✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दोस्ताना!

ज — ज्योति अळवणी, Mon, 02/09/2015 - 18:37
एकदा एक पुस्तक दिसल... 'एका मैत्रीची कहाणी'... नाव होत.. 'मैत्री'त कहाणी कशी असेल? 'कहाणी'तली मैत्री कशी असेल? कुतूहल माझ जागं झाल... पुस्तक माझ्या घरी आल! तेवढ्यात पक्या घरी आला... दोस्तीची 'आण'देऊन पान खायला घेऊन गेला... 'साल्या तुझी तंगी हाय? दोस्त न तुझा? सांगायच नाय?' जीव आत कसानुसा झाला... 'याला कोणी सांगितल?' प्रश्न मनात आला... मुलांची फी.. आईच् आजारपण.. बायकोची नोकरी गेली... राहाते राहिलो कमावते आपण.. पैसा पूरा पडेना... आयुष्यच तंग.. काहीच मला बोलवेना... उलाघाल मनाची... दोस्ताला कळली... 'तू नाही बोललास... काल आई भेटली... साल्या दोस्ती आपली फार जुनी हाय.. तुझ्यामुळे बुकं शिकलो.. विसरलो नाय.. आज आपला बिजनेश झाकास चालतो... तुझ्यावाणी आप टू डेट आपनपन असतो... तुझ्यामुळे दोस्ता आयुष्याला वळण लागल... मवाली-गुंड होता-होता लाईनीला लागल... आहे हे तुझ आहे यार.. तो म्हणतो; काळजी नको.. मी सगळ म्यानेज करतो..' मिठी मारायच्या बहाण्याने दोघे डोळे पुसतो.. घरी येऊन मी पुस्तक खोल कपाटात टाकतो... एक कहाणी नुकतीच अनुभवून आलेलो असतो... मैत्रीची कहाणी ज्याची त्याची आपली असते... ती फ़क्त अनुभवायची... पुस्तकातुन समजत नसते... ------

प्रतिक्रिया द्या
2037 वाचन

💬 प्रतिसाद (9)

कविता आवडली, पण..

किसन शिंदे
Mon, 02/09/2015 - 18:40 नवीन
पक्या पान खायला का जातो?
  • Log in or register to post comments

त्याला करंssssट येत असेल.

प्रचेतस
Mon, 02/09/2015 - 18:52 नवीन
त्याला करंssssट येत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Mon, 02/09/2015 - 21:53 नवीन
=)))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कविता आवडली.

रेवती
Mon, 02/09/2015 - 21:58 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

+ १

स्रुजा
Mon, 02/09/2015 - 23:25 नवीन
असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

वा वा वा!

एस
Mon, 02/09/2015 - 23:08 नवीन
दैनंदिनी सप्रेम भेट! (स्वगत - हम्म् त्या पराचा रोल कधी करावा लागेल असे वाटले नव्हते. )
  • Log in or register to post comments

दोस्ताना वाचून पॉपकॉर्न घेऊन

सूड
Mon, 02/09/2015 - 23:14 नवीन
दोस्ताना वाचून पॉपकॉर्न घेऊन बसावं लागतंय की काय असं वाटलं होतं, बार अंमळ फुसका निघाला!!
  • Log in or register to post comments

छान वाटली

स्वाती राजेश
Tue, 02/10/2015 - 01:54 नवीन
कविता... :)
  • Log in or register to post comments

अशीच आणि अजून छान असते मैत्री !

psajid
Tue, 02/10/2015 - 15:45 नवीन
मैत्रीची कहाणी ज्याची त्याची आपली असते... ती फ़क्त अनुभवायची... पुस्तकातुन समजत नसते... अशीच आणि अजून छान असते मैत्री ! आवडली कविता !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा