Skip to main content

दिल्ली विधानसभा निवडणुक-२०१५: निकाल

लेखक क्लिंटन यांनी सोमवार, 09/02/2015 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, या धाग्यावर दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि त्या अनुषंगाने इतर मुद्दे अशा स्वरूपाची चर्चा होईल.सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर सव्वा आठच्या सुमारास पहिले कल हाती यायला लागतील.जसे कल येतील त्याप्रमाणे ते या धाग्यावरील प्रतिसादात लिहेन. तेव्हा सुरवात करू उद्या सकाळी. धन्यवाद क्लिंटन

वाचने 38092
प्रतिक्रिया 163

प्रतिक्रिया

In reply to by असंका

निवडून देणारे लोक फुकटे नसतात असं म्हणायचंय का? बाकी मी काही भाजपाचा पक्षपाती नाही. त्यामुळे मी तरी त्यांना फुकटेच म्हणणार.

In reply to by नांदेडीअन

नान्देडियन - मिपा वर मागच्या वेळेस केजरीवाल ने शपथ घेऊन १० दिवस झाले नव्हते आणि त्यांचा performance जज करणारा धागा तयार झाला होता . यावेळेस शपथविधी झाल्यावरच धागा तैयार होईल बहुतेक

In reply to by पिंपातला उंदीर

केजरीवालांनी मागील वेळी शपथविधी झाल्यावर काही मिनिटातच प्रत्येक घरी प्रति महिना २०,००० लिटर मोफत पुरविण्याची घोषणा केली होती आणि लगेचच दुसर्‍या दिवशी वीजबिलात सवलत जाहीर केली होती. जो मुख्यमंत्री इतक्या वेगात निर्णय घेतो त्याच्या निर्णयांची समीक्षा वेगात होणारच.

भाजप मधले इतर दबलेले गट आता जास्त सक्रीय होतील. "पूर्ण बहुमत" हा आजकालचा ट्रेंड आहे का? का आघाडी/युती ला लोकं कंटाळले आहेत? विरोधी पक्ष असा काही राहतच नाही. मला अजूनही हा प्रश्न पडलाच आहे "फेवरेट पार्टीचा" उमेद्वार सरसकट निवडून देण्याचे फायदे-तोटे काय आहेत?

In reply to by सुधीर

"पूर्ण बहुमत" हा आजकालचा ट्रेंड आहे का? का आघाडी/युती ला लोकं कंटाळले आहेत?
हो असे दिसते.गेल्या काही वर्षात पूर्ण बहुमत मिळायचा कल वाढलेला दिसतो.अगदी उत्तर प्रदेशसारख्या राज्यातही मतदारांनी २००७ आणि २०१२ मध्ये एका पक्षाला निर्विवाद पूर्ण बहुमत दिले होते.
मला अजूनही हा प्रश्न पडलाच आहे "फेवरेट पार्टीचा" उमेद्वार सरसकट निवडून देण्याचे फायदे-तोटे काय आहेत?
"फेवरेट पार्टीच्या" नावावर दगड जरी उभा राहिला त्याला निवडून देणे ही नक्कीच चुकीची गोष्ट आहे.महाराष्ट्रात भाजपने राष्ट्रवादीतून आयात केलेल्या अनेक उमेदवारांना उभे केले होते.आआपनेसुध्दा ७० पैकी १० उमेदवार इतर पक्षांतून आयात केलेले होते.यातून राजकारणातील संधीसाधूपणाला नक्कीच चालना मिळेल.

In reply to by क्लिंटन

"फेवरेट पार्टीच्या" नावावर दगड जरी उभा राहिला त्याला निवडून देणे ही नक्कीच चुकीची गोष्ट आहे
हे पटत असले तरीही असे नाही केले तर त्रिशंकू परिस्थिती येते त्याचे दुष्परिणाम बघितलेलेच आहे.

दिल्लीतील यशाबद्दल केजरीवाल यांचे अभिनंदन करण्यासाठी देशभरातून फोन खणखणत असताना काही फोन लक्ष्यवेधी ठरले आहेत. महाराष्ट्राच्या सत्तेत दुय्यम स्थान मिळालेल्या शिवसेनेकडून केजरीवाल यांचे खास अभिनंदन करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केजरीवाल यांना फोन केला व त्यांच्या भरघोष यशाबद्दल अभिनंदन केले. ट्विटरवर ही माहिती देताना 'एक वर्ष सत्तेशिवाय काढल्यानंतर दिल्लीकरांनी आपल्याला हवा तोच पर्याय निवडला आणि 'आप'ला भरभरून यश दिले...दिल्लीचेही अभिनंदन', असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले. शिवसेना-भाजप युती तुटताना त्याचे खापर आदित्य यांच्यावर फोडणाऱ्या भाजपला हा चिमटा तर नाही ना, अशी शंका घ्यायला या अभिनंदानाने पूर्ण वाव आहे. सोर्स - महाराष्ट्र टाईमस महारश्त्र्म

डिएनए या वृत्तपत्राने दिल्ली विधानसभेच्या १९९३ पासूनचे वोट शेअर दिले आहेत. आवडत्या पक्षाला ४० - ४५ किंवा ५० टक्के पेक्षा अधिक वोट शेअर देणे हे दिल्ली विधान सभेचे सर्वसाधारण स्वरूप दिसते. मागची त्रिशंकु विधानसभा हा अपवाद होता असे म्हणता येईल असे दिसते. १९९३ च्या पहिल्याच विधान सभा निवडणूकीत भाजपाला ४७.८२ टक्के वोट शेअर होता. १९९८ - ३४ %; २००३ - ३५. २२%; २००८ - ३६ %; २००१३ - ३३.१०%; २०१५ - ३२.३० % २०१३ ते २०१५ वोट शेअर २९.५० % ते ५४ % असा भन्नाट वाढला आहे पण बिजेपीच्या किमान टक्केवारी म्हणजे लॉयल मतदारात फारसा फरक पडलेला नाही. काँग्रेसचा २४% शेअर घटून ९.५० टक्क्यांवर आला आहे म्हणजे आआपने १४% मते काँग्रेसच्या वाट्याची खाल्ली आणि दहा टक्के इंडिपेंडण्ट्स आणि इतर छोट्या पक्षांची खाल्ली असण्याची शक्यता आहे. भाजपाच स्वतःच्या टक्केवारीत नुकसान झालेल नाही पण इतरांची मते खाण्यात आआप भाजपाच्या का अग्रेसर राहू शकला याचे विश्लेषण भाजपा समर्थकांनी करावयास हवे असे वाटते.एकुण काय तर यावेळी आआपकडे वळलेल्या २४ % दिल्लीच्या मतदारांना भाजपचे नेते नव्याने माहिती करून घ्यायचे नव्हते ती २४ % मते मिळवण्यासाठी असलेली प्रतीमा भाजपाच्या स्थानिक नेतृत्वात कमी पडली असावी ? दुसरा एक फॅक्टर दिल्लीच्या गृहखात्याच्या बाबी केंद्रसरकारच्या हातात आहेत याचे प्रश्नावर केंद्रातील भाजपा सरकारने सुयोग्य तोडगा उपलब्ध केला नाही. दिल्लीचे गृहखाते विषयक प्रश्न पहाण्यासाठी दिल्लीतील एकाला उपमंत्री पद आणि स्त्री सुरक्षा विषयक प्रश्नापर्यंत किमान अधिकार स्थानिक प्रशासना कडे हस्तांतरीत करता आले असते मग याला समस्ये कडे दुर्लक्ष करणे म्हणता येईल का ? हे मोफत ते मोफत ची आआपची आश्वासने अधिक असू शकतात पण अशी आश्वासने देणारे पक्षही बर्‍याचदा निवडणूकीत पडत असतात आआपला दिल्लीतील मतदारांनी एक संधी नक्कीच दिली आहे. मुख्य म्हणजे दिल्ली बाजूच्या हरीयाणा आणि उत्तरप्रदेशापेक्षा आपल्या मतदानाचे वेगळेपण जपून ठेवते हे उल्लेखनीय म्हणावे लागेल.

In reply to by माहितगार

१९९३ च्या पहिल्याच विधान सभा निवडणूकीत भाजपाला ४७.८२ टक्के वोट शेअर होता.
१९९३ मध्ये भाजपला ४३%, काँग्रेसला ३४% तर जनता दलाला १२% मते होती. हा ४७.८२% हा आकडा कुठून आला याची कल्पना नाही.
भाजपाच स्वतःच्या टक्केवारीत नुकसान झालेल नाही पण इतरांची मते खाण्यात आआप भाजपाच्या का अग्रेसर राहू शकला याचे विश्लेषण भाजपा समर्थकांनी करावयास हवे असे वाटते.
+१.

In reply to by क्लिंटन

१९९३ मध्ये भाजपला ४३%, काँग्रेसला ३४% तर जनता दलाला १२% मते होती. हा ४७.८२% हा आकडा कुठून आला याची कल्पना नाही
हम्म डिएनएच्या आकडेवारीत गल्लत झाली असे दिसते. इलेक्शन कमीशनच्या वेबसाईटवर येथे तुम्ही म्हणता तशीच आकडेवारी दिसते.

भाजपेयी आत्मपरीक्षण करतील अशी किंचित आशा होती पण हे तर अजून केजरीवाल भंपक आहे .. आक्रस्ताळा आहे ईई मुद्दे उगाळत बसले आहेत . एवढ्या मोठ्या पराभवाची कारणीमीमांसा कोणत्याही पक्षाने , कार्यतर्याने , समर्थकाने नक्कीच करायला हवी. पूर्ण पराभव झाला याचा अर्थ चुकाही तेवढ्याच गंभीर आहेत . आणि मतदारांशी तुटलेली नाळ का तुटली . केजरीवाल कसे का असेना पण आज मतदारांनी त्यांना स्विकारला आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे इथे हातपाय आपटून नावे ठेवण्यात काही हशील नाही. अ पार्टी विथ डिफ्रन्स ने आत्मपरीक्षण करावे आणि पुढे या चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी . बाकी समर्थकाऐवजी भक्त असतील तर मात्र हे अवघड आहे.

नमस्कार मंडळी, चर्चेत भाग घेतल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.ही चर्चा पण मुद्द्यांच्या आधारेच झाली हे आवडले.त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. आता केजरीवाल नक्की कारभार कसा करतात हे बघायचे. बहुदा जुन्या चुकांपासून ते शिकतील.तसे झाल्यास नवा लोकाभिमुख पक्ष मिळणार असेल तर ते खूपच चांगले.जसे भाजपला साध्वी निरंजन, साक्षी महाराज या त्यांच्यातल्याच लोकांपासून धोका आहे आणि अशांना खड्याप्रमाणे दूर ठेवले नाही तर एकनाएक दिवस भाजपवाले गोत्यात येतील त्याप्रमाणे आआपला कमलमित्र चिनॉय सारख्या स्वतंत्र काश्मीरवाल्यांपासून धोका आहे. असो. गेले अनेक दिवस मी मिसळपाववर आणि फेसबुकवर बराच सक्रीय होतो. त्यामुळे थोडी दमछाकच झाली आहे. आता मला माझ्यासाठी वेळ हवा आहे.१५ फेब्रुवारी ते १ एप्रिल या काळात मी दोन्हींपासून दूर असेन.१५ तारखेपर्यंत इतर चर्चांमध्येही माझा सहभाग थोडा कमीच असेल. सर्वांना धन्यवाद.

In reply to by क्लिंटन

ही चर्चा पण मुद्द्यांच्या आधारेच झाली हे आवडले. सहमत! आता केजरीवालांनी आणि केंद्रात मोदीसरकारने देखील मुद्यांवर आधारीत राज्य केले तर ते या निवडणुकीचे चांगले फलीत मानता येईल. आता मला माझ्यासाठी वेळ हवा आहे.१५ फेब्रुवारी ते १ एप्रिल या काळात मी दोन्हींपासून दूर असेन. शुभेच्छा! मात्र (जरी शक्यता नसली आणि मी तसली काही आशा करत नसलो तरी) दिल्लीत जर काही जबरा (अर्थात युनिक) नौटंकी चालू झाली तर आणि हो अर्थसंकल्प कुठल्याही अर्थाने भन्नाट झाला तर, आपण हा त्रिदंडी संन्यास समजून (इष्टकामप्रसिद्यर्थम्) पुनरागमन करावेत! ;)

नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने विक्रमार्जितस्य सिंहस्य स्वयंमेव मृगेंद्रता।। अर्थात सिंहाला जंगलाचा राजा घोषित करण्यासाठी कोणताही राज्याभिषेक केला जात नाही किंवा कुठलाही विधी केला जात नाही. आपल्या गुण आणि पराक्रम, कर्तृत्वाच्या जोरावर तो राजपद प्राप्त करतो, हेच खरे. पण त्याही पेक्षा, मला अमित शहांचे कौतुक वाटते, कि कसेही करून श्रीयुत अरविंद केजरीवाल यांचे जळते शेपूट पकडून दिल्लीच्या राजधानीत बांधून व अडकवून ठेवल्याबद्दल! आता जरी आआप ने आग लागली तरी ती फक्त दिल्लीपर्यंतच मर्यादित राहील!!!

In reply to by आयुर्हित

पण त्याही पेक्षा, मला अमित शहांचे कौतुक वाटते, कि कसेही करून श्रीयुत अरविंद केजरीवाल यांचे जळते शेपूट पकडून दिल्लीच्या राजधानीत बांधून व अडकवून ठेवल्याबद्दल! आता जरी आआप ने आग लागली तरी ती फक्त दिल्लीपर्यंतच मर्यादित राहील!!! हायला !!! हे केजरीवालच काय पण अमित शहांच्या मनात आले नसेल ! ;) :)