✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आई ....

ग — गणेशा, गुरुवार, 02/05/2015 - 16:04
तळ्याचे नीर दर्पण | विखुरले नभांकण | वाळलेले नक्षीपर्ण | तरंगीत || ढळलेली सांजसंध्या | निजलेले सूर्यपक्षी | स्वप्नफ़ुले जागलेली | सुगंधीत || धरणीची ग्लान झोप | तार्‍यांचे सूरेल गीत | उसवले श्वासधागे | अंतरात || छतावर रातवैरी | तेवलेला ह्रदयदीप | शब्दांध झाली आसवे | आठवात || -- शब्दमेघ

प्रतिक्रिया द्या
6538 वाचन

💬 प्रतिसाद (21)

अप्रतिम. आवडली कविता.

प्रचेतस
गुरुवार, 02/05/2015 - 16:09 नवीन
अप्रतिम. आवडली कविता.
  • Log in or register to post comments

__/\__/\__/\__

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/05/2015 - 16:18 नवीन
__/\__/\__/\__
  • Log in or register to post comments

प्रचंड आवडली _/\_

वेल्लाभट
गुरुवार, 02/05/2015 - 16:27 नवीन
प्रचंड आवडली _/\_
  • Log in or register to post comments

सुंदर.........व भावपूर्ण.

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 02/05/2015 - 18:52 नवीन
सुंदर.........व भावपूर्ण.
  • Log in or register to post comments

+१

सुचेता
Fri, 02/06/2015 - 13:13 नवीन
आवड्ली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

अशीच एक आठवण : बाहेर

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 02/05/2015 - 18:57 नवीन
अशीच एक आठवण : बाहेर काळाकूट्ट अंधार, आत घोंगडीवर मिणमिणत्या चिमणीसमोर आईच्या कुशीत, मिचमिच्या डोळ्यांनी पहाणार्‍या, रातकिड्यांचा कर्कश्य आवाजात घाबरगुंडी उडालेल्या लहानग्याच्या अंगावर आईचा हात पडल्यावर तो निवांतपणे झोपी जाणारच........
  • Log in or register to post comments

वा! क्या बात है, जयंतराव!

बहुगुणी
गुरुवार, 02/05/2015 - 19:04 नवीन
कविताही आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

धन्यवाद

गणेशा
गुरुवार, 02/05/2015 - 23:27 नवीन
आठवणीतल्या प्रत्येक गोष्टीला लावलेली विशेषणे सुरेख.. त्यामुळे फिल येतो आहे. बाकी वरील माझी कविता आई नसणार्‍या मुलाची कहाणी सांगते आहे. बाकी तुमच्या आठवणीस माझे काही आधीचेच अनुरुप शब्द देतो आहे नयनांची दोन पिल्ले आसूसले घरटे मायेच्या छप्पराला काळजाची झुंबरे पापण्यांच्या तोरणाला अबोल आसवांची घुंगरे हरवलेल्या ह्रदयतरंगावर सूर ओळखीचे हळवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

मस्त..

मुक्त विहारि
गुरुवार, 02/05/2015 - 18:59 नवीन
उत्तम...
  • Log in or register to post comments

अप्रतिम.

इन्दुसुता
गुरुवार, 02/05/2015 - 19:20 नवीन
अप्रतिम. आवडली कविता. असेच म्हणते.
  • Log in or register to post comments

काही कवितांना नाव/ शीर्षक

चुकलामाकला
Fri, 02/06/2015 - 07:34 नवीन
काही कवितांना नाव/ शीर्षक दिल्याने ती अधिकच अर्थगर्भ होते, अशी कविता!!!
  • Log in or register to post comments

मिपापर कविताओंके अच्छे दिन आ

पाषाणभेद
Fri, 02/06/2015 - 08:58 नवीन
मिपापर कविताओंके अच्छे दिन आ गये है!
  • Log in or register to post comments

सर्वांचे मनपुर्वक आभार

गणेशा
Fri, 02/06/2015 - 19:00 नवीन
सर्वांचे मनपुर्वक आभार
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

बोका-ए-आझम
Fri, 02/06/2015 - 19:59 नवीन
शब्दांध झाली आसवें - फारच सुंदर!
  • Log in or register to post comments

सुरेख शब्द रचना आवडली कविता

विभावरी
Fri, 02/06/2015 - 21:05 नवीन
सुरेख शब्द रचना आवडली कविता
  • Log in or register to post comments

आई...

ऊध्दव गावंडे
Fri, 02/06/2015 - 22:46 नवीन
आई...
  • Log in or register to post comments

अप्रतिम लिहिलीयेस रे गणेशा

किसन शिंदे
Fri, 02/06/2015 - 23:22 नवीन
अप्रतिम लिहिलीयेस रे गणेशा
  • Log in or register to post comments

सुरेख, अतिशय आवडली पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 02/08/2015 - 12:36 नवीन
सुरेख, अतिशय आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

छान

पद्मश्री चित्रे
Sun, 02/08/2015 - 13:21 नवीन
आवडली कविता
  • Log in or register to post comments

अर्थगर्भ..

नाखु
Mon, 02/09/2015 - 09:28 नवीन
शिवाय लय्बद्ध रचना आवडली कविता
  • Log in or register to post comments

आवडली कविता.

अजया
Mon, 02/09/2015 - 09:41 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा