✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ते तिघं !

च
चिनार यांनी
गुरुवार, 01/22/2015 - 08:43  ·  लेख
लेख
ते तिघं सध्या आपल्या सगळ्यांच्या घरात धुमाकूळ घालतायेत. त्यांना वेळीच आवरलं नाही तर घरात राहणं मुश्कील होईल. आपल्या कळत-नकळत आपली तुलना सतत त्यांच्याबरोबर होते आहे. आपलं कुटुंबप्रमुख पद त्यांच्यामुळे धोक्यात येऊ शकतं. आणि आपण काहीही केलं तरी त्यांना आता अवरु शकत नाही. ये हमारे बस की बात नही!! आता तुम्ही विचाराल , हे कोण तुर्रमखान ? त्यांची ओळख काय ? त्याचं कर्तुत्व काय ? ओळख म्हणाल तर आपल्या रोजच्या सक्तीच्या पाहण्यातले. कर्तुत्व म्हणाल तर अफ़ाट ! अचाट ! पहिला -- आजीने कष्टाने उभे केलेल्या गृह उद्योगाचा एकमेव वारस आणि मालक असलेला श्री ! (होणार सून मी त्या घरची ) दुसरा -- एका गर्भश्रीमंत घरातली पोरगी पटवण्याचा पराक्रम गाजवलेला राया !! (जावई विकत घेणे आहे ) तिसरा -- गांधीजींची सहनशीलता, टिळकांचा दुर्दम्य आशावाद, श्रावणबाळाइतका आज्ञाधारक इत्यादी गुण पदरी घेऊन साक्षात श्यामच्या आईने सुद्धा जिची ट्युशन लावावी अश्या मातेच्या पोटी जन्मलेला सुपुत्र आदित्य !!! (जुळून येती रेशीमगाठी) आता बोला! आहे का तुमच्यात हिम्मत यांना आवरण्याची ? आहे का तुमच्यात हिम्मत संध्याकाळी ७-१० या वेळात बायकोच्या हातून रिमोट हिसकण्याची ? नाही ना ! मग गप्पं बसा. आणि त्या तिघांच्या पराक्रमाच्या गाथा पहा. घरातल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या आणि आकाराच्या सहा-सात बायकांच्या कटकटी सांभाळून व्यवसायामध्ये इतकं नेत्रदीपक यश मिळवणं म्हणजे खायचं काम नव्हे. त्यात मधूनच अनेक वर्षांपूर्वी घराबाहेर काढलेला बेवडा काका घरात वापस येतो. मग वाल्याचा वाल्मिकी व्हावा तसं या काकामध्ये आमुलाग्र बदल घडून येतो. या बदलाचा शिल्पकार अर्थातच श्री असतो. काहीही कारण नसताना घर सोडून गेलेले श्री चे वडील काहीही कारण नसताना परत येतात. मग श्री स्वत: ची मानसिक कुचंबणा वैगेरे काहीतरी विसरून हळूहळू वडीलांना स्वीकारतो. हाच श्री स्वत: च्या चुकीचं प्रायश्चीत्त म्हणून घरदार सोडून एका "हौटेल" मध्ये राहून फार हलाखीचे दिवस काढतो. संगणकासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून श्री त्यांचा गृहउद्योग एका नव्या उंचीवर नेउन ठेवतो. आर्थिक मंदी वगैरे शब्द त्याच्या गावीच नाहीयेत.त्याने नवीन उत्पादन बाजारात आणलं रे आणलं की त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो. श्री च्या व्यक्तीमत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे लग्नानंतर सुद्धा त्याचं आपल्या बायकोवर नितांत प्रेम आहे. फक्त त्याच्या बिझी शेड्युलमुळे तो तिला जास्त वेळ देऊ शकत नाही. आता एकचं माणूस कुठेकुठे पुरणार ना ! मधल्या काळात श्री च्या बायकोचा अपघात होऊन तिचा स्मृतीभंश होतो. अशातही श्री खचून जाऊन मालिका बंद पडू देत नही. तर सुरवातीचेच चाळीस पन्नास एपिसोड परत दाखवून बायकोची स्मृती परत आणतो. श्री ची सामाजिक बांधिलकी सुद्धा वाखाणण्याजोगी आहे बरं का ! फावल्या वेळात तो मित्र मैत्रिणींचे लग्न लावून देतो, लहान पोरांचे हरवलेले मायबाप शोधून देतो, सासूबाईंचे नखरे सांभाळतो. थोडक्यात काय तर श्री चं अष्टपैलू व्यक्तीमत्व समजून घ्यायला अजून ५०० एपिसोड तरी नक्कीच बघावे लागतील. तोपर्यन्त आपली खैर नाही. रायाचं कर्तुत्व ऐकून तर तुम्हाला स्वत: ची लाज वाटेल. काहीही करत नसलेल्या रायाला एकेदिवशी अचानक लौटरी लागते. एका गर्भश्रीमंत घरातली मुलगी त्याच्या प्रेमात पडते. यथावकाश (म्हणजे सावकाश पन्नासेक एपिसोड नंतर) त्यांचे लग्न होते.श्रीमंत सासू-सासरे रायाला घरजावई व्हायला सांगतात. पण आपला स्वाभिमानी राय त्यांना ठाम शब्दात नकार देतो. पुढल्या काळात राया स्वत:चा व्यवसाय सुरु करतो ह्या लोकांना व्यवसाय सुरु करताना भांडवल, जागा, परवानग्या असल्या फालतू अडचणींना सामोरं जावं लागत नाही .मनात येईल तेव्हा व्यवसाय सुरु करायचा आणि दोन महिन्यातच त्याची कीर्ती सगळीकडे पसरवायची एवढंच त्यांना माहिती ! श्री आणि रायानी भागीदारीत आखाडी कंपनी सुरु केली ना तर अंबानी आणि अदानीची काही खैर नाही. असो. तर एकेदिवशी नाईलाजाने रायाला घरजावई म्हणून सासू-सासऱ्यांचा घरी जावं लागते. तरीही ना डगमगता राया तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. त्यात जर त्याला यश आले तर सावरकरांच्या इंग्रजांच्या कैदेतून सुटकेच्या घटनेइतकंच ऐतिहासिक महत्त्व या घटनेला प्राप्त होईल. श्री प्रमाणेच रायाच सुद्धा बायकोवर नितांत प्रेम आहे. ते सिद्ध करण्यासाठी अधुनमधून तो तिला चहा वैगेरे करून देतो. तुम्ही कितीही वेळ घोटला ना तरी तुम्हाला इतका सुंदर चहा जमणार नाही. रायाच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राया अतिशय शांत आणि संयमी आहे. बहुधा त्याचा हाच गुण बायकांना आवडत असावा. श्री आणि राया यांच्या गाथा ऐकूनच जर तुम्ही थंडे झाले असला तर महात्मा आदित्यच्या तर जवळपासही येऊ नका. हम दिल दे चुके सनम मधल्या आजी देवगणचा वंशज असलेला आदित्य त्याच्या कितीतरी पुढे गेलेला आहे. गंमत अशी आहे की साधारण ज्या लोकांना आपण महात्मा म्हणतो, ते सगळे जन्मानंतर त्यांच्या कर्तुत्वाने महात्मा झाले. आदित्य आईच्या पोटातूनच महात्म्य घेऊन जन्माला आलाय. आदित्य च्या आईचा स्वभाव इतका गोड आहे की तिच्या फक्त सहवासानेच एखाद्याला डायबेटीस होईल. त्यामुळेच आदित्य एक अत्यंत सुस्वभावी मुलगा आहे. लग्नानंतर त्याच्या बायकोने त्याला 'हम दिल आधीचं किसीको दे चुके सनम' असं सांगितल्यावरही तो तिच्यावर चिडला नाही. तिच्यावर नातं स्वीकारण्याची जबरदस्तीही त्यानी केली नाही. याउलट तिला निर्णय घेण्याची मोकळीक दिली. हळूहळू तिला आदित्यचा चांगुलपणा उलगडू लागला. ती त्याला 'तू किती चांगला आहेस रे' असं दर एपिसोड मध्ये तीनदा म्हणायला लागली. तरीसुद्धा आदित्य तिला " मग राहा ना माझ्यासोबत भवाने !' असं एकदाही म्हणाला नाही.शेवटी तिनेच पुढाकार घेऊन प्रेमाच्या सुधारीत आवृत्तीची कबुली दिली. मगच त्यांचा सुखाचा संसार सुरु झाला. पण म्हणून मालिका बंद करण्याइतका आदित्य स्वार्थी नाहीये. तो एक जबाबदार मुलगा,भाऊ,जावई आहे. सगळ्यांच्या घरातल्या सगळ्या समस्या सोडवल्याशिवाय तो शांत बसत नाही. समस्या कमी पडल्याच तर घराबाहेरचं प्रेम प्रकरण सुद्धा तो मार्गी लावून देतो. थोडक्यात म्हणजे श्री,आदित्य,राया ही त्या सर्वशक्तीमान ईश्वराचीच तीन रूपं असल्यासारखी वाटतात. आपल्यासारखे सर्वसामान्य पुरुष त्यांच्यासमोर काय टिकणार ? निदान त्यांची अवतारसमाप्ती होईपर्यन्त आपली धडगत नाही. जास्तीत जास्त आपण सूड म्हणून त्या तिघांना एक शाप देऊ शकतो. "अरे चांडाळान्नो, तुम्हाला सुद्धा रोज ह्याच मालिका बघाव्या लागो रे !!!" --चिनार
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
31919 वाचन

💬 प्रतिसाद (161)

प्रतिक्रिया

हा हा हा

निनाद
गुरुवार, 01/22/2015 - 09:13 नवीन
जबरी!!
  • Log in or register to post comments

पण मला त्या चौथ्या जय चे

कहर
गुरुवार, 01/22/2015 - 09:38 नवीन
पण मला त्या चौथ्या जय चे अप्रूप वाटते …. एवढ्या मुली त्याच्याशी फ्लर्ट करतात … लाइन मारतात … अगदी त्याच्या बायकोसमोर … पण बायकोला काही वाटतच नाही … उलट ती असू दे म्हणून सर्व सहन करते …. मी एकदा सहज बायकोला म्हणालो ऑफिस मधी एक कलिग माझ्यावर लाईन मारते ( बहुतेक )…. तर तिने त्याच रात्री माझा रीसुमे नोकरि.कॉम वर अपलोड करायला लावला … डोळ्यात पाणी आणलेस रे ….
  • Log in or register to post comments

तुमचं बरोबर आहे. पण माझ्या

चिनार
गुरुवार, 01/22/2015 - 09:52 नवीन
तुमचं बरोबर आहे. पण माझ्या बायकोला ती मालिका एवढी आवडत नाही. त्यामुळे जय च्या लीला बघण्याच अहोभाग्य मला लाभत नाही. त्यामुळे त्याच्यावर लिहू शकलो नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर

ते जय नावाचे पात्र तर एकदम

मोहनराव
गुरुवार, 01/22/2015 - 16:28 नवीन
ते जय नावाचे पात्र तर एकदम मंद आहे. अभिनयच्या नावाने बोम्ब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर

या सगळ्या सिरीयलस मध्ये मंद

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 16:38 नवीन
या सगळ्या सिरीयलस मध्ये मंद कोण नाहिये??? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

आणखी एक म्हणजे ती आदिती.

मोहनराव
गुरुवार, 01/22/2015 - 17:03 नवीन
आणखी एक म्हणजे ती आदिती. एवढ्या श्रीमंत घरातली मुलगी, जावेकडून, रजनी नावाच्या जय वर लाईन मारणाऱ्या पोरीकडून सगळं मुकाट ऐकून घेते. जावेच्या घरात गपगुमान कामे करते. अरे काय साळसूदपणाचा कहर!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर

_/\_

कपिलमुनी
गुरुवार, 01/22/2015 - 18:06 नवीन
आता कळला तु ऑनलाईन का नसतोस ते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

(No subject)

मोहनराव
गुरुवार, 01/22/2015 - 18:08 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

@ मुनी

मी-सौरभ
गुरुवार, 01/22/2015 - 18:14 नवीन
पर्देशस्थ लोकान्ना ह्या मलिका ओनलाईन बघाव्या लागत्तात असे ऐकुन आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

ऑनलाईन आणी

कपिलमुनी
गुरुवार, 01/22/2015 - 18:16 नवीन
ऑनलाईन आणी कंपलसरी बघायला लागत आहेत असे मोहनरावांच्या वाढलेल्या ज्ञानावरून वाटत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

उगवलास.. पत्ते खेळून झाले

मोहनराव
गुरुवार, 01/22/2015 - 18:17 नवीन
उगवलास.. पत्ते खेळून झाले वाटतं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

+१११...

अमितसांगली
Fri, 06/12/2015 - 20:14 नवीन
तिसऱ्याच कर्तुत्व वाचल्यानंतर हेच खटकत...जयला कसे विसरले साहेब....अजून आपले खंडेराय व वाल्याचा वाल्मिकी झालेल्या कार्तिकला ( असे हे कन्यादान) पण विसरलात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर

बाकी त्या मेघनावर आमचा फार

स्पा
गुरुवार, 01/22/2015 - 09:44 नवीन
=)) बाकी त्या मेघनावर आमचा फार जीव
  • Log in or register to post comments

जान्व्ही वर डोला नका ठेउ रे

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 09:51 नवीन
जान्व्ही वर डोला नका ठेउ रे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

यक्क !! ती त्या श्रीलाच लखलाभ

सूड
गुरुवार, 01/22/2015 - 15:58 नवीन
यक्क !! ती त्या श्रीलाच लखलाभ होवो. तिने रोज तासभर वर्कआऊट केला तर कोल्हापुरातल्या आखाड्यातली मल्ल वाटेल ती. प्रिया बापट, उर्मिला कानिटकर, मृण्मयी देशपांडे सारख्या नाजूका एकेकाळी झीवर असायच्या. आता ती मेघना त्यातल्या त्यात बरी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

प्रिया बापट, उर्मिला कानिटकर

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 16:20 नवीन
प्रिया बापट, उर्मिला कानिटकर बाबत सहमत पण मृण्मयी देशपांडे??? ती काकूबाई??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

असो.

सूड
गुरुवार, 01/22/2015 - 17:24 नवीन
असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मृण्मयी देशपांडे काकुबाई

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/22/2015 - 18:20 नवीन
मृण्मयी देशपांडे काकुबाई नाहिये. गुगलवुन बघ!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

चिमणराव, अशा वेळी असो म्हणावं

सूड
गुरुवार, 01/22/2015 - 20:07 नवीन
चिमणराव, अशा वेळी असो म्हणावं आणि सोडून द्यावं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

बघितले...काह्ही मिळाले नाही..

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 20:10 नवीन
बघितले...काह्ही मिळाले नाही...तुमच्याकडे काही असेल तर द्या पाठवून... अवांतर - अश्या विषयांसाठी मिपावर पुरुषांचा वेगळा विभाग नसल्याने माझी पुरुषसुलभ कुचंबणा झाल्यासारखी वाटते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

एक प्रेमाचा सल्ला रे बाबा

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/22/2015 - 16:33 नवीन
एक प्रेमाचा सल्ला रे बाबा तुला. चुकुन माकुन जान्हवी पटलीचं तुला, तर कानात घालायचे बोळे, चांगुलपणाच्या अतिजेवणानंतर अपचन होउ नये म्हणुन गोळ्या, झालचं तर बसचा महिन्याचा पास, घरात रँडम पोरांसाठी डायपर, सासुबैंना चोरायला वस्तु, सासरेबुवांसाठी ऑपरेशन थिएटर, मेव्हण्यासाठी रेडीमेड बिझनेस वगैरे ची तयारी ठेव. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खिक्क....मला भेटली तर मी तर

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 16:38 नवीन
खिक्क....मला भेटली तर मी तर सगळ्यांना सोडून दुसरीकडेच राहीन ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

तिलापण

जेम्स बॉन्ड ००७
गुरुवार, 01/22/2015 - 18:19 नवीन
तिलापण सोडुन राहायची वेळ येइल रे बाबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

दिस्त्चेते

जेम्स बॉन्ड ००७
गुरुवार, 01/22/2015 - 18:27 नवीन
तिच्याकडे बघुन तुम्चा जीव फारच उतु चाल्लाय हे दिस्तंच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

खिक्क

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 09:50 नवीन
खिक्क =))
  • Log in or register to post comments

मला फक्त चला हवा येऊ द्या आवडते..

योगी९००
गुरुवार, 01/22/2015 - 10:10 नवीन
मला फक्त चला हवा येऊ द्या आवडते.. भारत गणेशपुरे, भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि डॉ. निलेश यांच्यामुळे बघणेबल होते. विनोदात तोच तोच पणा असला तरी भाऊ कदम यांच्या काहीश्या निरागसतेने खुपच मजा येते. बाकी मल्हार मार्तंड यांच्या सिरियलचे टायटल साँग खुप आवडते.? या सिरीयल विषयी काय मत आहे?
  • Log in or register to post comments

मला फक्त चला हवा येऊ द्या

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 10:13 नवीन
मला फक्त चला हवा येऊ द्या आवडते.. भारत गणेशपुरे, भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि डॉ. निलेश यांच्यामुळे बघणेबल होते. विनोदात तोच तोच पणा असला तरी भाऊ कदम यांच्या काहीश्या निरागसतेने खुपच मजा येते.
+११११११११११
बाकी मल्हार मार्तंड यांच्या सिरियलचे टायटल साँग खुप आवडते.? या सिरीयल विषयी काय मत आहे?
त्याचे फक्त टायटलसाँगच चांगले आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

नै रे बाबा. बाणुवर जीव हाय

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/22/2015 - 10:20 नवीन
नै रे बाबा. बाणुवर जीव हाय आपला (म्हणजे माझा) कधीतरी जाता येता दिसतं असते डोळ्याला. तेवढाचं श्रमपरिहार =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

(No subject)

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 10:37 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

सागर कारंडे..

योगी९००
गुरुवार, 01/22/2015 - 13:50 नवीन
सागर कारंडे.. यांचे नाव विसरलो. तो पण खूप मजा आणतो च.ह.ये.द्या मध्ये...!! त्याने नाना पाटेकर समोर त्याचीच नक्कल फार छान उतरवली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

टायटल साँग आवडते तेवढच..

संदीप डांगे
गुरुवार, 01/22/2015 - 17:04 नवीन
बाकी मल्हार मार्तंड यांच्या सिरियलचे टायटल साँग खुप आवडते.? या सिरीयल विषयी काय मत आहे?
कुणीतरी झोपडी(?)च्या बाहेर येतं, मग बाणू लचकत झोपडीतून बाहेर येते. ती ती दोघं काहीतरी बोलतात. किंचित टेन्स असतात. दरबारात मार्तंड इकडून तिकडे आणि तिकडून इकडे मान फिरवत मानकऱ्यांचे आइकत असतात. मार्तंड तोंड उघडतील तर कॅमेरा फुटेल अशा भीतीने त्यांना स्वगत बोलण्याची शिक्षा डिरेक्टर ने केलेली असते. मागच्या वर्षभरात हे अवघे तीनच सीन रिपीट मारतात असे वाटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

अरे बापरे !

किचेन
Sat, 04/16/2016 - 20:19 नवीन
अरे बापरे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

वा वा!

बोका-ए-आझम
गुरुवार, 01/22/2015 - 10:10 नवीन
माई मोड आॅन: छानच लिहिलं आहेस रे चिना-या!रोजरोज या मालिका बघितल्यामुळेच मला इन्शुलीनचं इंजेक्शन घ्यावं लागतं असं हेही म्हणतात! माई मोड आॅफ.
  • Log in or register to post comments

मी मल्हार मार्तंड यांच्या

चिनार
गुरुवार, 01/22/2015 - 10:13 नवीन
मी मल्हार मार्तंड यांच्या मालिकेवर भाष्य केले तर लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील. ज्यांना बघावते त्यांनी बघावं
  • Log in or register to post comments

त्यातला शिवशंभू इतका "भोळा"

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 10:14 नवीन
त्यातला शिवशंभू इतका "भोळा" आहे की बस्स....समजून जा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

धार्मिक भावना

कपिलमुनी
गुरुवार, 01/22/2015 - 14:23 नवीन
धार्मिक भावना दुखावतील
लिहा हो बिन्दास्त ! तुम्ही त्या पात्रांवर टीका करत आहात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

सुरवात कोणत्या मालीकेने करावी

खटपट्या
गुरुवार, 01/22/2015 - 10:18 नवीन
सुरवात कोणत्या मालीकेने करावी याचे मार्गदर्शन मिळेल का?
  • Log in or register to post comments

"अरे चांडाळान्नो, तुम्हाला

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/22/2015 - 10:18 नवीन
"अरे चांडाळान्नो, तुम्हाला सुद्धा रोज ह्याच मालिका बघाव्या लागो रे !!!"
का ओ...असा शाप का देताय आम्हा पामरांना =))
  • Log in or register to post comments

हा शाप त्या तिघांना आहे

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 10:18 नवीन
हा शाप त्या तिघांना आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ओह!! मला वाटलं आपल्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/22/2015 - 10:21 नवीन
ओह!! मला वाटलं आपल्या मिपाकरांना आहे. बाकी ह्यातल्या एकाही घरात चालु स्थितीमधला टी.व्ही. दिसलेला नाही. नाही म्हणायला मल्हार-मार्तंड मधे आय-पॅड म्हणा किंवा कम्युनिकेटर म्हणा दिसले होते मधे कधीतरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

"अरे चांडाळान्नो, तुम्हाला

आनन्दा
गुरुवार, 01/22/2015 - 10:21 नवीन
"अरे चांडाळान्नो, तुम्हाला सुद्धा रोज ह्याच मालिका बघाव्या लागो रे !!!"
आईशप्पत! असला शाप देता आला तर मी त्यांना असल्या मालिका + त्या पुढचे पाऊल वगैरे दिवसातून ३ वेळेस बघायचा शाप देईन.
  • Log in or register to post comments

निषेध!

सर्वसाक्षी
गुरुवार, 01/22/2015 - 10:47 नवीन
इतक्या सुंदर आणि युजर फ्रेंडली मालिकांवर टिका केल्याबद्दल निषेध - विषेतः जान्हवी. वा वा! किती सोपी मालिका! लेखक, दिग्दर्शक वगैरेची गरजच भासत नाही. आपण लहानपणी संध्याकाळी शाळेतून आल्यावर अंगणात जमायचो आणि ठरवायचो आज काय खेळायचं? तस या मालिकेत प्रत्येक भागात पात्र ठरवतात. उदाहरणार्थ एक भाग 'उशीर' वर. किमान ५-७ पात्रे कुठल्याही प्रसंगी उपस्थित असतातच. पहिले पात्रः आज जान्हवी नाही आली अजुन जितकी पात्रे तितक्या वेळा हे वाक्य. दुसरे पात्रे: फोनही केला नाही उशीर होइल म्हणुन. आधी 'हो ना' च्या अ‍ॅडिशनसह सर्व उपस्थित पात्रे हेच वाक्य क्रमाने. मग तिसरे पात्र हातात फोन घेउन : 'फोन लावते तर बंद आहे असे उत्तर येताय' सगळी पात्री क्रमा क्रमाने : 'हो फोनही लागत नाहीये' बघा. चार पाच वाक्ये गुणिले ७-८ माणसे आणि दर वाक्या आधी एकमेकाच्या तोंडाकडे बघणे यात १५ मिनिटे सहज जातात. उरलेला वेळ आधी काय झालं, पुढे काय होणार आहे आणि जाहिराती. झाला एक भाग. आणि समजा पात्र वेळेत सेट वर पोचली नाहीत तर? तर काय - उपस्थित पात्रांपैकी एकाला आढ्याकडे बघत बसवायचं मग उरलेलं काम एडिटरचं. काढा जुनी रिळं आणि दाखवा सेपियामध्ये. बघा किती सोपे आहे. लेखन, पाठांतर झिग्झिग नाही. अशा सहज सुंदर मालिकांवर टिका करणे बरे नाही
  • Log in or register to post comments

साबांच्या कृपेने अधुनमधुन

मितान
गुरुवार, 01/22/2015 - 11:26 नवीन
साबांच्या कृपेने अधुनमधुन दर्शन होते या सगळ्यांचे. बाकी सर्वसाक्षी म्हणतात तेच सर्वकाही !!!! :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

अगदी अगदी...

मोहनराव
गुरुवार, 01/22/2015 - 16:17 नवीन
अगदी अगदी... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

तुम्ही नक्की कशाबद्दल बोलत आहात?

मुक्त विहारि
गुरुवार, 01/22/2015 - 10:57 नवीन
(श्वेतांबराचे मनापासून २च भाग बघीतलेला) मुवि
  • Log in or register to post comments

कोण बरं हे तिघे ?

सस्नेह
गुरुवार, 01/22/2015 - 11:17 नवीन
कोण बरं हे तिघे ? आम्ही नाही पाहिलं यांना कधी ! ( मराठी सिरीयलद्वेष्टी ) स्नेहांकिता
  • Log in or register to post comments

कोण बरं हे तिघे ?

मुक्त विहारि
गुरुवार, 01/22/2015 - 11:24 नवीन
मला पण हाच प्रश्र्न पडला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

तुम्ही सिर्यल बघत नै??? म्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/22/2015 - 16:22 नवीन
तुम्ही सिर्यल बघत नै??? म्या आजपासुन तुमचा फॅण झालो मग. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

या तिघांना घेऊन पुढची कथा

स्पार्टाकस
गुरुवार, 01/22/2015 - 11:31 नवीन
या तिघांना घेऊन पुढची कथा लिहावी म्हणतो ;)
  • Log in or register to post comments

खबर्दार!!!!

बॅटमॅन
गुरुवार, 01/22/2015 - 13:01 नवीन
खबर्दार!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा