✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कार्टून्स आणि कॉमिक्स

प
पिंपातला उंदीर यांनी
Fri, 01/09/2015 - 10:55  ·  लेख
लेख
… १९९२ साल . बोलता बोलता शेजारचा नित्या मला म्हणाला ," काय येत तुमच्या सुपर कमांडो ध्रुव ला . आमचा नागराज विषारी फुंकर मारून दोन मिनिट मध्ये आडवा करेल त्याला ." मला पण चेव चढला . मी पण नागराज कसा घाणेरडा आहे हे सांगून तिथल्या तिथे परतफेड केली . शब्दाने शब्द वाढत गेला . बोलचाल बंद झाली . राज कॉमिक्स चे नागराज , परमाणु , डोगा हे कॉमिक्स नायक जाम प्रसिद्ध होते . पोरांनी आपले आपले हिरो निवडले होते . कंपू तयार झाले होते . दुसऱ्या नायकाचा चाहता हा शत्रू पक्षातला होता . नंतर मी गावातून बाहेर पडलो . नित्याशि संबंध संपला . कॉमिक्स शी असणारा संबंध पण संपला . नंतर काही वर्षांनी सुट्टी घेऊन घरी आलो होतो . मी घरी पेपर वाचत बसलो होतो . आई भाजी निवडत बसली होती . बोलता बोलता माझ्या मित्रांचा विषय निघाला . आईने नितीन बद्दल सांगितलं ,"अरे तो नितीन आहे ना कुलकर्णी बाईचा . त्याला काहीतरी रोग झाला रे . पायातली ताकत च गेली . व्हील चेयर वर खुरडत फिराव लागत बिचार्याला . किती हुशार मुलगा होता आणि काय झाल बिचार्याच ." मला एकदम कसतरीच झाल . न राहवून कपडे चढवले . बाजूच्या कॉलनी मधल्या त्याच्या घरी घरी त्याला भेटायला गेलो . त्याची आई बाहेर देवासमोर दिवा लावून बसली होती . "काकू नितीन आहे ?" "हो आहे कि . उदगीरकर न रे तू ? बर्याच वर्षांनी आलास . नितीन मधल्या खोलीत आहे . भेटून घे . चांगल वाटेल त्याला . आताशा फारस कोणी येत नाही . " मी खोलीत गेलो . नित्या पलंगावर आडवा पडून वाचत होता . जवळ गेल्यावर कळल . त्याच्या हातात पण सुपर कमांडो ध्रुव च पुस्तक होत . आजुबाजू ला पण कॉमिक्स पडली होती . "आता नीट वाचल्यावर आणि या वयात कळतंय . सुपर कमांडो ध्रुव च भारी होता ." नित्या हसत हसत बोलला . मला काही बोलवेच ना . गळ्यात काहीतरी अडकल्यासारख झाल होत . ……… मी आणि बाबा दोघेही Tom & Jerry चे चाहते . आम्ही दोघेही एकत्रच ते कार्टून बघायचो . आणि मग सगळ घर हसण्या ने भरून जायचं . बाबा Tom च्या बाजूने तर मी jerry च्या बाजूचा . नेहमी शेवटी jerry च जिंकायचा . मग बाबा माझ्या पाठीवर बुक्का मारून म्हणायचे , " अगली बार ." पण ती अगली बारी कधीच नाही आली . एकदा मी उसासून बाबाना म्हणालो , " का तुम्ही नेहमी हारणाऱ्या Tom ची बाजू घेता ?" एकदम हसणार्या बाबांच्या चेहऱ्यावर गांभीर्य आल , "ते तुला अजून काही वर्षांनी कळेल ." आता मी तिशीत आहे . अजून पण वेळ मिळेल तस टोम &जेरी बघतो . बाबा त्यावेळेस काय म्हणाले होते ते आता कळत आहे . हा साला जेरीच खोड काढतो टोम ची . आणि आकाराने मोठा असून पण भाबडा Tom नेहमी जेरी कडून मार खातो . साला जेरी च दुष्ट आहे . गेल्या काही वर्षात मार खाणार्या सगळ्यांबद्दल सहानुभूती वाटत आहे . स्वतःसकट . …… ज्यादिवशी नांदेड वरून काका आणि आजोबा येणार असत त्यादिवशी मी एकदम खुश असे . येताना ते माझ्यासाठी खूप कॉमिक्स घेऊन येत . एकदा असेच ते आले तेंव्हा त्यांच्या हातात कॉमिक्स नव्हते . माझा चेहरा उतरला . "अरे पुढच्या वर्षी दहावी न तुझी . आता तु मोठा झालास . आता कसले कॉमिक्स वाचतोस . " मामा ने बहुतेक माझ्या मनातले भाव वाचले असावेत . मी मोठा झाल्याच माझ्या अगोदर इतराना कळल होत . मोठ झाल्यावर कॉमिक्स वाचता येत नसतील तर काय करायचं मोठ होऊन . मी कमवायला लागल्यावर घर भरून कॉमिक्स घेईल असा बेत मी आखला होता . मी बघितलेलं भविष्य काळासाठीच ते पाहिलं स्वप्न होत . स्वतःच अस काहीतरी . त्यादिवशी ते तुटल . आणि हि तर फ़क़्त सुरुवातच होती . ……… नौकरी ला लागल्यावर पहिले भाड्याने flat घेतला . आता कुणासोबत आपली स्पेस शेयर करायची गरज नव्हती . एक टीवी पण घेतला . डिश टीवी वाल्याच्या दुकानात गेलो . तो मला वेगवेगळे packages समजावून द्यायला लागला . पण कामाच तो काही बोलेना . शेवटी न राहवून मीच बोललो , "मुझे कार्टून चानाल्स भी चाहिये . मुझे कार्टून देखना अच्छा लगता है ." त्या माणसाच्या चेहऱ्यावर आलेले सहानुभूतीचे भाव अजून पण डोळ्यासमोरून जात नाहीत . कार्टून्स आणि कॉमिक्स ने प्रचंड आनंदाचे क्षण दिले आहेत त्या सर्व क्षणांसाठी हा लेखन प्रपंच . आणि ह्या गोष्टी वाचणे आणि पाहणे हा 'पोरवडा ' आहे अश्या समाजाबद्दल प्रचंड सहानुभूती . ते काय मिस करत आहेत हे त्यांचे त्यांनाच कळत नाहीये .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
अनुभव

प्रतिक्रिया द्या
23851 वाचन

💬 प्रतिसाद (103)

प्रतिक्रिया

अजून एक म्हणजे चाचा चौधरी

पिंपातला उंदीर
Fri, 01/09/2015 - 15:25 नवीन
अजून एक म्हणजे चाचा चौधरी कॉमिक्स मध्ये वापरले जाणारे तकिया कलाम . उदा . चाचा चौधरी का दिमाग कम्प्युटर से भी तेज चलता है . जब साबु को गुस्सा आता है तब ज्युपिटर ग्रह पे कोई ज्वालामुखी फ़टत है . तो ज्युपिटर ग्रहावरून आलेला साबु पण भारी होता . पीके आणि कोई मिल गया च्या अगोदर एलिएन इथे अवतरला होता
  • Log in or register to post comments

अजुन एक राहिलच कि

पदम
Fri, 01/09/2015 - 15:43 नवीन
फास्टर फेणे राहिलच कि
  • Log in or register to post comments

मलासुद्धा अजुनही कार्टुन्स

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/09/2015 - 17:13 नवीन
मलासुद्धा अजुनही कार्टुन्स आणि अ‍ॅनिम्स पहायला आवडतं. झॅक असतात. (टॉम अँड जेरी, स्कुबी, नारुटो आणि ब्लीचचा पंखा) अनिरुद्ध :)
  • Log in or register to post comments

मी शाळेत असताना भरपूर कॉमिक्स

शिद
Fri, 01/09/2015 - 17:23 नवीन
मी शाळेत असताना भरपूर कॉमिक्स वाचायचो व जमवायचो देखील. ४०-५० तर सहज असतील माझ्याकडे पण १०वी ला अभ्यासाच्या पुस्तकात कॉमिक्स ठेवून(लपवून) वाचताना आईने पकडलं व रागाच्या भरात घरातील होती नव्हती तेव्हढी सगळी कॉमिक्स आईने जाळून टाकली. :( आम्ही मित्र स्वत:ची कॉमिक्स शाळेत आणायचो व एकमेकांबरोबर अदलाबदली करायचो. त्यातपण शाळेत तास चालू असताना दुसर्‍याचं बदलून घेतलेलं कॉमिक्स भरभर वाचून तिसर्‍याबरोबर बदलून ते घरी घेऊन जायचो. मस्त दिवस होते ते. कार्टुन नेटवर्क तसं आमच्याकडे फार उशीरा आलं पण डीडी२ वर रविवारी सकाळी लागणारी कार्टून्स न चुकता नियमितपणे पाहीली जात असत. माझ्या दोन्ही बहिणींना "जाईंट रॉबर्ट" तर मला "हि-मॅन" खुप आवडायचा. एवढंच काय, मला छोट्या गाड्या जमवायचा देखील जाम शौक आहे. बर्‍याच जमवल्या होत्या पण भाच्यांनी खेळायला घेतल्यानंतर बर्‍याच तुटल्या देखील. आता मुलाच्या हातात उरलेल्या गाड्या आल्यातर त्यांचीपण तीच अवस्था होईल असं वाटतंय. धन्यवाद, तुमच्या धाग्याच्या निमित्तानं बर्‍याच जुन्या आठवणी जागा झाल्या.
  • Log in or register to post comments

आधी वाटले charlie hebdo च्या

हाडक्या
Fri, 01/09/2015 - 17:33 नवीन
आधी वाटले charlie hebdo च्या बद्दल काही आहे की काय.. पण मग वाचून जीव भांड्यात पडला.. सुंदर लिहिलंय. आमच्या गावी असली मासिके मिळायचीच नाहीत तेव्हा शहरातल्या भावंडांचा मत्सर वाटायचा खूप .. कार्टून्स मात्र पाहिली खूप. टॉम न जेरी, डक टेल्स तर अजूनही पाहतो. (नंतर कॉलेजला शहरात आल्यावर मचाक आणि कॉमिक्स एकाच वेळी हातात आले तेव्हा ही कॉमिक्स आधी का भेटली नाहीत म्हणून भरपूर वाईट वाटल्याचं आठवतंय. )
  • Log in or register to post comments

नंतर कॉलेजला शहरात आल्यावर

टवाळ कार्टा
Fri, 01/09/2015 - 20:13 नवीन
नंतर कॉलेजला शहरात आल्यावर मचाक आणि कॉमिक्स एकाच वेळी हातात आले =>> =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

.... फुटलो...

ब़जरबट्टू
गुरुवार, 01/15/2015 - 16:37 नवीन
:)) :) :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

डकटेल्स..चा अंकल स्क्रुज.

जेपी
Fri, 01/09/2015 - 17:35 नवीन
डकटेल्स..चा अंकल स्क्रुज..टेलस्पीन..चा बल्लु.मोगली.आवडते..कॅरेक्टर.. कॉमीक्स फारसे मिळायचे नाय. चांदोबा,चंपक,चाचा चौधरी या पलीकडे गेलो नाही.
  • Log in or register to post comments

ठकठक !!!... इथूनच वाचनाची

नित्य नुतन
Fri, 01/09/2015 - 17:53 नवीन
ठकठक !!!... इथूनच वाचनाची सुरुवात झाली .. प्रत्येक महिन्याचे ठकठक आणि चांदोबा वाचल्याशिवाय महिना चालू झालाय असे वाटायचेच नाही
  • Log in or register to post comments

ठकठक !!!... इथूनच वाचनाची

नित्य नुतन
Fri, 01/09/2015 - 17:53 नवीन
ठकठक !!!... इथूनच वाचनाची सुरुवात झाली .. प्रत्येक महिन्याचे ठकठक आणि चांदोबा वाचल्याशिवाय महिना चालू झालाय असे वाटायचेच नाही
  • Log in or register to post comments

माध्यमिक शाळेत असताना कॉमिक्स

पिंगू
Fri, 01/09/2015 - 17:53 नवीन
माध्यमिक शाळेत असताना कॉमिक्स वाचून खुळावलो होतो. तेव्ह वाटायचं की जेव्हा नोकरी लागेल, तेव्हा महिन्याला भरपूर कॉमिक्स विकत घेईन. आणि आता तर वाचायला पण वेळ मिळाला तरी पुष्कळ वाटते. चुपके चुपके कंपनीतच ४-५ जीबी कॉमिक्स डाऊनलोड करुन ठेवलेत. निवांत वेळ मिळाला की वाचतो आणि बालपण आठवतो..
  • Log in or register to post comments

चांदोबा

पामर
Fri, 01/09/2015 - 18:18 नवीन
चांदोबा! त्यातल्या गोष्टी,त्यातली चित्र केवळ अप्रतीम! रामायण्,महाभारत्,देवीभागवत्,अनेक भारतीय रोमन,ग्रीक ऐतिहासीक पौराणीक कथा आणि सर्वात आवडणारे म्हणजे विक्रम्-वेताळ! केवळ त्यातील चित्रांसाठी मी अनेक वेळा ते मासिक घेतलेले आहे..कार्टून म्ह्णाल तर सगळी बघायची हा नेमच होता सगळीच अवडायची..त्यापैकी डिस्ने,वार्नेर ब्रदर्स ची जास्त आवडायची.सध्या मात्र छोटा भीम्/क्रिश्ना/ओग्गी झुरळ्/हागेमारु/शिन्चान्/डोरेमॉन वगैरे कल्पनादारिद्री दळीद्री आणि कमीदर्जाची उत्पादन्मुल्य असलेली कार्टूनस बघितली की ह्य पिढीची कीव येते...बिच्चारे हिमेश रेश्मिया ला रफी समजतात...
  • Log in or register to post comments

सध्या मात्र छोटा भीम्

शिद
Fri, 01/09/2015 - 18:30 नवीन
सध्या मात्र छोटा भीम्/क्रिश्ना/ओग्गी झुरळ्/हागेमारु/शिन्चान्/डोरेमॉन वगैरे कल्पनादारिद्री दळीद्री आणि कमीदर्जाची उत्पादन्मुल्य असलेली कार्टूनस बघितली की ह्य पिढीची कीव येते..
माझ्या दोन्ही भाच्यांना हि असली फालतू कार्टून्स भरपूर आवडतात; तेच नाही त्यांच्या समवयस्क सगळ्याच मुलांना. खायचं-प्यायचं सोडून फक्त कार्टून्स बघतात. रागानं टिवी बंद केलात तर मग हातात मोबाईल घेवून गेम खेळत बसतात. कठीण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पामर

ओग्गी झुरळ्

आदूबाळ
Fri, 01/09/2015 - 20:02 नवीन
ओग्गी झुरळ्
त्या ओग्गीला शाहरूख खानचा आवाज दिलेला आहे हे इतकं महाप्रचंड डोक्यात जातं ना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

+१.

काळा पहाड
Fri, 01/09/2015 - 18:35 नवीन
+१.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पामर

+2

जेपी
Fri, 01/09/2015 - 18:42 नवीन
+2 (अश्याच भाच्याने पिडीत)जेपी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

+३

पिंपातला उंदीर
Sat, 01/10/2015 - 09:15 नवीन
+३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

बराच काळ वाट पाहुन

जेपी
Fri, 01/09/2015 - 19:10 नवीन
हाफ शेंच्युरी निमीत्त श्री.धागाकर्ते आणी श्री.गवी यांचा सत्कार एक-एक मिकी माऊस देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

आमच्या शेजारची २-३ वर्षाची

हाडक्या
Fri, 01/09/2015 - 19:53 नवीन
आमच्या शेजारची २-३ वर्षाची पोरगी तर टॅबवर युट्युब वापरायला शिकलीये. मग, मलेशियन, रशियन आणि इतर पण कार्टून्स युट्युबच्या "recommended" यादीत येतात ते पण बघत बसतेय. आता गम्मत अशी झालीये की तिला तेच कार्टून्स हवे असतात आणि ती त्याच भाषांमधले त्यांचे डायलॉग बडबडत असते. एकाच वेळेस कौतुक आणि काळजी वाटते या नव्या पिढीची..
  • Log in or register to post comments

इंग्रजी कळत नसूनसुद्धा

मराठे
Fri, 01/09/2015 - 19:56 नवीन
इंग्रजी कळत नसूनसुद्धा 'फ्रॅजाईल रॉक' हा माझा आवडता प्रोग्रॅम होता. त्यातली गाणी ऐकायला मस्त वाटायची तेव्हा. आजच्या एवढा चॉईस नव्हता तेव्हा. स्पायडर-मॅन, ही-मॅन हे सगळ्यात आवडते... बसल्या बसल्या उगाच स्पायडर-मॅन सारखं जाळं टाकण्याची अ‍ॅक्शन करायचो.
  • Log in or register to post comments

बसल्या बसल्या उगाच स्पायडर

हाडक्या
Fri, 01/09/2015 - 22:59 नवीन
बसल्या बसल्या उगाच स्पायडर-मॅन सारखं जाळं टाकण्याची अ‍ॅक्शन करायचो.
ह्या ह्या ह्या.. आमी अजून पण करतो हे. बायकोने काही मागितले की त्या वस्तूच्या दिशेने ही अ‍ॅक्शन करायची(तोंडाने वेबचा आवाज करायचा) आणि "आत्ता वेब चालत नाहीये, चालू झाल्यावर देतो" म्हणून जागेवरून हलायचं नाही (अर्थात "अंतिम चेतावनी" पर्यंतच हा ) .. हा आमचा फेवरिट उद्योग .. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

डेक्सटर आणि स्वॅाट कॅटचे कोणी

धडपड्या
Fri, 01/09/2015 - 23:21 नवीन
डेक्सटर आणि स्वॅाट कॅटचे कोणी पंखे नाहीत का येथे?
  • Log in or register to post comments

बडे मियां - छोटे मियां आणि

टवाळ कार्टा
Fri, 01/09/2015 - 23:33 नवीन
बडे मियां - छोटे मियां आणि त्यांच्या महाबिल्ला शहरातल्या करामातींचा मी पंखा आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धडपड्या

खरं सांगू का? स्वॉट कॅट

काळा पहाड
Fri, 01/09/2015 - 23:41 नवीन
खरं सांगू का? स्वॉट कॅट विसरलोच होतो. सध्या कुठल्या चॅनेल्वर चालू आहेत का? नाही तर डाऊन्लोड करावे म्हण्तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मेगा कॅट सिटी.... वाय.

अत्रुप्त आत्मा
Sat, 01/10/2015 - 00:02 नवीन
मेगा कॅट सिटी.... वाय..पर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र! छोटे म्यांऊ...वो तुम्हारे पिछे आ रहा है... देख रहा हूं....बूम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म.... दे मारा.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

टिंकल

बोका-ए-आझम
Sat, 01/10/2015 - 00:04 नवीन
टिंकल नावाच्या मुलांसाठीच्या मासिकात ' शिकारी शम्भू ' आणि सुप्पन्दी नावाची दोन कार्टून्स असायची. शम्भूची टोपी त्याच्या डोक्यावर इतकी दाबलेली असायची की त्याचे डोळे दिसायचेच नाहीत आणि सुप्पन्दी म्हणजे पेप्सीचा फिडो डिडो!
  • Log in or register to post comments

हा घ्या सुपन्डी !!

स्पंदना
Sat, 01/10/2015 - 09:25 नवीन
हा घ्या सुपन्डी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

ट्विंकल पण भारी होत .

पिंपातला उंदीर
Sat, 01/10/2015 - 09:19 नवीन
ट्विंकल पण भारी होत . शिकारी शंभू लई कॉमेडी होता . त्याच्यावर चित्रपट येणार अस वाचल होत . त्याबरोबर बहादूर नावच ऐक डितेक्तिव पात्र पण होत .
  • Log in or register to post comments

अगदी सुपर्ब लिहीलयं!!

स्पंदना
Sat, 01/10/2015 - 09:26 नवीन
अगदी सुपर्ब लिहीलयं!! कार्टुन्स नी हे जग अतिशय सुंन्दर बनवलं अस आजही माझं मत आहे.
  • Log in or register to post comments

एइला

इरसाल
Sat, 01/10/2015 - 10:07 नवीन
आवरा होवुन्शिनी कोनालाच कुमार नाय आठोलं <
  • Log in or register to post comments

प्रतिसादा साठि सर्वाना

पिंपातला उंदीर
Sat, 01/10/2015 - 18:51 नवीन
प्रतिसादा साठि सर्वाना धन्य्वाद
  • Log in or register to post comments

डोनाल्ड डक च्या पंख्यान्नी हे

वगिश
Sat, 01/10/2015 - 21:23 नवीन
डोनाल्ड डक च्या पंख्यान्नी हे जरूर वाचा.
  • Log in or register to post comments

लेख मनाला भावला.

निनाद मुक्काम …
Sat, 01/10/2015 - 23:11 नवीन
लेख मनाला भावला. लेखक फक्त राज कॉमिक्स वाचायचा असे वाटते . आमच्यात कधीही हिरो वरून भांडण झाली नाही पण ध्रुव मला नागराज पेक्ष्या जरा कमीच शक्तिशाली वाटायचा , कॉमिक्स म्हटले कि राज प्रकाशन सोबत डायमंड च्या उल्लेख अपरिहार्य आहे चाचा चौधरी , बिल्लू पिंकी अशी त्यांची गाजलेली अनेक नायक आता आठवते ५ वी पासून हि कॉमिक्स हिंदीत वाचून माझे हिंदी बोलणे इतर मुलांच्या पेक्ष्या जास्त सफाईदार झाले होते उदा चाचा चौधरी का मस्तिष्क कम्प्युटर से तेज चलता हे अशी वाक्ये वाचून अनेक दुर्बोध हिंदी शब्द सहजरीत्या आत्मसात होत गेले. ह्या कॉमिक्स ची हॉरर सिरीज सुद्धा यायची. रेल्वे च्या बुक स्टोल व स्टेशन बाहेरील पेपर च्या स्टोल वर आम्ही कॉमिक्स प्रिय मंडळी लक्ष ठेवून असायचो ,आपल्या नायकाचे नवे पुस्तक कधी येणार ह्याची आतुरतेने वाट पाहायचो आमच्या ह्या आवडीला निकृष्ट दर्जा तत्कालीन वडीलधार्या व शिक्षक मंडळींनी दिला होता. आताचे पालक मुलांना दुकाना बाहेर रांगा लावून हेरी पोटर घेऊन देतात तेव्हा त्यांचे कौतुकवजा हेवा वाटतो , मराठीत ठक ठक चा दिपू दि ग्रेट व चंपक मधील चंपू ससा चांदोबा मधील विक्रम वेताळ दर महिन्याला आवडीने वाचायचो कितीतरी वेळा मित्रांच्या कडून पुस्तकांची आदला बदली व्हायची. रद्दीच्या दुकानात तासंतास पडीक राहून एखादे दुर्मीळ बालसाहित्य शोधून स्वस्तात विकत घ्यायचे व त्यासाठी सुट्टीच्या काळात शहरातील रद्दीची दुकाने सायकल वरून पालथी घालण्यात भारी मौज वाटायची , ह्या लेखाने सर्व आठवणी ताज्या झाल्या.
  • Log in or register to post comments

सिन्दबाद , अलादीन , दानू दानासुर

सिरुसेरि
Mon, 01/12/2015 - 15:36 नवीन
सिन्दबाद जहाजी मधले "डोले रे डोले डोले डोले रे , बोले रे बोले बोले बोले रे , अगर मगर डोले नैया , इधर उधर जाये रे पानी , निला समुन्दर है , आकाश प्यासी , डुबे ना डुबे ना मेरा जहाजी " हे गाणे मस्तच आवडले . दानू दानासुर मधले "दानु है दानु इतनासा जानु , छिपकली के नाना है , छिपकली के है हुजुर ,दानासुर , दानासुर दानासुर " हेही गाणे मस्तच आवडले . गुलजार यांनी सिन्दबाद , दानू दानासुर , जंगलबूक मधली शिर्षक गीते लहान मुलांकडून गाउन घेतली . त्यामुळे ती मजेदार वाटतात . अलादीनचे डबिंग सुमित राघवनने केले होते त्यामुळेही व एकुणच अलादीन मालिका आवडायची . "एक , दोन , तीन , चार " , सिग्मा , फेअरी टेल्स थिएटर , इन्द्रधनुष याही मालिका आवडल्या .
  • Log in or register to post comments

आपल्याकडे चाचा चौधरींवर

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 01/12/2015 - 16:22 नवीन
आपल्याकडे चाचा चौधरींवर चित्रपट बनला तर चाचा चौधरींची भुमिका ओम पुरी ह्यांनी तर साबुची भुमिका खलीनी करावी असं मनात वाटुन जातं.
  • Log in or register to post comments

कल्पना भारी आहे . मला एकूण

पिंपातला उंदीर
Mon, 01/12/2015 - 16:25 नवीन
कल्पना भारी आहे . मला एकूण अंगकाठी आणि विनोदाचा सेन्स पाहता राजपाल यादव जास्त योग्य वाटतो
  • Log in or register to post comments

जबरी

स्वच्छंदी_मनोज
Mon, 01/12/2015 - 20:30 नवीन
लेखाने आणी प्रतीसादात उल्लेखलेल्या सर्वांमुळे हळवा झालो.. ह्या कार्टुन्सनी बालपण समृद्ध केल होतं.. त्यावेळी ह्यांच जग खरं वाटायचं आणी आता ह्यांच्या सारखं जग असाव असं वाटत.
  • Log in or register to post comments

@मनोज - शेम हिअर

पिंपातला उंदीर
Mon, 01/12/2015 - 20:35 नवीन
@मनोज - शेम हिअर
  • Log in or register to post comments

माझ्या लहानपणी..

चौकटराजा
Mon, 01/12/2015 - 21:00 नवीन
१९६० ते १९६६ हा साधारण काळ हे सगळं हाताळण्याचा. त्याकाळी चांदोबा लोकप्रिय होता. पण त्याला चित्रकथा म्हणता येईल. पण मला इंद्रजाल कॉमिक्सच्या पुस्तकानी वेड लावले. मॅड्रेक,लोथार, वेताळ डायना, डेंकाली ई नावे अजूनही स्मरणात आहेत. पुढे या प्रकाराचा प्रसार खूप म्हंणजे खूप झाला. पण अर्नाळकर मग काकोडकर ( राजाराज राजे कथा) ..जेम्स हॅडले चेस असा प्रवास सुरू झाल्याने चित्ररूप नायक मागे पडले.
  • Log in or register to post comments

एक दोन तीन चार

निनाद मुक्काम …
Wed, 01/14/2015 - 16:46 नवीन
एक दोन तीन चार चे शीर्षक गीत आणि हा एक पूर्ण भाग सुमीत चा फास्टर फेणे पण खासच
  • Log in or register to post comments

निनाद मुक्काम प...

Pain6
गुरुवार, 01/15/2015 - 14:04 नवीन
सुमीत चा फास्टर फेणे पण खासच तो कुठे उपलब्ध होऊ शकेल का? फाफआ, बिपीन बुकलवार वगैरे फार आवडायच लहानपणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

लै भारि

पिंपातला उंदीर
Wed, 01/14/2015 - 19:22 नवीन
लै भारि
  • Log in or register to post comments

सिंदबाद म्हटला कि डोळ्यासमोर

निनाद मुक्काम …
गुरुवार, 01/15/2015 - 02:42 नवीन
सिंदबाद म्हटला कि डोळ्यासमोर येतो ते अलिफ लैला रामानंद सागर ची अजरामर प्रस्तुती एखाद्या छोट्या मजकुराएवढे एक उर्दू वाक्य आणि सिंदबाद ची तलवारे सुलेमानी आणि विलासराज
  • Log in or register to post comments

चिमा मस्त कि हूल हूल

कहर
गुरुवार, 01/15/2015 - 11:54 नवीन
चिमा मस्त कि हूल हूल *diablo* ]:->
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

मस्त धागा

कहर
गुरुवार, 01/15/2015 - 11:13 नवीन
मस्त धागा लहानपणी आत्या मावशी वगैरे पाहुण्यांनी खाऊसाठी दिलेले एक दोन रुपये साठवून १०-१५ रुपये साठले कि बस स्थानकावरच्या बुक डेपो मधून कॉमिक्स आणायचो ( त्याच दुकानात मिळायची)। चाचा चौधरी,शक्तीपुत्र , अग्निपुत्र अभय, फौलादी सिंह आणि किती किती कॉमिक्स जमवली होती । अजूनही एक पिशवी भरून आहे … सध्या dl करूनच वाच्तो… x men , iron man , avenger आणि नागराज, ध्रुव, भोकाल ,भेरीया, डोगा, परमाणु, योध्द्ध असे कितीतरी कॉमिक्स ने जवळपास २०-३० gb जागा नक्कीच भरली असेल laptop ची सध्या ध्रुव चे Hunters , मल्टीस्टारार सर्वनायक - सर्वसंहार प्रकाशित झाले आहे । नागराज च्या नरकाहुति आणि क्षतीपुर्ती च्या प्रतीक्षेत आहे (नागराज का ) कहर
  • Log in or register to post comments

x men , iron man , avenger

पिंपातला उंदीर
गुरुवार, 01/15/2015 - 20:41 नवीन
x men , iron man , avenger आणि नागराज, ध्रुव, भोकाल ,भेरीया, डोगा, परमाणु, योध्द्ध असे कितीतरी कॉमिक्स ने जवळपास २०-३० gb जागा नक्कीच भरली असेल laptop ची कस जमवलत? दोउन्लोड कुठुन केल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर

इंग्रजी कॉमिक्स साठी torrent

कहर
Fri, 01/16/2015 - 16:01 नवीन
इंग्रजी कॉमिक्स साठी torrent आणि हिंदी साठी http://comicscollection.blogspot.in
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

धन्यवाद : )

पिंपातला उंदीर
Fri, 01/16/2015 - 16:03 नवीन
धन्यवाद : )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर

रूप बदलो!

Pain6
गुरुवार, 01/15/2015 - 14:02 नवीन
Transformers चा उल्लेख कसा झाला नाही अजून? मायकेल बेने चित्रपटांचा चुथडा केला असला तरी मूळ मालिका भारी होत्या.
  • Log in or register to post comments

चाचा चौधरी, पिंकी बरोबर

सौंदाळा
गुरुवार, 01/15/2015 - 15:32 नवीन
चाचा चौधरी, पिंकी बरोबर बांकेलाल पण खुप वाचायचो. शेंडीवाला बांकेलाल अडचणीत सापडलेल्या राजाला मदत करायचा. ही बघा लिंक
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा