Skip to main content

पिक्चरगाथा ('टॉरेंटगाथा'वरून प्रेरित)

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 30/01/2015 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
संकेतानंदांच्या या कवितेवरून प्रेरणा घेत माझाही एक दुबळा प्रयत्न सरसर सरसर नेट वरूनी डाउनलोडला पिक्चर मी इंटरनेटी बँडविड्थ चा यथेच्च केला वापर मी लॅपटॉप मांडीवर ठेवून घरीच केले थेटर मी डोळे फाडून बघत बैसलो वेडा एक निशाचर मी पेनड्राईव्हे देणे घेणे करण्यामध्ये तत्पर मी नवे सिनेमे आणिक सीझन जाणून घेण्या ईगर मी हर वीकांती शुक्र शनीला बघावा नवा पिक्चर मी असे घरगुती मनोरंजनाचे हे केले फीचर मी सरसर सरसर नेट वरूनी डाउनलोडला पिक्चर मी इंटरनेटी बँडविड्थ चा यथेच्च केला वापर मी -अपूर्व ओक डिस्क्लेमरः कवितेत व्यक्त झालेले शब्द, भाव व अर्थ काल्पनिक असून कवीच्या मानसिकतेशी, विचारांशी किंवा आचारांशी त्याचा एक बाईटभरही संबंध नाही.
लेखनविषय:

वाचने 1240
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

आमी ब्वा पायरेटेड डीव्हीड्या आणतो. का म्हणता? सिनेमा तयार करताना सगळा काळा पैसाच तर वापरलेला अस्तो! ;)