिबात गुंडाळून ठेवलेले नाहीत आणि ते जिवंत आहेत हो. ३७० वे कलम आणि अ‍ॅस्फामुळेच तर यांचं अजून पीडीपीशी जमत नाहीय्ये. हे दोन्ही गुंडाळावेत अशी पीडीपीची इच्छा आहे आणि भाजप त्याला विरोध करतोय म्हणून तर तिथं अजून सरकार स्थापन होत नाहिय्ये.
समान नागरी कायदा या लोकसभेला बिजेपी च्या मुद्यांमध्ये नव्हताच. आणि होता तर आता बहुमत त्यांच्याकडे आहे का करत नाहियेत ? या एका मुद्द्या साठी मी कायम भाजप ला मत देइन पण त्यांनी तो मुद्दा खरेच गुंडाळुन ठेवलाय. कास्मिर च्या राजकारणात मी पडत नाही, पण ३७० कलम केंद्रा सरकार रद्द करु शक्ते की राज्य ? आणि जर राज्य सरकार करत असेन तर लोकसभेला तशी घोषणा त्यांनी का केली होती. ( हेच तुम्ही नेहमी केजरीवाल ला बोलता ना ) -- महाराष्ट्राच्या पेपर मध्ये आले होते भाजप स्कुल फी रेगुलायजेशन करत आहे.. मला तर हे कुठेच दिसले नाही सगःळी कडे हजारोंनी फी अजुन ही घेतली जातात, मग तसे दिक्लेअर का केले आहे पेपर मध्ये ? >>> महाराष्ट्रात बोलायचं झाल तर टोल मुक्तीवरून यु टर्न , एनसीपीबरोबर फिक्सिंग, संभाजी बिग्रेडशी जवळीक अशी कित्येक उदाहरणे आहेत. कधी केली संभाजी ब्रिगेडशी जवळीक? कधी केलं एनसीपी बरोबर फिक्सिंग? आजचीच बातमी आहे. शिवसेना युती सरकारमधून बाहेर पडली तर राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देईल असं आजच राकाँ ने जाहीर केलंय. हे फिक्सिंग असतं का? मला वाटते संभाजी ब्रिगेड नसेल म्हणायचे त्यांना शिवसंग्राम बोलायचे आहे काय मेटेंचे ? ते आणि ब्रिगेड वेगळॅ आहेत. जर भाजप ने राष्ट्रवादीशी संगनमत केले नव्हते तर आवाजी मतदान पास होउन भाजप्चे सरकार आलेच कसे होते ? आवाज नक्की कोणाचा होता. आता तुम्ही म्हणता केजरीवाल भगोडा होता आणि नंतर माफी मागत फिरतो. मला सांगा राष्ट्रावादी बरोबर संगणमत करुन आवाजी मतदान घेणॅ पण भगोड्या टाईप प्रव्रुत्तीचेच लक्षण आहे हे सरळ सरकार आणण्यापासुन पळत होते. आणि या प्रयोगाला अतुम्ही कौतुकास पात्र असे ही बोलला आहे.. मग केजरीवाल नंतर माफी मागुन पुन्हा शुन्यातुन उठतो तर ते नाटक ? ते कौताकास पात्र नाही ? एकाच बाजुचा विचार सोडा .
>>> केजरीवालवर टीका करायला यांना तोंड आहे का? प्रधानसेवक स्वतः राज्याराज्यात 'मै , मै 'करत प्रचार करत फिरतात. केजरीवालही तेच करतात ना. मी ४९ दिवसात यँव केलं, त्यँव केलं अशा फुशारक्या मारत होतेच ना. माझ्या ४९ दिवसांच्या कारकीर्दीतल्या तिमाहीत दिल्लीत सर्वाधिक करभरणा झाला अशीही लोणकढी थाप त्यांनी मारून स्वतःकडे नसलेलं श्रेय घेतलं होतंच ना.
तुम्ही काय म्हाणता, केजरीवाल ने प्रचार करावयास नको होता का? तुमच्या म्हणण्याने काय केले पाहिजे होते, जेव्हडे ४९ दिवसाबद्दल केजरीवाल बोलला त्याच्या कितीतरी पट आणि कितीतरी दिवस भाजप त्या ४९ दिवसाबद्दल बोलत होता त्यामुळॅ त्याच ४९ दिवसांबद्दल भाजप ने बोलायचे पण केजरीवाल ने बोलायचे नाही असे का ?
>>> आता भक्त लोक दिल्लीत हिंदुनी एक होवून मते दिली नाही म्हणून आप जिंकली असला प्रचार करत आहेत जणू काही हिंदू मते म्हणजे यांची जहागीर आहे. असे भाजपने सांगितलेलं नाही. अजून काही दिवसांनी आत्मपरीक्षण केल्यावर भाजपची प्रतिक्रिया येइल. प्रथमदर्शनी असं दिसतंय की भाजपची मते जवळपास तेवढीच आहेत (३२.३%). फक्त २ टक्क्यांनी घटलेली आहेत. काँग्रेसची मते १६-१७% टक्क्यांनी घटलेली असून आआपच्या मतात अंदाजे २४-२५ टक्क्यांची वृद्धी आहे. म्हणजे काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणात आआपकडे वळलेली (की वळविलेली?) आहेत. थोडक्यात म्हणजे या निवडणुकीत आआपच्या मतांना सूज आलेली आहे आणि कोणतीही सूज काही काळाने उतरतेच. २०१६ मधील निवडणुकीत ही सूज उतरलेली दिसेल.
मग तुम्ही मोदींना मतांची सूज आलेली आहे याव्ळेस लोक्सभेच्या निवडनुकीत ती पण कधी ओसरेल हे का सांगत नाहियेत ? का सुजा फक्त आप च्या मतांच्या ओसरतात, भाजप्चय मतांच्या नाहित. आणि एक ३३ % होते तर ते वाढवण्याचे का जमले नाही भाजप ला ? आणि असे ही शक्यता नाही का की कॉन्ग्रेस ची २५ % मतातील १५ % मते आप ला पडली अशी तुम्ही म्ह्णाता त्यातले ५ % च आप ला मिळाले असतील आणि १० % भाजप्ला पण . पण भाजप्चे स्वताचे ११ % आप कडे वळले असतील . का असे कुठे लिहिलेले आहे की कॉन्ग्रेस चीच मते आप ला पडली. तुम्ही असे विश्लेशन कशाच्या जोरावर करता. न्युज चॅनेल च्या ? माझय मताने भाजप चे पण ११ % आप ला मिळाले आणि कॉन्ग्रेस चे १० % भाजप्ला मिळाले. याला पण अर्थ का होत नाहीत तुम्ही म्हण्ता तसे ?
>>> हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण कारणे हा यांचा जुना धंदा आहे. युपी मध्ये पण सध्या भाजप आणि सपा हेच करत आहेत. असे करणे हे काँग्रेसचे व्यवच्छेदक लक्षण आहे. भाजपचे नाही. केजरीवालांनी देखील बुखारीला पाठिंबा द्यायला जाहीर करायला लावून तेच केले होते. प्रकरण अंगाशी येताना दिसताच घाईघाईने बुखारीचा पाठिंबा आम्हाला नको असे शहाजोगपणे सांगितले. तोपर्यंत मुस्लिमांपर्यंत योग्य तो संदेश गेला होता. मुस्लिमांनी आआपला मते द्यावीत असे बुखारीने सांगितले होते. पण केजरीवालांनी युक्ती करून मुस्लिम मते नकोत असे न सांगता बुखारीचा पाठिंबा नको असे सांगून चलाखी केली होती.
मुस्लिम मते नको असे का त्यांनी सांगायचे होते ? बुखारी नी पाठिंबा दिला होता तोच नको म्हणणार ना. मुसलमानांची मते नको तर नको ही माणसिकता भाजपची आहे. म् आणि आप सांगत ते सहाजोग पणा, आणि हेच महराष्ट्रात बिजेपी थोड्याच दिवसात रा,कॉ ने पाठिंबा दिलाच नाही ते कौताकास पात्र असा भेद का ? चुक ती चुकच ना मग ? >>> मोदिसरकारने भंपक भाषणबाजी कमी करून लोकांची कामे करावीत नाहीतर जनता असे धक्के देत राहणार. सेम फॉर केजरीवाल

In reply to by गणेशा

बीग्रेडच्या व्यासपीठावर फडणवीस, गडकरी गेल्या महिन्यात जावून आले आहेत. पुरुषोत्तम खेडेकर यांची पत्नी भाजपच्याच तिकिटावर २ वेळा आमदार खाली होती (आता एनसीपी मध्ये आहे). पवार/ प्रफुल पटेल आणि गडकरी/ शहा/ मोडी याराना नवीन नाहि. भाजप - एनसीपी च्या सेटिंग मुळेचच सरकार स्थापनेननंतर लोकांनी गेल्या २० वर्षात घातल्या नाही इतक्या शिव्या घातल्या हे फडणवीस यांनी स्वतः कबूल केले आहे. समान नागरी कायदा, ३७० कलम , राममंदिर हे मुद्दे भाजपने कधीच गुंडाळून ठेवले आहेत. वरचे गुरुजी कदाचित अजून ८०-९० च्या दशकात वावरत असावेत कारण भाजपच्या आजच्या नवीन कार्यकर्त्यांना तर हे मुद्दे काय होते हे पण आठवत असेल कि नाही माहित नाहि.हिंदू- मुस्लिम ध्रुवीकरण करण्यात भाजप माहिर आहे. सध्या युपी मध्ये भाजप-सप दोघेही हेच करत आहेत.

In reply to by दुश्यन्त

>>> बीग्रेडच्या व्यासपीठावर फडणवीस, गडकरी गेल्या महिन्यात जावून आले आहेत. पुरुषोत्तम खेडेकर यांची पत्नी भाजपच्याच तिकिटावर २ वेळा आमदार खाली होती (आता एनसीपी मध्ये आहे). व्यासपीठावर जाऊन काय त्यांचा अजेंडा मान्य केला काय? >>> पवार/ प्रफुल पटेल आणि गडकरी/ शहा/ मोडी याराना नवीन नाहि. भाजप - एनसीपी च्या सेटिंग मुळेचच सरकार स्थापनेननंतर लोकांनी गेल्या २० वर्षात घातल्या नाही इतक्या शिव्या घातल्या हे फडणवीस यांनी स्वतः कबूल केले आहे. न मागता राष्ट्रवादीने दिलेल्या पाठिंब्याचा फडणवीसांनी अत्यंत चतुराईने उपयोग करून शिवसेनेला नमवून शरण आणले. ज्या दिवशी राष्ट्रवादीने पाठिंबा दिला तेव्हा मौन पाळले नसते तर शिवसेनेने प्रचंड ब्लॅकमेल करून मंत्रीपदांसाठी अतिशय त्रास दिला असता. त्याऐवजी पाठिंबा ना स्वीकारून ना नाकारून शिवसेनेला घायकुतीला आणून व कासावीस करून भाजपने एक अत्यंत चतुर खेळी खेळली होती. >>> समान नागरी कायदा, ३७० कलम , राममंदिर हे मुद्दे भाजपने कधीच गुंडाळून ठेवले आहेत. अशी तुमची खुळी समजूत आहे.

In reply to by गणेशा

>>> समान नागरी कायदा या लोकसभेला बिजेपी च्या मुद्यांमध्ये नव्हताच. आणि होता तर आता बहुमत त्यांच्याकडे आहे का करत नाहियेत ? या एका मुद्द्या साठी मी कायम भाजप ला मत देइन पण त्यांनी तो मुद्दा खरेच गुंडाळुन ठेवलाय. भाजपकडे राज्यसभेत बहुमत नाही. कायदा मंजूर होण्यासाठी दोन्ही सभागृहात बहुमताने मंजूर व्हावा लागतो. >>> कास्मिर च्या राजकारणात मी पडत नाही, पण ३७० कलम केंद्रा सरकार रद्द करु शक्ते की राज्य ? आणि जर राज्य सरकार करत असेन तर लोकसभेला तशी घोषणा त्यांनी का केली होती. ( हेच तुम्ही नेहमी केजरीवाल ला बोलता ना ) -- केंद्र आणि राज्य असे दोघेही लागतात. >>> महाराष्ट्राच्या पेपर मध्ये आले होते भाजप स्कुल फी रेगुलायजेशन करत आहे.. मला तर हे कुठेच दिसले नाही सगःळी कडे हजारोंनी फी अजुन ही घेतली जातात, मग तसे दिक्लेअर का केले आहे पेपर मध्ये ? कोणत्या वृत्तपत्रात आले होते? लिंक देता का? >>> जर भाजप ने राष्ट्रवादीशी संगनमत केले नव्हते तर आवाजी मतदान पास होउन भाजप्चे सरकार आलेच कसे होते ? आवाज नक्की कोणाचा होता. आवाजी मतदानात एकूण मतांपैकी निम्मी किंवा अधिक मते पडावी लागतात. विश्वासदर्शक ठरावावेळी फक्त २४६ आमदारांचाच आवाज होता. त्यात भाजपचे १२३ + काही इतर मित्रपक्षांचा बहुमताचा आवाज होता. राष्ट्रवादीचे मौन होते. यावर दुसर्‍या धाग्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे. ती वाचा. >>> आता तुम्ही म्हणता केजरीवाल भगोडा होता आणि नंतर माफी मागत फिरतो. मला सांगा राष्ट्रावादी बरोबर संगणमत करुन आवाजी मतदान घेणॅ पण भगोड्या टाईप प्रव्रुत्तीचेच लक्षण आहे हे सरळ सरकार आणण्यापासुन पळत होते. आणि या प्रयोगाला अतुम्ही कौतुकास पात्र असे ही बोलला आहे.. मग केजरीवाल नंतर माफी मागुन पुन्हा शुन्यातुन उठतो तर ते नाटक ? ते कौताकास पात्र नाही ? एकाच बाजुचा विचार सोडा . तो दुसरा धागा वाचा. >>> तुम्ही काय म्हाणता, केजरीवाल ने प्रचार करावयास नको होता का? तुमच्या म्हणण्याने काय केले पाहिजे होते, जेव्हडे ४९ दिवसाबद्दल केजरीवाल बोलला त्याच्या कितीतरी पट आणि कितीतरी दिवस भाजप त्या ४९ दिवसाबद्दल बोलत होता त्यामुळॅ त्याच ४९ दिवसांबद्दल भाजप ने बोलायचे पण केजरीवाल ने बोलायचे नाही असे का ? करावा ना प्रचार. पण स्वतः काय केले तेवढेच बोला ना. माझ्या ४९ दिवसांच्या तिमाहीतच सर्वात जास्त करभरणा झाला हे सांगून करभरणा होण्याचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न हास्यास्पद होता. >>> का असे कुठे लिहिलेले आहे की कॉन्ग्रेस चीच मते आप ला पडली. तुम्ही असे विश्लेशन कशाच्या जोरावर करता. न्युज चॅनेल च्या ? आजच्या अनेक वृत्तपत्रातून विश्लेषण आले आहे ते वाचल्यास शंका दूर होतील. >>> मुस्लिम मते नको असे का त्यांनी सांगायचे होते ? बुखारी नी पाठिंबा दिला होता तोच नको म्हणणार ना. मुसलमानांची मते नको तर नको ही माणसिकता भाजपची आहे. गुपचूप बुखारीला भेटून व त्याला जाहीररित्या पाठिंबा द्यायला लावून नंतर पाठिंबा नाकारणे हे एक नाटक होते हो.

In reply to by श्रीगुरुजी

भाजपकडे राज्यसभेत बहुमत नाही. कायदा मंजूर होण्यासाठी दोन्ही सभागृहात बहुमताने मंजूर व्हावा लागतो.
संयुक्त अधिवेशन घेउन पास करता येता

In reply to by कपिलमुनी

कदाचित येईल तसे करता. पण यासाठी साधे बहुमत पुरेसे की दोनतृतीयांश हे बघायला हवे. दोनतृतीयांशाची गरज असल्यास अजून काही वर्षे थांबावे लागेल.

In reply to by श्रीगुरुजी

समान नागरी कायदा लोक्सभेचा जाहिरनामा/वचननामा/व्हिजन आणि फलाना काय असते त्यात नव्हता. आणि इ तो जानिव पुर्वक काधुन टाकला होता. तो तेथे असल्यास येथे दाखवुन द्यावे.
>>> महाराष्ट्राच्या पेपर मध्ये आले होते भाजप स्कुल फी रेगुलायजेशन करत आहे.. मला तर हे कुठेच दिसले नाही सगःळी कडे हजारोंनी फी अजुन ही घेतली जातात, मग तसे दिक्लेअर का केले आहे पेपर मध्ये ? कोणत्या वृत्तपत्रात आले होते? लिंक देता का?
सकाळ पेपर मध्ये आले होते, न्युज प्रमाणे सर्च कसे मारतात मला माहीत नाही तरी पाहतो. मी खोटे बोलत नाहिये.
>>> जर भाजप ने राष्ट्रवादीशी संगनमत केले नव्हते तर आवाजी मतदान पास होउन भाजप्चे सरकार आलेच कसे होते ? आवाज नक्की कोणाचा होता. आवाजी मतदानात एकूण मतांपैकी निम्मी किंवा अधिक मते पडावी लागतात. विश्वासदर्शक ठरावावेळी फक्त २४६ आमदारांचाच आवाज होता. त्यात भाजपचे १२३ + काही इतर मित्रपक्षांचा बहुमताचा आवाज होता. राष्ट्रवादीचे मौन होते. यावर दुसर्‍या धाग्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे. ती वाचा.
दुसर्या धाग्यावरचे भाजप च्या बाजुने नसणारे रिप्लाय पण बघा
>>> आता तुम्ही म्हणता केजरीवाल भगोडा होता आणि नंतर माफी मागत फिरतो. मला सांगा राष्ट्रावादी बरोबर संगणमत करुन आवाजी मतदान घेणॅ पण भगोड्या टाईप प्रव्रुत्तीचेच लक्षण आहे हे सरळ सरकार आणण्यापासुन पळत होते. आणि या प्रयोगाला अतुम्ही कौतुकास पात्र असे ही बोलला आहे.. मग केजरीवाल नंतर माफी मागुन पुन्हा शुन्यातुन उठतो तर ते नाटक ? ते कौताकास पात्र नाही ? एकाच बाजुचा विचार सोडा . तो दुसरा धागा वाचा.
या साठी दुसर्या धाग्याची गरजच नाहिये
>>> तुम्ही काय म्हाणता, केजरीवाल ने प्रचार करावयास नको होता का? तुमच्या म्हणण्याने काय केले पाहिजे होते, जेव्हडे ४९ दिवसाबद्दल केजरीवाल बोलला त्याच्या कितीतरी पट आणि कितीतरी दिवस भाजप त्या ४९ दिवसाबद्दल बोलत होता त्यामुळॅ त्याच ४९ दिवसांबद्दल भाजप ने बोलायचे पण केजरीवाल ने बोलायचे नाही असे का ? करावा ना प्रचार. पण स्वतः काय केले तेवढेच बोला ना. माझ्या ४९ दिवसांच्या तिमाहीतच सर्वात जास्त करभरणा झाला हे सांगून करभरणा होण्याचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न हास्यास्पद होता.
मग स्वता बद्दल आणि त्या रीलेट्ड च बोलायचे होते तर भाजप आणि मोदी केजरीवाल बद्दल का बोलत होती ? का त्यांना स्वताविषयी काही बोलण्यासारखे नव्हते ?
>>> का असे कुठे लिहिलेले आहे की कॉन्ग्रेस चीच मते आप ला पडली. तुम्ही असे विश्लेशन कशाच्या जोरावर करता. न्युज चॅनेल च्या ? आजच्या अनेक वृत्तपत्रातून विश्लेषण आले आहे ते वाचल्यास शंका दूर होतील.
कोणत्या वृत्तपत्रात असे ठोस लिहिलेले आहे की फक्त कॉन्ग्रेस चीच सर्व मते आप कडे वळाली. का त्या वृत्तपत्रांचे विश्लेषण बरोबर असते का ? मग अशी अनेक वृत्तपत्रे आहेत त्यात भाजप च्या चुका आहेत असे दाखवले आहे, शिवाय महारष्ट्रात काय घोळ घातला होता तेंव्हा ही त्यांच्यावर टिकायुक्त विश्लेशन पण आहे मग तेच का खरे नाही म्हाणायचे? आणि तुम्ही म्हणता तेव्हडेच का खरे माणयाचे ? तुमचाच धागा का प्रमाण माणायचा ?
>>> मुस्लिम मते नको असे का त्यांनी सांगायचे होते ? बुखारी नी पाठिंबा दिला होता तोच नको म्हणणार ना. मुसलमानांची मते नको तर नको ही माणसिकता भाजपची आहे. गुपचूप बुखारीला भेटून व त्याला जाहीररित्या पाठिंबा द्यायला लावून नंतर पाठिंबा नाकारणे हे एक नाटक होते हो.
जर गुपचुप बुखारी ला भेटायचे होते तर सगळीकडे कसे कळाले ? आणि काय बोलणे झाले हे पण न्युज वालेच सांगत आहेत, त्यांच्यावर पण आता किती भरवासा ठेवावा ? बर असो असे सगळॅ झाले असले तरी लगेच पुर्ण पाठिंबा नाकारला गेला होता. आधीच्या चर्चा तुम्ही म्हणता तश्या गुपचुप झाल्या असतील आणि त्याला ठोस पुरावा नाहिये नक्की काय बोलणे झाले असेन , जो पुरावा आहे त्याच्यात काड्या टाकुन आधीच मागितला होता हे आपण कश्याच्या जिवावर बोलतो आहोत.

In reply to by गणेशा

>>> समान नागरी कायदा लोक्सभेचा जाहिरनामा/वचननामा/व्हिजन आणि फलाना काय असते त्यात नव्हता. आणि इ तो जानिव पुर्वक काधुन टाकला होता. तो तेथे असल्यास येथे दाखवुन द्यावे. जाहीरनाम्यात एखादी गोष्ट नसली तर ती करायचीच नसते किंवा तसे करणे हे घटनात्मकदृष्ट्या अवैध आहे असं काही नसतं. बादवे, हिंदुत्व आणि रामजन्मभूमीसारखे प्रश्न हा भाजपचा छुपा अजेंडा आहे असे अनेक विरोधक म्हणत असतातच. >>> >>> >>> महाराष्ट्राच्या पेपर मध्ये आले होते भाजप स्कुल फी रेगुलायजेशन करत आहे.. मला तर हे कुठेच दिसले नाही सगःळी कडे हजारोंनी फी अजुन ही घेतली जातात, मग तसे दिक्लेअर का केले आहे पेपर मध्ये ? >>> >>> कोणत्या वृत्तपत्रात आले होते? लिंक देता का? >>> सकाळ पेपर मध्ये आले होते, न्युज प्रमाणे सर्च कसे मारतात मला माहीत नाही तरी पाहतो. मी खोटे बोलत नाहिये. शोधा म्हणजे सापडेल. >>> आता तुम्ही म्हणता केजरीवाल भगोडा होता आणि नंतर माफी मागत फिरतो. मला सांगा राष्ट्रावादी बरोबर संगणमत करुन आवाजी मतदान घेणॅ पण भगोड्या टाईप प्रव्रुत्तीचेच लक्षण आहे हे सरळ सरकार आणण्यापासुन पळत होते. ते कसं काय? राष्ट्रवादीला पाठिंबा मागितलाच नव्हता. राष्ट्रवादीने तो न मागता स्वतःहून दिला होता, पण भाजपने तो स्वीकारलाच नव्हता. ज्या पक्षाचा पाठिंबा स्वीकारलाच नव्हता त्याच पक्षाबरोबर संगनमत कसे काय शक्य आहे? भाजपने एक चतुराई केली. राष्ट्रवादीच्या स्वयंघोषित पाठिंब्याचा सरकारच्या बहुमतासाठी वापर करण्याऐवजी अत्यंत चलाखीने वापर करून शिवसेनेला शरण आणले. >>> आणि या प्रयोगाला अतुम्ही कौतुकास पात्र असे ही बोलला आहे.. मग केजरीवाल नंतर माफी मागुन पुन्हा शुन्यातुन उठतो तर ते नाटक ? ते कौताकास पात्र नाही ? एकाच बाजुचा विचार सोडा . त्याचे कारण हा प्रयोग करून भाजपने स्वतःला शिवसेनेकडून ब्लॅकमेल होऊन दिले नाही, म्हणून तो कौतुकास पात्र. केजरीवालांची माफी प्रामाणिक नव्हती. त्यामुळे कौतुकाचा प्रश्नच नाही. >>> मग स्वता बद्दल आणि त्या रीलेट्ड च बोलायचे होते तर भाजप आणि मोदी केजरीवाल बद्दल का बोलत होती ? का त्यांना स्वताविषयी काही बोलण्यासारखे नव्हते ? दोघेही एकमेकांविरूद्ध बोलले आहेत. >>> कोणत्या वृत्तपत्रात असे ठोस लिहिलेले आहे की फक्त कॉन्ग्रेस चीच सर्व मते आप कडे वळाली. का त्या वृत्तपत्रांचे विश्लेषण बरोबर असते का ? मग अशी अनेक वृत्तपत्रे आहेत त्यात भाजप च्या चुका आहेत असे दाखवले आहे, शिवाय महारष्ट्रात काय घोळ घातला होता तेंव्हा ही त्यांच्यावर टिकायुक्त विश्लेशन पण आहे मग तेच का खरे नाही म्हाणायचे? आणि तुम्ही म्हणता तेव्हडेच का खरे माणयाचे ? तुमचाच धागा का प्रमाण माणायचा ? माझा धागा नका प्रमाण मानू. वाचन वाढवा आणि स्वतःचे मत ठरवा. >>> जर गुपचुप बुखारी ला भेटायचे होते तर सगळीकडे कसे कळाले ? आणि काय बोलणे झाले हे पण न्युज वालेच सांगत आहेत, त्यांच्यावर पण आता किती भरवासा ठेवावा ? अलका लांबा निवडणुकीच्या काही दिवस आधी बुखारीच्या भावाला भेटून आल्या हे अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाले आहे. त्या भेटून आल्यावर लगेचच बुखारी पाठिंबा देतो हा योगायोग नव्हे.

In reply to by श्रीगुरुजी

जाहीरनाम्यात एखादी गोष्ट नसली तर ती करायचीच नसते किंवा तसे करणे हे घटनात्मकदृष्ट्या अवैध आहे असं काही नसतं.
येथे पुरावा नसताना ही तुम्ही जर भाजपच्याच बाजुने असे बोलणार असेन तर पुढे काय बोलु आता मी. मी मात्र तुम्हाला जाहीर पणे सांगतो, की भाजप या मोदी सरकारच्या ५ वर्षाच्या काळात समान नागरी कायदा आणणार नाही म्हणजे नाही. जर त्यांनी असे केले तर मी कधीच राजकिय धाग्यावर माझे मत देणार नाही किंवा कधीच राजकिय धागे काढनार नाही. या उलट तुम्ही जसे म्हणत की तो मुद्द गुंडालुन ठेवला नाही तो ते करणारच, तर काही प्रमाण देताल का ? मला वाटते तुम्हाला ते शक्य नाही.
ते कसं काय? राष्ट्रवादीला पाठिंबा मागितलाच नव्हता. राष्ट्रवादीने तो न मागता स्वतःहून दिला होता, पण भाजपने तो स्वीकारलाच नव्हता
तुम्ही आप सारखे अस्विकार केला का त्या पाठिंब्याचा? हे जे कौतुक करत आहात तर थोडे राष्ट्रवादीचे पण करा मग. आणि एक भाजप चा हा डाव नव्हता. ते काय सर्वांना सांगुन थोडेच पवारांना सांगणार होते पाठिंबा द्या. हे सर्व ठरले होते, आता तुमचा धागा पहा आणि त्यावेळेसचे माझे रिप्लाय पण .
केजरीवालांची माफी प्रामाणिक नव्हती.
वा .. दुसर्‍याच्या कुठल्याच गोष्टी तुम्हाला योग्य वाटत नाही.. दुसर्यास तुच्छ लेखने सोडा.
दोघेही एकमेकांविरूद्ध बोलले आहेत.
नाही, केजरीवाल मुद्द्याला धरुन बोलत होते, आणि भाजप काय करत होता हे तरी आता येथे द्यायला लावु नका . कुठला ही दिल्लीचए पेपर आणि न्युज पाहु शकता बर्र ते जावुद्या दोघे ही एकमेकांन्बद्दल बोलत होते तर केजरीवल ४९ दिवसाच्यावेळॅस काय झाले बोलले तर तुम्हाला आक्षेप का ? बोलुद्या की ते पण बाकी भंपक बोलण्यापेक्षा ते महत्वाचे नव्हते का ?
माझा धागा नका प्रमाण मानू. वाचन वाढवा आणि स्वतःचे मत ठरवा.
बरोबर, तुम्ही पण वाचन वाढवा आणि इतरांच्या ही चुका पहा.
अलका लांबा निवडणुकीच्या काही दिवस आधी बुखारीच्या भावाला भेटून आल्या हे अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाले आहे. त्या भेटून आल्यावर लगेचच बुखारी पाठिंबा देतो हा योगायोग नव्हे.
भावाल भेटुन त्या काय बोलल्या याचे संभाषण द्या ? नसेल तर फक्त भाजपच्या खोट्या आरोपावर मते गिरवु नका.

In reply to by गणेशा

>>> तुम्ही आप सारखे अस्विकार केला का त्या पाठिंब्याचा? हे जे कौतुक करत आहात तर थोडे राष्ट्रवादीचे पण करा मग. आणि एक भाजप चा हा डाव नव्हता. ते काय सर्वांना सांगुन थोडेच पवारांना सांगणार होते पाठिंबा द्या. हे सर्व ठरले होते, आता तुमचा धागा पहा आणि त्यावेळेसचे माझे रिप्लाय पण . भाजपने राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचा स्वीकार किंवा अस्वीकार केलाच नव्हता. न मागता ज्यांनी पाठिंबा दिला आहे त्यांना उत्तर द्यायची गरज काय? २००४ मध्ये सपचा अमरसिंग स्वतःहून सपचा संपुआ सरकारला पाठिंबा द्यायला गेला होता. सोनिया गांधींनी स्वीकार/अस्वीकार न करता त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. तसेच इथे पण. २००१ मध्ये ९/११ नंतर वाजपेयींनी भारत अल्-कायदा विरूद्धच्या लढाईत अमेरिकेला पाठिंबा देईल असे अनेकवेळा बुशला सांगितले होते. बुशने त्या पाठिंब्याचा स्वीकार/अस्वीकार केला नव्हता.

In reply to by श्रीगुरुजी

मग कॉन्ग्रेस ने पण आप ला मागच्या वेळेस होउन पाठिंबा दिला होता, तुम्ही आप ला तरी का दोष देत बी टीम म्हणता मग. सर्वांचेच एकसारखे माना ना. काय प्रोब्लेम आहे ? आप ने पण कोठे कॉन्ग्रेस चा पाठिंबा मागितला होता. आणि समान नागरी कायद्यावर काहीच बोलत नाहीत, गुंडाळुन ठेवला नाही तर कधी पर्यंत आमलात येइन असे आपणास वाटते, का आमलात येणार नाही असेच आमच्या सारखे तुम्हाला वाटते