कार्टून्स आणि कॉमिक्स
… १९९२ साल . बोलता बोलता शेजारचा नित्या मला म्हणाला ," काय येत तुमच्या सुपर कमांडो ध्रुव ला . आमचा नागराज विषारी फुंकर मारून दोन मिनिट मध्ये आडवा करेल त्याला ." मला पण चेव चढला . मी पण नागराज कसा घाणेरडा आहे हे सांगून तिथल्या तिथे परतफेड केली . शब्दाने शब्द वाढत गेला . बोलचाल बंद झाली . राज कॉमिक्स चे नागराज , परमाणु , डोगा हे कॉमिक्स नायक जाम प्रसिद्ध होते . पोरांनी आपले आपले हिरो निवडले होते . कंपू तयार झाले होते . दुसऱ्या नायकाचा चाहता हा शत्रू पक्षातला होता . नंतर मी गावातून बाहेर पडलो . नित्याशि संबंध संपला . कॉमिक्स शी असणारा संबंध पण संपला . नंतर काही वर्षांनी सुट्टी घेऊन घरी आलो होतो . मी घरी पेपर वाचत बसलो होतो . आई भाजी निवडत बसली होती . बोलता बोलता माझ्या मित्रांचा विषय निघाला . आईने नितीन बद्दल सांगितलं ,"अरे तो नितीन आहे ना कुलकर्णी बाईचा . त्याला काहीतरी रोग झाला रे . पायातली ताकत च गेली . व्हील चेयर वर खुरडत फिराव लागत बिचार्याला . किती हुशार मुलगा होता आणि काय झाल बिचार्याच ." मला एकदम कसतरीच झाल . न राहवून कपडे चढवले . बाजूच्या कॉलनी मधल्या त्याच्या घरी घरी त्याला भेटायला गेलो . त्याची आई बाहेर देवासमोर दिवा लावून बसली होती .
"काकू नितीन आहे ?"
"हो आहे कि . उदगीरकर न रे तू ? बर्याच वर्षांनी आलास . नितीन मधल्या खोलीत आहे . भेटून घे . चांगल वाटेल त्याला . आताशा फारस कोणी येत नाही . "
मी खोलीत गेलो . नित्या पलंगावर आडवा पडून वाचत होता . जवळ गेल्यावर कळल . त्याच्या हातात पण सुपर कमांडो ध्रुव च पुस्तक होत . आजुबाजू ला पण कॉमिक्स पडली होती .
"आता नीट वाचल्यावर आणि या वयात कळतंय . सुपर कमांडो ध्रुव च भारी होता ." नित्या हसत हसत बोलला . मला काही बोलवेच ना . गळ्यात काहीतरी अडकल्यासारख झाल होत .
……… मी आणि बाबा दोघेही Tom & Jerry चे चाहते . आम्ही दोघेही एकत्रच ते कार्टून बघायचो . आणि मग सगळ घर हसण्या ने भरून जायचं . बाबा Tom च्या बाजूने तर मी jerry च्या बाजूचा . नेहमी शेवटी jerry च जिंकायचा . मग बाबा माझ्या पाठीवर बुक्का मारून म्हणायचे , " अगली बार ." पण ती अगली बारी कधीच नाही आली . एकदा मी उसासून बाबाना म्हणालो , " का तुम्ही नेहमी हारणाऱ्या Tom ची बाजू घेता ?" एकदम हसणार्या बाबांच्या चेहऱ्यावर गांभीर्य आल , "ते तुला अजून काही वर्षांनी कळेल ." आता मी तिशीत आहे . अजून पण वेळ मिळेल तस टोम &जेरी बघतो . बाबा त्यावेळेस काय म्हणाले होते ते आता कळत आहे . हा साला जेरीच खोड काढतो टोम ची . आणि आकाराने मोठा असून पण भाबडा Tom नेहमी जेरी कडून मार खातो . साला जेरी च दुष्ट आहे . गेल्या काही वर्षात मार खाणार्या सगळ्यांबद्दल सहानुभूती वाटत आहे . स्वतःसकट .
…… ज्यादिवशी नांदेड वरून काका आणि आजोबा येणार असत त्यादिवशी मी एकदम खुश असे . येताना ते माझ्यासाठी खूप कॉमिक्स घेऊन येत . एकदा असेच ते आले तेंव्हा त्यांच्या हातात कॉमिक्स नव्हते . माझा चेहरा उतरला . "अरे पुढच्या वर्षी दहावी न तुझी . आता तु मोठा झालास . आता कसले कॉमिक्स वाचतोस . " मामा ने बहुतेक माझ्या मनातले भाव वाचले असावेत .
मी मोठा झाल्याच माझ्या अगोदर इतराना कळल होत . मोठ झाल्यावर कॉमिक्स वाचता येत नसतील तर काय करायचं मोठ होऊन . मी कमवायला लागल्यावर घर भरून कॉमिक्स घेईल असा बेत मी आखला होता . मी बघितलेलं भविष्य काळासाठीच ते पाहिलं स्वप्न होत . स्वतःच अस काहीतरी . त्यादिवशी ते तुटल . आणि हि तर फ़क़्त सुरुवातच होती .
……… नौकरी ला लागल्यावर पहिले भाड्याने flat घेतला . आता कुणासोबत आपली स्पेस शेयर करायची गरज नव्हती . एक टीवी पण घेतला . डिश टीवी वाल्याच्या दुकानात गेलो . तो मला वेगवेगळे packages समजावून द्यायला लागला . पण कामाच तो काही बोलेना . शेवटी न राहवून मीच बोललो , "मुझे कार्टून चानाल्स भी चाहिये . मुझे कार्टून देखना अच्छा लगता है ." त्या माणसाच्या चेहऱ्यावर आलेले सहानुभूतीचे भाव अजून पण डोळ्यासमोरून जात नाहीत .
कार्टून्स आणि कॉमिक्स ने प्रचंड आनंदाचे क्षण दिले आहेत त्या सर्व क्षणांसाठी हा लेखन प्रपंच . आणि ह्या गोष्टी वाचणे आणि पाहणे हा 'पोरवडा ' आहे अश्या समाजाबद्दल प्रचंड सहानुभूती . ते काय मिस करत आहेत हे त्यांचे त्यांनाच कळत नाहीये .
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खूप छान ! मी अजूनही टॉम अँड
आम्हाला "मोटू और पतलू की जोडी
जरा आमची पण
अगदि. लोट्पोट कोमिक्स
अप्रतिम.. संवेदनशील.
+१
शिवाय.. डायना, नार्डा आणि
हो हो अगदी मार्मिक
जपानी कार्टून्स बघितले असते
तत्काळ तिकेट टु ॲडल्टहूड..
@गवी - कसलं भारी निरीक्षण
खूप छान!
आणि अजिबात जरासुद्धा इतर काही
मीक मीक .........
येस्स
धन्यवाद पैसा ताई
माझ्या दिराने मुलाच नाव ध्रुव
नमन...!!!
Fred Quimby च्या
ध्रुव हा ऑल टाइम फेवरीट
खूप छान!
यावर कितीही लिहल तरी ते कमीच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- Saathiyaपहिल्या व्हिडीओच्या आठवणीने
एक चिडिया अनेक चिडिया..
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- Saathiyaमस्त काम...
सोधुन पाहतो... मिळाल्यास इथे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- Saathiyahttps://www.youtube.com/user
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- Saathiyaथोडी भर...एक तितली...
धन्यवाद गवि...
मदनबाण.....
Piddly Official Song :- { Shamitabh }कार्टून नेटवर्क वरचं माझं
मला जपानी कार्टून मधले फक्त
अत्रुप्त आत्मा
सहमत
आणि FTII चं मोलू .......
गायब आया गायब आया किसीको
चिंटू
सकाळ मधे थांबला पण मला वाटतं
अल्लादिन..
तुमचं सदस्यनाम पाहून "चाचा
हीमॅन विसरले का लोक? शिवाय
राज कॉमिक्स....
नीलकांत आपले कॉमिक्स गोत्र
नागराज चे काबुकी का खजाना ,
विठ्ठ्ल कांबळे नावाचा मराठी
(No subject)
मला
टॉम & जेरी, डक टेल्स, विन्नी
हे बहुदा २००० च्या नंतर झाले आहे
ही एक नवीन माहिती मिळालि
+१