Skip to main content

' यज्ञ आहे हा जिवाला जाळण्याचा...'

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 12/01/2015 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
यज्ञ आहे हा जिवाला जाळण्याचा प्रेम नाही छंद नुसता भाळण्याचा छान हा दु:खासही आला फुलोरा ये, वसा घे वेदनेला माळण्याचा आणशी हे रोज तू कोठुन बहाणे केवढा हा सोस तुजला टाळण्याचा मी करू चिंता कशाला काजळाची सोडला संकल्प मी डागाळण्याचा श्वास घे माझे तुझ्या श्वासात भरुनी ये, ऋतू आला फुले गंधाळण्याचा डॉ.सुनील अहिरराव
लेखनविषय:

वाचने 2201
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

छान!

मतला सुंदर आहे एकदम यज्ञ आहे हा जिवाला जाळण्याचा प्रेम नाही छंद नुसता भाळण्याचा