आपल्याला शाळेत असताना प्रश्न विचारायचे, तु मोठेपणी काय होशिल? आपण पण सांगायचो, इंजीनिअर, डॉक्टर. बास एवढच माहिती. माझ्या एका मित्राने साइंटिस्ट असे सांगून देखण्या मॅडमची वाहवा मिळवली होती. आत तो आयटी मधे हमाल आहे. असो. मी नोकरी चालू केल्यापासून मला नेहमी एक प्रश्न पडत आलाय, मी माझ्या क्षेत्रात पुढे काय बनेन, मॅनेजर कि लिडर? कि दोन्ही? म्हणजे मी ऑन रोल मॅनेजर असेन पण माझ्या हाताखाली काम करणारे कर्मचारी मला काय समजतील? आता कितीही प्रयत्न केला तरी कोणी आदर्श (लोकप्रिय नव्हे) मॅनेजर बनू शकत नाही. मान्य. पण हा लिडर बनणे म्हणजे काय प्रकार असतो?
मॅनेजर आणि लिडर या तशा वेगवेगळ्या आणि विशिष्ट अर्थ असलेल्या संज्ञा आहेत. राजकारणातल्या किंवा सामाजिक कार्य करणार्या व्यक्तीला आपण मॅनेजर म्हणत नाही. तसेच एखादे मोठे हॉटेल चालवणार्या व्यक्तीस आपण लिडर म्हणणार नाही. देवाच्या नावावर माया गोळा करणार्यांचा देवाचे मॅनेजर म्हणून तिरस्कार करण्यात येतो. व्याख्येनुसार मॅनेजर हि अशी व्यक्ती असते जिच्याकडे काहि ठराविक कार्ये करुन घेण्याची जबाबदारी असते. हि कार्ये एकट्या व्यक्तीने करण्याजोगी नसतात आणि यासाठी मॅनेजरच्या हाताखाली काही कर्मचारि असतात. तसेच लिडर हि तिच्या क्षेत्रातली एक प्रभावशाली व्यक्ती असते जीच्या विचारांचे इतरांवर नियंत्रण असते आणि त्यांना काम करण्यास प्रवृत्त करू शकते.
परंतु क्षेत्र बदलते तसे यांचे अर्थ बदलतात, एकमेकात घुसडण्यात येतात. उदा. कार्पोरेट क्षेत्र, त्यातल्या त्यात भारतातील आयटी क्षेत्र. ईथे मॅनेजर पदाला पोहोचलेल्या व्यक्तीला सर्रास लिडर म्हणले जाते. त्यात कहर म्हणजे मॅनेजरच्या व्हायच्या आधिचा एक रोल असतो; काही कंपन्या त्याचे नामकरण करतात टिम लिडर. (एका कंपनीने हुशारी दाखवत याचे नाव 'टेक्नॉलॉजी लिडर' केले. काम तेच.) काही अपवाद वगळता हा रोल हरकाम्याचा जास्त असतो. म्हणजे मॅनेजर सांगेल तशी कामे करायची (स्वतःची आणि मॅनेजरची) आणि हाताखालच्या दोन चार लोकांना कामे वाटून द्यायची. मग हा लिडर काय झाला कप्पाळ! विचार करा, आजपर्यंत आपण ज्याच्या हाताखाली काम केले असा कुठला मॅनेजर लिडर वाटतो? या आयटी मधे तरी किती मॅनेजर आहेत कि जे प्रोजेक्ट बिलिंग, डेडलाईन्स आणि रिक्वायरमेंट च्या पलिकडे जाउन आपल्या कर्मचार्याला निदान करियरसाठी तरी मार्गदर्शन करतात? थोडक्यात अशा क्षेत्रातल्या मॅनेजरना लिडर म्हणणे म्हणजे एक विनोद आहे, किमान मधल्या फळीतल्या तरी!
आता काही मॅनेजमेंट गुरूंच्या मते सध्या कॉर्पोरेटमध्ये मॅनेजमेंट आणि लिडरशीप यांचा वेगवेगळा विचार करता येउच शकत नाही. असे असेल तर 'लिडिंग द प्रोजेक्ट' आणि 'मॅनेजिंग द प्रोजेक्ट' मधे काही फरक आहे कि नाही? मुळात 'लिडिंग द पिपल' असा लिडरचा आशय असताना 'लिडिंग द प्रोजेक्ट' हा नवा विचार जन्माला घातला आहे.
हा माणूस लिडर आहे. बर हा काय लिड करतो तर हा प्रोजेक्ट लिड करतो. म्हणजे नक्की काय करतो, तर हा प्रोजेक्ट सांभाळतो म्हणजेच मॅनेज करतो. अरे हा तर प्रोजेक्ट मॅनेजर आहे, गेला बाजार ह्याला त्या प्रोजेक्ट मधले लोक स्वतःचा लिडर समजतात का? नाही, उलट याला शिव्या घालत असतात. मग कसला डोंबलाचा लिडर? लिडरशीप हि गोष्ट आपण ज्यांच्यासाठी काम करतो त्यांच्या म्हणण्यात नाही तर आपल्यासाठी जे लोक काम करत असतात त्यांच्या समजण्यात असते.
आता कंपनीच्या उच्च्पदस्थांना सर्रास लिडर म्हणले जाते कारण ते एखादा विभाग किंवा पुर्ण कंपनी सांभाळत अहं लिड करत असतात. भलेही लिडर म्हणवून घ्यायचे मुलभूत गुण त्यांच्यात असोत कि नसोत. म्हणजे त्यांच्यावरती कोणी मॅनेजर नाही म्हणून ते आपोआप लिडर होतात. आता हे बिरूद उच्च्पदापर्यंत मर्यादित न राहता हरकाम्या टिम लीड पर्यंत येउन पोहोचले आहे. काही पुरस्कार सोहळेही आहेत जिथे कॉर्पोरेट क्षेत्रातले 'लिडरशिप पुरस्कार' अशा उच्च्पदस्थांना देण्यात येतात ज्यांनी त्यांची कंपनी उत्तमरित्या चालवून दाखवलेली आहे. अशा पुरस्कारांसाठी निवडताना यांच्या ज्या 'लिडरशिप कॉलिटीज' विचारात घेण्यात येतात त्यायल्या किती लिडरशिप या सदरात मोडतात आणि किती मॅनेजमेंट या सदरात?
मॅनेजरची व्याख्या आहे तशीच आहे याबाबत कुणाचे दुमत नसेल. पण यामुळे लिडरच्या आता दोन व्याख्या तयार झाल्या आहेत. एक, ज्याच्या हाताखाली काही लोक काम करतात तो लिडर आणि दोन, जो यशस्वीरित्या कंपनीसाठी भरिव योगदान देतो तो त्यातल्या त्यात उत्तम लिडर.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
19632
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला मॅनेजर = जो कंपनीचे
बदलेले अर्थ
In reply to चांगला मॅनेजर = जो कंपनीचे by डॉ सुहास म्हात्रे
माझ्या प्रतिसादाच्या खालच्या
In reply to बदलेले अर्थ by जातवेद
कंपन्यांमधल्या हुद्द्यांमुळे
टॅक्टीकलअसतो. लीडर स्ट्रॅटेजीक असतो, कंपनीला किंवा कंपनीच्या एखाद्या विभागाला दिशा देण्याचे काम लीडर करतो. लीडर कंपनीत अजून लीडर तयार करतात. कुठल्याही क्षेत्रात ह्या व्याख्या सेमच असतात. -(लीडर) सोकाजीम्हणजे कंपनीतल्या लिडरची
In reply to कंपन्यांमधल्या हुद्द्यांमुळे by सोत्रि
@लीडर हा निष्णात मॅनेजर असतो,
In reply to कंपन्यांमधल्या हुद्द्यांमुळे by सोत्रि
(No subject)
ते जरा आकसून घ्या कि
In reply to (No subject) by स्पा
स्व संपादन नसल्याने आमचा पास
In reply to ते जरा आकसून घ्या कि by जातवेद
वरच्या फोटोत मी आहे ?
In reply to ते जरा आकसून घ्या कि by जातवेद
तुम्ही तेव्हा हॉटेलात होता
In reply to वरच्या फोटोत मी आहे ? by सस्नेह
(No subject)
लिडर
फार उच्च्पदस्थ लोक लिडर
In reply to लिडर by आरोह
नाही!
In reply to फार उच्च्पदस्थ लोक लिडर by जातवेद
पण मधल्या फळीतल्या आणि
In reply to नाही! by सोत्रि
तेच म्हणतोय, तुम्ही कंपनीतले
In reply to पण मधल्या फळीतल्या आणि by जातवेद
बरोबर
In reply to तेच म्हणतोय, तुम्ही कंपनीतले by सोत्रि
इसिलिए इंडिया मार खाता है :)
आणि मुख्य म्हणजे त्यांचे पालक
In reply to इसिलिए इंडिया मार खाता है :) by क्लिंटन
गावाकडे अजुन हेच चालतं
In reply to इसिलिए इंडिया मार खाता है :) by क्लिंटन
शहरातही काही दिवे लावत नाहीत.
In reply to गावाकडे अजुन हेच चालतं by जातवेद
म्यानेजर आणि लीडर
अहो नावात काय आहे
हायला…!
In reply to अहो नावात काय आहे by सुबोध खरे
फक्त असा पेपर फेकून मारणार्
In reply to हायला…! by संदीप डांगे
गावाकडे असंच असते हो.
In reply to फक्त असा पेपर फेकून मारणार् by क्लिंटन
मिसलिडिंग हुद्दे
In reply to अहो नावात काय आहे by सुबोध खरे
ह्म्म्म
In reply to अहो नावात काय आहे by सुबोध खरे
स्टीफन कोव्हे म्हणतो तसे
५ पातळ्या
परिस्थितीजन्य नेतृत्व
शरू रांगणेकर
In reply to परिस्थितीजन्य नेतृत्व by बोका-ए-आझम
मॅनेजर आणि लिडर…
हेच
In reply to मॅनेजर आणि लिडर… by अभिदेश
लीडर
.
In reply to लीडर by चिरोटा
आलमगीर औरंगजेब यांना "अरे
In reply to . by hitesh
. गुस्ताखी माफ
In reply to आलमगीर औरंगजेब यांना "अरे by हाडक्या
चालणारच नाही
In reply to . गुस्ताखी माफ by hitesh
खिक्क...."ह.भ.प. औरंगजेब"
In reply to आलमगीर औरंगजेब यांना "अरे by हाडक्या
टका .. भावना दुखावणारी
In reply to खिक्क...."ह.भ.प. औरंगजेब" by टवाळ कार्टा
"ह.भ.प." वैट्ट आहे????
In reply to टका .. भावना दुखावणारी by हाडक्या
आलमगीर जिकडे पहातात ते कधीच
In reply to "ह.भ.प." वैट्ट आहे???? by टवाळ कार्टा
वास्तव मधे
In reply to लीडर by चिरोटा
सहमत
In reply to वास्तव मधे by जातवेद
शेवटचे उदाहरण
In reply to सहमत by चिरोटा
ते
In reply to शेवटचे उदाहरण by जातवेद
बाकी लीडर म्यानेजर
वाचतीये. सोत्रींशी सहमत.
मी तर..
(No subject)
In reply to मी तर.. by नाखु
(No subject)
In reply to मी तर.. by नाखु
(No subject)
In reply to मी तर.. by नाखु
हा हा हा
In reply to मी तर.. by नाखु
अगागागागागा =)) धन्य _/\_
In reply to मी तर.. by नाखु
हाहाहाहा
In reply to मी तर.. by नाखु
जालावरुन साभार.