✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ते तिघं !

च
चिनार यांनी
गुरुवार, 01/22/2015 - 08:43  ·  लेख
लेख
ते तिघं सध्या आपल्या सगळ्यांच्या घरात धुमाकूळ घालतायेत. त्यांना वेळीच आवरलं नाही तर घरात राहणं मुश्कील होईल. आपल्या कळत-नकळत आपली तुलना सतत त्यांच्याबरोबर होते आहे. आपलं कुटुंबप्रमुख पद त्यांच्यामुळे धोक्यात येऊ शकतं. आणि आपण काहीही केलं तरी त्यांना आता अवरु शकत नाही. ये हमारे बस की बात नही!! आता तुम्ही विचाराल , हे कोण तुर्रमखान ? त्यांची ओळख काय ? त्याचं कर्तुत्व काय ? ओळख म्हणाल तर आपल्या रोजच्या सक्तीच्या पाहण्यातले. कर्तुत्व म्हणाल तर अफ़ाट ! अचाट ! पहिला -- आजीने कष्टाने उभे केलेल्या गृह उद्योगाचा एकमेव वारस आणि मालक असलेला श्री ! (होणार सून मी त्या घरची ) दुसरा -- एका गर्भश्रीमंत घरातली पोरगी पटवण्याचा पराक्रम गाजवलेला राया !! (जावई विकत घेणे आहे ) तिसरा -- गांधीजींची सहनशीलता, टिळकांचा दुर्दम्य आशावाद, श्रावणबाळाइतका आज्ञाधारक इत्यादी गुण पदरी घेऊन साक्षात श्यामच्या आईने सुद्धा जिची ट्युशन लावावी अश्या मातेच्या पोटी जन्मलेला सुपुत्र आदित्य !!! (जुळून येती रेशीमगाठी) आता बोला! आहे का तुमच्यात हिम्मत यांना आवरण्याची ? आहे का तुमच्यात हिम्मत संध्याकाळी ७-१० या वेळात बायकोच्या हातून रिमोट हिसकण्याची ? नाही ना ! मग गप्पं बसा. आणि त्या तिघांच्या पराक्रमाच्या गाथा पहा. घरातल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या आणि आकाराच्या सहा-सात बायकांच्या कटकटी सांभाळून व्यवसायामध्ये इतकं नेत्रदीपक यश मिळवणं म्हणजे खायचं काम नव्हे. त्यात मधूनच अनेक वर्षांपूर्वी घराबाहेर काढलेला बेवडा काका घरात वापस येतो. मग वाल्याचा वाल्मिकी व्हावा तसं या काकामध्ये आमुलाग्र बदल घडून येतो. या बदलाचा शिल्पकार अर्थातच श्री असतो. काहीही कारण नसताना घर सोडून गेलेले श्री चे वडील काहीही कारण नसताना परत येतात. मग श्री स्वत: ची मानसिक कुचंबणा वैगेरे काहीतरी विसरून हळूहळू वडीलांना स्वीकारतो. हाच श्री स्वत: च्या चुकीचं प्रायश्चीत्त म्हणून घरदार सोडून एका "हौटेल" मध्ये राहून फार हलाखीचे दिवस काढतो. संगणकासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून श्री त्यांचा गृहउद्योग एका नव्या उंचीवर नेउन ठेवतो. आर्थिक मंदी वगैरे शब्द त्याच्या गावीच नाहीयेत.त्याने नवीन उत्पादन बाजारात आणलं रे आणलं की त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो. श्री च्या व्यक्तीमत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे लग्नानंतर सुद्धा त्याचं आपल्या बायकोवर नितांत प्रेम आहे. फक्त त्याच्या बिझी शेड्युलमुळे तो तिला जास्त वेळ देऊ शकत नाही. आता एकचं माणूस कुठेकुठे पुरणार ना ! मधल्या काळात श्री च्या बायकोचा अपघात होऊन तिचा स्मृतीभंश होतो. अशातही श्री खचून जाऊन मालिका बंद पडू देत नही. तर सुरवातीचेच चाळीस पन्नास एपिसोड परत दाखवून बायकोची स्मृती परत आणतो. श्री ची सामाजिक बांधिलकी सुद्धा वाखाणण्याजोगी आहे बरं का ! फावल्या वेळात तो मित्र मैत्रिणींचे लग्न लावून देतो, लहान पोरांचे हरवलेले मायबाप शोधून देतो, सासूबाईंचे नखरे सांभाळतो. थोडक्यात काय तर श्री चं अष्टपैलू व्यक्तीमत्व समजून घ्यायला अजून ५०० एपिसोड तरी नक्कीच बघावे लागतील. तोपर्यन्त आपली खैर नाही. रायाचं कर्तुत्व ऐकून तर तुम्हाला स्वत: ची लाज वाटेल. काहीही करत नसलेल्या रायाला एकेदिवशी अचानक लौटरी लागते. एका गर्भश्रीमंत घरातली मुलगी त्याच्या प्रेमात पडते. यथावकाश (म्हणजे सावकाश पन्नासेक एपिसोड नंतर) त्यांचे लग्न होते.श्रीमंत सासू-सासरे रायाला घरजावई व्हायला सांगतात. पण आपला स्वाभिमानी राय त्यांना ठाम शब्दात नकार देतो. पुढल्या काळात राया स्वत:चा व्यवसाय सुरु करतो ह्या लोकांना व्यवसाय सुरु करताना भांडवल, जागा, परवानग्या असल्या फालतू अडचणींना सामोरं जावं लागत नाही .मनात येईल तेव्हा व्यवसाय सुरु करायचा आणि दोन महिन्यातच त्याची कीर्ती सगळीकडे पसरवायची एवढंच त्यांना माहिती ! श्री आणि रायानी भागीदारीत आखाडी कंपनी सुरु केली ना तर अंबानी आणि अदानीची काही खैर नाही. असो. तर एकेदिवशी नाईलाजाने रायाला घरजावई म्हणून सासू-सासऱ्यांचा घरी जावं लागते. तरीही ना डगमगता राया तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. त्यात जर त्याला यश आले तर सावरकरांच्या इंग्रजांच्या कैदेतून सुटकेच्या घटनेइतकंच ऐतिहासिक महत्त्व या घटनेला प्राप्त होईल. श्री प्रमाणेच रायाच सुद्धा बायकोवर नितांत प्रेम आहे. ते सिद्ध करण्यासाठी अधुनमधून तो तिला चहा वैगेरे करून देतो. तुम्ही कितीही वेळ घोटला ना तरी तुम्हाला इतका सुंदर चहा जमणार नाही. रायाच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राया अतिशय शांत आणि संयमी आहे. बहुधा त्याचा हाच गुण बायकांना आवडत असावा. श्री आणि राया यांच्या गाथा ऐकूनच जर तुम्ही थंडे झाले असला तर महात्मा आदित्यच्या तर जवळपासही येऊ नका. हम दिल दे चुके सनम मधल्या आजी देवगणचा वंशज असलेला आदित्य त्याच्या कितीतरी पुढे गेलेला आहे. गंमत अशी आहे की साधारण ज्या लोकांना आपण महात्मा म्हणतो, ते सगळे जन्मानंतर त्यांच्या कर्तुत्वाने महात्मा झाले. आदित्य आईच्या पोटातूनच महात्म्य घेऊन जन्माला आलाय. आदित्य च्या आईचा स्वभाव इतका गोड आहे की तिच्या फक्त सहवासानेच एखाद्याला डायबेटीस होईल. त्यामुळेच आदित्य एक अत्यंत सुस्वभावी मुलगा आहे. लग्नानंतर त्याच्या बायकोने त्याला 'हम दिल आधीचं किसीको दे चुके सनम' असं सांगितल्यावरही तो तिच्यावर चिडला नाही. तिच्यावर नातं स्वीकारण्याची जबरदस्तीही त्यानी केली नाही. याउलट तिला निर्णय घेण्याची मोकळीक दिली. हळूहळू तिला आदित्यचा चांगुलपणा उलगडू लागला. ती त्याला 'तू किती चांगला आहेस रे' असं दर एपिसोड मध्ये तीनदा म्हणायला लागली. तरीसुद्धा आदित्य तिला " मग राहा ना माझ्यासोबत भवाने !' असं एकदाही म्हणाला नाही.शेवटी तिनेच पुढाकार घेऊन प्रेमाच्या सुधारीत आवृत्तीची कबुली दिली. मगच त्यांचा सुखाचा संसार सुरु झाला. पण म्हणून मालिका बंद करण्याइतका आदित्य स्वार्थी नाहीये. तो एक जबाबदार मुलगा,भाऊ,जावई आहे. सगळ्यांच्या घरातल्या सगळ्या समस्या सोडवल्याशिवाय तो शांत बसत नाही. समस्या कमी पडल्याच तर घराबाहेरचं प्रेम प्रकरण सुद्धा तो मार्गी लावून देतो. थोडक्यात म्हणजे श्री,आदित्य,राया ही त्या सर्वशक्तीमान ईश्वराचीच तीन रूपं असल्यासारखी वाटतात. आपल्यासारखे सर्वसामान्य पुरुष त्यांच्यासमोर काय टिकणार ? निदान त्यांची अवतारसमाप्ती होईपर्यन्त आपली धडगत नाही. जास्तीत जास्त आपण सूड म्हणून त्या तिघांना एक शाप देऊ शकतो. "अरे चांडाळान्नो, तुम्हाला सुद्धा रोज ह्याच मालिका बघाव्या लागो रे !!!" --चिनार
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
31919 वाचन

💬 प्रतिसाद (161)

प्रतिक्रिया

रमेश भाटकर ची सिरीयल आठवली..

असंका
गुरुवार, 01/22/2015 - 14:31 नवीन
रमेश भाटकर ची सिरीयल आठवली...खबरदार!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

__/\__

वाह्यात कार्ट
गुरुवार, 01/22/2015 - 11:38 नवीन
सगळ्यांच्या घरातल्या सगळ्या समस्या सोडवल्याशिवाय तो शांत बसत नाही. समस्या कमी पडल्याच तर घराबाहेरचं प्रेम प्रकरण सुद्धा तो मार्गी लावून देतो.
हे आवडलंय...
  • Log in or register to post comments

हा... हा... हा... !!!!!!

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 01/22/2015 - 11:46 नवीन
हा... हा... हा... !!!!!! : मालिकाग्रस्त इ ए
  • Log in or register to post comments

आपली सोडून..

नाखु
गुरुवार, 01/22/2015 - 11:58 नवीन
बाहेरच्यांची समस्या फक्त मालिकावाल्यांनाच सोडवता येतात हे खर आहे. घरातल्या समस्यांची उणीव अशा रित्या भरून काढली जाते. वेळेवर संपवल्यामुळे "अग्निहोत्र" मालिकेचा पंखा ( आणि त्या मुळेच एअर टेल कनेक्शन घेऊन पस्तावलेला)
  • Log in or register to post comments

एवढ काय आहे त्यांच्यात

पदम
गुरुवार, 01/22/2015 - 12:12 नवीन
एवढ काय आहे त्यांच्यात.
  • Log in or register to post comments

बाकी यावरून आठवलं.. माझा एक

आनन्दा
गुरुवार, 01/22/2015 - 12:26 नवीन
बाकी यावरून आठवलं.. माझा एक मॅनेजर म्हणायचा, तुम्हाला जर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग शिकायचे असेल तर या मालिका बघा.. दिग्दर्शक यामध्ये फक्त क्लासेस तयार करून त्यांचे इन्स्टन्सेस सोडून देतो सिरियलमध्ये. बाके सगळे आपोआप होते..
  • Log in or register to post comments

जबरी उपहास! मजा आली.

श्रीगुरुजी
गुरुवार, 01/22/2015 - 12:48 नवीन
जबरी उपहास! मजा आली. आमच्याकडे रोज ८ ते ९:३० या वेळात, "होसूमीत्या", "जुयेरे" आणि नंतर "लौआत्रि" या लागोपाठच्या तीन मालिका हाउसफुल्ल होत असल्याने या दीड तासात हॉलमध्ये फिरकायची आम्हाला परवानगी नाही.
  • Log in or register to post comments

धन्यवाद गुरुजी . आपल्या

चिनार
गुरुवार, 01/22/2015 - 12:55 नवीन
धन्यवाद गुरुजी . आपल्या घरातील प्रेक्षकांना सुद्धा वाचायला द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

चक्क तुमच्या घरचेच तुमचे ऐकत

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 13:54 नवीन
चक्क तुमच्या घरचेच तुमचे ऐकत नाहीत =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

काय करणार? आमच्या सौं. च्या

श्रीगुरुजी
गुरुवार, 01/22/2015 - 20:30 नवीन
काय करणार? आमच्या सौं. च्या इच्छेविरूद्ध ब्र काढायची आमची प्राज्ञा नाही. :YAHOO:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तेव्हाच ईकडे मोठे मोठे

खटपट्या
Fri, 01/23/2015 - 09:12 नवीन
तेव्हाच ईकडे मोठे मोठे प्रतीसाद देउन भरपाई करत असता..:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

खरंय. आम्ही मिपावर येऊन

श्रीगुरुजी
Fri, 01/23/2015 - 22:05 नवीन
खरंय. आम्ही मिपावर येऊन कितीही डरकाळ्या फोडल्या तरी घरी आम्ही शेळी आहोत. *LOL*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

हे "लौआत्रि" काय आहे?

उदय के'सागर
गुरुवार, 01/22/2015 - 14:39 नवीन
हे "लौआत्रि" काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

लौट आओ त्रिशा..?

असंका
गुरुवार, 01/22/2015 - 14:39 नवीन
लौट आओ त्रिशा..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय के'सागर

आयला, असल्या नावाची पण सिरियल

उदय के'सागर
गुरुवार, 01/22/2015 - 14:51 नवीन
आयला, असल्या नावाची पण सिरियल आहे का? कमाल आहे ब्वा... उद्या काहीही वाक्य काढून त्याच्या सिरियल बनवतील.. लाईक : आओ बैठो यहा मूझे अ‍ॅसिडीटी हुई यहा से लेफ्ट लेना कैच्या काय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

अगदी अगदी... मीही विचार करत

असंका
गुरुवार, 01/22/2015 - 15:13 नवीन
अगदी अगदी... मीही विचार करत होतो की हे लौआत्री काय असावं म्हणून. तुम्ही विचारल्यावर एकदम आपोआप शब्द उमटले मनात. आणि मला स्वत:लाच खरं वाटलं नाही की हे असं नाव असेल. मग आधी गूगल वर सर्च केलं आणि खात्री करून मगच इथे लिहिलं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय के'सागर

हा हा हा उदय जबर्‍या

दिपक.कुवेत
गुरुवार, 01/22/2015 - 17:11 नवीन
यहा से लेफ्ट लेना तर खासच!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय के'सागर

काल संध्याकाळी ९ च्या सुमारास

श्रीगुरुजी
Fri, 01/23/2015 - 22:09 नवीन
काल संध्याकाळी ९ च्या सुमारास आमच्या सौ. आमच्या मुलीला सांगत होत्या की "तुला कळलं का, अमृताचा खून झाला ते.". आम्ही दुसर्‍या खोलीत होतो. अमृता नावाची एक महिला आमच्या माहितीतली आहे. त्यामुळे खून झाला हे ऐकल्यावर आम्ही जोरात दचकलो आणि घाईघाईत सौं. ना विचारले की, "काय सांगतेस? अमृताचा खून झाला? शॉकिंग. कधी झाला?". आमच्या सौ. नी अत्यंत त्रासिक आणि केविलवाण्या दृष्टीने आमच्याकडे कटाक्ष टाकून आमच्या बुद्धीची कीव करत सांगितले की "लौआत्रि मधील अमृताचा खून झाला.". हे ऐकल्यावर आमच्या अज्ञानाचे आम्हाला ज्ञान झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय के'सागर

जै रोगेर मूरच आहे ना..

hemants.gokhale
गुरुवार, 01/22/2015 - 14:03 नवीन
ऱोगेर मूर वेर मुलि फिदा होत होत्या असे ऐकले होते , हा जय रोगेर मूर च्या वर आहे , जि याल पहाते ति लगेच फिदा....
  • Log in or register to post comments

ऱोगेर मूर वेर मुलि फिदा होत

वैभव जाधव
Fri, 01/23/2015 - 18:36 नवीन
ऱोगेर मूर वेर मुलि फिदा होत होत्या
रोगेर????? आणी मूर????? शेतातल्या किटकनाशकात पण होमीपाथी आली का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hemants.gokhale

लग्नानंतर सुद्धा त्याचं

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 01/22/2015 - 14:19 नवीन
<<श्री च्या व्यक्तीमत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे लग्नानंतर सुद्धा त्याचं आपल्या बायकोवर नितांत प्रेम आहे.>>> हा खरोखर षटकार आहे राव ;)
  • Log in or register to post comments

(No subject)

चिनार
गुरुवार, 01/22/2015 - 14:37 नवीन
*biggrin* :-D :D +D =D :biggrin: *biggrin* :-D :D +D =D :biggrin: *biggrin* :-D :D +D =D :biggrin:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

तो राया, आयचा - जाम डोक्यात

उदय के'सागर
गुरुवार, 01/22/2015 - 14:49 नवीन
तो राया, आयचा - जाम डोक्यात जातो तो.. त्याचं थोबाड असलं शेळपट आहे, मंदसारखा हसत असतो आणि शाळेतल्या गॅदरींग मधे ज्यांना मारून-मुटकून भाग घ्यायला लावला असतो त्यांच्यासारखे डॉयलॉग डिलीवरी करतो @#$#$@#$... आणि तो श्री... नेहमी ढूं*ण आवळून चालत असतो, आणि चेहर्‍यावर तेच भाव - खळखळून जुलाब होत असल्यासारखे. असं वाटतं की जुलाब दाबून धरलेत आणि कॅमेरा दुसर्‍यावर गेला आणि पुन्हा ह्याच्यावर येईपर्यंत हा मोकळा होऊन येतो. जयमल्हार तर दगडच, हाव-भावाने पण आणि डोक्यानेपण (अतिपैलवानाचा गुडघ्यात असतो म्हणतात तसा). सदा-न-कदा त्याला तो प्रधान सल्ले देत असतो नाहीतर बायको डाफरत असते. हा आपला फक्त डोले-शोले दाखवत फिरत असतो - मख्ख. आणि ह्या सगळ्यात, तुम्ही अस्मिता ला... ओह सॉरी 'अस्मिता प्रभाकार अग्नीहोत्री (हग्रीमुत्रि)" ला कसं विसरलात ? आहो बी.बी.सी शेरलॉक च्या तोडीच्या केसेस असतात... शेरलॉक (बेनेडीक्ट) ने जर पाहिलं ना अस्मिता तर तडक तोही शेरलॉक सोडून ट्रासजेंडर होऊन अस्मिता चा रोल काबीज करेल हो... एवढी जबरदस्त आहे आमची अस्मिता.
  • Log in or register to post comments

हग्रिमुत्रि =))

बॅटमॅन
गुरुवार, 01/22/2015 - 14:55 नवीन
हग्रिमुत्रि =)) =)) =)) आगायायायायायाया, पार वाटच लावलीत की हो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय के'सागर

रायाबद्दल अगदी सहमत. आणि ती

आदूबाळ
गुरुवार, 01/22/2015 - 15:31 नवीन
रायाबद्दल अगदी सहमत. आणि ती रायबाघन नाकाखालच्या भागाला सौम्य सूज आल्यासारखी दिसते. (बाद्वे - ती शिरल संपणारे असं कळलं) काही (कैच्याकै) ऐकीव माहिती: (१) "होणार सुन्न मी याघर्ची" शिरलची संवादलेखिका मधुगंधा कुलकर्णी म्हणजे "जुळू नये ती रे. गा." मधली मोठ्या भावाची बायको (२) "जुळू नये ती रे. गा." फेम प्राजक्ता माळीचा नवरा म्हणजे जैमल्हारचा नवा हेगडे प्रधान (सौजन्यः मातोश्री)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय के'सागर

"होणार सुन्न मी याघर्ची"

उदय के'सागर
गुरुवार, 01/22/2015 - 16:29 नवीन
"होणार सुन्न मी याघर्ची" शिरलची संवादलेखिका मधुगंधा कुलकर्णी म्हणजे "जुळू नये ती रे. गा." मधली मोठ्या भावाची बायको
ही माहिती अगदी बरोबर आहे. स्वतः मधुगंधाचा लोकसत्ता मधे लेख आला होता त्यात तिने ह्याचा उल्लेख केला होता. आणि ती त्या गुणी परेश मोकाशी पत्नी बरं का (माहित नसल्यास). परेश मोकाशी ची पत्नी म्हंटल्यावर आणि अभिनय पण चांगला करते म्हणून तिच्याबद्दल थोडा आदर वाटला(अगदी गोड गोड किंवा नखरेबाज, अक्रस्ताळा, रडका जो अभिनय बाकी बाया करतात त्या सिरीयल मधे, तसा मधुगंधा फार करत नाही म्हणून चांगला अभिनय). पण जेव्हा हे कळालं की हो.सु.मी.ह्या.घ. ची लेखिका ती आहे... आदर पार कोलमडला.
(२) "जुळू नये ती रे. गा." फेम प्राजक्ता माळीचा नवरा म्हणजे जैमल्हारचा नवा हेगडे प्रधान
हे ही शक्य असेल... कारण प्राजक्ता म्हणे हार्डकोर क्लासिकल डांसर आहे आणि तो प्रधान पण आहे क्लासिकल डांसर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

परेश मोकाशी पत्नी बरं का

आदूबाळ
गुरुवार, 01/22/2015 - 17:09 नवीन
परेश मोकाशी पत्नी बरं का
हे माहीत नव्हतं. बाद्वे - का रे दुरावाचा लेखक अंबर हडप आहे हे श्रेयनामावळीत वाचून वाईट वाटलं. बालक पालक (मूळ एकांकिका) आणि "थरारली वीट" सारखी विस्फोटक, वादग्रस्त एकांकिका लिहिणार्‍या वाघाला हे गवत लिहायला लागलं हे वाईट्च
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय के'सागर

ही कदाचित

मी-सौरभ
गुरुवार, 01/22/2015 - 18:20 नवीन
त्याची पोटापाण्याची सोय असावी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

अहो प्रविण तरडेंचं ही तेच

उदय के'सागर
गुरुवार, 01/22/2015 - 19:41 नवीन
अहो प्रविण तरडेंचं ही तेच झालं हो... पुण्यातल्या कॉलेजसला पुरुषोत्तम करंडक मिळवून देणारी नाटकं दिली आणि नुसतं अवॉर्ड /करडंकच नाही पण लोकप्रिय एकांकिका दिल्या. पण नंतर जेव्हा असे गुणी कलाकार पिंजरा, कुंकू सारखे मालिका लिहीतात हे समजलं तेव्हा वाईट वाटलं. (अता पुन्हा नव्याने तरडे साहेब 'क्वालीटी' काम करताहेत हे पाहून छान वाटलं)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मला तर त्या रायाच्या सगळ्याच

थॉर माणूस
गुरुवार, 01/22/2015 - 17:44 नवीन
मला तर त्या रायाच्या सगळ्याच घरच्यांची मजा वाटते... नाही म्हणजे घरातल्या आजीपासून मुलींपर्यंत सगळे एकाच माणसाला राया म्हणत असतील तर किती विचित्र वाटेल ते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय के'सागर

भाऊ

DEADPOOL
गुरुवार, 11/26/2015 - 16:31 नवीन
भाऊ जरा थंड घ्या!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय के'सागर

छळ आहेत.. छळ... बाकी मेघनाने

पिलीयन रायडर
गुरुवार, 01/22/2015 - 14:56 नवीन
छळ आहेत.. छळ... बाकी मेघनाने "प्रेमाच्या सुधारित आवृत्तीची कबुली" खतरनाक पंच!!! एक प्रश्न.. जय मल्हार मध्ये खंडेराय आपले शिवत्व म्हाळसाला देतात ना.. आणि आता मी "सामान्य माणूस" म्हणुन दाग-दागिने काढुन, सेवक सोडुन गेले आहेत ना... मग आता ते जागो जागी "शिवलिंग" कसे स्थापन करत आहेत?
  • Log in or register to post comments

अहो फ्रँचायझी दिली असेल, असं

बॅटमॅन
गुरुवार, 01/22/2015 - 15:36 नवीन
अहो फ्रँचायझी दिली असेल, असं काय करता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

जबरी लिहिलंय

भुमन्यु
गुरुवार, 01/22/2015 - 15:02 नवीन
जबरी लिहिलंय.... आमच्या कडे याचे रिपीट एपिसोड्स पण बघितले जातात.
  • Log in or register to post comments

रिपीट ना!

पैसा
गुरुवार, 01/22/2015 - 19:58 नवीन
त्यात काही वेगळं दिसतंय का बघत असतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भुमन्यु

आदित्यची आई

सिरुसेरि
गुरुवार, 01/22/2015 - 15:28 नवीन
आदित्य नगरकरला काही बोलायचे नाही बरं का ... वा.........
  • Log in or register to post comments

महादेव नावाची सिरियल …

कहर
गुरुवार, 01/22/2015 - 15:40 नवीन
महादेव नावाची सिरियल … सुरुवातीला छान वाटली पण त्यात नंतर तेच तेच राक्षस नवीन नवीन नावाने अवतरीत व्हायला लागले … आणि त्यातही बहुतेक बजेट कमी म्हणून कि काय प्रत्येक राक्षस शिवांश म्हणजे तो रोल पण मोहित रैना करणार …. म्हणजे त्याला महादेवचा अवतार म्हणावे कि राक्षस तेच कळायचे नाहि।… त्या मालिकेत महादेवाणे जसे असुरांचे marathon (WWE च्या भाषेत Royal Rumble Match ) संपवले तशीच ती मालिकाही अचानक मधेच संपवावी लागली …. (२४ वर्षे शिव शंकराचे अखंड स्मरण करणारा आमच्या जवळचा शिवभक्त सुद्धा कंटाळला म्हणे त्या महादेवाला । आता बोला )
  • Log in or register to post comments

जय मल्हार

कपिलमुनी
गुरुवार, 01/22/2015 - 15:46 नवीन
जय मल्हार मध्ये असलेला टॅब आणि व्हिडीओ कॉलिंग जबर्‍या ! आता मला कळला देवांना पृथवीकडे लक्ष द्यायला वेळ का नाहिये ते ;)
  • Log in or register to post comments

अजुन एक....

मोहनराव
गुरुवार, 01/22/2015 - 16:21 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

एवढ्या लोकाना माहिती असलेलं

अजया
गुरुवार, 01/22/2015 - 15:47 नवीन
एवढ्या लोकाना माहिती असलेलं काही मला माहित नसल्याचं दुःख झालंय.बघायला हव्या शिरियली.पण मग पुस्तकं वाचायला वेळ कसा मिळेल? काय विवंचना आहे!
  • Log in or register to post comments

हा... हा... हा... !!!!!!

अविनाश पांढरकर
गुरुवार, 01/22/2015 - 16:12 नवीन
जबरी!! आवडलंय... "अग्निहोत्र" मालिका मस्त होती.
  • Log in or register to post comments

चिन्मय मांडले लिखित "असंभव "

कहर
गुरुवार, 01/22/2015 - 16:34 नवीन
चिन्मय मांडले लिखित "असंभव " सुद्धा आवडली होति आपल्याला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश पांढरकर

लेखक म्हणून चिन्मय मांडले

उदय के'सागर
गुरुवार, 01/22/2015 - 16:43 नवीन
लेखक म्हणून चिन्मय मांडले चांगला असेलही (असंभव आणि अग्निहोत्र दोन्ही मी पाहिल्या नाहीत) पण अभिनय मात्र फार भडक करतो हा माणूस. "तू तिथे मी" सिरीयल मधला त्याचा अभिनय तर फारच अंगावर यायचा (अगदी कधी एखादा एपीसोड काही मिनीटांसाठीही पाहवत नव्ह्ता.. असो, एकदाची संपली - बरं झालं)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर

चिन्मय मांडलेकर अभिनय सुंदर

कहर
गुरुवार, 01/22/2015 - 18:06 नवीन
चिन्मय मांडलेकर अभिनय सुंदर करतो पण भूमिका तशी हवि… त्याचा झेंडा आणि मोर्यातील अभिनय छान आहे… पण डेली सोप "तू ती मी "बद्दल… नो कमेंट्स *secret* :-X :-x X: x: :-# :# :secret:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय के'सागर

हो काही ठिकाणी अभिनय छान

उदय के'सागर
गुरुवार, 01/22/2015 - 19:43 नवीन
हो काही ठिकाणी अभिनय छान केलाय खरा. मला त्याचा गजर (गाजर नव्हे) मधला अभिनय पण चांगला वाटला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर

आपण एवढे सीरीयल्सच्या नावाने शंख करतो

दिपक.कुवेत
गुरुवार, 01/22/2015 - 17:15 नवीन
पण त्यात काम करणार्‍या लोकांना एवढं गोड गोड (प्रत्येक एपीसोड मधे) वागून कंटाळा येत नसेल?
  • Log in or register to post comments

पैसे मिळतात...मी तर

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 17:18 नवीन
पैसे मिळतात...मी तर जान्व्हीसाठी फुकटपण काम करेन ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

म्हणजे जान्हव्हीच्या रोल साठि??

दिपक.कुवेत
गुरुवार, 01/22/2015 - 17:22 नवीन
काय पण चॉईस!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

+१

मोहनराव
गुरुवार, 01/22/2015 - 17:25 नवीन
तिचा आवाज ऐकून tv फोडावासा वाटतो…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

नाही रे....

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 17:26 नवीन
नाही रे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा