Skip to main content

कार्टून्स आणि कॉमिक्स

लेखक पिंपातला उंदीर यांनी शुक्रवार, 09/01/2015 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
… १९९२ साल . बोलता बोलता शेजारचा नित्या मला म्हणाला ," काय येत तुमच्या सुपर कमांडो ध्रुव ला . आमचा नागराज विषारी फुंकर मारून दोन मिनिट मध्ये आडवा करेल त्याला ." मला पण चेव चढला . मी पण नागराज कसा घाणेरडा आहे हे सांगून तिथल्या तिथे परतफेड केली . शब्दाने शब्द वाढत गेला . बोलचाल बंद झाली . राज कॉमिक्स चे नागराज , परमाणु , डोगा हे कॉमिक्स नायक जाम प्रसिद्ध होते . पोरांनी आपले आपले हिरो निवडले होते . कंपू तयार झाले होते . दुसऱ्या नायकाचा चाहता हा शत्रू पक्षातला होता . नंतर मी गावातून बाहेर पडलो . नित्याशि संबंध संपला . कॉमिक्स शी असणारा संबंध पण संपला . नंतर काही वर्षांनी सुट्टी घेऊन घरी आलो होतो . मी घरी पेपर वाचत बसलो होतो . आई भाजी निवडत बसली होती . बोलता बोलता माझ्या मित्रांचा विषय निघाला . आईने नितीन बद्दल सांगितलं ,"अरे तो नितीन आहे ना कुलकर्णी बाईचा . त्याला काहीतरी रोग झाला रे . पायातली ताकत च गेली . व्हील चेयर वर खुरडत फिराव लागत बिचार्याला . किती हुशार मुलगा होता आणि काय झाल बिचार्याच ." मला एकदम कसतरीच झाल . न राहवून कपडे चढवले . बाजूच्या कॉलनी मधल्या त्याच्या घरी घरी त्याला भेटायला गेलो . त्याची आई बाहेर देवासमोर दिवा लावून बसली होती . "काकू नितीन आहे ?" "हो आहे कि . उदगीरकर न रे तू ? बर्याच वर्षांनी आलास . नितीन मधल्या खोलीत आहे . भेटून घे . चांगल वाटेल त्याला . आताशा फारस कोणी येत नाही . " मी खोलीत गेलो . नित्या पलंगावर आडवा पडून वाचत होता . जवळ गेल्यावर कळल . त्याच्या हातात पण सुपर कमांडो ध्रुव च पुस्तक होत . आजुबाजू ला पण कॉमिक्स पडली होती . "आता नीट वाचल्यावर आणि या वयात कळतंय . सुपर कमांडो ध्रुव च भारी होता ." नित्या हसत हसत बोलला . मला काही बोलवेच ना . गळ्यात काहीतरी अडकल्यासारख झाल होत . ……… मी आणि बाबा दोघेही Tom & Jerry चे चाहते . आम्ही दोघेही एकत्रच ते कार्टून बघायचो . आणि मग सगळ घर हसण्या ने भरून जायचं . बाबा Tom च्या बाजूने तर मी jerry च्या बाजूचा . नेहमी शेवटी jerry च जिंकायचा . मग बाबा माझ्या पाठीवर बुक्का मारून म्हणायचे , " अगली बार ." पण ती अगली बारी कधीच नाही आली . एकदा मी उसासून बाबाना म्हणालो , " का तुम्ही नेहमी हारणाऱ्या Tom ची बाजू घेता ?" एकदम हसणार्या बाबांच्या चेहऱ्यावर गांभीर्य आल , "ते तुला अजून काही वर्षांनी कळेल ." आता मी तिशीत आहे . अजून पण वेळ मिळेल तस टोम &जेरी बघतो . बाबा त्यावेळेस काय म्हणाले होते ते आता कळत आहे . हा साला जेरीच खोड काढतो टोम ची . आणि आकाराने मोठा असून पण भाबडा Tom नेहमी जेरी कडून मार खातो . साला जेरी च दुष्ट आहे . गेल्या काही वर्षात मार खाणार्या सगळ्यांबद्दल सहानुभूती वाटत आहे . स्वतःसकट . …… ज्यादिवशी नांदेड वरून काका आणि आजोबा येणार असत त्यादिवशी मी एकदम खुश असे . येताना ते माझ्यासाठी खूप कॉमिक्स घेऊन येत . एकदा असेच ते आले तेंव्हा त्यांच्या हातात कॉमिक्स नव्हते . माझा चेहरा उतरला . "अरे पुढच्या वर्षी दहावी न तुझी . आता तु मोठा झालास . आता कसले कॉमिक्स वाचतोस . " मामा ने बहुतेक माझ्या मनातले भाव वाचले असावेत . मी मोठा झाल्याच माझ्या अगोदर इतराना कळल होत . मोठ झाल्यावर कॉमिक्स वाचता येत नसतील तर काय करायचं मोठ होऊन . मी कमवायला लागल्यावर घर भरून कॉमिक्स घेईल असा बेत मी आखला होता . मी बघितलेलं भविष्य काळासाठीच ते पाहिलं स्वप्न होत . स्वतःच अस काहीतरी . त्यादिवशी ते तुटल . आणि हि तर फ़क़्त सुरुवातच होती . ……… नौकरी ला लागल्यावर पहिले भाड्याने flat घेतला . आता कुणासोबत आपली स्पेस शेयर करायची गरज नव्हती . एक टीवी पण घेतला . डिश टीवी वाल्याच्या दुकानात गेलो . तो मला वेगवेगळे packages समजावून द्यायला लागला . पण कामाच तो काही बोलेना . शेवटी न राहवून मीच बोललो , "मुझे कार्टून चानाल्स भी चाहिये . मुझे कार्टून देखना अच्छा लगता है ." त्या माणसाच्या चेहऱ्यावर आलेले सहानुभूतीचे भाव अजून पण डोळ्यासमोरून जात नाहीत . कार्टून्स आणि कॉमिक्स ने प्रचंड आनंदाचे क्षण दिले आहेत त्या सर्व क्षणांसाठी हा लेखन प्रपंच . आणि ह्या गोष्टी वाचणे आणि पाहणे हा 'पोरवडा ' आहे अश्या समाजाबद्दल प्रचंड सहानुभूती . ते काय मिस करत आहेत हे त्यांचे त्यांनाच कळत नाहीये .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23949
प्रतिक्रिया 103

प्रतिक्रिया

In reply to by मराठे

बसल्या बसल्या उगाच स्पायडर-मॅन सारखं जाळं टाकण्याची अ‍ॅक्शन करायचो.
ह्या ह्या ह्या.. आमी अजून पण करतो हे. बायकोने काही मागितले की त्या वस्तूच्या दिशेने ही अ‍ॅक्शन करायची(तोंडाने वेबचा आवाज करायचा) आणि "आत्ता वेब चालत नाहीये, चालू झाल्यावर देतो" म्हणून जागेवरून हलायचं नाही (अर्थात "अंतिम चेतावनी" पर्यंतच हा ) .. हा आमचा फेवरिट उद्योग .. ;)

In reply to by धडपड्या

बडे मियां - छोटे मियां आणि त्यांच्या महाबिल्ला शहरातल्या करामातींचा मी पंखा आहे :)

In reply to by टवाळ कार्टा

खरं सांगू का? स्वॉट कॅट विसरलोच होतो. सध्या कुठल्या चॅनेल्वर चालू आहेत का? नाही तर डाऊन्लोड करावे म्हण्तो.

In reply to by टवाळ कार्टा

मेगा कॅट सिटी.... वाय..पर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र! छोटे म्यांऊ...वो तुम्हारे पिछे आ रहा है... देख रहा हूं....बूम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म.... दे मारा.......

टिंकल नावाच्या मुलांसाठीच्या मासिकात ' शिकारी शम्भू ' आणि सुप्पन्दी नावाची दोन कार्टून्स असायची. शम्भूची टोपी त्याच्या डोक्यावर इतकी दाबलेली असायची की त्याचे डोळे दिसायचेच नाहीत आणि सुप्पन्दी म्हणजे पेप्सीचा फिडो डिडो!

ट्विंकल पण भारी होत . शिकारी शंभू लई कॉमेडी होता . त्याच्यावर चित्रपट येणार अस वाचल होत . त्याबरोबर बहादूर नावच ऐक डितेक्तिव पात्र पण होत .

अगदी सुपर्ब लिहीलयं!! कार्टुन्स नी हे जग अतिशय सुंन्दर बनवलं अस आजही माझं मत आहे.

आवरा होवुन्शिनी कोनालाच कुमार नाय आठोलं

लेख मनाला भावला. लेखक फक्त राज कॉमिक्स वाचायचा असे वाटते . आमच्यात कधीही हिरो वरून भांडण झाली नाही पण ध्रुव मला नागराज पेक्ष्या जरा कमीच शक्तिशाली वाटायचा , कॉमिक्स म्हटले कि राज प्रकाशन सोबत डायमंड च्या उल्लेख अपरिहार्य आहे चाचा चौधरी , बिल्लू पिंकी अशी त्यांची गाजलेली अनेक नायक आता आठवते ५ वी पासून हि कॉमिक्स हिंदीत वाचून माझे हिंदी बोलणे इतर मुलांच्या पेक्ष्या जास्त सफाईदार झाले होते उदा चाचा चौधरी का मस्तिष्क कम्प्युटर से तेज चलता हे अशी वाक्ये वाचून अनेक दुर्बोध हिंदी शब्द सहजरीत्या आत्मसात होत गेले. ह्या कॉमिक्स ची हॉरर सिरीज सुद्धा यायची. रेल्वे च्या बुक स्टोल व स्टेशन बाहेरील पेपर च्या स्टोल वर आम्ही कॉमिक्स प्रिय मंडळी लक्ष ठेवून असायचो ,आपल्या नायकाचे नवे पुस्तक कधी येणार ह्याची आतुरतेने वाट पाहायचो आमच्या ह्या आवडीला निकृष्ट दर्जा तत्कालीन वडीलधार्या व शिक्षक मंडळींनी दिला होता. आताचे पालक मुलांना दुकाना बाहेर रांगा लावून हेरी पोटर घेऊन देतात तेव्हा त्यांचे कौतुकवजा हेवा वाटतो , मराठीत ठक ठक चा दिपू दि ग्रेट व चंपक मधील चंपू ससा चांदोबा मधील विक्रम वेताळ दर महिन्याला आवडीने वाचायचो कितीतरी वेळा मित्रांच्या कडून पुस्तकांची आदला बदली व्हायची. रद्दीच्या दुकानात तासंतास पडीक राहून एखादे दुर्मीळ बालसाहित्य शोधून स्वस्तात विकत घ्यायचे व त्यासाठी सुट्टीच्या काळात शहरातील रद्दीची दुकाने सायकल वरून पालथी घालण्यात भारी मौज वाटायची , ह्या लेखाने सर्व आठवणी ताज्या झाल्या.

सिन्दबाद जहाजी मधले "डोले रे डोले डोले डोले रे , बोले रे बोले बोले बोले रे , अगर मगर डोले नैया , इधर उधर जाये रे पानी , निला समुन्दर है , आकाश प्यासी , डुबे ना डुबे ना मेरा जहाजी " हे गाणे मस्तच आवडले . दानू दानासुर मधले "दानु है दानु इतनासा जानु , छिपकली के नाना है , छिपकली के है हुजुर ,दानासुर , दानासुर दानासुर " हेही गाणे मस्तच आवडले . गुलजार यांनी सिन्दबाद , दानू दानासुर , जंगलबूक मधली शिर्षक गीते लहान मुलांकडून गाउन घेतली . त्यामुळे ती मजेदार वाटतात . अलादीनचे डबिंग सुमित राघवनने केले होते त्यामुळेही व एकुणच अलादीन मालिका आवडायची . "एक , दोन , तीन , चार " , सिग्मा , फेअरी टेल्स थिएटर , इन्द्रधनुष याही मालिका आवडल्या .

आपल्याकडे चाचा चौधरींवर चित्रपट बनला तर चाचा चौधरींची भुमिका ओम पुरी ह्यांनी तर साबुची भुमिका खलीनी करावी असं मनात वाटुन जातं.

कल्पना भारी आहे . मला एकूण अंगकाठी आणि विनोदाचा सेन्स पाहता राजपाल यादव जास्त योग्य वाटतो

लेखाने आणी प्रतीसादात उल्लेखलेल्या सर्वांमुळे हळवा झालो.. ह्या कार्टुन्सनी बालपण समृद्ध केल होतं.. त्यावेळी ह्यांच जग खरं वाटायचं आणी आता ह्यांच्या सारखं जग असाव असं वाटत.

१९६० ते १९६६ हा साधारण काळ हे सगळं हाताळण्याचा. त्याकाळी चांदोबा लोकप्रिय होता. पण त्याला चित्रकथा म्हणता येईल. पण मला इंद्रजाल कॉमिक्सच्या पुस्तकानी वेड लावले. मॅड्रेक,लोथार, वेताळ डायना, डेंकाली ई नावे अजूनही स्मरणात आहेत. पुढे या प्रकाराचा प्रसार खूप म्हंणजे खूप झाला. पण अर्नाळकर मग काकोडकर ( राजाराज राजे कथा) ..जेम्स हॅडले चेस असा प्रवास सुरू झाल्याने चित्ररूप नायक मागे पडले.

In reply to by निनाद मुक्काम …

सुमीत चा फास्टर फेणे पण खासच तो कुठे उपलब्ध होऊ शकेल का? फाफआ, बिपीन बुकलवार वगैरे फार आवडायच लहानपणी

सिंदबाद म्हटला कि डोळ्यासमोर येतो ते अलिफ लैला रामानंद सागर ची अजरामर प्रस्तुती एखाद्या छोट्या मजकुराएवढे एक उर्दू वाक्य आणि सिंदबाद ची तलवारे सुलेमानी आणि विलासराज

मस्त धागा लहानपणी आत्या मावशी वगैरे पाहुण्यांनी खाऊसाठी दिलेले एक दोन रुपये साठवून १०-१५ रुपये साठले कि बस स्थानकावरच्या बुक डेपो मधून कॉमिक्स आणायचो ( त्याच दुकानात मिळायची)। चाचा चौधरी,शक्तीपुत्र , अग्निपुत्र अभय, फौलादी सिंह आणि किती किती कॉमिक्स जमवली होती । अजूनही एक पिशवी भरून आहे … सध्या dl करूनच वाच्तो… x men , iron man , avenger आणि नागराज, ध्रुव, भोकाल ,भेरीया, डोगा, परमाणु, योध्द्ध असे कितीतरी कॉमिक्स ने जवळपास २०-३० gb जागा नक्कीच भरली असेल laptop ची सध्या ध्रुव चे Hunters , मल्टीस्टारार सर्वनायक - सर्वसंहार प्रकाशित झाले आहे । नागराज च्या नरकाहुति आणि क्षतीपुर्ती च्या प्रतीक्षेत आहे (नागराज का ) कहर

In reply to by कहर

x men , iron man , avenger आणि नागराज, ध्रुव, भोकाल ,भेरीया, डोगा, परमाणु, योध्द्ध असे कितीतरी कॉमिक्स ने जवळपास २०-३० gb जागा नक्कीच भरली असेल laptop ची कस जमवलत? दोउन्लोड कुठुन केल?

Transformers चा उल्लेख कसा झाला नाही अजून? मायकेल बेने चित्रपटांचा चुथडा केला असला तरी मूळ मालिका भारी होत्या.

चाचा चौधरी, पिंकी बरोबर बांकेलाल पण खुप वाचायचो. शेंडीवाला बांकेलाल अडचणीत सापडलेल्या राजाला मदत करायचा. ही बघा लिंक

अजून पोपोय हि आठवला नाही का कुणाला ? हिरव्या पालेभाज्या नावडणार्या अमेरिकन मुलांना spinich (पालक) खाण्यात रस निर्माण व्हावा म्हणून या कार्टून पात्राची निर्मिती झाली …. त्याच्या हिंदी अनुवादात gf ऑलिव ला मेघना एरंडे नि आवाज दिला होत…

गेल्या काही वर्षात मार खाणार्या सगळ्यांबद्दल सहानुभूती वाटत आहे . स्वतःसकट .
बरोबर. कार्टुन्स आवड्ने हे निर्भेळपनाचे लक्सन वाटते मला.