लोकहो,
कळविण्यास अत्यंत आनंद होतो की मिसळपाव वर लवकरच आम्ही छंदशास्त्राचे सदर सुरू करीत आहोत.
मिसळपाववर काव्यलेखनाची उर्मी अनेकांना आहे. त्यांची प्रतिभाही चांगली आहे. पण आमच्या पाहण्यात असे आले आहे की, अनेक नवोदित कवींची वृत्तांवर पकड नाही. वृत्तात निर्दोषपणे लिहिता येणे अत्यंत आवश्यक आहे. वृत्तात कविता फसली की भातात खडा आल्यासारखे ते काव्य खटकते. परिणामी त्यातील रंजकता निघून जाते.
मराठीत अनेक उत्तमोत्तम वृत्ते आहेत. पण आज दुर्दैवाने मुक्तछंदाच्या नावाखाली पाडल्या गेलेल्या तथाकथित काव्याकडे अनेकांचा ओढा आहे. वृत्तात लिहायचे म्हणजे ते वृत्त अंगवळणी पडेपर्यंत श्रम घ्यायला लागतात. नाहीतर एखाद्या वृत्तपत्रातील अग्रलेखाचे तुकडे करूनही मुक्तछंदातली कविता होते. तर ते असो.
काही वर्षांपूर्वी एका मराठी संकेतस्थळावर आम्ही छंदशास्त्राबद्दल लिहिले होते आणि त्याला प्रतिसादही उत्तम मिळाला होता. त्यानंतर तसा कुणी प्रयत्न केल्याचे पाहण्यात नाही.
नाही म्हणायला आमचे स्नेही श्री.चित्तरंजन भट यांच्या सुरेशभट डॉट इन या संकेतस्थळावर गझलेची बाराखडी आहे. पण त्यात फक्त गझल एके गझल हा एकच पाढा आहे. केवळ गझल म्हणजे काव्य नाही. असो.
तर मराठीतील विविध वृत्तांची अभ्यासकांना माहिती व्हावी आणि त्या वृत्तांचा अभ्यास करून निर्दोष काव्याची निर्मिती त्यांच्याकडून व्हावी म्हणून हे सदर सुरू होत आहे. याचा दुवा कायम मुख्यपृष्ठावर असेल. जेणेकरून त्यातील लेखन वाचण्यासाठी शोधाशोध वा उत्खनन करावे लागणार नाही.
नवीन कवींनी याचा लाभ घेऊन आपल्या कक्षा विस्तृत कराव्यात, नुसत्या जिलब्या न पाडता चांगले काव्य निर्माण करावे हा अपेक्षेसह.
आपला,
(छंदशास्त्री) धोंडोपंत
विशेष
वाचने
4172
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद!
पंत, उत्तम
स्तुत्य उपक्रम
वेगळा उपक्रम
कार्यशाळाही घ्या.
उत्तम उपक्रम...
भुक