Skip to main content

(सोबती) सकारात्मक.

लेखक प्रभाकर पेठकर यांनी गुरुवार, 22/01/2015 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
सुचेता ह्यांची सोबती ही कविता वाचली आणि आवडलीही. तसं पाहिलं तर काव्य करणं हा माझा प्रांत नव्हे. पण मधेच कधीतरी सुरसुरी येते. सुचेता ह्यांची 'सोबती' कविता वाचली आणि आलेल्या सुरसुर्‍या अवस्थेत एक कविता होऊन गेली. तुम्हा सर्वांच्या आस्वादार्थ...... सुखाला अनंत सोबती जरी, दु:खातही तुम्ही एकटे नसता, मित्र असतो सोबतीला, सगळेच कडेने पोहणारे नसतात. ज्याचं त्याने सामोरं जावं, प्राक्तनाला दोषी का धरावं? जीद्द अशी बाळगावी, दैवानेही समोर झुकावं. अरे हेच चिरंतन सत्य आहे, पाठ फिरवून पळायचं नसतं. संघर्ष जो सदैव करीतो, दैव त्यालाच प्रसन्न होतं.
लेखनविषय:

वाचने 3477
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

काकाश्री! झकास!! सकारात्मक विचार मांडणारी कविता खूप आवडली!!

अरे हेच चिरंतन सत्य आहे, पाठ फिरवून पळायचं नसतं. संघर्ष जो सदैव करीतो, दैव त्यालाच प्रसन्न होतं. वाह्ह वा... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }

मस्त

ज्याचं त्याने सामोरं जावं, प्राक्तनाला दोषी का धरावं? जीद्द अशी बाळगावी, दैवानेही समोर झुकावं.
हे आवडलं.

"सुखाला अनंत सोबती जरी, दु:खातही तुम्ही एकटे नसता, मित्र असतो सोबतीला, सगळेच कडेने पोहणारे नसतात." -------- थोडा बदल.... "सुखाला अनंत सोबती जरी, दु:खातही तुम्ही एकटे नसता, मिपाकर असतो सोबतीला, सगळेच कडेने पोहणारे नसतात." आमच्या पासून "मिपा आणि मिपाकर" तोडणे शक्य नाही.

दु:खातही तुम्ही एकटे नसता, मित्र असतो सोबतीला, अनुभवतो आहे!!

हि बाजु ही आवडली आहे