Skip to main content

खरड फळा रे खरड फळा

लेखक प्रमोद देर्देकर यांनी गुरुवार, 05/02/2015 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
खरडफळा रे खरडफळा, जरी तुझा रंग नाही काळा, तुझ्या अंगी विविध कळा, येथेच होते सुरुवात मिपाकरांची अभिवादनाने, मुख्य धाग्यापेक्षा इथेच जास्त खडाजंगी घडे, कोणी काढतो इथे दुसर्याच्या नावे गळा, पॉपकॉर्न खात जग बघती तेवढाच विरंगुळा, पडिक मिपाकरांचा हा जालिय मेळावा, अहोरात्र इथे केव्हाही टंकाळा, खरडफळा रे खरडफळा, जरी क्षणिक लाभले आयुष्य तुझला, तरी मिपाचा तु भरजेरी शेला. खरडफळा रे खरडफळा.
लेखनविषय:

वाचने 3321
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

झकास हो देर्देकर. बाकी ह्या खरड'फ़ळ्या' मुळे फळा ह्या लोकप्रिय कवितेची आठवण झाली।

In reply to by प्रचेतस

+++++११११११ कचकुन सहमत हाय! मात्र त्या काव्याचे जनक .. श्री. लीलाधर स्वामी महाराज हे सध्या प्रा"पंचिक सुखात विहरत असल्यामुळे, त्याच्या(प्रत्यक्ष मिळालेल्या :-D ) परिणाम रूपावर भाळुन लळा ,नावाची एक गोंडस बालकविता पाडण्यात व्यस्त आहेत,असे कळले आहे!

फळा फळा रे फळा फळा येथे जमतो नव कवींचा मळा

In reply to by लीलाधर

गोड माझा बाळा, त्याचा लागला लळा आला उमाळा, प्रतिभा वाहिली भळाभळा बदलायला मी दुपटी रोज, शिकतोय मी बाळा सोनुलं तुजला बघून लागला मज लळा

छान .. खरडफळा खरेच असा आहे काय ?