Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विशाल कुलकर्णी on Sat, 01/24/2015 - 14:49
शब्दात गझल वेड्या गावेल का कधी रे? मोजून फक्त मात्रा साधेल का कधी रे? करतोस काय गप्पा नुसत्याच काफियांच्या? वगळून आशयाला चालेल का कधी रे? नाही मनात श्रद्धा, अन् हात जोडलेले दगडात देव आहे वाटेल का कधी रे? खुर्चीच माय झाली स्वार्थांध मानवाची सत्तेशिवाय त्याचे भागेल का कधी रे? टाळून याचकाला, अभिषेक सावळ्याचा वेड्या, विठू तुलाही पावेल का कधी रे? व्हावे 'विशाल' आता, कोतेपणा गळावा वृत्ती मनामधे ही बाणेल का कधी रे? विशाल...

Submitted by गणेशा on Sat, 01/24/2015 - 14:54

Permalink

गझल आवडली. मस्त एकदम.

गझल आवडली. मस्त एकदम. बाणेल हा शब्दप्रयोग पहिल्यांदा वाचला, अर्थ मला माहिती नाही. स्पष्ट अर्थ सांगताल का ?
  • Log in or register to post comments

Submitted by काकाकाकू on Sat, 01/24/2015 - 19:24

Permalink

बाणणे म्हणजे

बाणणे म्हणजे बिंबणे, मनात धारण करणे उदा. "आपल्या समाजाच्या उन्नतीची आस त्याच्या मनात उपजतच बाणलेली होती.", "महाराज आपल्यासारख्या रयतेचं संरक्षण करतील असा विश्वास त्यांच्या मनात बाणला होता". वगैरे. का कुणास ठाउक पण "ग्रूपमधल्या त्या एकट्याच्याच मनात, 'निरनिराळी लोकोपयोगी अ‍ॅप्स तयार करून सर्वसामान्यांचं काम हलकं करीन' हा आत्मविश्वास पुरेपूर बाणलेला होता" हे वाक्य तांत्रिकदृष्ट्या बरोबर असलं तरी थोडं खटकतं. जुना शब्द निव्वळ वापरात नसतो म्हणून असं होतं का? असो, विशाल, गझल सुरेख आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Sun, 01/25/2015 - 10:04

In reply to बाणणे म्हणजे by काकाकाकू

Permalink

धन्यवाद काकाकाकू, माझं काम

धन्यवाद काकाकाकू, माझं काम सोपं केल्याबद्दल.
  • Log in or register to post comments

Submitted by खमक्या on Sat, 01/24/2015 - 21:52

Permalink

उत्तम

मस्त उत्तम गझल -गझलेचा प्रियकर खमक्या
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sat, 01/24/2015 - 23:02

Permalink

क्लास!

क्लास!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 01/24/2015 - 23:21

In reply to क्लास! by अत्रुप्त आत्मा

Permalink

+१

हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by hitesh on Sun, 01/25/2015 - 09:17

Permalink

.

सुंदर
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Sun, 01/25/2015 - 10:05

Permalink

मन:पूर्वक आभार मंडळी _/\_

मन:पूर्वक आभार मंडळी _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Mon, 01/26/2015 - 17:28

Permalink

आवडेश

खूप सुंदर रे भावा! प्रतिसाद द्यायलाच लावणारी रचना. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Tue, 01/27/2015 - 10:22

In reply to आवडेश by राघव

Permalink

धन्यवाद राघवभाऊ _/\_

धन्यवाद राघवभाऊ _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by सौन्दर्य on Tue, 01/27/2015 - 00:20

Permalink

ओघवती रचना. सुंदर.

ओघवती रचना. सुंदर.
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Tue, 01/27/2015 - 10:22

In reply to ओघवती रचना. सुंदर. by सौन्दर्य

Permalink

_/\_

_/\_
  • Log in or register to post comments

Submitted by शब्दबम्बाळ on Tue, 01/27/2015 - 18:39

Permalink

खूप छान!

मस्त!!!
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 01/28/2015 - 09:13

Permalink

जब्राट..

किमान शब्द कमाल आशय. पुलेशु
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 01/28/2015 - 15:43

Permalink

खासच!

मस्त लिहिलीय!
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 01/29/2015 - 12:00

Permalink

आभार्स मंडळी _/\_

आभार्स मंडळी _/\_
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3413 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com