Skip to main content

रेखाटने

लेखक वर्षा यांनी मंगळवार, 11/11/2008 04:49 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या दोन आवडत्या कलाकारांची रेखाटने करायला घेतली होती. पण ते मूळ फोटो मध्यंतरी पीसी format केला त्यात गायब झाले. कालपरवा आठवून शेडींग करायचा प्रयत्न केला पण काही जमलं नाही. मग नाद सोडून दिला. आता परत नव्यानेच रेखाटावे म्हणते. बघुया. :) माध्यमः Derwent Charcol Medium, RAFFINE 2B Graphite pencil मग काय वाटलं कुणास ठाऊक, चक्क दोन कार्टून्स काढली आणि रंगवलीपण! कित्ती दिवसांनी नव्हे वर्षांनी! मला वाटतं शाळेनंतर आताच काढली डायरेक्ट :D खूप मजा आली डिस्नेचे Chip 'n Dale....मला फार आवडतात...कधीकधी मिकी आणि डोनाल्डपेक्षाही :) माझा ७ महिन्यांचा लेक यांना बघून खूष झाला... अजून काय पाहिजे! :) -वर्षा
लेखनविषय:

वाचने 3474
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

चिप न डेल काय क्युट आलेत! पर्फेक्ट एकदम! वर, शम्मी कपुर आणि कोण आहे? नाही ओळखलं.. :( तेही दोघं छान , पण अपूर्ण वाटतात... http://bhagyashreee.blogspot.com/

In reply to by भाग्यश्री

धन्यवाद गं. होगं अपूर्णच आहेत. आणि तसंही चेहेरा रेखाटून झाला की केस रेखाटायला मला कंटाळा येतो. (जमतच नाही ना :D ) शम्मी बरोबर...दुसरी ओळखली नाहीस????? नवलच आहे बाई :D अगं मी समजा दहा वेळा चित्र रेखाटलं तर त्यातले नऊ वेळा प्रयत्न फसलेलाच असतो :) -वर्षा

In reply to by वर्षा

ओह्ह.. दिप्ती नवल होय!! काय क्रिप्टीक लिहीतेस!! :)))) छान आहे गं, फसले नाहीय.. मला डोळे ओळखीचे वाटले पण नाव नाही आठवलं.. :) http://bhagyashreee.blogspot.com/

चिप न डेल मस्तच दिसतात... मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर

In reply to by मदनबाण

चिप न डेल मस्तच दिसतात...

चिप न डेल मस्तच दिसतात... असेच म्हणतो..... शम्मी कपूर आणी माहीत नसलेली हीरोइन सुद्धा छान रेखाटलीये.. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

के व ळ अ प्र ती म...! तात्या.

भयंकर सुंदर काढले आहेस! माझ्यामते चित्रातला सर्वात आवघड भाग म्हणजे डोळे. तेही अतिशय छान आले आहेत.

रेखाटने आवडली. :)

शम्मी, चिप न डेल मस्त! दीप्ती नवल मात्र नाही ओळखू आली...