मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाऊस आठवणींचा…

शब्दबम्बाळ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आज अचानक पाऊस आला, सगळ्यांनाच भिजवून गेला… एवढी कसली घाई होती बाबा, हिवाळ्यातच पडून गेलास… बरं येताना तू एकटा कधी येत नाहीस, सोबत तिच्या आठवणीही घेऊन येतोस… तू आपला पडून जातोस, आणि मला मात्र कासाविस करतोस… घरातच बसून मी बाहेर तुला पडताना पहात राहतो, तुझ्या पडणाऱ्या प्रत्येक थेंबात मला तिचाच चेहरा दिसत राहतो… कधीतरी कडाडणाऱ्या विजेसोबत मी नक्षी आठवणींची विणत राहतो, अश्याच कुठल्यातरी जुन्या पावसात मग मी देखील हरवून जातो… तेव्हा देखील तू असाच यायचास कोणालाही न सांगता, मग मी ही निघायचो तिच्याकडे कुठेही न थांबता… मग आम्ही दोघंही भिजत राहायचो तू थांबेपर्यंत, अरे! पहिल्या पावसात भिजायचा काय तो आनंद! पण आता मात्र मी भिजत नाही दुरूनच पाहतो तुला, मन मात्र भिजत राहत करून आठवणींचा झुला… ती ही अशीच कुठेतरी पहात असेल ना रे तुला? सांग मलाही कधीतरी माझी आठवण येते का रे तिला? -आशिष

वाचने 1468 वाचनखूण प्रतिक्रिया 4

प्रचेतस गुरुवार, 01/29/2015 - 20:13
कविता आवडली. पण हिवाळ्यात पडणाऱ्या पावसाला रेंगाळलेला / रेंगाळणारा पाऊस असे म्हणतात. लवकर आलेला नाही.