✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ओडी बारय्या...

प
पिवळा डांबिस यांनी
गुरुवार, 01/15/2015 - 10:24  ·  लेख
लेख
काल इंटरनेटवर सर्फिंग करत असतांना यूट्यूबवर एक गाणं मिळालं. कानात आणि मनात रात्रभर भरून राहिलं म्हणून तुमच्याबरोबर शेयर करतोय... कर्नाटकी संत आणि कवि श्री. पुरंदरदास यांचं हे एक कानडी भजन आहे. आता मला कानडी अजिबात येत नाही. पण हे एकतर भजन आहे आणि त्यातले बरेचसे शब्द संस्कृतोद्भव आहेत त्यामुळे अर्थ समजायला फारशी अडचण येत नाही. हे भजन पूर्वी एम एस सुब्बलक्ष्मी यांनीही गायलेलं आहे पण ते कर्नाटकी शास्त्रीय संगीताच्या पद्धतीने! इथे हेच भजन पं. कैवल्यकुमार गुरव यांनी गायलं आहे ते आपल्या महाराष्ट्रीय स्टाईलने! थोडीफार पं. भीमसेन जोशींच्या स्टाईलची आठवण करून देणारं! मला फार आवडलं, बघा तुम्हाला पसंत पडतंय का? ODI Barayya
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
6973 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

कर्नाटक शैली

सुनील
गुरुवार, 01/15/2015 - 10:42 नवीन
हपिसातून आता ऐकता नाहीय. घरी जाऊन ऐकेन. अवांतर १ - पुरंदरदास हा मूळचा महाराष्ट्रीय. पुढे कर्नाटकात स्थलांतरीत झाला, असे सांगण्यात येते. संगीताची कर्नाटक शैली ह्यानेच सुरू केली असे मानले जाते. अवांतर २ - नुकताच एक लेख वाचनात आला होता. त्यात हिंदुस्थानी शैली ही सर्वसमावेशक असल्यामुळे त्यात सर्व जाती-जमातींतीच नव्हे तर मुस्लिमांनीदेखिल भर घातली आणि तिला सर्वांगाने बहरू दिले. याउलट, कर्नाटकी शैली मात्र दक्षिण भारतीय उच्च वर्णियांच्यांच ताब्यात राहिली. पैकी, पहिले वाक्य खरे आहे ते दिसतेच. दुसर्‍याबद्दल माहिती नाही.
  • Log in or register to post comments

सुरेखच आहे भजन डा . लो केलंय

स्पा
गुरुवार, 01/15/2015 - 11:04 नवीन
सुरेखच आहे भजन डा . लो केलंय
  • Log in or register to post comments

युट्युबवरून डालो कसं करायचं ?

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 01/15/2015 - 23:32 नवीन
युट्युबवरून डालो कसं करायचं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

फायरफॉक्स वापरत असाल तर Video

मदनबाण
Fri, 01/16/2015 - 02:52 नवीन
फायरफॉक्स वापरत असाल तर Video DownloadHelper हे अ‍ॅडऑन इनस्टॉल करुन व्हिडीयो डाउनलोड करता येइल. या अ‍ॅडऑन ने तुमचे काम होइल.एचडी व्हिडीयो डाउनलोड करण्यासाठी वेगळी पद्धत आहे. @ पिडां काका सुरेख भजनाचा दुवा दिल्या बद्धल आभारी आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मधुबन खुशबु देता है... { Saajan Bina Suhagan }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मी गुगल क्रोम वापरतो.

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 01/16/2015 - 15:24 नवीन
मी गुगल क्रोम वापरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

additional software नको असतील

यसवायजी
Fri, 01/16/2015 - 15:17 नवीन
additional software नको असतील तर savevid.com किंवा keepvid.com वापरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मी गुगल क्रोम वापरतो.

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 01/16/2015 - 15:23 नवीन
मी गुगल क्रोम वापरतो. ही दोन्ही software डालो करताना क्रोम थ्रेट मेसेज देउन त्यांना ब्लॉक केले आहे असे सांगतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

YTD Video Downloader

नंदन
Fri, 01/16/2015 - 15:34 नवीन
हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून पहा. मीही क्रोमच वापरतो आणि हा प्रोग्रॅम डाऊनलोड करताना काही अडचण आली नाही. (दुवा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

हे डालो करतानाही तोच मेसेज

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 01/16/2015 - 16:12 नवीन
हे डालो करतानाही तोच मेसेज आला. पण तसंच पुढे गेलो आणि एक व्हिडिओ यशस्वीपणे डालो पण केला ! अनेक धन्यवाद नंदन ! अनेक धन्यवाद स्पा, मदणबाण आणि यसवायजी !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

मी क्रोमवर या साइट वअप्रल्या

यसवायजी
Fri, 01/16/2015 - 15:35 नवीन
मी क्रोमवर या साइट वअप्रल्या आहेत. सॉफ्टवेअर डालो करायची गरज नाही. फक्त व्हिडिओ डालो करता येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणे

पिवळा डांबिस
गुरुवार, 01/15/2015 - 11:22 नवीन
नेहमीप्रमाणे गरूडावर बैसोनि माझा कैवारी (नंदन, दुसरं कोण!) आला!! :) नंदनने पुरवलेला इंग्रजी तर्जुमा खालीलप्रमाणे... Odi Barayaa By Saint Purandara Dasa Translated by P.R.Ramachander Raga Bhairavi Thala Aadhi Pallavi Odi Barayya Vaikunta Pathi, Ninne noduve manadhaniye Anupallavi Nodi muddhdi mathadi sanosakudi Padi pogaluvenu parama purusha Hariye Charanam Mangalaathmaka , mohana kaya ranga, Sangeetha lola Sad guna sheela, Angane yarigella athi priyavanda , Shubanga Sri Purandara Vittala Raya Sri English translation Pallavi Oh Lord of Vaikunta, please come running, For my mind, likes to see you. Anupallavi I want to see you, fondle you, speak to you, Become happy and sing your praise, Oh divine Lord, Oh Hari Charanam Oh God with a great powers, oh Ranga, who is pretty, Oh God who likes music, Oh good with good conduct You have become very dear to every one, simply like that, Oh God with Good body, Oh Purandara Vittala
  • Log in or register to post comments

.

hitesh
गुरुवार, 01/15/2015 - 11:25 नवीन
दोन्ही डाउनलोडत आहे
  • Log in or register to post comments

भाग्यदा लक्ष्मी बारम्मा

रमेश आठवले
गुरुवार, 01/15/2015 - 23:11 नवीन
भीमसेन जोशी यांना सुरवातीला प्रसिद्धी त्यांच्या एका कन्नड चित्रपटासाठी हिंदुस्तानी शैलीत गायलेल्या- भाग्यदा लक्ष्मी बारम्मा- या गाण्यामुळे मिळाली. https://www.youtube.com/watch?v=_tdYY6lUw9g&list=PL50DCACCFA275BECD
  • Log in or register to post comments

आणि तेही पुरंदरदासाचंच भजन

आदूबाळ
गुरुवार, 01/15/2015 - 23:34 नवीन
आणि तेही पुरंदरदासाचंच भजन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

वा!

पिवळा डांबिस
Mon, 01/19/2015 - 11:22 नवीन
अतिसुरेल आहे... अनेक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

खूपच सुंदर भजन आहे. धन्यवाद

सव्यसाची
Fri, 01/16/2015 - 00:29 नवीन
खूपच सुंदर भजन आहे. धन्यवाद पीडां जी. भीमसेनजींमुळे कन्नड भजने ऐकायची सवय लागली. त्यांच्या आवाजात भजन ऐकायला कायमच चांगले वाटते. मग ते मराठी, हिंदी, कन्नड किंवा संस्कृत असो. याआधी 'तुंगा तीरदी' आणि 'बारम्मा' ही भजने विशेष आवडली होती. हे भजन खूपच आवडले.
  • Log in or register to post comments

आसावरी?

रमेश आठवले
Fri, 01/16/2015 - 02:41 नवीन
वर भजनाच्या इंग्लिश भाषांतरा बरोबर राग भैरवी व आदि ताल असे लिहिले आहे. हे बहुधा कर्नाटकी पद्धतीच्या मूळ रचने विषयी असावे असे वाटते . गुरव यांनी मांडलेल्या भजनात मला हिंदुस्तानी पद्धतीतल्या, सुरवातीला आसावरी आणि नंतर भीमपलास यांची जाणीव झालि. या संबंधी तसेच त्यांनी वापरलेल्या ताला संबंधी कोणी जाणकार प्रकाश टाकू शकतील काय ?
  • Log in or register to post comments

क्रुष्णानी बेगने

सिरुसेरि
Fri, 01/16/2015 - 15:13 नवीन
तामिळ भाषेमधले चित्रा , येसुदास यांनी गायलेले "क्रुष्णानी बेगने" हे भजन छान आहे . तसेच इलय्राराजाने संगीत दिलेले व येसुदासने गायलेले "महागणपती मनसा स्मरामी" हे गीतही खूप चांगले आहे .
  • Log in or register to post comments

तेच भीमसेनजींचे भजन

सुबोध खरे
Fri, 01/16/2015 - 15:32 नवीन
तेच भीमसेनजींचे भजन त्यांच्याच शिष्यांकडून पं जयतीर्थ मेवुंडी आणि पं. आनंद भाटे (आनंद गंधर्व) यांची जुगलबंदीत ऐका. https://www.youtube.com/watch?v=7VQosAltaWc
  • Log in or register to post comments

वा

सविता००१
Fri, 01/16/2015 - 15:35 नवीन
क्या बात है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

वर दिलेल्या लिंकवरून

पिवळा डांबिस
Mon, 01/19/2015 - 11:31 नवीन
वर दिलेल्या लिंकवरून भीमसेनजींच्या आवाजातलं ऐकलं. पण तुम्ही दिलेल्या लिंकवर माझ्या इथे खूप बॅकग्राउंड डिस्टर्बन्स आणि हिसिंग येतंय त्यामुळे पूर्ण आस्वाद दुर्दैवाने घेता नाही आला. अर्थात तो माझ्या एन्डकडून आलेला प्रॉब्लेम असू शकतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

धन्यवाद!

यशोधरा
Fri, 01/16/2015 - 19:02 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

खूपच छान!

पैसा
Mon, 01/19/2015 - 16:11 नवीन
या धाग्यात दिलेल्या इतर लिंक्सवरची गाणीही फार आवडली. पंडित भीमसेन जोशी यांचं सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नेहमी ऐकते.
  • Log in or register to post comments

भीमसेन जोशींचं ऐकलं असेल तर

बॅटमॅन
Mon, 01/19/2015 - 16:20 नवीन
भीमसेन जोशींचं ऐकलं असेल तर सुब्बुलक्ष्मींचं देखील ऐकून पहावं. मला व्यक्तिशः सुब्बुलक्ष्मी व्हर्जन जास्त आवडली. https://www.youtube.com/watch?v=i9fIDapggl8
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अजून एक तमिऴ भजन आहे. मला

बॅटमॅन
Mon, 01/19/2015 - 16:18 नवीन
अजून एक तमिऴ भजन आहे. मला खूप आवडलेले. https://www.youtube.com/watch?v=YfvjAuw3D2w आणि एक धम्माल मजेशीर तेलुगु गाणे. भजनाबिजनाचा वट्ट संबंध नाही, पण या निमित्ताने आठवले इतकेच. हेही माझे प्रचंड फेव्हरीट. चाल आणि व्हिडिओ दोन्ही प्रचंड मनोरंजक. आंध्रात हा पिच्चर सुप्परहिट आहे. https://www.youtube.com/watch?v=0TSOVO2YkYM
  • Log in or register to post comments

आत्ताच ओडी बारय्या ऐकले. अति

बॅटमॅन
Mon, 01/19/2015 - 16:21 नवीन
आत्ताच ओडी बारय्या ऐकले. अति उच्च _/\_
  • Log in or register to post comments

गायनातलं काही कळतं अशातला भाग

बॅटमॅन
Mon, 01/19/2015 - 16:27 नवीन
गायनातलं काही कळतं अशातला भाग नाही, पण याची शैली हिंदुस्थानीछाप वाटते आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा