✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

समाधी

अ — अत्रुप्त आत्मा, Wed, 05/29/2013 - 02:01
वेगळी धुंदी इथे अन् वेगळा हा बाज आहे. वेगळे हे विश्व आणी वेगळा हा साज आहे. शांत सारे हे स्वयंभू शांत इथला नाद आहे. शांतिचे संगीत म्हणूनी कोकिळाही शांत आहे. बंद होती येथ वाटा बंदिचे संगीत आहे. आज बंदी पाहिली मी मुक्त येथे गात आहे. बंदिचेही शब्द ऐसे मानसीचा साज आहे. सुप्तता अन् शांततेचा मूळचा आवाज आहे. बोलण्यासी आतुरे तो खोल आतलाच आहे. आज या ही..कारणाने मुक्त तो ही होत आहे. शांती आणी मोक्ष सारा येथ तो मिळणार आहे. सत्य शामल नम्रतेने मी इथे झुकणार आहे. आज काहि मागणे ना मुक्तिही मोक्षात आहे. मुक्तिच्या विहरात येथे समाधिही स्तब्ध आहे... https://lh5.googleusercontent.com/-YW5tgPygb-w/UOmud9zCBPI/AAAAAAAAV_k/Bbu7ugYjEWg/w808-h539-no/IMG_3713.JPG

प्रतिक्रिया द्या
9495 वाचन

💬 प्रतिसाद (37)

मी जागी आहे ना? की स्वप्न आहे

स्पंदना
Wed, 05/29/2013 - 06:38 नवीन
मी जागी आहे ना? की स्वप्न आहे हे? आत्मुस? किती सुरेख लिहुन गेलात भाउ? (भुताला भाऊ म्हंटल तर चालेल का हा प्रश्न आहेच मनी, पण राहु द्या.) कविता शेवटी शेवटी मनाच्या गाभार्‍यात घुमु लागते. सुरेख!!
  • Log in or register to post comments

मी जागी आहे ना? की स्वप्न आहे

किसन शिंदे
Wed, 05/29/2013 - 07:27 नवीन
मी जागी आहे ना? की स्वप्न आहे हे? आत्मुस? किती सुरेख लिहुन गेलात भाउ?
त्यांच्याकडे आहे हो असं उत्तमोत्तम लिहायची ताकद, पण त्या अगोबा ढगोबाच्या नादानं विडंबनं करण्यात वेळ वाया घालवतात.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

अवांतराशी सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/29/2013 - 07:31 नवीन
>>>> त्यांच्याकडे आहे हो असं उत्तमोत्तम लिहायची ताकद, पण 'पण' शी सहमत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

छान

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/29/2013 - 07:23 नवीन
आवडली कविता. असं उत्तमोत्तम येऊ द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

उत्कृष्ट कविता.

प्रचेतस
Wed, 05/29/2013 - 08:35 नवीन
उत्कृष्ट कविता. तुमची समाधिस्थ अवस्था बेडश्याच्या चैत्यगृहात पाहिलेलीच होती. कितीतरी दिवस त्यावर काहीतरी लेखन येईल याची वाट पाहातच होतो.
  • Log in or register to post comments

आवडली

सुधीर
Wed, 05/29/2013 - 09:08 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
Wed, 05/29/2013 - 09:10 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

अप्रतिम

चित्रगुप्त
Wed, 05/29/2013 - 09:15 नवीन
अप्रतिम. अगदी वेगळ्या बाजाची कविता.
  • Log in or register to post comments

सुंदर.

प्रभाकर पेठकर
Wed, 05/29/2013 - 10:27 नवीन
कविता सुंदरच आहे. पण, त्याहून गूढ, शांत, सुंदर चित्र कवितेच्या प्रारंभीच टाकलं असतं तर मनाची एक विशिष्ट तयारी होऊन कविता जास्त चांगल्याप्रकारे समजली असती.
  • Log in or register to post comments

+१

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 05/29/2013 - 10:33 नवीन
मस्त मस्त मस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

अप्रतिम कविता.

प्यारे१
Wed, 05/29/2013 - 13:08 नवीन
अप्रतिम कविता. शत शत वंदन गुरुजी. अवांतरः परवाच्या बुद्ध पौर्णिमेला अधिक औचित्यपूर्ण झाली असती का असं वाटतंय. अतिअवांतरः स्मायल्या सोडून आत्मुस किती छान लिहू शकतो नाही? (इथे डोळा मारल्याची स्मायली कल्पावी) ;)
  • Log in or register to post comments

@तरः परवाच्या बुद्ध

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/29/2013 - 13:54 नवीन
@तरः परवाच्या बुद्ध पौर्णिमेला अधिक औचित्यपूर्ण झाली असती का असं वाटतंय.>>> आमचा बुद्ध पौर्णिमेत अडकलेला नाही!!! ...असो. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

सुंदर !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 05/29/2013 - 15:49 नवीन
वरची कविता खूप आवडलीच... आमचा बुद्ध पौर्णिमेत अडकलेला नाही!!! आणि ही एकोळी तर क्या कहने !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

>>>आमचा बुद्ध पौर्णिमेत

प्यारे१
Wed, 05/29/2013 - 16:38 नवीन
>>>आमचा बुद्ध पौर्णिमेत अडकलेला नाही!!! ...असो. 'माझा ' मोड : माझा प्रतिसाद मन लावून वाचत जा. लगेच्च प्रतिसाद द्यायची घाई करत जाऊ नका. मी तुम्हाला काय म्हणतोय हे समजत नाहीये का? ;) : माझा मोड संपला. तुम्ही म्हणताय ते मान्यच आहे. महापुरुषां च्या विचारांच्या स्मरणासाठी एका स्पेशल दिवसाची गरज नि मर्यादा देखील असू नये. पण अगदी परवाच बुद्ध पौर्णिमा झाली, मिपाच्या मुखपृष्ठावर तथागत गौतमाचं चित्र देखील लावलेलं होतं त्या अनुषंगानं ही कविता त्या दिवशी 'अधिक' औचित्यपूर्ण दिसली असती नि अधिक खुलून दिसली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@त्या अनुषंगानं ही कविता त्या

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/29/2013 - 17:02 नवीन
@त्या अनुषंगानं ही कविता त्या दिवशी 'अधिक' औचित्यपूर्ण दिसली असती नि अधिक खुलून दिसली असती.>>> अस्सं होय! पण आमची कविता झाली काल! आमचंही वाक्य ''या'' अनुषंगानी आहे,तसं त्ये वाचा! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

______/\_________ मस्त..

पक पक पक
Wed, 05/29/2013 - 13:11 नवीन
______/\_________ मस्त.. :)
  • Log in or register to post comments

सुरेखच

दिपक.कुवेत
Wed, 05/29/2013 - 15:00 नवीन
शांत सारे हे स्वयंभू शांत इथला नाद आहे. शांतिचे संगीत म्हणूनी कोकिळाही शांत आहे. आज काहि मागणे ना मुक्तिही मोक्षात आहे. मुक्तिच्या विहरात येथे समाधिही स्तब्ध आहे... हि दोन कडवी तर खुपच आवडली
  • Log in or register to post comments

+१

कोमल
Wed, 05/29/2013 - 15:44 नवीन
अगदी असेच. छानच कविता गुर्जी.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

मुक्तिच्या विहरात येथे

अनिरुद्ध प
Wed, 05/29/2013 - 17:25 नवीन
येथे आपल्याला विहारात असे म्हणायचे होते का?
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख...

तर्री
Wed, 05/29/2013 - 18:17 नवीन
आत्मा : तुझ्या प्रतिभेचा दीर्घ पल्ला दाखवणारी दर्जेदार कविता ....
  • Log in or register to post comments

मस्तच की बुवा

लीलाधर
Wed, 05/29/2013 - 21:08 नवीन
छान चाण छाण
  • Log in or register to post comments

आवरा.

अर्धवटराव
Wed, 05/29/2013 - 22:22 नवीन
बुवा... आचमनं जास्त झालीत का ? चैत्यगृहाने तुमच्या अंतरी कविता करवली... तरिही तुम्ही अजुन अत्रुप्त आत्मेच आहात. काय अफाट काव्य आहे हे. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

आत्मुस

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 05/29/2013 - 22:59 नवीन
आज काहि मागणे ना मुक्तिही मोक्षात आहे. मुक्तिच्या विहरात येथे समाधिही स्तब्ध आहे
आत्मुस, क लिवलय, क लिवलय, व्वाह...
  • Log in or register to post comments

क्या बात है !

सस्नेह
गुरुवार, 05/30/2013 - 12:57 नवीन
काव्य शांतवून गेले...
  • Log in or register to post comments

मस्त रचना

चाणक्य
गुरुवार, 05/30/2013 - 13:27 नवीन
अगदी 'भोळा सांब' च्या तोडीची..... खूप आवडली
  • Log in or register to post comments

@अगदी 'भोळा सांब' च्या तोडीची

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/30/2013 - 14:25 नवीन
@अगदी 'भोळा सांब' च्या तोडीची.....>>> ह्या प्रतिसादा बद्दल विशेष धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य

सुरेख कविता.

यशोधरा
Fri, 05/31/2013 - 08:04 नवीन
सुरेख कविता.
  • Log in or register to post comments

अ.आ. - सुंदर कविता.

आदूबाळ
Fri, 05/31/2013 - 11:15 नवीन
अ.आ. - सुंदर कविता. कधी कधी मिपावर ब्याकग्रौंड मूजिकची सोय हवी होती असं वाटतं. या कवितेला सुरात लावलेल्या तंबोर्‍याचं मूजिक मस्त शोभलं असतं...
  • Log in or register to post comments

अत्रुप्त आत्म्याने चक्क

पाषाणभेद
Sat, 06/01/2013 - 00:52 नवीन
अत्रुप्त आत्म्याने चक्क त्रुप्तीचा शोध घेतला.
  • Log in or register to post comments

सुंदर कविता

पैसा
Sun, 06/02/2013 - 10:30 नवीन
सुंदर कविता
  • Log in or register to post comments

म्हणेना कितीही स्वत:ला

बॅटमॅन
Sun, 06/02/2013 - 12:18 नवीन
म्हणेना कितीही स्वत:ला अत्रुप्त इथे जाहला पूर्ण आत्माचि त्रुप्त लिहोनी खरे धीरगंभीर साचे मनी बोल जे आपुले आपणाचे ||
  • Log in or register to post comments

सुरेख.

परिकथेतील राजकुमार
Sun, 06/02/2013 - 14:41 नवीन
आशयघन एकद. ही कवीता सहज गुणगुणण्याचा प्रयत्न केला असता अजून एक कवीता आठवून गेली. अर्थात 'शब्दांची गेयता' हा भाग सोडला तर दोघींना जोडणारा इतर कुठलाही धागा नाही. :- http://www.maayboli.com/node/22918 ही काय टोळक्यांनी केली कमाल आहे दिसतात कुट्ट काळे म्हणतात 'लाल' आहे नाही म्हणीत तो तर बापास बाप त्याच्या दाऊन सुर्य म्हणतो "माझी मशाल आहे!" भात्याशिवाय पेटी, नादान अन तबलची बेताल नाचण्याची मोठी धमाल आहे बुध्दीस कोंभ आले, पुर्णत्वही मिळाले भोंदू समिक्षकाचा, लंपट दलाल आहे! आभाळ मोजणारी तुज वीत लाभली का? शब्दाकडून त्याला इतका सवाल आहे! -हबा
  • Log in or register to post comments

माझं सगळं झालं आहे काही

कंजूस
Sun, 06/02/2013 - 14:47 नवीन
माझं सगळं झालं आहे काही द्यायचे नाही आणि काही मागायचे तर मुळीच नाही हीच भावना चैत्यगृहात आपल्या मनात येते ,या कवितेतूनही जाणवतेय हीच ती समाधी ॥पोहोचलास तू अतृप्त आत्म्या आज पलीकडे ॥बदलून टाक आजच तुझा आइडि ॥
  • Log in or register to post comments

वा !!

चौकटराजा
Sun, 06/02/2013 - 16:20 नवीन
शांत सारा चैत्य परिसर कलत्या दुपारचा प्रहर आहे वल्ली अआ च्या मस्करीवर चौराचा पुरता कहर आहे मंडळी असा होता तो अनुभव. पण अ आ नी त्यावर हे काव्य रचले. सुंदर !
  • Log in or register to post comments

नाही नाही काका.

प्रचेतस
Sun, 06/02/2013 - 17:22 नवीन
नाही नाही काका. गल्ली चुकलात. वरील अनुभव आधीच्या बेडसे लेणीतील चैत्यगृहाच्या इथे आलेला आहे. भाजे चैत्यगृहात समाधीस्थ वाटणे अवघड आहे कारण चैत्यगृहाची दर्शनी रचना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

अगदा बरोबर ! भाजे मे वो बात

अत्रुप्त आत्मा
Sun, 06/02/2013 - 17:57 नवीन
अगदा बरोबर ! भाजे मे वो बात नही ,के कविता हो जाए ! आणी फोटोही बेडसे लेण्यातलाच आहे, @खरं तर बेडसे लेणी हेच काव्य आहे. आणी ही कविता हा त्या मूळरुपाचा प्रतिध्वनी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सुंदर

प्रसाद गोडबोले
Wed, 01/28/2015 - 15:54 नवीन
सुंदर
आज काहि मागणे ना मुक्तिही मोक्षात आहे. मुक्तिच्या विहरात येथे समाधिही स्तब्ध आहे
अफाट लिहिलय बुवा =)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा