मी झाडीपट्टीत राहतो. महाराष्ट्राच्या पूर्व टोकावरचे चार जिल्हे म्हणजे झाडीपट्टी. कोकणानंतर सर्वाधिक पाऊस इकडेच पडतो म्हणतात. तसेच तलावांची साखळीच आहे आमच्याकडे. त्यामुळे धानाचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. आमच्याकडे मोठे उद्योगधंदे वगैरे नाहीत. मोठी शहरे नाहीत.(आमचे चंद्रपूर त्यातल्या त्यात थोडे मोठे म्हणता येईल.) शेतीवरच सगळी भिस्त आहे.
आमची फार शेती नाही. शेतीवर आता पोट नसले तरी कधीकाळी शेतीचा मोठा आधार होता. यंदा माझ्या घरी पावसाळी धानाचे 2 एकरात 16 हजार एकूण खर्चात 57 हज़ार एकूण उत्पन्न मिळाले. म्हणजे 41 हज़ार निव्वळ नफ़ा. एकरी 20.5 हज़ार फक्त. जमीन ओलिताखाली( वरच्या अंगाला तळे+ शेतात विहीर) आहे, म्हणजे फ़क्त अतिवृष्टिची किंवा अवकाळी ढगाळ वातावरणाची( कीड पडते) फ़क्त भीती आहे, दुष्काळाची नाही.
अधिक, धुर्यावर(बांधावर) तूर लावली ती घरी खायला पुरेसी दाळ देते.धान कापणीनंतर शेतातल्या ओलावरच थोड़ी मोहरी, लाखोळी, तीळ नि जवस पण होते. ही घरीच वापरली जाते सहसा. जास्त उत्पन्न झाले असेल तर विकून पै-पावली मिळते. जी जमीन ओलिताखाली नाही तिथे कधी धान पिकतो तर कधी पिकत नाही. थोडक्यात रामभरोसे. नफा शून्यावर येतो पण अजूनतरी उणे गेलेला नाही कारण विकण्यापुरते नाही तरी खाण्यापुरते धान येतेच. इतर दुय्यम पिके, जी विनाखर्च निव्वळ जमीनीच्या ओलावर घेतो, ती बेरजेचाच व्यवहार असते.
आमच्या झाडीपट्टीत शेतकरी आत्महत्या का करत नाही ह्याचे कारण लक्षात येईल.(२-३ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत पण त्यावर 'चर्चा' करता येईल.) ओलित नसले तरी पोटापुरते धान आणि बाकी पोटउत्पन्न होते. गरीब असला तरी कर्जबाजारी नसतो.बचत म्हणून एक पैसा नसेल कदाचित. 2 वेळ पोट भरते आणि तेवढ्यात तो खुश असतो. जास्त मेहनत करत नाही. सिंचनाची सोय असली तरी दोन-तीन पिके घेईलच ह्याची खात्री नाही.(पाण्याची सोय असली तरी आम्ही पण नाही घेत उन्हाळी धान.) जास्त टेंशन पण घेत नाही. आमचा शेतकरी महागडे प्रयोग सहसा करत नाही. नगदी पीके घेण्याचा धोका घेत नाही. काही 'प्रगतिशील शेतकरी' तेवढे नगदी पिके घेणे, प्रयोग करणे वगैरे छंद करत असतात. बहुतेक शेतकर्यांचे जोडधंदे असतात. एखादी म्हैस तर नक्कीच असते. माझ्या गावात प्रत्येक शेतकर्याचा छोटामोठा कसलातरी जोडधंदा आहे. धानाची शेती करून आपण कधी श्रीमंत होणार नाही ह्याची त्याला स्पष्ट कल्पना आहे, पण आपल्या डोक्यावर मोठे कर्ज नि विकतचे टेन्शन नसणार हेपण त्याला माहीत आहे. 'चलरा वैसा चलने दो. खेतीबाडी में ज्यादा पैसा डालनेका नइ' ही त्याची मानसिकता आहे. त्यामुळे किमान माझ्या गावातला कोणीही शेतकरी स्वत:च्या अवस्थेला शासनाला जबाबदार धरत नाही. 'सरकारने ये करनेको होना और वो करनेको होना' अशी काही मागणीही कधी केल्याचे माझ्या लक्षात नाही. त्याला पश्चिम महाराष्ट्राच्या बागायतीची कल्पना आहे, नाही असे नाही. 'पर उसके लिए दिनरात खेत मेंच रहना पडता, वो लोग वोही पे घर बनाके रहते, इत्ती मरमर कौन करेगा?' हे उत्तर आमची आईच देते.धानाच्या शेतीत भागत नसले तर जोडधंदा करतात, त्याने भागत नसले तर उन्हाळ्यात शहरात कामावर जातात, पण बागायतीकडे वळत नाही किंवा नगदी पिकांकडे वळत नाही. त्याऐवजी शिकून , गेलाबाजार डिएड करून एखाद्या शाळेत शिक्षक बनणे त्याला जास्त सोयीचे वाटते. आमच्याकडे बव्हंशी सगळेच नोकरदार आपली नोकरी सांभाळत शेती करत असतात. सगळ्या घरी नोकरदार झाले म्हणून 'आता शेती कोण करणार?'हा प्रश्न आलेला नाही. शेतमजूरांची टंचाई आली तसे यांत्रिकीकरण वाढले. ट्रॅक्टर, थ्रेशर वगैरे यंत्रे 'भाड्याने' घेणे सुरु झाले. मार्ग सापडत राहतात. परिस्थितीशी जुळवून घेणे सुरु असते. पण शेतीशी नाळ तुटत नाही. आपल्याला पश्चिम महाराष्ट्रासारखी बागायत शक्य नाही हे स्वतःलाच पटवून दिले की,अपने अभावों का रोना औरों के पास न रोते हुए, डोक्याला जास्त ताप न देता आपली पारंपारिक धानाची शेती मजेत सुरु असते. झाडीपट्टीतले जिल्हे अतिमागास म्हणून ओळखले जातात. असतील अतिमागास, असतील शेतकरी गरीब, पण डोक्याला जास्त ताप नाही. खुश रहो, आबाद रहो, बर्बाद मत होवो.
ह्या शेतीला आम्ही गमतीने अल्लाल(आळशी/अतिनिवांत) शेती म्हणतो.
मी हा असा अल्लाल प्राणी असल्याने कधीकधी माझ्या डोक्यात मजेदार प्रश्न येतात.
१) आमच्या ह्या मानसिकतेमागचे काय कारण असावे? असंच काहीसं कोकणाचं आहे असे ऐकून आहे. तिकडे पण धानाची शेती होते. शेती/पीक पद्धतीचा आणि मानसिकतेचा काही परस्परसंबंध असू शकतो का कोकणातले शेतकरी शेतीबद्दल कशा पद्धतीने विचार करतात?
२) वर्हाडात सातत्याने कपाशीला कमी दर मिळाल्याने आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या अशी परिस्थीती होती. कमी दरामागची काही कारणे आंतरराष्ट्रीय आणि काही महाराष्ट्रीय होती. तेव्हा ते शेतकरी पारंपारिक पिकांकडे (अन्नधान्यांकडे) का वळले नाहीत? नगदी पिकांसाठी वारंवार कर्ज काढण्याचे धाडस कुठून येते?(कर्जाच्या बाबतीत आम्ही पराकोटीचे घाबरट!) मुळात वर्हाडात पाऊस तुलनेने कमी. जमीनीतही खूप पाणी नाही. शेती जास्त बेभरवशाची. त्यात कपाशी म्हणजे खर्चिक, जास्त मनुष्यबळ लागणारी. तरीही कपाशीच का? कपाशीला पर्याय शोधला तोदेखील नगदी पिकाचाच, सोयाबीनचा. यंदा सोयाबीनचेही दर पडले. नगदी पिकांचा असा वाईट अनुभव सातत्याने गेली दहा वर्षे तरी येत असताना नगदी पिकांचाच अट्टाहास कशापायी? कारण आपल्या दुरावस्थेचे खरे कारण नगदी पिके आहेत हे तर एव्हाना भेज्यात आले असेलच. चांगले दर मिळण्याच्या आशेवरती किती ताणून लावायचे माणसाने? थोडे व्यावहारिक व्हावे ना?कशाला कर्जावर कर्ज काढत बसावे? आणि आकड्यांचेच सांगायचे तर कपाशीचे दर हेकटर उत्पादन महाराष्ट्राचे सर्वात कमी आहे, गुजरातचे सर्वाधिक. म्हणजे सर्वाधिक उत्पादनखर्चात सर्वात कमी उत्पादन होते आपल्या राज्यात. म्ह्णजे फार नफ्याची अपेक्षा करणेही चुकीचेच. जर नगदी पिके घ्यायचीच आहेत तर किमान उत्पादनक्षमता तरी वाढवायला पाहिजे. त्या दृष्टीने तसे विशेष प्रयत्न होत आहेत का? त्याची इथे कोणाला कल्पना आहे का?
३) मराठवाड्याने ऊसाचा स्वप्नातही विचार करू नये. नाहीतर कायमचे वाळवंट होईल तिकडे. पण तरीही तिकडे नवे साखर कारखाने येत असल्याची बातमी वाचली. मला कोणी ऊसाचे अर्थशास्त्र समजावून सांगेल? फार जुने कुतूहल आहे. गन्ने में ऐसा क्या है के सारे किसान चींटी की तरह गन्ने को चिपक जाते है?
४) शेती आणि शेतकरी ह्यांच्याबद्दल प्रसार माध्यमांत किंवा सोशल साइट्सवर टोकाचीच मते का दिसून येतात? एकतर हे टोक किंवा ते टोक. जर ह्यामागचे कारण एका बाजूचे शेतीविषयक अज्ञान आणि दुसर्या बाजूचे शेतकर्यांना भगवान का धरती पे प्रतिरुप समजणे असेल तर ते गैरसमज दूर करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले जावेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रकारच्या, प्रत्येक भागातल्या शेतीचे अर्थशास्त्र प्रामाणिकपणे जनतेपुढे आणायला पाहिजे. तसा प्रयत्न कोणी केला आहे का? त्याचप्रमाणे काही शेतकरी जे 'उपद्व्याप' करतात तेपण रोखठोकपणे जनतेपुढे आणले पाहिजे. सरसकट उदात्तीकरण थांबवण्याचा तोच एक मार्ग आहे असे वाटते. ह्याला प्रखर विरोध होईल ह्याचीपण कल्पना आहे कारण हर कोई अपना उल्लू सीधा करना चाहता है! पण नेटाने हे काम रेटले तर यश मिळेलच. शेती हा देखील एक उद्योग आहे, व्यवसाय आहे.( आमच्या सीमेपलीकडच्या तेलुगु बांधवांनी शेतीला 'व्यवसायम' हेच नाव दिले आहे.) तर, शेती हा देखील एक व्यवसाय आहे हे मान्य केले तर व्यावसायिकता आपोआप येते. नफा-तोटा ह्यांचा विचार करूनच गुंतवणूक केली जाते. मग एखादा शेतकरी धोका टाळून सुरक्षित व्यवसाय करतो तर कुठे शेतकरी थोडी जोखीम घेऊन जास्त नफा कसा कमावता येईल हे बघतो. मग एका शुद्ध व्यावसायिकाकडे आपण 'तारणहार' म्हणून का बघतो?
असो, पेंगायची वेळ झाली. काथ्या कूटून दमलो..
वाचने
22054
प्रतिक्रिया
114
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रश्नांची उत्तरे माहित नाहीत
+१
In reply to प्रश्नांची उत्तरे माहित नाहीत by रेवती
हो.
In reply to +१ by बहुगुणी
धान भाई भले, कुटे, खाए, चले!
In reply to +१ by बहुगुणी
धन्यवाद!
In reply to प्रश्नांची उत्तरे माहित नाहीत by रेवती
सकारात्मक लेख
म्हणूनच प्रत्येक भागातल्या
In reply to सकारात्मक लेख by मधुरा देशपांडे
प्रत्येक भागातील लोकांचे
In reply to म्हणूनच प्रत्येक भागातल्या by दादा पेंगट
शेती करत नसल्याने...
+ १/२
In reply to शेती करत नसल्याने... by मुक्त विहारि
फार छान लिहिलं आहे. प्रश्नही
धन्यवाद.
In reply to फार छान लिहिलं आहे. प्रश्नही by आदूबाळ
तुमचे आणि तुमच्या गावाकडचे
लेख आवडला.खरंच हा विचार का
अल्लाल लेख आवडां मेरेकू.
छान लेख
सहमत आहे.
In reply to छान लेख by पैसा
अतिशय छान वर्णन केले
In reply to छान लेख by पैसा
सहमत
In reply to छान लेख by पैसा
आवडला.
In reply to छान लेख by पैसा
होय
In reply to आवडला. by राही
कोंकणात पाणी भरपूर आहे ही
In reply to आवडला. by राही
म्हात्रे आगरी. कोकणी नव्हे.
In reply to कोंकणात पाणी भरपूर आहे ही by आदूबाळ
हे म्हात्रेशेट बहुतेक भंडारी
In reply to म्हात्रे आगरी. कोकणी नव्हे. by सतिश गावडे
हो बरोबर, काही पाचकळशी लोक
In reply to हे म्हात्रेशेट बहुतेक भंडारी by आदूबाळ
हे राम!
In reply to हो बरोबर, काही पाचकळशी लोक by खटपट्या
"आगरी" म्हणून काही जात आहे की
In reply to हे राम! by सोत्रि
मुळात आडनावे ही जातीवरुन पडली
In reply to हे राम! by सोत्रि
मुळात आगरी म्हणजे मिठाच्या
In reply to मुळात आडनावे ही जातीवरुन पडली by खटपट्या
आणि ह्या जमिनी विकून
In reply to मुळात आगरी म्हणजे मिठाच्या by पिंगू
मी पण आगरीच. पण मला कधीच असले
In reply to आणि ह्या जमिनी विकून by निनाद मुक्काम …
माझे खुप मित्र आहेत आगरी
In reply to मी पण आगरीच. पण मला कधीच असले by पिंगू
डोंबिवलीत बालपण गेले तेथे
In reply to मी पण आगरीच. पण मला कधीच असले by पिंगू
यात इतके वाईट काय आहे हेच मला
In reply to हे राम! by सोत्रि
+११११११११११११११११११११११११११११
In reply to यात इतके वाईट काय आहे हेच मला by बॅटमॅन
बिल्कुल सही कहा
In reply to यात इतके वाईट काय आहे हेच मला by बॅटमॅन
जर समाजशास्त्रीय अभ्यासासाठी
In reply to बिल्कुल सही कहा by दादा पेंगट
जर समाजशास्त्रीय अभ्यासासाठी कोणी चालीरीती, खाद्यसंस्कृती वगैरे बद्दल बोलत असेल तर जातीचा उल्लेख आवश्यक ठरतोसहमत आहे. वर बॅटमन यांनी म्हटल्याप्रमाणे जर अवमान, अवहेलना होत नसेल तर जातीच्या उल्लेखाने फारसा फरक पडत नाही. आणि भारतासारख्या देशात जिथे अठरापगड जातींचे वर्चस्व आहे तिथे तर या गोष्टी अपरिहार्यपणे संवादात येतच राहणार.+१
In reply to जर समाजशास्त्रीय अभ्यासासाठी by विशाल कुलकर्णी
'कोडतातल्या केशी' बद्दल
In reply to छान लेख by पैसा
थोडक्या महाराष्ट्राच्या पूर्व
In reply to छान लेख by पैसा
एक मात्र आहे, कोकणी माणूस हा
In reply to छान लेख by पैसा
सहमत !!
In reply to एक मात्र आहे, कोकणी माणूस हा by गवि
अहो सत्य आहे ते सत्यच आहे.
In reply to सहमत !! by खटपट्या
(No subject)
In reply to अहो सत्य आहे ते सत्यच आहे. by बॅटमॅन
माझ्यात पण हा सुशेगाद रहायचा गुण...
In reply to छान लेख by पैसा
लेख फार छान आणि संतुलित आहे.
छान लेख,,. आवडला.
लेख आवडला. एक शंका आहे-
शंका योग्यच आहेत.
In reply to लेख आवडला. एक शंका आहे- by किशोर७०
व्यावसायीकतेचा अभाव.
In reply to शंका योग्यच आहेत. by दादा पेंगट
सहमत...
In reply to व्यावसायीकतेचा अभाव. by अर्धवटराव
लेख आवडला
खरे तर थोडे, एखाद्या बांधीत
In reply to लेख आवडला by चेतन
साधी सरळ गोष्ट आहे दादा,
ह्म्म्म
>>पहिला प्रश्न आणि वरील ही ओळ
In reply to ह्म्म्म by सोत्रि
कशावरुन
In reply to >>पहिला प्रश्न आणि वरील ही ओळ by चेतन
मग
In reply to कशावरुन by सोत्रि
महानगरात राहणाऱ्या
In reply to मग by चेतन
सर्वात जास्त महसूलही!
In reply to महानगरात राहणाऱ्या by विवेकपटाईत
त्यांच्या कंपन्याही सरकारला
In reply to सर्वात जास्त महसूलही! by वामन देशमुख
चुकता आहात राव, शेतीचे भाव
In reply to सर्वात जास्त महसूलही! by वामन देशमुख
Mumbai accounts for slightly
In reply to महानगरात राहणाऱ्या by विवेकपटाईत
हे पण पहाhttp:/
In reply to Mumbai accounts for slightly by सुबोध खरे
मुंबईतील माणूस जेवढी मेहनत
In reply to Mumbai accounts for slightly by सुबोध खरे
मुंबईतील माणूस जेवढी मेहनत करतो तेवढी महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात किंवा गावात होत नाही हि वस्तुस्थिती आहे.हे आमच्या मुटेसाहेबांना सांगा. ते म्हणतात शेतकर्यांइतके कष्ट कोणीच करत नाही. ;)आता या धाग्यालाही शतकाकडे
In reply to मुंबईतील माणूस जेवढी मेहनत by विशाल कुलकर्णी
(No subject)
In reply to आता या धाग्यालाही शतकाकडे by डॉ सुहास म्हात्रे
ये मैं कब बोला?
In reply to कशावरुन by सोत्रि
अहो साहेब...
In reply to ह्म्म्म by सोत्रि
फेक आयडी,फेक लेख.