सबप्राईम क्रायसीस्,दलाल स्ट्रिट आणी........
लेखनप्रकार
सबप्राईम क्रायसीस-
साल होत २००५ साहेब दुसर्यांदा सिएम झाले.पण पुन्हा सिएम होण सोप नव्ह्त.स्पर्धा तिव्र होती,साहजीकच सायबांना भक्कम किमंत मोजावी लागली.साहेब त्याला गुतंवणुक समजुन कशी वसुल करता येईल याचा विचार करु लागले.
थोड्याच काळात एक एक सरकारी कार्यालय गावात येऊ लागत.त्या सोबतच नव्या माणसांची गावात भर पडु लागली.
नव्या लोकांसाठी जागेची मागणी वाढु लागली.गावा तस लहान त्यामुळे फारशी जागा नव्हती.त्यामुळे २००८ येता येता
गाव आडवतिडव पसरु लागल.
साल २००९, २६/११ घडल आणी सायबांच पद गेल.गावात निराशा पसरली.पण साहेब धोरणी होते आणी त्यांची गुंतवणुक अजुन वसुल झाली नव्ह्ती.त्यांनी आणखीन गुंतवणुक केली आणी वरच्या पदावर गेले,आणी वसुलीला लागले.
गावात पुन्हा चेतन्य पसरल.जमिनीचे भाव पुन्हा वाढु लागले.लोक मिळेल ती जमीन घेऊ/विकु लागले.
२०११ येता येता गावातल्या बार्शी रोड भागात ४० किमी पर्यंत प्लॉटींग पडली( याच भागात सायबांचा भुजबळ टाईप महाल आहे,वरुन दिसणार नाही कारण गाडी गेट मधुन थेट जमीनीत घुसते).
रिएल इस्टेटच मार्केट बेफाम वाढल ,यात भर पडत होती रोज नव्या अफवेची,आता रोज विमान येणार,गावात फाईव्ह स्टार हॉटेल होणार्,आज नवा सरकारी प्रकल्प आलाय एकुण आता गाव आता मोठ्ठ होणार.लोक वेड्यासारखे दागिने,बँकेच्या एफडी मोडुन,कर्ज घेऊन जमिनीत गुंतवणुक करु लागले.रजिस्ट्रार ऑफीसला रोज १००-१५० दस्त नोंद व्हायचे.
पण ही सुज होती...कधीना कधी तर उतरणारच...फक्त कारण पाहिजे होत ...२०१२ मधे मिळाल.
सायबांच निधन झाल...जमिनीचे भाव धाडकन कोसळले...गजबजलेल रजिस्ट्रार ऑफिस ओस पडल....
मुश्किलीन १-२ दस्त नोंद होऊ लागले...आज तिच परिस्थीती कायम आहे.
=================================================================================
दलाल स्ट्रिटः-
या काळात गावात एक नवी जमात जन्माला आली,ति म्हणजे जमिन खरेदी -विक्री करणार्या दलालांची.
जिभेवर गोडवा,अंगात लोचटपणा आणी या बोटाची थुंकि त्या बोटावर करण्यात पटाईत असा कुठलाही व्यक्ती त्या जमातिचा भाग होऊ जात असे.नाक्यावर उभे राहुन 'जमीन','प्लॉट' असा शब्द मोठ्याने जरी उच्चारला तरी या जमातीतिल १०-१५ लोक तुमच्यावर तुटुन पडत.रोज सांच्याला ढाब्यावर दारु ढोसत, कोण किती कमावले याच्या गप्पा रंगायच्या.
या जमातीत आमचाही एक मित्र होता.२०१० मधे प्लॉट घे,वर्षात दुप्पट होतील म्हनुन खनपटीला बसला होता.
पण घरचे बधत नाहीत हे समजल्यावर रागाने पहात्,डोळ्यावर गॉगल चढवत ..नव्या गाडीतुन निघुन गेला.
पुन्हा बोललाच नाही...वर्षभरापुर्वी एकाच्या गाडीवर मागे बसुन जाताना दिसला होता.
दोन महिण्यापुर्वी भेटला...कसनुस हसला..म्हणाला "तुझी जुनी सायकल देतो का ? एमाआयडीसित चालत जायला वेळ लागतो.उशिर झाला तर मालक अर्ध्या दिवसाचा पगार कापतो.लवकरच वापस करीन...."
=================================================================================
आणी वाहती गंगा-
याच काळात आणखिन एक प्रकार घडत होता,ते म्हणजे या वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्याचा.
२०११ मध्ये आमच्या दोन मित्रानीं ठरवल वाढत्या जागेच्या भावात स्वतःचा काही फायदा करुन घ्यायचा.एकान आपल सर्वस्व विकल आणी एक चांगला प्लॉट घेतला,दुसरा अश्याच प्रकारे पयशे जमा करुन त्या प्लॉटचा डेव्हलपर झाला.
पण आधीच घाण झालेल्या गंगेत हात धुवताता अडकुन पडले.२०१२ झाल आणी प्लॉटवर उभ्या होत असलेल्या ईमारतीला ग्राहकच मिळाना गेल .दोघही वेतागले...एकमेकांना दोष देऊ लागले..एकमेकांच तोंड बघणे ही सोडुन दिले.पहिला दुसर्याला शिव्या घालयचा आणी दुसरा पहिल्याला.
भांडण कोर्टात गेल..अर्धवट बांधलेल्या ईमारतीला सिल लागल..आता ती इमारत टवाळखोरांचा अड्डा बनली आहे.दिवसा रिकाम टेकडे तिथे बसुन मॉरल पोलीसिंग करतात आणी रात्री....
(समाप्त)
जाता जाता: लेखाचा आणी शिर्षकाचा काही संबध नाही,तसाही लेख फालतु आहे..आणी काही भाग इतरत्र प्रकाशित *biggrin* .
वाचने
8886
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
उत्तम लेख आणि माहीतीपूर्ण
दंडवत....
हे आणि ते...
काय तुम्ही जेपी?
ओ ते साहेब म्हण्जे पवार नाय.
In reply to ओ ते साहेब म्हण्जे पवार नाय. by विजुभाऊ
व्हय जी...
अगदी बरोबर
मस्त! सूक्ष्म अर्थशास्त्र का
.
वाचतिये तुमचे लेख पण
कं लिवलंय, कं लिवलंय
प्रकाटाआ
In reply to प्रकाटाआ by जेपी
अहो, स्पष्ट नावं घेऊन लिहिलं
In reply to अहो, स्पष्ट नावं घेऊन लिहिलं by रेवती
:-)
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
ओह...
In reply to ओह... by तुषार काळभोर
मल व्यनी कर्ता का नाव...मी
In reply to मल व्यनी कर्ता का नाव...मी by टवाळ कार्टा
मी पण नाही.
In reply to मी पण नाही. by रेवती
हा हा
In reply to हा हा by श्रीरंग_जोशी
पद्मसिंह पाटील. काय राव तो
In reply to पद्मसिंह पाटील. काय राव तो by हाडक्या
हेच ते
In reply to हेच ते by श्रीरंग_जोशी
उस्मानाबादेतील भयपर्व
In reply to उस्मानाबादेतील भयपर्व by संपत
थरकाप
In reply to हेच ते by श्रीरंग_जोशी
ओक्के.
पैसा मिळवणे
मस्त .. क्रायसिस जास्त आवडले
किती ते 'अवजड उद्योग'
संवेदनशील, माहितीपूर्ण लेख
हम्म
सर्व प्रतिसादकांचे आभार.
चांगलं लिहिलंय जेपी. थोड्या
चांगलं लिहिलंय
पुण्यात काय परिस्थिती आहे?
In reply to पुण्यात काय परिस्थिती आहे? by काळा पहाड
खरंच खरेदीची इच्छा असेल तर