Skip to main content

दिल्ली विधानसभा निवडणुक-२०१५: निकाल

लेखक क्लिंटन यांनी सोमवार, 09/02/2015 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, या धाग्यावर दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि त्या अनुषंगाने इतर मुद्दे अशा स्वरूपाची चर्चा होईल.सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर सव्वा आठच्या सुमारास पहिले कल हाती यायला लागतील.जसे कल येतील त्याप्रमाणे ते या धाग्यावरील प्रतिसादात लिहेन. तेव्हा सुरवात करू उद्या सकाळी. धन्यवाद क्लिंटन

वाचने 38109
प्रतिक्रिया 163

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

आणि हरियाणामध्येही १९८७ मध्ये लोकदल+भाजप युतीने ९० पैकी ८५ जागा जिंकल्या होत्या. तसेच सिक्किम डेमॉक्रॅटिक फ्रंटने ३२ पैकी ३१-३२ जागा २००४ आणि २००९ मध्ये जिंकल्या होत्या.

काहीही आहे हे ! अरे मुख्यमंत्री झाल्यावरही लहान मुलासारखा आंदोलनरुपी हट्ट करणा-या, पुढे सत्ता सोडणा-या अविचारी माणसाला कसं काय बहुमत मिळू शकतं? कमाल आहे. महाराष्ट्रात टोकाचे का होईना पण सुविचार मांडणा-या नेत्यालाही पूर्ण बहुमत न मिळावं; याचं कुठेतरी वाईट वाटतं. आता बघूच. किती दिवस टिकतंय आणि काय करतंय.

आआपचे अभिनंदन, केजरीवाल आतातरी शहाणपणाने वागतील ही अपेक्षा. काँग्रेसी गवत उपटून टाकल्याबद्धल दिल्लीवासीयांचे अभिनंदन. मोदी-शहा-भाजपचे सांत्वन, बिहारसाठी शुभेच्छा!

जाम खूष झालो मी. गेल्या ५ वर्षात भारतातले मतदार खूपच बदलले आहेत आणि त्याचे थोडे श्रेय केजरीवाल ला पण आहेच.

अरविंद केजरिवाल आणि आपचे हार्दिक अभिनंदन!!! जे लोकसभेत मोदींसाठी झालं तेच आज आप साठी झालं... संपुर्ण बहुमत. ह्यातुन जनतेचखुप मोठ्या अपेक्षाच दिसुन येतात.. पुढिल ५ वर्षांसाठी हार्दिक शुभेच्छा

श्री केजरीवाल आता दिलेल्या वचनांची पुर्तता करण्यासाठी केंद्र सरकारकडे मदत मागतील. ती मिळाली नाही की त्यांच्या नावाने ओरडतील. आता बिहारमधे तेच चालले आहे.... कालच्या लोकसत्तेतील अग्रलेख वाचावा. जनतेला "फुकट काही मिळत नसते'' हे जेव्हा कळेल तो सुदीन. अर्थात ते कळणार नाही हेही निश्चित... :-) पण भाजपने कटू असले तरी अर्थशास्त्र दोरीवर वाळत टाकू नये. नाहीतर अर्थव्यवस्थेची वाट लागलीच समजा...... आणि त्यांना धडा मिळाला हेही एका अर्थाने बरेच झाले असे मला वाटते....

प्रखर हिंदुत्वाचा वाचाळपणा, मोदिंनी दिलेली अवास्तव आश्वासनं, निगेटीव्ह प्रचार, किरण बाई... इ. सर्व घटक मिळुन सुद्धा आप ला ६२ जगांचा पुश देऊ शकत नव्हत्या. मग उरलं एकच कारण... लोकांना यंदा केजरीवाल सीएम म्हणुन हवा'च' होता. भाजपला इतक्या कमि वेळात प्रतिकेजरीवाल तयार करता आला नाहि ( ते फारसं शक्य देखील नव्हतं) अन्यथा केजरीवालशिवाय आपलं काहि अडत नाहि हा विश्वास तरी वाटायला हवा होता लोकांना... ते ही नाहि जमलं मोदिंना. आता जे मोदिंबद्दल खरं तेच केजरीसाहेबांबद्दलही. त्यांनी जेव्हढी वचनं दिली त्याच्या वास्तवीक शक्यतेएव्हढं काम केलं तरी पुरे. अभिनंदन एण्ड ऑल द बेस्ट केजरीवालजी.

लेटेस्ट आकडे आहेत आआप: ६६, भाजप: ३ आणि इतर: १. आम आदमी पक्ष एकटाच ७० जागा जिंकणार आणि इतर सगळ्यांचा व्हाईटवॉश करणार की काय? इतके प्रचंड बहुमत मिळणेही वाईट.

केजरीवाल यांनी निवडणूकीअाधी त्या ४९ दिवसानंतर दिलेल्या राजीनाम्याबद्दल जनतेची माफी मागितली अाणि जनतेने त्यांना एक चान्स दिला. याबरोबरच बीजेपीची अांधळी-कोशिंबीरही कारणीभूत अाहे. त्यापलीकडे याला महत्त्व देणं म्हणजे बेडकीला बैल केल्यासारखे अाहे. केजरीवाल अाता डोेकं ताळ्यावर ठेवून काम करतील ही अपेक्षा... पण ले़फ्टीस्ट मिडिया अाणि अापवाले यातून अाक्रस्ताळेपणाचं प्रदर्शन करतील हेही नक्की...

In reply to by ग्रेटथिंकर

खांग्रेसला एकही नाही. तुमचेही अभिनंदन. बाकी इतका कुजकटपणा नाही हं करायचा. तुम्हाला देवबाप्पाने शिक्षा दिली बरे. भाजपाच्या जागा तुम्ही सांगितल्यापेक्षा ५०% ने वाढलेल्या दिसत आहेत आता. ६ जागांवर पुढे आहे. हाहाहाहा. नमो आणी अमित शहांचा अवाजवी भपकेपणा नडला त्यांना.

In reply to by ग्रेटथिंकर

तुमचंही अभिनंदन नानासाहेब (काँग्रेसला भोपळा मिळाल्याबद्दल)! आज तुमच्या घरावर लाईटिंग असेल ना आणि तुम्ही आणि माई ठेवणीतला कोट-टोपी, पैठणी, नथ वगैरे घालून सत्यनारायण घालणार असाल ना!!! :YAHOO:

In reply to by सुबोध खरे

दिल्लीच्या "स्थानीक" निवडणूकीचा शेअर बाजारावर फारसा परिणाम पडत नाही. गेले काही दिवस (आणि विशेषतः काल) खाली गेलेल्या किंमतींमुळे स्वस्त झालेल्या समभागांची खरेदी होत असल्याने बाजार वर गेला आहे.

अरविंद केजरीवालांचे अभिनंदन व्होट शेअर बघितला तर भाजपाचा व्होट शेअर फार कमी झालेला नाही आहे. तो अजूनही ३२.५% जवळ जवळ आहे. संपूर्ण निकालानंतर निश्चित आकडे कळतील. म्हणजे इतरांनी एकगठ्ठा आआपला मतदान केले. काँग्रेस फकत ८% वर घसरली आहे सध्यातरी.इतरही मागे सरले. ७० पैका ६५ जागांवर निवडून आल्यावर अपेक्षा पूर्ण करणे कठीण असते.

In reply to by मित्रहो

मी खरे तर निकाल आल्या आल्या पहिला प्रश्न मित्राला हाच विचारला होता. व्होटे शेअर काय आहे? काँग्रेसने आपली सागळी ताकद 'आप'च्या मागे उभी केली आहे असे सकृतदर्शनी दिसत आहे. बाकी क्लिंटनसारख्या जाणकारांच्या विश्लेषणाच्या प्रतीक्षेत.

In reply to by आनन्दा

चित्र भयंकर बदलेय आआप 73% गेल्या कित्येक वर्षात हे दिसले नव्हते भाजपा १९.४ इतरांचे हाल विचारुच नये. म्हणजे ज्यांनी २०१३ च्या विधानसभेत भाजपाल मत दिले तेही आता आआपकडे वळले. याचे कारण फक्त बेदी नाहीत. ही विचार करण्यसारखी गोष्ट आहे.

हा फक्त प्रामाणिक पणाचा विजय नसुन एका विश्वासाचा हे विजय होणार आहे. आणि जनतेनेही लगेच एका दिवसात कांडी फिरावी तशी अपेक्षा करु नये. या वेळॅस अरविंद केजरीवाल यांनी योग्य रीतीने प्रचार केला आणि मुद्देसुद प्रचार केला या बद्दल अभिनंदन. भारतीय राजकारणात मुद्देसुद प्रचार करुन आपले विचार जनते पर्यंत योग्य पोहचवु शकतो हे अरविंद जींनी दाखवुन दिले. त्यांचे अभिनंदन. आणि एक खास झाले कॉन्ग्रेस ए प्रचारात न उतरवुन आप ला मदत केली असे म्हणण्याची सोय ही आप ने मागे ठेवली नाही हे बरे झाले.

भाजप इतक्या कम्मी जागा घेईल असे कुणालाच वाटले नव्हते भाजप ४ , आ आ पा. ६४. भाजपला दहा टक्के सुद्धा जागा मिळालेल्या नाहिय्येत. जिंकले तर मोदी हरले तर बेदी.........ही भाजपची तयारीच सांगत होती की त्यांचे काय होणार आहे ते.

अापला छप्पर फाडके विजय मिळाला. मतदारांनी भाजपला चांगलाच धडा शिकवला. - मतदारांनी निश्चितपणे प्रस्थापितांना नाकारलेले दिसते. मोदींच्या तथाकथित प्रतिमेचा काहीच परिणाम झाला नाही. अाप ही अाम अादमीला केंद्रस्थानी ठेवणारा पक्ष निवडून अाला. - अापचा विजय हा नव्या प्रकारच्या राजकारणाला दिलेली पसंती होय. त्याांनी राजकारणाचे नियमच बदलून टाकले. अाता इतर पक्षांनाही याच नियमांवर काम करावे लागेल. देशाच्या दृष्टीने हे अत्यंत दिलासादायक अाहे. - केजरीवाल अाणि मंडळीना अाता ‘अराजक माजवणारे’ या प्रतिमेला पुसून काढेल असे काम करावे लागेल. - स्वधर्म

In reply to by स्वधर्म

नाहि. अगदी लोहिया वगैरे मंडळींपासुन ते नितीशकुमारने लालु यादवला पराजीत करेपर्यंत हेच कौतुक चालत आलय. डाव्यांना बंगालमधे पाणि पाजणार्‍या ममताबाईंना देखील असच मखरात बसवलं गेलं होतं.

In reply to by अर्धवटराव

प्रचाराच्या सांगतेदिवशी केजरीवाल यांना सकाळी टीव्हीवर दाखवले. तो माणूस एका साध्या सलून दुकानात केस कापायला गेला. मोदी, फडणवीस, पवार, भुजबळ, ठाकरे यांचं नख तरी सामान्य माणसाला दिसतं का कधी? एकदा मुख्यमंत्री होउन गेलेला माणूस कधी असा अॅप्रोचेबल पाहिला अाहे काय? - स्वधर्म

In reply to by स्वधर्म

स्वतः फडणवीस, शिवराजसींग चौहान, पर्रिकर, स्व. साहेबसिंग वर्मा, लालु यादव... इतरही अनेक आहेत. मुख्यमंत्री होऊन गेलेला माणुस जर सामान्यांप्रमाणे सलुनमधे जाताना दिसला तर तो नवीन ट्रेण्ड सेटर कसा बनतो हे कळलं नाहि. असो.

In reply to by स्वधर्म

अहो तो फडणवीस मुलीच्या शाळेत साधेपणाने गेला हे पाहीले नव्हते का? त्याची बायको साधेपणाने आर टी ओ च्या रांगेत जाऊन उभी राहीली माहीत नाही का? नाहीतर लगेच केजरीवाल यांची बायको रांगेत उभी राहीली की त्यांच्या साधेपणाचे ढोल वाजणे चालू होईल म्हणून आधीच नोंदवून ठेवले. साधेपणाने.

मागच्या वेळेस कॉंग्रेस ची आमदारसंख्या बघून इंनोवात मावतील अशी हेटाळणी केली गेली होती . आता भाजप चे आमदार रिक्षात बसून जातील बहुतेक . भाजप समर्थक ह. घेणे *biggrin*

मला राजकारणातलं अजिबात म्हणजे अजिबात काहिही कळत नाही, तरीही एक प्रतिसाद द्यायची खुमखुमी आहेच.. आप निवडुन येणार हे तसंही कळालं होतंच.. किरण बेदी हा सगळ्यात मोठा गाढवपणा होता.. केजरीवाल की किरण बेदी असं मला विचारलं असतं तर मी सुद्धा कदाचित केजरीवालांना निवडलं असतं.. असो.. मागच्या वर्षी सुद्धा केजरीवालांना पहिल्याच फटक्यात चांगल्या जागा मिळाल्या होत्या, ते मुख्यमंत्री सुद्धा झाले.. ह्याही वर्षी त्यांना दणकुन जागा मिळाल्या आहेत. फक्त मागच्या वर्षी त्यांची प्रतिमा ही "अत्यंत स्वच्छ, पारंपारिक राजकारणापेक्षा वेगळं काहीतरी देणारा पक्ष, शिकल्या - सवरल्या, जाणत्या लोकांचा पक्ष" वगैरे होती. ती तशी फारशी आता रहिली नाहीये... नसावी.. केजरीवाल माणुस किती घोळ घालु शकतो हे त्यांनीच मागच्या १ वर्षात दाखवलय.. आप आता "अजुन एक राजकीय पक्ष" म्हणून निवडुन आला असावा.. अजुन एक नेहमीचीच निवडणुक झालीये, अजुन एक "राजकारणी"च निवडुन आलाय.. मला तरी फार काही वेगळं घडेल असं वाटत नाहीये.. फक्त गोष्टी फुकट वाटणे आणि काही झालं की धरणं धरणे हे दोन वैताग पुढे कमी व्हावेत अशीच इच्छा... (* - मला वाटतं म्हणुन मी लिहीलं.. का वाटलं असं? ह्याला उत्तर नाही.. म्हणून मी माझी मत तुम्हाला पटवुन द्यायला बांधील नाही.. वसावसा अंगावर येऊ नये..)

जाम खुश...मुफ्त पाणि,मुफ्त वीज,मुफ्त वायफाय,मुफ्त घर.......मुफ्त जेवन देणार असेल तर दिल्लीला राहायला जाणार आम्ही.........

मला प्रचंड मजा येतेय! फेसबुकपासून, व्हॉट्सअ‍ॅपपासून काही परिचितांपर्यंत अनेकजण जे गेले काही आठवडे अव्याहत स्पॅमिंग करत होते आज भुमिगत झालेत! त्यातील काही वीर ते धाडस करताहेत त्यांपैकी भयाण विनोदाची झालर चढवण्यात व्यग्र आहेत तर काही हे शासकीय कर्मचार्‍यांना वेळेवर हाफिसात यायचे नव्हते म्हणून झाल्याचे सांगण्यात! आणि हे बचावात्मक तोकडे प्रयत्न तर अधिकच करूण भासत आहेत! ५०%हून अधिक मते तिरंगी लढतीत मिळवणे, ९०% च्या आसपास जागा जिंकणे! वॉव! काय मॉस्टरस विजय आहे! आआपच्या नियोजनाला हॅट्स ऑफ! ३०-३२% मतांसह विजय मिळवल्यानंतरही जग जिंकल्याच्या थाटात काही इंच छाती वाढवणार्‍यांना, दिल्लीकरांनी काँग्रेसमुक्त विधानसभेत फार जागा ठेवलेली नैय्ये! बेसिकली, मला फारच मजा येतेय!

In reply to by ऋषिकेश

हाहाहा!!! मलाही..अगदी गुदगुल्या वगैरे होत अस्ल्यासारखा हस्तोय सकाळपासून!! आज तरी मजेचा दिवस आहे!!

या प्रचंड मोठ्या विजयातून असे स्पष्ट दिसते की मी जे काही आडाखे बांधले होते ते चुकले. मतदानाची टक्केवारी मी अजून बघितलेली नाही.तरीही असे दिसते की दिल्लीत दुरंगी लढत झाली.कॉंग्रेस जागा घेणार नाही तरीही १०-१२% मते घेईल असे वाटले होते.तसे झाले असायची चिन्हे कमी. आघाडीच्या दोन पक्षांना ८५-९०% च्या आसपास मते मिळणे याला दुरंगी लढत म्हणता येईल.भाजपने २०१३ च्या तुलनेत फार मते गमावली नसतील (कदाचित आणखी मते मिळवली सुध्दा असतील) अशी माझी ’हंच’ आहे.पण कॉंग्रेस समर्थकांनी आपला पक्ष जिंकणे शक्य नाही हे लक्षात घेऊन एकगठ्ठा आआपला मतदान केले असे दिसते.त्याचप्रमाणे बसपाने २००८ मध्ये १४% आणि २०१३ मध्ये ५.५% मते घेतली होती त्यापैकी बरीचशी मते आआपला गेलेली असावीत असे दिसते.म्हणजेच मला वाटत होते की आआप ५०% पेक्षा जास्त मते मिळवू शकणार नाही असे वाटत होते ते चुकीचे ठरलेले दिसते.दुरंगी लढतीत जर आघाडीवर असलेल्या पक्षाला दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षापेक्षा १५% पेक्षा जास्त मतांची आघाडी असेल तर पहिल्या क्रमांकावरील पक्ष असा जबरदस्त स्वीप करू शकतो. म्हणजे आआपला ५०-५१% आणि भाजपला ३५-३६% मते असतील तर आआप ९०% जागा नक्कीच जिंकू शकतो. म्हणजे कॉंग्रेस आणि बसपा आआपची मते खातील आणि आआप ५०% ओलांडू शकणार नाही हा माझा अंदाज चुकला.

In reply to by क्लिंटन

एका वाहिनीवरील वृत्तानुसार मतांची टक्केवारी अशी आहे. (कंसात डिसेंबर २०१३ मधील मतांची टक्केवारी) आआप - ५४% (२९.९%), भाजप - ३२% (३४.५%) आणि काँग्रेस - ८% (२४.५%) भाजपची सुमारे २.५०% मते कमी झालेली दिसताहेत. मतांच्या टक्केवारीत भाजपला फारसा फटका बसलेला दिसत नाही. आआपला तब्बल २४-२५ टक्के मते जास्त मिळाली. त्यातील १६-१७ टक्के मते काँग्रेसकडून आलेली दिसताहेत. इथेच मुख्य फरक पडला. दुसर्‍या एका वाहिनीवरील चर्चेत सांगण्यात आले त्यानुसार काँग्रेसने आआपला वॉकओव्हर द्यायचे ठरविले होते. त्यामुळे त्या पक्षाने फारसा प्रचार केलाच नाही व पैसेही हात राखून खर्च केले. बर्‍याच झोपडपट्ट्यात काँग्रेसचे एकही पोस्टर नव्हते व तिथले कार्यकर्ते आआप उमेदवाराचा प्रचार करत होते. भाजपचे नाक कापण्यासाठी आपली स्वतःची स्पेस आआपला व्यापून देणे ही काँग्रेसची घोडचूक ठरेल.

In reply to by श्रीगुरुजी

का मी खाली बोलतो ते का असु शकत नाही. कॉन्ग्रेस ची १० % वोट भाजप ला गेले आणि भाजपचे ११ % आप ला गेले . म्हणजेच भाजपचे पण पारंपारिक लोक आप कडे वळलेच नाहीत असे ठोस आपण बोलु शकत नाही. आकड्यांचय खेळात हे चालते,

बाकी भाजप ला इतक्या कमी जागा मिळाल्या तर त्याना विरोधी पक्ष नेते पद पण मिळणार नाही म्हणे . लैच धुव्वा उडाला मग

केजरीवाल आणि आप यांचे अभिनंदन आणि शुभेछ्चा! अपेक्षेपेक्षा खूप चांगली कामगिरी आपने या निवडणुकीत केली आहे. हा भाजपला मोठा झटका आहे, मोदी सरकराने जनतेची कामे करायला सुरुवात करावी नुसती भाषणबाजी उदंड झाली आणि हो 'जीता तो मोदी , हारा तो किरण बेदी' असे चालणार नाहि. मोदींच्या ९ महिन्याच्या कारभाराची दिल्लीकर जन्तेने दिलेली ही पोचपावती आहे. इथून पुढे तरी प्रधानसेवक उठसुठ राज्याराज्यात फिरून विरोधकांना 'बाजारू, नक्षलवादी बना' असा पोरकट प्रचार करून पदाची शान घालवणार नाहीत अशी आशा करुयात.नकारात्मक प्रचार करायचा, हिंदू -मुस्लिम ध्रुवीकरण करायचं या सगळ्यांना लोकांनी एक सणसणीत चपराक दिली आहे. काल दुसर्या एका धाग्यावर लिहिलेलं इथे परत डकवतो.. दिल्ली राज्य लहान आहे (पूर्ण राज्याचा दर्जा पण त्याला नाही). केंद्र शासित प्रदेश, महानगरपालिका आणि दिल्ली राज्य सरकार अश्या ३ पातळ्यावर दिल्लीचा कारभार चालतो तरीपण दिल्लीसाठी मोदी /शहा यांनी खूप जोर लावला कारण राज्य लहान असले तरी देशाची राजधानी आणि इथल्या मिडीयामुळे चर्चेत राहते आणि देशभर इथल्या घटनांचा परिणाम पडतो, दखल घेतली जाते (डिसेंबर २०१३ मध्ये भाजपने मप्र, छत्तिसगढ, राजस्थान जिंकले मात्र चर्चा जास्त झाली ती दिल्लीतल्या आपच्या जागांची!). दिल्लीत अपयश आले तर देशभर प्रतिसाद उमटणार आणि लोकसभा २०१४ नंतर उधळलेला वारू रोखला जाणार या भीतीने मोदी/ शहा आणि त्यांची फौज केजरीवर तुटून पडली (खरे तर महाराष्ट्रात त्याला थोडा ब्रेक लागलाच होता मात्र आधी एनसीपीबरोबर मिलीभगत उघड झाल्यावर पब्लिकने केलेल्या छीथुमुळे यांनी सेनेला बरोबर घेवून प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न केला) . दुसरे असे कि केजरीवाल कसा का असेना प्रामाणिक आहे आणि जिद्दी आहे. शहरी सुशिक्षित मध्यमवर्ग आपकडे खेचला गेला होता, लोकसभेत परत तो भाजपकडे वळाला. मोदींचा कारभार आहे असाच चालत राहिला तर परत हा वर्ग केजरीवालकडे आशेने पाहू शकतो हे भाजपचे चाणक्य जाणून आहेत म्हणून ते आणि त्यांची फौज केजरीला टार्गेट करत आहेत. यांचा प्रचार काय तर मफलरवाला, खुज्लीवाल, अनार्कीस्ट वगैरे वगैरे आणि काही मोदिभक्त फेबुवालवर आप कसा देशद्रोही आहे, आपला मुस्लिम देशातून (पाक, सौदी) फंडिंग होते याच्या 'मनघडंत' कहाण्या रंगवत आहेत. प्रतिस्पर्धी आटोपत नसेल तर हिंदू- मुस्लिम अस ध्रुवीकरण करायची भाजपची जुनीच सवय आहे मात्र केजरीवाल दिल्लीतल्या सर्व समाज घटकांत लोकप्रिय आहे उद्या जर आप बहुमताने जिंकली आणि केजरीवाल मुख्यमंत्री झाला तर तो आपल्याला नडणार हे भाजपेयी जाणून आहेत आणि म्हणून केजरीवर इतके तुटून पडत आहेत.

In reply to by दुश्यन्त

बरोब्बर बोललास रे दुश्यन्ता. भाजपावाले जेवढे अरविण्दला टार्गेट करतील तेवढी त्यांची मते कमी होतील.गेल्याच वर्षी येथेच मिपाकरांनी अरविंदची यथेच्छ टिंगल केली होती."आप" संपला म्हणून पेढे वाटायचे बाकी ठेवले होते. ह्या निकालातून सगळेच काही ना काही शिकतील अशी अपेक्षा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आआप ही खाप पंचायत आहे आणि केजरीवाल खोटारडा आहे असे तू सुद्धा मागील वर्षी म्हणत होतास की रे माईसाहेब. आता टोपी बदललीस का रे?

अरु व त्याच्या पक्षाचे अभिनंदन. सकाळपासूनच चहा,आरारूट बिस्किटे,गुड-डे बिस्कीटे खात टी.व्ही.बघणे चालु होते.अरू व त्याचा पक्ष सत्तेवर येणार हे भाजपा-अध्य़़क्ष-अमितच्या बोलण्यातून जाणवत होते.गेल्या आठवड्यातच 'दिल्ली निकालांचा व केण्द्र सरकारच्या कामगिरीचा संबंध लावू नये' असे तो म्हणाला होता. किरण बेदी ह्यांना पक्षात घेऊन मोठी घोडचूक केली.आता "आमची मते कमी झाली नाहीत' असे भाजपावाले म्हणत आहेत. हे म्हणजे- मला परी़क्षेत कमी मार्क्स मिळाले पण माझा विषयाचा अभ्यास पक्का होता' म्हणण्यासारखे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

किरण बेदी 'ह्यांना'???? आप जिंकल्याचा एवढा परिणाम की चक्क माई लोकांना आदरार्थी सम्बोधू लागल्या????? :-D

बाकी भाजप ला इतक्या कमी जागा मिळाल्या तर त्याना विरोधी पक्ष नेते पद पण मिळणार नाही म्हणे . लैच धुव्वा उडाला मग ७ पेक्षा तरी आम्ही भाजपला विरोधी पक्ष नेतेपद देवू असे कुमार विश्वास म्हणत आहेत . भाजपने पण यातून बोध घ्यावा. लोकसभेत झाला एवढा पोरखेळ खूप झाला आता कॉंग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद द्यावे. एवढे पण घाबरू नये आणि प्रधान सेवकांनी सभागृहात आपली उपस्थिती वाढवावी

इथेच उद्धट भाजप नेतृत्व आणि आप मधला फरक कळतो . बाकी सत्या फिल्म मधला एक भारी संवाद आहे . "मौका सबको मिलता है ."

In reply to by टिल्लू

हो .. वाटले नव्हते ही सीट जाईन. जसे टीव्ही वर निकाल + आघाडी दाखवतात, तसे नेट वर कोणत्या साईट वरती असे दिसेल. मी साईट बघतोय पण तसे टीव्ही सारखे कुठेच दिसत नाहिये

किरण बेदींचा कृष्णानगरमधून पराभव झाला अशी पी.टी.आय ची बातमी आहे असे आताच एन.डी.टि.व्ही वर जाहिर केले गेले आहे. ही जागा भाजपच्या हर्षवर्धन यांनी गेल्या वेळी ३७% आघाडीने जिंकली होती.भाजपने ही जागा कधीच गमावली नव्हती.याचाच अर्थ असा किरण बेदींना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून आणणे पक्षावर जोरदार बॅकफायर झाले आहे.पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी काम केलेले दिसत नाही.अन्यथा इतकी सुरक्षित जागा गमावणे शक्य वाटत नाही.

जबरदस्त विजयाबद्दल केजरीवाल आणि आआपचे अभिनंदन आणि शुभेच्छा! या निवडणुकीत भाजपचा अगदी पालापाचोळा झाला. काँग्रेसला तर भोपळाही फोडता आला नाही. केजरीवालांनी "Promising the Moon" अशा प्रकारची आश्वासने दिली आहेत. व्यावहारिक दृष्ट्या ती पूर्ण करणे अवघड आहे. तब्बल ५४% मते व ९०% हून अधिक जागा मिळवून आआप सत्तेत येत आहे. अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून जाऊन व अवास्तव आश्वासने पूर्ण करता आली नाहीत तर केजरीवाल केंद्रावर खापर फोडून पुन्हा एकदा राजीनामा देतील असं वाटतंय. निदान आता तरी केजरीवालांनी नाटकीपणा सोडावा. आताच एका वाहिनीवर पाहिले. आपल्या शेजारी उभ्या असलेल्या पत्नी व वडीलांची केजरीवालांनी ओळख करून दिली आणि नंतर सांगितले की माझी पत्नी केंद्र सरकारी सेवेत आहे व तिला सरकार त्रास देईल अशी भीति आहे. आता हे नाटक कशाला? त्यांच्या पत्नीला सरकाराला त्रास द्यायचा असता तर याआधीच्या दोन्ही सरकारांनी त्रास दिला नसता का? एवढा मोठा विजय मिळवून सुद्धा हा भंपकपणा कशाला?

In reply to by श्रीगुरुजी

केजरीवालांनी "Promising the Moon" अशा प्रकारची आश्वासने दिली आहेत.
निदान आता तरी केजरीवालांनी नाटकीपणा सोडावा.
आआपला प्रचंड बहुमत मिळाल्याने आता आश्वासने पूर्ण न करण्यासाठी कोणतेही कारण शिल्लक नाही.
काही महिन्यांपूर्वी एका विशिष्ट व्यक्तीमत्वाविषयी अगदी याच टायपातले उद्गार काढणार्‍यांना "भक्तांनी" दीलेली उत्तरे आठवली आणि Irony म्हणजे काय याचा प्रत्यय आला. :D

In reply to by थॉर माणूस

माझे ही म्हणणे असे आहे की पुर्वग्रहदुषित द्रुष्टिकोण कायम का ठेवायचा. वेळ उत्तर देइलच आणि नाही जमले तर पुन्हा निवडनुका आहेतच. तेंव्हा पडतील मग

लेटेस्ट आकडे: आआप-६७, भाजप-३ १९८४ मध्ये कॉंग्रेसने दिल्लीत ६९% मते मिळवली होती आणि जबरदस्त स्वीप केला होता. तसेच २००९ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला ७० पैकी ६८ जागांवर आघाडी होती.आआप या विक्रमाशी बरोबरी करतो की मोडतो आणि इतर सगळ्या पक्षांचा पूर्ण व्हाईटवॉश करतो ते बघायचे.

एक चांगलं झालं. आआपला प्रचंड बहुमत मिळाल्याने आता आश्वासने पूर्ण न करण्यासाठी कोणतेही कारण शिल्लक नाही. अर्थात केंद्राने माझ्या योजनांना निधी पुरवला नाही हे राखीव कारण केजरीवालांनी खिशात ठेवलं असणारंच. मागील वर्षी केजरीवालांचा राजीनामा म्हणजे, प्रेक्षकात बसून फलंदाजावर टीका करणार्‍या प्रेक्षकाला हातात बॅट देऊन खेळायला बोलावल्यावर आणि आपल्याला गोलंदाजी खेळता येत नाही हे त्याच्या लक्षात आल्यावर अशक्य अशी धाव घ्यायचा प्रयत्न करून मुद्दाम स्वतःहून धावबाद होऊन पंचांवर आणि नॉनस्ट्रायकरच्या काँग्रेसच्या फलंदाजावर दोषाचं खापर फोडण्यासारखं होतं. आता त्याच प्रेक्षकाला पुन्हा एकदा फलंदाजीची संधी मिळाली आहे. नॉनस्ट्रायकरला काँग्रेसचा नसून आआपचाच फलंदाज आहे. गोलंदाज व क्षेत्ररक्षकही आआपचेच आहेत. पंच सुद्धा आआपचेच आहेत. असे असूनसुद्धा फलंदाज बाद झाला तर आपल्याला खेळता येत नाही हे कबूल करण्यापेक्षा चेंडू पडताना साईटस्क्रीन समोर कोणतरी हलत होतं आणि म्हणून लक्ष विचलीत झाल्यामुळे मी बाद झालो असे फुसके कारण फलंदाज देतो का ते बघायचं.

In reply to by श्रीगुरुजी

दिल्लीचा अर्थ संकल्प हा ४०,००० कोटी रुपयांचा आहे, आणि ती काही थोडकी रक्कम नाहिये. आपण थोडा वेळ तर दिला पाहिजे असे वाटते. हे तर मॅच सुरु न होताच, फलंदाज बाद होण्यासच मैदानात उतरले आहेत असे म्हणण्यासारखे आहे

In reply to by गणेशा

आपण थोडा वेळ तर दिला पाहिजे असे वाटते.
तोच तर कळीचा मुद्दा आहे. वेळ द्यायला हवे हे अगदी बरोबर आहे.मला स्वत:ला ’फुलपाखरू’ मानसिकता अजिबात आवडत नाही. माझ्यासारखा विचार करून ज्या नेत्यावर विश्वास दाखविला आहे त्याला निदान ३-४ वर्षांचा वेळ दिला पाहिजे असा विचार मतदार इन जनरल करताना दिसत नाहीत. आता मतदारांना सगळे काही इन्स्टन्ट हवे असे दिसते.विशेषत: नेत्याला मॅन्डेट मोठे प्रचंड मिळाले असेल तर अशा अपेक्षा वाढीला लागतात. व्ही.आय.पी कल्चर बंद करणे, वीजेचे दर कमी करणे, पाणी फुकटात देणे वगैरे त्या मानाने सोप्या गोष्टी आहेत.तरीही हे वीजेचे दर कमी करायचे असतील तर वीज वितरण कंपन्यांना सबसिडी द्यायला हवी.अन्यथा या कंपन्या कोर्टात गेल्या तर ते प्रकरण लटकू शकेल.शीला दिक्षित यांच्या सरकारने २००१-०२ मध्ये या कंपन्यांबरोबर करार केले होते आणि या कंपन्यांना वीज वितरणाचे अधिकार दिले गेले होते. तो करार मोडायचा असेल तरी तो नक्की कोणत्या परिस्थितीत आणि कसा मोडावा हे त्या करारातच स्पष्ट केलेले असते (सर्वच करारात असे असते). मनात आले म्हणून केजरीवाल असा करार मोडू शकणार नाहीत.शेवटी केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री होणार आहेत कोणी अनभिषिक्त सम्राट नव्हे.त्यांना हे सगळे करारमदार, कायदेकानू नक्कीच लागू पडतील. केजरीवालांची खरी कसोटी लागेल इतर आश्वासनांच्या पूर्ततेच्या वेळी. १. ५०० नव्या शाळा बांधू असे एक आश्वासन पक्षाने दिले आहे.पाच वर्षात ५०० नव्या शाळा म्हणजे दरवर्षाला सरासरी १०० नव्या शाळा आणि दर आठवड्याला सरासरी जवळपास २ नव्या शाळा काढल्या तरच ते शक्य आहे.तसेच प्रत्येक शाळेला किमान २ एकर जागा हवी.म्हणजे दिल्लीमध्ये एक हजार एकर जागा मिळायला हवी.तितकी जागा उपलब्ध आहे की नाही याची कल्पना नाही.शाळा बांधायला नक्की किती खर्च येतो याची कल्पना नाही. २. पूर्ण दिल्लीमध्ये फुकटात वाय-फाय देऊ असे आणखी एक आश्वासन आहे.माझ्या ५०० स्क्वेअर फुटाच्या घरासाठी इंटरनेट आणि वायफायसाठी मी दर महिन्याला जवळपास ३०० रूपये भरतो.दिल्ली शहर हे मुंबईच्या सुमारे अडीच पटींनी मोठे आहे.म्हणजे हे आश्वासन पूर्ण करायचे असेल तर किती खर्च येईल? ३. दोन लाख पब्लिक टॉयलेट बांधू हे आणखी एक आश्वासन आहे.म्हणजे दर वर्षी ४० हजार पब्लिक टॉयलेट बांधून व्हायला हवीत आणि दररोज सुमारे ११०!! अशी इतर अनेक आश्वासने आहेत. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की स्वत: केजरीवालांनी ही आश्वासने देऊन लोकांच्या अपेक्षा उंचावून ठेवल्या आहेत.त्या पूर्ण करता आल्या नाहीत तर नेतृत्वाविषयी असंतोष वाढायला वेळ लागणार नाही.विशेषत: इतके अभूतपूर्व बहुमत मिळालेले असताना.

In reply to by क्लिंटन

शाळा, टॉयलेट, वाय-फाय इ. च्या आश्वासनावर विसंबून जनता मत देते असे मला वाटत नाही. मुळात या मूलभूत गरजाच समजल्या जात नाहीत. त्याऐवजी फुकट पाणी, विजबिलात ५०% सवलत या जास्त आकर्षक व मते खेचणार्‍या घोषणा आहेत. २००४ मध्ये महाराष्ट्र सरकारने शेतकर्‍यांना फुकट वीज द्यायला सुरूवात केली होती. त्याचा जबरदस्त फायदा मिळाला होता. अर्थात निवडून आल्यावर लगेचच ती योजना रद्द करण्याचा शहाणपणाही काँग्रेसने दाखविला होता. २००८ मध्ये शेतकर्‍यांना ७२,००० कोटी रूपयांचे कर्ज माफ करण्याच्या योजनेचा २००९ मध्ये काँग्रेसला प्रचंड फायदा झाला होता. जनतेला अशाच योजना आवडतात. स्वच्छता, टॉयलेट, वाय-फाय, शाळा अशा आश्वासनांना जनता भुलेल असे वाटत नाही.

In reply to by क्लिंटन

किलंट्न जी आपले विचार आणि मुद्दे बरोबर. बघुया पुधे काय होते ते . परंतु सकारत्मक .. त्य दिशेकडे भ्रष्टाचार मुक्त वाटचाल चालु होत आहे या बद्दल मला आनंद आहे. राजकारण दिसते तेव्हडे सोप्पे नाहिच हे दिसते आहेच. बघु या. परंतु बीजेपीच योग्य पर्याय होती आणि लोक चुकीचे होते हे सर्रास म्हणने योग्य नाही असे वाटते


फेसबुकवर माझ्या मित्र यादीमध्ये अनेक अमराठी मित्र आहेत. सगळ्यांना समजावे म्हणून मी हा पोस्ट हिंदी भाषेतून लिहिला होता. तोच इकडे कॉपी-पेस्ट करतोय, त्याबद्दल माफ करा. नियमबाह्य असेल तर नियंत्रकांनी खुशाल उडवून टाकावे.

================================================================ सुपडा साफ । ऎतिहासिक विजय । एक ‘भक्त’ दोस्त ने इस जित का एक लाईनमें ही विश्लेषण कर दिया । उसने कहा ये असत्य पर सत्य की विजय है । आज मुझे जो खुशी हो रही है, वो बयान करने के लिए मेरे पास वाकई में शब्द नहीं है । पर जो विचार मन में है, कम से कम उन्हे तो मै बयान कर ही सकता हूं । मेरे कुछ दोस्त केहते थे की केजरीवाल भगौडा है, नक्सली है, खांसता है, अराजकतावादी है, आतंकवादी है, देशद्रोही है, CIA एजंट है, भ्रष्टाचारी है, नौटंकीबाज है, पता नहीं और क्या क्या है, पर है जरूर । दिल्ली की जनता ने आज उनको बता दिया की ये बचकाने आरोप कितने खोखले थे । ३०० एम.पी. + आधा दर्जन कॅबिनेट मिनिस्टर्स + तीन मुख्यमंत्री + खुद प्रधानमंत्री + पेड मिडिया + रिसोर्सेस + पैसा + संगठन के हजारो कार्यकर्ता + किरण बेदी + बाबा राम रहिम इन सब लोगों को दिल्ली की जनता ने बता दिया की हमे काम करनेवाली सरकार चाहीये, आप लोगों की नकारात्मक सोच और भाषण नहीं । इतना जबरदस्त बहुमत मिला है, पर फिर भी कुछ लोग दिल्ली की जनता को कोस रहे है के उन्होंने आम आदमी पार्टी को चुनकर बहोत बडी गलती की है, अब पुरे देश को खामियाजा भुगतना पडेगा वगैरा वगैरा... भाईयों, अब तो आंखे खोल दो । ४९ दिन की सरकार के काम देखकर उन्हें वोट करनेवाली जनता पागल और आप फेसबुकी पंडित सच ऎसा तो नही हो सकता ना ? लोकसभा मे आप लोगों जैसे ही ये दिल्ली की जनता भी मार्केटिंग के जाल में उलझकर पछता रही थी । पिछले ९ महिनों मे भाजपाने इतने अच्छे काम किये दिल्ली और पुरे भारत में की दिल्ली की जनता ने उन्हें वोट ही नही दिया । लाखों दिलों की धडकन, और उतने ही लोगों के आदर्श महामहिम बिन्नी जी लगभग १८ हजार वोटों से पिछे चल रहे है । जिस त्रिलोकपुरी मे दंगे कराने की कोशिश की गई थी, उस जगह भाजपा के प्रत्याशी ३० हजार वोटों से पिछे चल रहे है । किरण बेदी जी सिर्फ १ हजार वोटों से आगे चल रही है । खुद डिबेट को बुलाकर बाद मे विधानसभा में डिबेट करेंगे ऎसा कहा था इन्होंने । अगर किरण जी जित गई तो कम से कम वहां तो डिबेट करेंगी वो । खैर, आपको चिढाना मेरा मकसद नहीं है । बस इतनी सी प्रार्थना है की आंखे खोलकर देखो अपने आसपास । कट्टरतावाद समस्यायें सुलझाता नहीं बल्की बढाता है । ये बात दिल्ली के तो समझ में आ गई । आप भी जल्दी समझ जाओ तो आपके लिए ही अच्छा है । इस हार से सबक लेकर अगर भाजपा-कॉंग्रेस (और अन्य तमाम पार्टीयां) जनता के काम करना शुरू कर दे तो इससे अच्छी बात और क्या हो सकती है ? आम आदमी पार्टी की जरूरत ही नही रहेगी फिर तो. आम आदमी पार्टी के इस ऎतिहासिक विजय के तीन प्रमुख कारण जो मुझे लगते है, वो है : १) आम आदमी पार्टी की नियत २) ग्राऊंड लेवल पर काम करने वाले कार्यकर्ता ३) दिल्ली की जनता दिल्ली की जनता का जितना शुक्रीया अदा किया जाये उतना कम है । देश की राजनिती को बदलकर रख देनेवाली पार्टी को जिताकर उन्होंने पुरे भारत के सामने एक आदर्श रखा है । और एक महत्त्वपूर्ण बात... पिछले एक-दो साल में कई जगह पर डिस्कशन, डिबेट किया । वैसे मैने कभी किसी पर पर्सनल अटॅक किया नही, जबान कभी फिसलने नहीं दी । पर फिर भी कोई अगर मुझसे नाराज है तो उससे माफी मांगना चाहता हूं । आशा करता हूं की आप मुझे माफ कर देंगे । सोचा था ४-५ लाईन लिखकर खतम कर दूं, पर थोडा ज्यादा लंबा खिंच गया. जाते जाते आपको भविष्य मे न्युज चॅनल और कुछ फेसबुक वॉलपर आनेवाली खबरें बता देता हूं । - मुख्यमंत्री बनने के २ घंटे बाद भी जनलोकपाल बिल पास नही हुआ । - ४ घंटे हो गये, अभी भी दिल्ली की जनता फ्री WiFi के लिये तरस रही है । - सरकार के ६ घंटे पुरे हो चुके है फिर भी १० लाख CCTV नही लगाये है । - केजरीवालने आज २ की बजाय ३ रोटीयां खाई हैं । तिसरी रोटी के लिये क्या दुबई से फंड आया है ? - १० घंटों के बाद भी भ्रष्टाचार पुरी तरह से रूका नही है और इसलिये दिल्ली की जनता हा हाल बेहाल है । - केजरीवालने गिता की कसम खाते वक्त उसपर बांया हाथ रखा, हिंदू धर्म का अपमान । - पुरे २४ घंटे हो चुके है फिर भी केजरीवालने पेट्रोल के दाम नही घटाये है । - अब तक का सबसे बडा स्टींग ऑपरेशन, केजरीवाल के मंत्री हॉटेल में चाय पिते पकडे गये । अब इजाजत दिजिये, कुछ दोस्तों को पार्टी देने जाना है । ;)


In reply to by नांदेडीअन

मुख्यमंत्री बनने के २ घंटे बाद भी जनलोकपाल बिल पास नही हुआ । - ४ घंटे हो गये, अभी भी दिल्ली की जनता फ्री WiFi के लिये तरस रही है । - सरकार के ६ घंटे पुरे हो चुके है फिर भी १० लाख CCTV नही लगाये है । - केजरीवालने आज २ की बजाय ३ रोटीयां खाई हैं । तिसरी रोटी के लिये क्या दुबई से फंड आया है ? - १० घंटों के बाद भी भ्रष्टाचार पुरी तरह से रूका नही है और इसलिये दिल्ली की जनता हा हाल बेहाल है । - केजरीवालने गिता की कसम खाते वक्त उसपर बांया हाथ रखा, हिंदू धर्म का अपमान । - पुरे २४ घंटे हो चुके है फिर भी केजरीवालने पेट्रोल के दाम नही घटाये है ।
नाही हो.. ही 'आआप'वाल्यांची खासियत आहे. २००४च्या बातम्या २०१५त झळकवणे इत्यादी.. आता तेच जिंकले म्हटल्यावर हे सगळं कोण करणार? ;-) असो. आआपचे आणि केजरीवालांचे जबरदस्त अभिनंदन.. पाच वर्षं आहेत हातात. सुयोग्यरित्या वापरावीत, हीच अपेक्षा..

In reply to by नांदेडीअन

>>> आम आदमी पार्टी के इस ऎतिहासिक विजय के तीन प्रमुख कारण जो मुझे लगते है, वो है : १) आम आदमी पार्टी की नियत २) ग्राऊंड लेवल पर काम करने वाले कार्यकर्ता ३) दिल्ली की जनता माझ्या दृष्टीने आआपच्या विजयाची २ मुख्य कारणे आहेत. (१) फुकट पाणी, वीजबिलात ५०% घट यासारखी अत्यंत लोकानुययी आश्वासने आणि (२) काँग्रेसने आआपला दिलेला वॉकओव्हर. भाजपच्या मतात जेमतेम २-३ टक्के घट झाली आहे परंतु आआपची मते तब्बल २४-२५ टक्क्यांनी वाढली आहेत. काँग्रेसची मते २४.५% टक्क्यांवरून ८% टक्के इतकी कमी झाली आहेत. हा प्रामाणिकपणाचा, स्वच्छ कारभाराचा विजय आणि अहंकाराचा पराभव वगैरे नुसत्या वावड्या आहेत. खरी कारणे ही दोनच असावीत.

In reply to by श्रीगुरुजी

आपण खरंच भाजपाचे पक्षपाती आहात का याबद्दल आता शंका यायला लागली आहे. लक्षात घ्या, ज्या लोकांनी निवडून द्यायचे आहे, त्यांची 'फुकटे' वगैरे शब्दात संभावना करून आपण लोकांच्या मनात भाजपा बद्द्ल अनुकूल भावना कशा निर्माण करणार? म्ह्णजे जो फुकट देइल असे म्हणतो त्याच्या मागून फक्त ती फुकट गोष्ट हवी म्हणून एवढे लोक गेले? धन्य!!!

In reply to by असंका

मी फुकटे हा शब्द वापरलेला नाही. फुकट पाणी, विजबिलात ५०% सवलत इ. लोकानुययी घोषणांमुळे लोकांनी मते दिली असे म्हटले आहे. मी आधीच्या एका प्रतिसादात महाराष्ट्रातील २००४ मधील शेतकर्‍यांना फुकट वीज योजना, २००८ मधील ७२,००० कोटी रूपयांची कर्जमाफी ही उदाहरणे दिली आहेत. तीच इथेही लागू पडतात.