काही आजार शरीराचे;काही मनाचे तर काही दोन्ही चे मिळुन असे माहित होते. या पलिकडे जाऊन काही 'वैचारीक आजार' असतात असे एका संशोधनात सिद्ध झालं आहे म्हणे !(संशोधक जिवाच्या भितीने लपुन बसलाय) त्या संशोधनात काही तथ्य आहे असे आमच्याच काही मित्रमंडळीकडे पाहुन पटायला लागलंय.. :?
माझा एक मित्र आहे.त्याला वै.जुलाबाचा आजार आहे! कोणताही विषय त्याला ऐकू आला कि सुरु झालेच म्हणुन समजा ! नव्या रेसिप्यांपासुन अणुकरारापर्यंत कोणताही विषय याला'पचत'नाही.पोटात काही म्हणुन ठरत नाही! कितीही चांगलं याला द्या;अंगी काही लागत नाही.विचार,विषय कितीही जड असू द्या;याच्या कानातून आत शिरतो,काही क्षणात तोंडातून बाहेर्!तेही डोक्यात घाईघाईत झालेल्या प्रक्रियेसह! :NO
एक मैत्रिण याच्या विरुद्ध. वै.बद्धकोष्ठता आहे तिला.म्हणजे डोक्यात खूप असतं हो,बाहेर पडण्याची मारामार!!! चर्चा,विनोद्,चेष्टा असे पाचक ही काही परिणाम करत नाहीत्. एक चांगलं आहे हिचं..कुणीही तिच्यासमोर कितीही जड विषयावर बड्बडू श़कतों. नजिकच्या भविष्यकाळात तरी बाहेर काही पडणार नाही याची खात्री असते.
एकीला वै.अॅलर्जी आहे.पथ्यपाणी कडक!न चालणारा विषय निघाला कि पुरळ उठते. डोके ठणकायला लागते.खाज सुट्ल्याने ती वेडीपिशी होते!एक तर ती प्रचंड स्त्री मुक्तिवादी(दोन्ही) आहे. त्यामुळे कुठल्याही वयाच्या पुरुषांबद्द्ल चांगले बोलले की ही ताप चढल्यासारखी त्या जातीबद्द्ल'अन्याय..अत्त्याचार्.'.असे भाषण सुरू करते! तिच्या अशा आजाराला घाबरून मी तेंडुलकरचंही कौतूक तिच्यासमोर करत नाही. e:
काहींची अवस्था याहून वाईट. वै.बधिरता! कोणत्याही विषयाचा पोत्,स्पर्श यांना जाणवतच नाही. मग तो विषय दाहक असो की मोरपिशी..त्यांच्या कातडीवरचा केसही हलत नाही.सुखी जीव नाही!
हे झाले मोठे आजार.सर्दी पडश्या सारखे किरकोळ आजार आप्ल्यातुप्ल्याला पण होतातच की. म्हणजे बघा,एखाद्या विषयावर इथे खूप लोक पेटलेत असे दिसले की विषय कोणताही असो..मतांच्या शिंका येणारंच! :)
बाकी वैचारिक गतिमंदता,वै.स्थूलता,वै.कावीळ ही नावे तुमच्या कल्पनाशक्तीसाठी सप्रेम भेट :D
( अन्यत्र पूर्वप्रकाशित )
वाचने
10230
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा बरेच थोर थोर चेहरे
+१
In reply to हा हा हा बरेच थोर थोर चेहरे by अवलिया
असेच म्हणतो
In reply to +१ by छोटा डॉन
खरं का ?
In reply to असेच म्हणतो by नितिन थत्ते
अगदी अगदी!
In reply to खरं का ? by छोटा डॉन
मस्त....
बाबी
कोन्चे कोन्चे महानुभाव हायती
सहीच बरेच लोक आठवले...
वैचारिक फटकेबाजी .. दे धमाल !
माया जि
मस्त
खॅ खॅ खॅ!!!
In reply to मस्त by राजेश घासकडवी
लेखापेक्षा हा प्रतिसाद सरस
In reply to मस्त by राजेश घासकडवी
वैचारीकता
In reply to मस्त by राजेश घासकडवी
आम्हाला वैचारिक एलर्जी
एक नंबर*lol*
काही नवे चेहेरे आठवुन
हेच लिहायला आले होते
In reply to काही नवे चेहेरे आठवुन by अजया
वैचारिक गळवे ठसठसणे हा रोग
वैचारिक डायबेटिस-या रोगाच्या
In reply to वैचारिक गळवे ठसठसणे हा रोग by बॅटमॅन
हो पण या दोहोंपलीकडे गळवांचा
In reply to वैचारिक डायबेटिस-या रोगाच्या by अजया
(No subject)
In reply to हो पण या दोहोंपलीकडे गळवांचा by बॅटमॅन
अगदी अगदी!आणि या पू चे पण
In reply to हो पण या दोहोंपलीकडे गळवांचा by बॅटमॅन
अगदी अगदी....
In reply to अगदी अगदी!आणि या पू चे पण by अजया
बॅटमॅन आणि आर्य गळूमोचक
In reply to हो पण या दोहोंपलीकडे गळवांचा by बॅटमॅन
मस्त लेख
वैचारीक जळजळ
फ्फा र आव्ड्ले
दुसर्यांच्या भानगडीत नाक
हा हा !
हा पण राहिला होता वाचायचा
हाहाहा!
छान लेख
य लेखाला चांगले म्हटले तर लोक
अनेक आजार आणि त्यांचे वैचारिक
वैचारिक दूषित ताप राहिलाच
काय मुद्देसूद मांडणी आहे
आजही