अवघ्या १४ महिन्यांच्या अवधीत राजधानी दिल्ली पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. डिसेंबर २०१३ पासून ७ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या १४ महिन्यात दिल्लीकर तिसर्यांदा मतदान करणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजपला ३२, आआपला २८, काँग्रेसला ८, जदयुला १ व अपक्षांना १ अशा जागा मिळाल्या होत्या. कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी आघाडी करावीच लागणार होती. भाजप, आआप व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले होते. सलग १५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या शीला दिक्षितांना पराभूत करून केजरीवालांनी सामनावीराचा किताब पटकाविला होता, परंतु सामना जिंकण्यात त्यांना अपयश आले होते.
प्रचारात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध प्रचंड राळ उठविणार्या केजरीवालांनी निकाल लागल्यावर एकदम टोपी फिरविली. काही दिवस चर्चेचे नाटक करून व नंगर नागरिकांकडून एसेमेस मागविण्याची नौटंकी करून शेवटी चक्क काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आणि त्यानंतर लगेचच ४९ दिवसात राजीनामा देऊन मोकळेही झाले. त्या ४९ दिवसात जे झाले त्याचा सभ्य शब्दात "तमाशा" असाच उल्लेख करावा लागेल. आआप सरकारमधील मंत्र्यांने गाडीवर खेळणार्या मुलाचा फुटबॉल आदळल्यावर माझ्यावर दगडफेक झाली हा थेट आरोप करणे, अजून एका दुसर्या मंत्र्याने अधिकार नसताना व कोणतेही वॉरंट नसताना परदेशी नागरिकांच्या घरावर धाड घालणे, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रात्रभर फुटपाथवर धरणे धरून नागरिकांना वेठीस धरणे, राज्यपालांची परवानगी नसताना जनलोकपाल विधेयक मांडण्याचा हट्ट धरणे व त्या कारणावरून राजीनामा देणे ... हे व असे अनेक वादग्रस्त प्रकार त्या ४९ दिवसात घडले. शेवटी त्यांच्याच अट्टाहासामुळे दिल्लीला पुन्हा एकदा निवडणुक होत आहे.
दरम्यानच्या काळात यमुनेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व ७ मतदारसंघात भाजपचा विजय झाला. दस्तुरखुद्द केजरीवालांनी मोदींविरूद्ध निवडणुक लढण्यासाठी वाराणशीला जाउन उंटाच्या **चा मुका घ्यायचा प्रयत्न केला व त्यात साफ पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीच्या काळात आआपच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःला थोबाडीत मारून घ्यायचे व स्वतःवर शाई उडविण्याचे कार्यक्रम त्यांनी मॅनेज केले व स्वतःला सहानुभूती मिळविण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. त्यांच्या दुर्दैवाने हे सर्व प्रयत्न फसले.
परंतु फेब्रुवारी २०१५ मध्ये परिस्थिती बदललेली आहे. आआपचे काही मुख्य नेते आआप सोडून भाजपमध्ये गेले आहेत (शाझिया इल्मी, विनोद बिन्नी इ.). आआपचे एक संस्थापक असलेले शांतीभूषण यांनी केजरीवालांवरच टीका करून किरण बेदींचे कौतुक केले आहे. आआप तर्फे अजूनही केजरीवाल हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जगदीश मुखी असतील हे गृहीत धरून केजरीवालांनी त्यांना लक्ष्य करून प्रचाराला सुरूवात केली होती. नंतर भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सतीश उपाध्याय आहे अशी समजूत करून घेऊन त्यांनी सतीश उपाध्याय यांच्याविरूद्ध राळ उठवायला सुरूवात केली. नंतर भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच नाही व मोदी स्वतःच दिल्लीचे मुख्यमंत्री होणार अशा तर्हेने भाजप प्रचार करीत आहे असेही आआपने सांगायला सुरूवात केली. परंतु भाजपने अगदी आयत्या वेळी केजरीवालांच्याच सहकारी माजी पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना भाजपत आणून त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून ही लढत केजरीवाल विरूद्ध बेदी अशी कलाटणी देऊन टाकली.
बेदींना भाजपत आणून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करणे हा काही जणांच्या मते भाजपचा मास्टरस्ट्रोक आहे. खरे काय ते दिल्लीकरच ठरवतील. दिल्लीचे मतदार अत्यंत जागृत आहेत. त्यांनी निवडणुकीत भल्याभल्यांना हिसका दाखविलेला आहे. त्यामुळे नक्की काय निकाल लागेल हे सांगता येत नाही.
सध्या तरी आआपचे पारडे काही प्रमाणात जड आहे असे वाटते. भाजप व आआपमध्ये तुल्यबल लढत होऊन भाजपच्या तुलनेत आआपला अगदी थोड्या जागा जास्त मिळतील असा बर्याच मतदार सर्वेक्षणांचा अंदाज आहे. परंतु पुन्हा एकदा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असे वाटत नाही. या दोन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेस व इतर कोणतेही पक्ष मतदारांच्या खिजगणीतही नाहीत. दुर्दैवाने पुन्हा एकदा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर मागील वर्षीच्याच तमाशाची पुनरावृत्ती होईल. जर आआपला स्पष्ट बहुमत मिळाले तरी केजरीवालांसारख्या अत्यंत बेभरवशाच्या व विचित्र स्वभावाच्या व्यक्तीमुळे ते सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही.
वाचने
150353
प्रतिक्रिया
452
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे सगळे मुद्दे पटणेबल आहेत.
In reply to दिल्ली विधानसभा निवडणुक - एका कट्टर आआप विरोधकाच्या भूमिकेतून by क्लिंटन
moronism (मराठी शब्द?) = वाय. झेड.
In reply to दिल्ली विधानसभा निवडणुक - एका कट्टर आआप विरोधकाच्या भूमिकेतून by क्लिंटन
मला तरी असे स्पष्ट वाटते की
या निवडणुकीत आप जिंकूदे.
आपवाले माजावेत अशी ईच्छा आहे
In reply to या निवडणुकीत आप जिंकूदे. by बॅटमॅन
+१
In reply to या निवडणुकीत आप जिंकूदे. by बॅटमॅन
आग केलिए पानी का डर बना
In reply to या निवडणुकीत आप जिंकूदे. by बॅटमॅन
या निवडणुकीत आप जिंकूदे.
In reply to या निवडणुकीत आप जिंकूदे. by बॅटमॅन
माजलेत म्हणजे नक्की काय?
In reply to या निवडणुकीत आप जिंकूदे. by आनन्दिता
१९७० च्या दशकातील इंदिरा
In reply to माजलेत म्हणजे नक्की काय? by क्लिंटन
मुळात माज किंवा (अहंमन्यता
In reply to १९७० च्या दशकातील इंदिरा by आनन्दिता
+१
In reply to मुळात माज किंवा (अहंमन्यता by क्लिंटन
माझ्यासाठी राष्ट्रवाद आणि
In reply to मुळात माज किंवा (अहंमन्यता by क्लिंटन
बर्याच अंशी सहमत
In reply to माझ्यासाठी राष्ट्रवाद आणि by आनन्दिता
एक अवांतर
In reply to मुळात माज किंवा (अहंमन्यता by क्लिंटन
सीएसडीएस सर्वे आलाय का? तो
आआपचा जन्म
केजरीवालांनी जनलोकपालसाठी
In reply to आआपचा जन्म by ग्रेटथिंकर
दिल्लीत कोणी मिपाचे सदस्य
@श्रीगुरूजी,टॉपगिअर्ड
.
In reply to @श्रीगुरूजी,टॉपगिअर्ड by ग्रेटथिंकर
तक्रार
In reply to . by hitesh
काल एका वाहिनीवर केजरीवालांची
आजच आपचा जाहीरनामा जाहीर झाला
In reply to काल एका वाहिनीवर केजरीवालांची by श्रीगुरुजी
:)
In reply to आजच आपचा जाहीरनामा जाहीर झाला by सव्यसाची
दिल्ली विधानसभेचे वार्षिक
In reply to :) by क्लिंटन
दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा
In reply to :) by क्लिंटन
काही नवीन सर्वेक्षणानुसार
सर्व्हे
In reply to काही नवीन सर्वेक्षणानुसार by श्रीगुरुजी
कालच एबीपी न्यूज-नेल्सन
In reply to सर्व्हे by क्लिंटन
दिल्ली इलेक्शन भाजपाला टफ जात
In reply to कालच एबीपी न्यूज-नेल्सन by श्रीगुरुजी
http://m.ndtv.com/india-news
In reply to दिल्ली इलेक्शन भाजपाला टफ जात by ग्रेटथिंकर
>>> दिल्ली इलेक्शन भाजपाला टफ
In reply to दिल्ली इलेक्शन भाजपाला टफ जात by ग्रेटथिंकर
:)
In reply to >>> दिल्ली इलेक्शन भाजपाला टफ by श्रीगुरुजी
आज बर्याच वृत्तसंस्थांनी
In reply to कालच एबीपी न्यूज-नेल्सन by श्रीगुरुजी
आज अजून ४-५ नवीन सर्वेक्षणाचे
In reply to आज बर्याच वृत्तसंस्थांनी by श्रीगुरुजी
समजत नाही
In reply to आज अजून ४-५ नवीन सर्वेक्षणाचे by श्रीगुरुजी
त्रिशंकु
In reply to समजत नाही by क्लिंटन
आज सकाळी १२ वाजता एक नवीन
In reply to समजत नाही by क्लिंटन
चाचण्यांवरचा विश्वास उडाला
In reply to आज सकाळी १२ वाजता एक नवीन by श्रीगुरुजी
कालच्या सर्वेक्षणात आआपला ४४
In reply to चाचण्यांवरचा विश्वास उडाला by क्लिंटन
रॅन्डम नंबर जनरेटर?
In reply to कालच्या सर्वेक्षणात आआपला ४४ by श्रीगुरुजी
TheUnrealTimes ची लिंक देऊन
In reply to आज सकाळी १२ वाजता एक नवीन by श्रीगुरुजी
अहो, "अनरिअल टाइम्स"ची लिंक
In reply to TheUnrealTimes ची लिंक देऊन by नांदेडीअन
भाजपने किती पैसा ओतला असेल...
In reply to समजत नाही by क्लिंटन
जनमत चाचण्यांविषयी
In reply to कालच एबीपी न्यूज-नेल्सन by श्रीगुरुजी
धन्यवाद सर. भूतकाळात काय झाले
In reply to जनमत चाचण्यांविषयी by क्लिंटन
धन्यवाद
In reply to धन्यवाद सर. भूतकाळात काय झाले by सव्यसाची
आप सोडुन कुणिही
In reply to धन्यवाद by क्लिंटन
+१
In reply to आप सोडुन कुणिही by भुमन्यु
+१
In reply to +१ by क्लिंटन
क्लिंटन,
In reply to जनमत चाचण्यांविषयी by क्लिंटन
आता आआप येणार हे जवळपास
In reply to क्लिंटन, by श्रीगुरुजी
प्रतिसाद प्रसिद्ध करायच्या
In reply to आता आआप येणार हे जवळपास by ग्रेटथिंकर
अत्यंत चुरशीच्या निवडणुका
In reply to जनमत चाचण्यांविषयी by क्लिंटन
एक अतिशय जास्त अवांतर प्रश्ण!
हा कायदा संसदेमध्ये संमत
In reply to एक अतिशय जास्त अवांतर प्रश्ण! by कॅप्टन जॅक स्पॅरो
मी दिल्लीतल्या सर्वात मोठी
आआपचा खरा चेहरा दिल्लीतील
In reply to मी दिल्लीतल्या सर्वात मोठी by विवेकपटाईत
उत्तम प्रतिसाद! परंतु हा
In reply to मी दिल्लीतल्या सर्वात मोठी by विवेकपटाईत
व्यक्त केलेले मत लोकांचे आहेत
In reply to उत्तम प्रतिसाद! परंतु हा by श्रीगुरुजी
भक्तांचे डोळे
In reply to उत्तम प्रतिसाद! परंतु हा by श्रीगुरुजी
तुमच्या प्रतिक्रियेचा एकूण
In reply to मी दिल्लीतल्या सर्वात मोठी by विवेकपटाईत
एकंदर काय तर बहुसंख्य जनता ही
In reply to तुमच्या प्रतिक्रियेचा एकूण by संपत
जर सगळेच भ्रष्ट असतील, तर
In reply to एकंदर काय तर बहुसंख्य जनता ही by अस्वस्थामा
हा हा हा..
In reply to जर सगळेच भ्रष्ट असतील, तर by असंका
उत्तम निरिक्षणे
In reply to मी दिल्लीतल्या सर्वात मोठी by विवेकपटाईत
अवांतर
In reply to मी दिल्लीतल्या सर्वात मोठी by विवेकपटाईत
कालपासून मी एकटाच इथे ‘उत्तरं
मेकिंग व्हर्चू ऑफ नेसेसिटी
In reply to कालपासून मी एकटाच इथे ‘उत्तरं by नांदेडीअन