✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आकाशी झेप घे रे पाखरा

ज
जागु यांनी
Sat, 01/31/2015 - 11:01  ·  लेख
लेख
बरेच दिवस ऐकून होते उरणच्या पाणजे येथील खाडीत फ्लेमिंगो पक्षी आले आहेत. आज जाऊ उद्या जाऊ करत एक रविवारी वेळ काढलाच आणि कौटुंबीक मित्रपरीवारासह गेलोच हे पक्षी पहायला. ही खाडी माशांसाठी खास करून कोलीम (माझ्या माशांच्या मालिकेत हा प्रकार आहे) ह्या प्रकारासाठी प्रसिद्ध आहे. खाडीपर्यंत पोहोचलो तेंव्हा फ्लेमिंगोचे नामोनिशान नव्हते. सुरुवातीला छोटे काळे पक्षी दिसू लागले. सुर्यप्रकाशामुळे त्यांचे मुखदर्शन न झाल्याने नक्की कुठल्या जातीचे आहेत ते कळत नव्हते. १) पुढे रस्त्याच्या जवळच पाण्यात हा सुंदर पक्षी होता. २) अजुन पुढे ह्या पक्षाची कसरत भक्ष पकडताना. ३) पाणी भरल्या खाडीत फ्लेमिंगोची आशा धरून आलेलो आम्ही थोडेसे निराश होऊन इकडे तिकडे पाहतो तो पाणी नसलेल्या एका खाडीच्या पट्यात पांढरे थर्माकोलचे जाळे लावतात त्याप्रमाणे काहीतरी लांबून दिसले. जरा जवळ गेलो तेंव्हा मात्र त्या थर्माकोल ढोकळ्यांच्या भासाची जागा फ्लेमिंगोच्या उंची आकृतीमध्ये साकार होत गेली. मी कॅमेरा काढला आणि जवळ जाऊ लागले. आपली चाहूल लागताच हे उडतील म्हणून आधी लांबून फोटो काढून घेतले. ४) ५) आता ह्या पक्ष्यांच्या क्लोजअपच्या आशेने मी हळू हळू पुढे जाऊ लागले. पक्षी माझ्या भितीने उडू नयेत म्हणून मी दबक्या पावलांनी चालत होते खरी पण एकीचे बळ करून हे माझ्यावर हल्ला तर नाहीना करणार ही भिती पण मनामध्ये डोकावत होती. तसे दृश्यही माझ्या डोळ्यासमोर येऊ लागले. :हाहा: जव्ळ जाऊन पाहते तर ते फ्लेमिंगो नसून अजून वेगळेच पक्षी होते पण तितकेच सुंदर होते. मित्रपरीवाराकडून त्याचे चित्रबलाक हे नाव समजले. ६) आम्ही २-३ जणच पुढे गेलो. पण आमची चाहूल लागताच पहिले दोन पक्षी १-२-३ च्या ठेक्यावर उठले. आणि वर उडाले तेंव्हा भित्यापाठचा ब्रह्मराक्षस म्हणू लागला आलेच तुझ्या डोक्यावर आता हे टोचायला. पण बहुतेक त्यांना माझे फोटो काढणे पसंत नव्हते म्हणून कंटाळून दुसरीकडे निघून गेले. त्यापाठोपाठ ८-१० चा ग्रुप करत सगळे पक्षी दुसर्‍या ठिकाणी निघून गेले. त्यांचे उडते रुप अतिशय मनमोहक होते. हे उडणे पाहताना आकाशी झेप घे रे पाखरा, पाखरा जा दूर देशी अशी गाणी आठवत होती. ७) ८) ९) १०) ह्या पक्षांना जवळून निरखायचे राहीले म्हणून पुन्हा आम्ही ह्यांची शोधमोहिम सुरु केली. आमच्या परतीच्याच भावावर एका पाणथळीवर हे जाऊन बसले होते. आता मात्र एकदम सावध गतीने आम्ही जवळ गेलो. हे काय पिच्छा सोडणार नाहीत अशा आविर्भावाने आता मात्र त्यांनी जागा सोडली नव्हती किंवा एका भेटीतच आमची मैत्री झाली होती. पण नंतर जवळ गेल्यावर कळाले की एका ठराविक अंतरावरुन आम्ही त्यांना पाहू शकत होतो, पुढे पुर्ण पाणी होते व त्या पाणथळ जागेनंतरच्या कोरड्या भागात ते उभे होते. अगदी तळ्यात मळ्यात खेळतात तसे मला वाटू लागले. ११) १२) १३) १४)  १५) कोरड्या खाडीतील त्यांच्या पाउलखुणा व पिसे. १६) १७) १८) खाडीभेटीतील हे सुंदर झुडूप. १९) २०) २१) समुद्रभाजी डायला. ही चवीला खारट असते. मिठ टाकायची गरज नसते. माझ्या लेखनात सापडेल. २२) दुर्व्याला आलेली फुले प्रथमच पाहीली.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2465 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

फटु आवडले!!

जुइ
Sun, 02/01/2015 - 00:12 नवीन
फटु आवडले!!
  • Log in or register to post comments

मस्त फोटो...

मुक्त विहारि
Sun, 02/01/2015 - 02:42 नवीन
तुमच्या पा.क्रु. जितक्या चविष्ट तितकेच सुंदर फोटो. (देव कुणा कुणाला भरभरून कला देतो, तर कुणाला अजिबातच काही नाही....असे सुंदर फोटो काढता येत नाहीत म्ह्णून ....(निराश) मुवि...)
  • Log in or register to post comments

मस्त आले आहेत सगळे फोटो..

शिद
Sun, 02/01/2015 - 08:12 नवीन
मस्त आले आहेत सगळे फोटो...विशेषतः ६वा व ७वा.
  • Log in or register to post comments

जुई, शिद धन्यवाद.

जागु
Mon, 02/02/2015 - 14:23 नवीन
जुई, शिद धन्यवाद. मुक्त अहो प्रत्येका कडे असते काही ना काही कला. त्या कलेला थोडे आपल्याकडून पॉलिश करायला लागत.
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो ...

mayurpankhie
Sun, 02/08/2015 - 11:06 नवीन
मला १२ वा फोटो जास्त आवडला, आणि दुर्वाना फुलं येता हे माहित नव्हतं....
  • Log in or register to post comments

०७ व १२ मस्तच....

मॅक
Mon, 02/16/2015 - 13:19 नवीन
०७ व १२ मस्तच....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा