Skip to main content

लायनीतले अब्जाधीश

लेखक कोंबडी प्रेमी यांनी बुधवार, 28/01/2015 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
लायनीतले अब्जाधीश ह्या रांगेतील प्रत्येकाचे कर्तृत्व वादातीत आहे ...आपल्या पैकी कित्येकांची रोजी रोटी ह्या लोकांच्या उद्योगांशी निगडीत असेल ..सगळे सगळे मान्य पण .....१०० वर्षांनी ह्या फोटोचे ऐतिहासिक वर्णन काय असेल ? अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आले असतांना त्यांच्या भेटीसाठी आतुरतेने रांगेत वाट पाहणारे तत्कालीन भारतीय अब्जाधीश ... ओबामांच्या भेटीसाठी रांगेतील उभ्या भारतातील अब्जाधीशांना बघून धक्का बसलाय ...साक्षात मुकेश अंबानी सुद्धा 'एका पायावर' ? एखाद्या खंडप्राय देशतील बहुतांश औद्योगिक साम्राज्याचे मालक असलेले ...असे हात बांधून रांगेत ?? त्याचे फोटो सार्वजनिक होताहेत आणि कुणाला त्याचे काही नाही ? नं त्या रांगेतल्या लोकांन्ना नं आजूबाजूच्या सरकारी अधिकाऱ्यांना ... नशीब आमच्या सैन्याधीकार्यांना असे रांगेत एका मागे एक उभे केले नाही .... हि नम्रता / शिस्तप्रियता कि धंद्यातील पैसा/नफा याच्या साठी कडेला ठेवलेली अस्मिता / आब ? असो कवी ग्रेस म्हणतात त्याप्रमाणे "हे जग आपले नाही"

वाचने 30587
प्रतिक्रिया 157

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

गुर्जी दुसर्या भागाच उत्तर न देता पहिल्या भागातच चर्चा घोळवणार अस वाटलं होतच. पण मी काय म्हणतो गुर्जी बाकी चर्चा आपण करूच पण हमीद अन्सारी यांच्या देशभक्ती बद्दल तुमच मत काय आहे हे लगेहात सांगून टाकाच

अन्सारींवर शंका घेणाऱ्या तमाम देशभक्तांना एक छोटासा प्रश्न. अन्सारींना सभागृहाचे कामकाज हाताळताना यातल्या एकाने तरी पाहिले आहे का? तसे जर असते तर हा माणूस राजनीतिक प्रथा, सांसदीय नियम आणि प्रोटोकॉल चा किती पक्का आहे हे निश्चित माहित असते. सरकारचे व संसदेचे कामकाज कसे चालते ह्याचे अन्सारींना जेवढे ज्ञान आहे त्याच्या ०.०००१ टक्का तरी ह्या तथाकथित देशभक्तांना असेल काय? तुनळी वर संसदेचे कामकाज मिळत असेल तर पाहून घ्या. मग करा त्यांच्या आणि आपल्या देशभक्तीच्या तुलना.

In reply to by संदीप डांगे

त्या अन्सारींबद्दल एक किस्सा वाचलेला फेबुवर. मध्ये एकदा तुर्की देशात भारताचे एक प्यानेल गेले होते त्यात हे अन्सारी साहेबही होते. 'अन्सारी' आडनावाचा अर्थ इस्लाम संस्थापक मुहम्मद यांना अडचणीच्या वेळी आश्रय देणारे असा होतो. तुर्कीमध्ये त्या खानदानाचे जुने घर आहे. भारतीय शिष्टमंडळ तुर्कीत पोचल्यावर नमस्कारचमत्कार झाले आणि तुर्कीतले काही लोक आले की तुमच्या खानदानाचे मूळ घर बघायला चला म्हणून. अन्सारी लगेच हो म्हणाले नाहीत, उद्या सांगतो म्हणाले. भारतीय शिष्टमंडळातले लोक म्हणाले अहो इतकी जुनी परंपरा आहे तर जाऊन तरी या, काय फरक पडतो. अन्सारी म्हणाले की मी इथे भारताचा पोलिटिकल प्रतिनिधी म्हणून आलोय, अन्सारी खानदानाचा वंशज म्हणून नाही. परत दुसर्‍या दिवशी तुर्कीचे लोक आले. त्यांनी व इंड्यन शिष्टमंडळाने अन्सारींना परत गळ घातली तेव्हा कुठे ते जायला तयार झाले. असा हा कर्तव्यतत्पर माणूस असूनही त्याच्या देशभक्तीबद्दल शंका घेतली जातेय हे केवळ दुर्दैव.

In reply to by बॅटमॅन

जो माणुस मुरब्बी आयऍफ़एस असतो तो असाच असतो! हामीद अन्सारीं चा किस्सा सुपर्ब!! आवडला!! ज्ञानेश्वर मुळे जेव्हा मालदीव्स मधे भारतीय उच्चायुक्त होते तेव्हा त्यांचे अधिकारीक निवासस्थान अन मालदीव्स च्या अध्यक्षा चं हापिस/घर २०० मीटर च्या अंतरा वर होते! तरीही जेव्हा कधी वैयक्तिक किंवा सरकारी कामानिमित्त मुळे ह्याना अध्यक्षा ला भेटायचे असले किंवा त्यांचे आवतन आले असले तरीही ते कधीच प्यांटी च्या खिशात हात घालून गेले नाही! बाकायदा प्रोटोकॉल नुसार गेराज मधुन काळी मर्क काढून त्याच्या पुढे फ्लैग मास्ट वर भारताचे निशाण लावुन सोबत मायन्युट्स घ्यायला सेक्रेटरी , दुभाषा इत्यादी सोबत घेऊन जात असत! आता हयात दोन मते येऊ शकतात १. त्यांच्या प्रोफेशनलिझम चं कौतिक २. त्यांच्या प्रोटोकॉल कड़क पाळण्य़ा वर टिका (जनतेच्या कराचा अपव्यय करतात, इतके काही करायची गरज नाही वगैरे) व्यक्तिशः मला ते पटते! कारण मर्क मधे फ़िरणारे तिथे मुळे हे व्यक्ति नंतर पण जगातल्या एक महाप्रचंड देश, अर्थव्यवस्था, सरकार अन त्या उप्पर १२१ कोटी भारतीय लोकांचे प्रतिनिधी असतात! अर्थात हे माझे व्यक्तिगत मत झाले! इतरांच्या मताचा पण आदर!! _/\_ (व्होलटेरीश) बाप्या! :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

हे व्यक्ति नंतर पण जगातल्या एक महाप्रचंड देश, अर्थव्यवस्था, सरकार अन त्या उप्पर १२१ कोटी भारतीय लोकांचे प्रतिनिधी असतात! नेते आणि प्रतिनिधी यांची देशातली आणि परदेशातली दृश्य वागणूक देशाची प्रतिमा नागरिकांच्या मनात बिंबविते आणि परदेशात देशाची लायकी ठरवते.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अर्थात हे माझे व्यक्तिगत मत झाले! इतरांच्या मताचा पण आदर!! _/\_
एकच नंबर बघा. काहीवेळेस मात्र आम्ही इतरांच्या मत असण्याच्या अधिकाराचा तेवढा आदर करतो. ;) (सेमीव्होल्टेरिश ;) ) बट्टमण्ण.

In reply to by बॅटमॅन

माझ्यापुरता तरी हा प्रश्न देशभक्तीचा नाही तर देशातल्या दोन क्रमांकाइतक्या उच्च पदावरच्या व्यक्तीने दाखवलेल्या नेतृत्वगुणाचा आहे. देशभक्ती आणि धर्म हे इथे (दोन्ही बाजूंकडून) एनकेनप्रकारेन आपली बाजू पक्की करायला ओढूनताणून मधे आणलेले मुद्दे आहेत.

१. फोटोतील सर्व उद्योगपती हे जंटलमन आहेत. ते स्वतःहूनच रांगेत उभे राहीले असतील. त्यांनी काय एकमेकाला ढकला ढकली करत जायचे होते की काय? आजकाल कुणी कसलाही फोटो काढतो आणि त्याच्याशी कसलाही बादरायण संबंध जोडायची फॅशनच आली आहे. आजच्या मेडीयाला चघळायला असेच काही तरी लागते. २. उपराष्ट्रपतींबद्दलही निष्कारण धुरळा उडवला जात आहे. झैलसिंग राष्ट्रपती असताना ते एकदा अनवधानाने राष्ट्रगीत चालू झाल्यावर बसून राहीले होते. इंदिरा गांधींनी खुणावल्यानंतर ते उभे राहीले. दुस-या दिवशी पेपरमधे बातमी होती. पण त्यानंतर कुणी एव्ह्ढी राळ उडवली नव्ह्ती.

In reply to by बबन ताम्बे

इंदिरा गांधींनी सांगितल्याशिवाय काही करायचे नाही अशी त्यांना सक्त ताकीद होती असे ऐकून आहे, त्यामुळे असे झाले असेल :) रबर स्टँप म्हणून त्यांच्या इतकी प्रसिद्धी आणि व्यंगचित्रे दुसर्‍या कोणत्या राष्ट्रपतींची पाहिली नाहीत.

In reply to by खटपट्या

आणि "मॅडमनी मला राष्ट्रपती केले. पण त्यांनी झाडू मारायला सांगितला असता तरी मी ते केले असते." असे म्हणणारे आद्य पार्टी वर्कर अशीही त्यांची ओळख आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हो, हे खरे आहे की ते रबर स्टँप होते. पण इंदिरा गांधी गेल्यानंतर शेवटी जाताना राजीव गांधींना त्यांनी नाकी नउ आणले होते असे वाचल्याचे आठवते. बहुतेक पोस्ट खात्यासंबंधीच्या बिलावर त्यांनी सही करण्यास नकार दिला होता. ते बिल काय होते ते आता आठवत नाही.

John Kerry (अमेरिकेचे सद्याचे परराष्ट्र मंत्री, पूर्व सिनेटर आणि पूर्व अध्यक्षिय उमेदवार) fined $50 for failing to shovel snow अशी लोकशाही भारतात कधी येईल ? अगदी निवडणूकीत (जिंकलेल्या तर सोडाच पण) पडलेल्या कॉर्पोरेटरला निर्भयपणे त्याच्या चुकीबद्दल जाब विचाराणे हे फार मोठे धाडस आहे असे (सर्वसामान्य नागरिकांना तर सोडाच पण) पोलीसांना वाटायचे केव्हा बंद होईल ? नॉर्वेतला माझा एक अनुभव : हॉटेलशेजारी असलेल्या एका रेस्तराँच्या नावावरून तिथे चमचमीत खायला मिळेल म्हणून गेलो. चमचमीत जेवण मिळाले नाही पण खर्‍या लोकशाहीत काय घडते याची चमक मात्र जरूर दिसली. त्या रेस्तराँचा मालक पाकिस्तानातून नॉर्वेत स्थलांतरीत झालेला आहे. गप्पा मारताना तो सहजपणे म्हणून गेला, "इथे घाम गाळावा लागतो. महागाई आहे. कर फार आहेत. पण एक मात्र त्या सगळ्यात भारी आहे." ते त्याच्याच शब्दांत, "इधर एम पी (मेंबर ऑफ पार्लमेंट) ने काम नही किया तो उसकी कॉलर पकडके पूछ सकते है ।"