Skip to main content
लेखक विदेश यांनी गुरुवार, 29/01/2015 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
नकोच सोने हिरे जवाहिर देऊ तू मजला देवा एक हृदय अन त्यात भावना देई तू मजला देवा .. निंदा द्वेष न उद्भावा कधीच हृदयामधून माझ्या माया प्रेम नि वात्सल्याचा असु दे अमापसा ठेवा .. गरीब थकले गांजुन गेले दया येऊ दे मनामधे श्रीमंतीचा नको रुबाब नको मनाला त्याचा हेवा .. गोडधोड नशिबात असू दे कधीतरी सणवाराला नकोस पाडू मोहात कधी मिळण्यासाठी रे मेवा .. भान राहु दे स्थळ काळाचे जगु दे स्थितीत आहे त्या शबरी सुदामा श्रावणबाळ पुनर्जन्म दे मज देवा .. .
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2175
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

कविता आवडली, परंतु बदललेल्या वास्तवीक सामाजिक परिस्थितीशी तुलना करण्यासाठी नकोच सोने हिरेजवाहिर -स्वप्नमयकल्पना आणि बदललेल्या काळातील लाकूडतोड्याची गोष्टीचे वास्तव हा स्वतंत्र धागा काढत आहे.

पैसा... धन्यवाद ! माहितगार ... ही कविता आवडून, तुलना करण्यासाठी इतर आणखी चांगल्या कवितांचा संदर्भात आपण वापरली. छान वाटले. आभार !