Skip to main content

डेथ ऐप्लिकेशन

लेखक म्हया बिलंदर यांनी रविवार, 01/02/2015 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
सर - ह्यालो मी - हं सर बोलाना ? सर - आरं आईक की. . मी - हं सर - त्यो आपला ह्यो हाय का.. गणू ? मी - म्हणजे डॉ. गणेश ना? त्याचं काय? सर - हा त्योच, त्याचा बा म्येलाय तर त्यो गेलाय सुट्टीवर मी - अरेरे. . वाईट झालं. सर - तर त्याला लिहायचय डेथ ऐप्लिकेशन. मी - सर, लीव ऐप्लिकेशन सर - त्येच, मी सुरुवात करून दिलीये फुडच्या दोन ओळी जरा सांगचिल का ? मी - हो सर, काय लिहिलंत? सर - Dear Sir, आता सांग. मी - Dear Sir, I am sorry to inform… सर - Sorry? Sorry कशाला? बा मेलाय ही काय चूक हाय का? मी - सर इथे Sorry म्हणजे 'खेद' या अर्थाने आहे. सर - मग खेद ला अजून दुसरं काय हाय का? मी - बरं मग Dear Sir, I regret to inform you about.. सर - हां (MS Word मध्ये समानार्थी शब्द शोधीत)regret कसं मोठ्ठ वाटतंय, बरं फुडं? मी - Dear Sir, I regret to inform you about the sad demise of my father… सर - काय डीमाईस??(पुन्न्हा MS Word) कसलं स्याड? पार नातुंड-पर्तुंड बघून म्येलाय म्हतारा, बरं फुडं hence grant me leave of ten days आसं लितो, पार सातवं करूनंच ये म्हणतो ब्येन्याला. ल्येका बा मारायचा ह्यांनी आणि डेथ ऐप्लिकेशन लिहायचं आम्मी? मी - सर, लीव ऐप्लिकेशन.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3366
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

झ्याक ! कोंची कंपनी म्हनावी तुम्ची ? :)

मिसळपाववर स्वागत ! आणिक जरा पैस लेखन युंदे

मिपावर स्वागत.

भारी

छान