Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पिंपातला उंदीर on Fri, 01/09/2015 - 10:55
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
अनुभव
… १९९२ साल . बोलता बोलता शेजारचा नित्या मला म्हणाला ," काय येत तुमच्या सुपर कमांडो ध्रुव ला . आमचा नागराज विषारी फुंकर मारून दोन मिनिट मध्ये आडवा करेल त्याला ." मला पण चेव चढला . मी पण नागराज कसा घाणेरडा आहे हे सांगून तिथल्या तिथे परतफेड केली . शब्दाने शब्द वाढत गेला . बोलचाल बंद झाली . राज कॉमिक्स चे नागराज , परमाणु , डोगा हे कॉमिक्स नायक जाम प्रसिद्ध होते . पोरांनी आपले आपले हिरो निवडले होते . कंपू तयार झाले होते . दुसऱ्या नायकाचा चाहता हा शत्रू पक्षातला होता . नंतर मी गावातून बाहेर पडलो . नित्याशि संबंध संपला . कॉमिक्स शी असणारा संबंध पण संपला . नंतर काही वर्षांनी सुट्टी घेऊन घरी आलो होतो . मी घरी पेपर वाचत बसलो होतो . आई भाजी निवडत बसली होती . बोलता बोलता माझ्या मित्रांचा विषय निघाला . आईने नितीन बद्दल सांगितलं ,"अरे तो नितीन आहे ना कुलकर्णी बाईचा . त्याला काहीतरी रोग झाला रे . पायातली ताकत च गेली . व्हील चेयर वर खुरडत फिराव लागत बिचार्याला . किती हुशार मुलगा होता आणि काय झाल बिचार्याच ." मला एकदम कसतरीच झाल . न राहवून कपडे चढवले . बाजूच्या कॉलनी मधल्या त्याच्या घरी घरी त्याला भेटायला गेलो . त्याची आई बाहेर देवासमोर दिवा लावून बसली होती . "काकू नितीन आहे ?" "हो आहे कि . उदगीरकर न रे तू ? बर्याच वर्षांनी आलास . नितीन मधल्या खोलीत आहे . भेटून घे . चांगल वाटेल त्याला . आताशा फारस कोणी येत नाही . " मी खोलीत गेलो . नित्या पलंगावर आडवा पडून वाचत होता . जवळ गेल्यावर कळल . त्याच्या हातात पण सुपर कमांडो ध्रुव च पुस्तक होत . आजुबाजू ला पण कॉमिक्स पडली होती . "आता नीट वाचल्यावर आणि या वयात कळतंय . सुपर कमांडो ध्रुव च भारी होता ." नित्या हसत हसत बोलला . मला काही बोलवेच ना . गळ्यात काहीतरी अडकल्यासारख झाल होत . ……… मी आणि बाबा दोघेही Tom & Jerry चे चाहते . आम्ही दोघेही एकत्रच ते कार्टून बघायचो . आणि मग सगळ घर हसण्या ने भरून जायचं . बाबा Tom च्या बाजूने तर मी jerry च्या बाजूचा . नेहमी शेवटी jerry च जिंकायचा . मग बाबा माझ्या पाठीवर बुक्का मारून म्हणायचे , " अगली बार ." पण ती अगली बारी कधीच नाही आली . एकदा मी उसासून बाबाना म्हणालो , " का तुम्ही नेहमी हारणाऱ्या Tom ची बाजू घेता ?" एकदम हसणार्या बाबांच्या चेहऱ्यावर गांभीर्य आल , "ते तुला अजून काही वर्षांनी कळेल ." आता मी तिशीत आहे . अजून पण वेळ मिळेल तस टोम &जेरी बघतो . बाबा त्यावेळेस काय म्हणाले होते ते आता कळत आहे . हा साला जेरीच खोड काढतो टोम ची . आणि आकाराने मोठा असून पण भाबडा Tom नेहमी जेरी कडून मार खातो . साला जेरी च दुष्ट आहे . गेल्या काही वर्षात मार खाणार्या सगळ्यांबद्दल सहानुभूती वाटत आहे . स्वतःसकट . …… ज्यादिवशी नांदेड वरून काका आणि आजोबा येणार असत त्यादिवशी मी एकदम खुश असे . येताना ते माझ्यासाठी खूप कॉमिक्स घेऊन येत . एकदा असेच ते आले तेंव्हा त्यांच्या हातात कॉमिक्स नव्हते . माझा चेहरा उतरला . "अरे पुढच्या वर्षी दहावी न तुझी . आता तु मोठा झालास . आता कसले कॉमिक्स वाचतोस . " मामा ने बहुतेक माझ्या मनातले भाव वाचले असावेत . मी मोठा झाल्याच माझ्या अगोदर इतराना कळल होत . मोठ झाल्यावर कॉमिक्स वाचता येत नसतील तर काय करायचं मोठ होऊन . मी कमवायला लागल्यावर घर भरून कॉमिक्स घेईल असा बेत मी आखला होता . मी बघितलेलं भविष्य काळासाठीच ते पाहिलं स्वप्न होत . स्वतःच अस काहीतरी . त्यादिवशी ते तुटल . आणि हि तर फ़क़्त सुरुवातच होती . ……… नौकरी ला लागल्यावर पहिले भाड्याने flat घेतला . आता कुणासोबत आपली स्पेस शेयर करायची गरज नव्हती . एक टीवी पण घेतला . डिश टीवी वाल्याच्या दुकानात गेलो . तो मला वेगवेगळे packages समजावून द्यायला लागला . पण कामाच तो काही बोलेना . शेवटी न राहवून मीच बोललो , "मुझे कार्टून चानाल्स भी चाहिये . मुझे कार्टून देखना अच्छा लगता है ." त्या माणसाच्या चेहऱ्यावर आलेले सहानुभूतीचे भाव अजून पण डोळ्यासमोरून जात नाहीत . कार्टून्स आणि कॉमिक्स ने प्रचंड आनंदाचे क्षण दिले आहेत त्या सर्व क्षणांसाठी हा लेखन प्रपंच . आणि ह्या गोष्टी वाचणे आणि पाहणे हा 'पोरवडा ' आहे अश्या समाजाबद्दल प्रचंड सहानुभूती . ते काय मिस करत आहेत हे त्यांचे त्यांनाच कळत नाहीये .
  • Log in or register to post comments
  • 23851 views

प्रतिक्रिया

Submitted by खटपट्या on Fri, 01/09/2015 - 11:01

Permalink

खूप छान ! मी अजूनही टॉम अँड

खूप छान ! मी अजूनही टॉम अँड जेरी बघतो. पण आत्ताची ती झुरळाची वगैरे कारटून्स आवडत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 01/09/2015 - 11:11

Permalink

आम्हाला "मोटू और पतलू की जोडी

आम्हाला "मोटू और पतलू की जोडी" आवडते. तशीच एक जोडी आमच्या मित्रमंडळीतही आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 01/09/2015 - 12:18

In reply to आम्हाला "मोटू और पतलू की जोडी by सतिश गावडे

Permalink

जरा आमची पण

भेट घालून द्या त्यांच्याशी एखादेवेळेस :"जोगायोग" घडायचा !!! जो आम्हाला अभिप्रेत आहे तोच झालेला योग.
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Fri, 01/09/2015 - 11:14

Permalink

अगदि. लोट्पोट कोमिक्स

अगदि. लोट्पोट कोमिक्स :)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 01/09/2015 - 11:16

Permalink

अप्रतिम.. संवेदनशील.

अप्रतिम.. संवेदनशील. -("शेरदिल"प्रेमी नासमझ डॉगी) गवि ..
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 01/09/2015 - 11:19

In reply to अप्रतिम.. संवेदनशील. by गवि

Permalink

+१

सुंदर आणि हळवा लेख! फँटम, मँड्रेक, कर्बी, बहादूर इत्यादी इंद्रजाल कॉमिक्सच्या नायकांनी वेड लावलं होतं लहानपणी. माझा भाऊ तर त्याच दुनियेत वावरत असायचा बरीच वर्षे.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 01/09/2015 - 11:45

In reply to +१ by नगरीनिरंजन

Permalink

शिवाय.. डायना, नार्डा आणि

शिवाय.. डायना, नार्डा आणि कर्मा (चूभूदेघे आणि करेक्ट करणे) यांच्या माफक क्लीवेज असलेल्या चित्रांनी खर्‍या अर्थाने पहिल्या पहिल्या खूप "कोवळ्या" नसलेल्या भावना मनात जागल्याचं आठवतं.. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 01/09/2015 - 11:51

In reply to शिवाय.. डायना, नार्डा आणि by गवि

Permalink

हो हो अगदी मार्मिक

हो हो अगदी मार्मिक :)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 01/09/2015 - 12:49

In reply to शिवाय.. डायना, नार्डा आणि by गवि

Permalink

जपानी कार्टून्स बघितले असते

जपानी कार्टून्स बघितले असते तर काय झाले असते =))
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 01/09/2015 - 12:56

In reply to जपानी कार्टून्स बघितले असते by टवाळ कार्टा

Permalink

तत्काळ तिकेट टु ॲडल्टहूड..

तत्काळ तिकेट टु ॲडल्टहूड.. बाकी आम्ही इतके पण हॅ नव्हतो हां.. जेम्स हॅडली चेसची कव्हर्स बघायचो.. -(पूर्वी चहा पीत होतो) गटणे
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Fri, 01/09/2015 - 15:33

In reply to शिवाय.. डायना, नार्डा आणि by गवि

Permalink

@गवी - कसलं भारी निरीक्षण

@गवी - कसलं भारी निरीक्षण *lol* *LOL*
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 01/09/2015 - 11:21

Permalink

खूप छान!

खूप सुरेख लिहिलंय! मी पण टॉम आणि जेरी फॅन! कसाही मूड असो, त्यांना पाहिले की चेहर्‍यावर हसू आलंच पाहिजे. माझी मुलं शिन चॅन वगैरे बघायची, आणि इतर पॉवरपफ गर्ल्स आणि तत्सम बरेच प्रकार! कॉमिक्स मात्र घरात फार कधी आली नाहीत. मी लहान असताना सहज मिळत नसत. ते वेताळाचे मॅगझिन कुठे मिळाले तर जाम भारी वाटायचं. मुलांना टीव्हीवर कार्टून नेटवर्क असल्याने कॉमिक्स घ्यावी असं कधी फार वाटलं नाही. मात्र दोघंही मुलं मोठी झाली तशी बाकी सगळी कार्टून्स हद्दपार झाली पण टॉम आणि जेरी मात्र अढळपदावर आहेत!
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 01/09/2015 - 11:42

In reply to खूप छान! by पैसा

Permalink

आणि अजिबात जरासुद्धा इतर काही

आणि अजिबात जरासुद्धा इतर काही तार्किक विचार करायचा नसेल आणि फक्त ठो ठो हसायचं असेल तर रोड रनर आणि कयोटे. त्या रोडरनरला पकडण्यासाठी बनवलेली उपकरणे म्हणजे लाजवाब. तोचतोचपणा असतो, पण बर्‍याच काळाने एखाद्या वेळेस पाहिलं तर हुकमी हसू येतं दणदणीत. मीक मीक.. ;) Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on Fri, 01/09/2015 - 13:11

In reply to आणि अजिबात जरासुद्धा इतर काही by गवि

Permalink

मीक मीक .........

मीक मीक ......... :) तोचतोचपणा असला तरी पाहायला जाम मजा येते.
  • Log in or register to post comments

Submitted by सविता००१ on Fri, 01/09/2015 - 14:51

In reply to आणि अजिबात जरासुद्धा इतर काही by गवि

Permalink

येस्स

रोड रनर मस्तच
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Fri, 01/09/2015 - 15:34

In reply to खूप छान! by पैसा

Permalink

धन्यवाद पैसा ताई

धन्यवाद पैसा ताई
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 01/09/2015 - 12:06

Permalink

माझ्या दिराने मुलाच नाव ध्रुव

माझ्या दिराने मुलाच नाव ध्रुव ठेवलय आणि अजुनही माझा नवरा सकाळी उठुन दात न घासता "हॉ" असं करत "नागराज की विष की फुम्कार" असलं काहीतरी बडबडत हॉ हॉ हॉ करत दात घासतो...!! असे जगात अजुनही येडपट लोक आहेत हे बघुन आनंद वाटला!!! छान लिहीलाय लेख.. कार्टुन्स पहाणं, ते ही टॉम आणि जेरी, ही माझ्यामते आनंदी माणासची लक्षणं आहेत !!
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on गुरुवार, 01/15/2015 - 23:59

In reply to माझ्या दिराने मुलाच नाव ध्रुव by पिलीयन रायडर

Permalink

नमन...!!!

कार्टुन्स पहाणं, ते ही टॉम आणि जेरी, ही माझ्यामते आनंदी माणासची लक्षणं आहेत !! खरंय. त्यातही Fred Quimby चे खास. आत्ताचे टॉम आणि जेरी हे अतिशय रटाळ आणि यांत्रिक वाटतात. चंपक बद्दल कुणी बोललं नाही ते! ;-) कॉमिक्स हा नेहमीच वीक पॉईंट राहिलेला आहे. अर्थात् ध्रुव सगळ्यांत आवडता. त्याचे खलनायक सुद्धा एकाहून एक असायचेत. "बौना वामन हमेशा एक न एक ट्रिक बचाके रखता है..!" असे म्हणत पळून जाणारा बौना वामन आठवला म्हणजे हसू येतं आता..! ;-) कार्टून्स मधे आणिक एक कॅरेक्टर आठवतं ते म्हणजे बांकेलालचं... अप्रतीम sarcastic कॉमेडी होती ती. इतक्यात पोरीसाठी काही जुन्या वॉल्ट डिस्नेच्या मूव्हीज डाऊनलोड केल्या आहेत. Cinderella, Snow White, Thumbeleena, Dumbo... आत्ताच्या कार्टून्सपेक्षा कितीतरी सरस आहेत. त्यात पुन्हा साऊंडट्रॅक म्हणजे खिळवून ठेवणारं आहे.. कितीतरी बारीक-सारिक विचार करून एक-एक हालचाल तयार केलेली आहे. वॉल्ट डिस्नेच्या Snow White चा मेकींग चा १५-२० मिनिटांचा व्हिडीओ आहे.. निव्वळ अप्रतीम आहे. लिंक मिळाली की डकवतो. सर्व जुन्या आठवणी ताज्या केल्याबद्दल धागालेखकाचे मनःपूर्वक आभार!! :-) धागा अतिशय आवडला हे वेगळे सांगणे न लगे!
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Fri, 01/16/2015 - 09:32

In reply to नमन...!!! by राघव

Permalink

Fred Quimby च्या

Fred Quimby च्या निरीक्षणासाठी आभार . माझ पण एकदम हेच मत आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by किल्लेदार on Wed, 11/11/2015 - 01:45

In reply to नमन...!!! by राघव

Permalink

ध्रुव हा ऑल टाइम फेवरीट

ध्रुव हा ऑल टाइम फेवरीट होता. वेगळेच पण काहीतरी लॉजिकल कथानक असायचे. त्यावरून एखादा हॉलीवूडपट सुद्धा बनू शकेल. ग्रांड मास्टर रोबो आणि उडनतश्तरी के बंधक चे कथानक तर निव्वळ अफलातून होते. त्यामानाने नागराज च्या कथानकात काहीच दम नसे.
  • Log in or register to post comments

Submitted by पदम on Fri, 01/09/2015 - 12:12

Permalink

खूप छान!

मला टोम न जेरी, मोन्गलि, रोबेर्ट वगैरेफार आवडायचे त्यावेळेला.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 01/09/2015 - 12:19

Permalink

यावर कितीही लिहल तरी ते कमीच

यावर कितीही लिहल तरी ते कमीच वाटेल...लहानपणातले सोनेरी क्षण ! :) माझ्या लहानपणी स्पायडर मॅन, फॅटम यांचे कागदी मुखवटे मी घेतल्याच आठवतय... अधिक टंकन कष्ट घेण्या ऐवजी इडियो देतो... :) १} माझ्या आणि इथल्या सगळ्यांच्याच मनात या व्हिडीयोने कायमचे स्थान निर्माण केले आहे. :) २} जंगल बुक आणि मोगली... :) ३} डक टेल्स :- या कार्टुन सिरीजचा मी फुलस्पीड पंखा होतो आणि आजही आहे ! :) ४} सगळ्यातं गोंडस कार्टुन सिरीज... :) पाखरांच्या शब्दात क्यूट ! ;) ५} जॉनी क्वेस्ट... मला वाटतं... ही बहुधा कार्टून नेटवर्कवर आलेली पहिली ३डी कार्टून सिरीज असावी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- Saathiya
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 01/09/2015 - 12:24

In reply to यावर कितीही लिहल तरी ते कमीच by मदनबाण

Permalink

पहिल्या व्हिडीओच्या आठवणीने

पहिल्या व्हिडीओच्या आठवणीने डोळे पाणावले. झाडे तोडू नका असे सांगताना त्या त्रिकोणाच्या चेहर्‍यावरची अजिजी आणि हातवारे.. अन शेवटचा तो झांगडगुत्ता डान्स.. एक चिडिया अनेक चिडिया.. राहिले उल्लेखायचे वाटते.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 01/09/2015 - 12:30

In reply to पहिल्या व्हिडीओच्या आठवणीने by गवि

Permalink

एक चिडिया अनेक चिडिया..

एक चिडिया अनेक चिडिया.. राहिले उल्लेखायचे वाटते. नाही, ते माहित आहे... पण वरचा व्हिडीयो बरेच दिवस तू-नळीवर शोधला होता तेव्हा मिळाला नव्हता... काही दिवसांपूर्वी सापडला आणि लयं लयं आनंद झाला ! :) मारा-मारी झाल्यावर तो जसा ओरडतो तो आवाज माझ्या लक्षात होता. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- Saathiya
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 01/09/2015 - 14:57

In reply to एक चिडिया अनेक चिडिया.. by मदनबाण

Permalink

मस्त काम...

एक अजून विनंती... असाच एक, "कचरा टाकू नका." हा संदेश देणारी एक कार्टून फिल्म होती. ती पण मिळतेय का?
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 01/09/2015 - 15:08

In reply to मस्त काम... by मुक्त विहारि

Permalink

सोधुन पाहतो... मिळाल्यास इथे

सोधुन पाहतो... मिळाल्यास इथे देतो. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- Saathiya
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 01/09/2015 - 15:27

In reply to सोधुन पाहतो... मिळाल्यास इथे by मदनबाण

Permalink

https://www.youtube.com/user

https://www.youtube.com/user/FilmsDivision/videos इथे फिल्म डिव्हीजनचे बरेचसे व्हिडीयो आहेत... यात तुम्हाला हवा तो व्हिडीयो आहे का ते पहाल का ? बाकी हा देखील अत्यंत बोधप्रद वाटला ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- Saathiya
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 01/10/2015 - 00:24

In reply to https://www.youtube.com/user by मदनबाण

Permalink

थोडी भर...एक तितली...

http://www.youtube.com/watch?v=R-tTOJ1RvUY
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 01/10/2015 - 22:15

In reply to थोडी भर...एक तितली... by मुक्त विहारि

Permalink

धन्यवाद गवि...

धन्यवाद गवि... :) बाकी तुम्ही गायब आया ची जी आठवण सांगितलं आहे त्यावरुन मला त्याचे गाणे आठवले होते ! तत थै तत थै असं काही तरी तो गोंडस गायब गुणगुणायचा ! :) बाकी टिनएज म्युट्न्ट निंजा टरटल्स, कोब्रा, कॅप्टन प्लॅनेट, रिची रिच ही काही आठवलेली आवडती कार्टून्स, हिमॅन मधल्या मला स्केलेटॉरचा आवाज फार आवडायचा आणि त्यांच हसण सुद्ध लक्षात आहे. जाता जाता :- माझ्या मागच्या प्रोजेक्टच्या मॅनेजरनी { मला लाभलेला एक उत्तम बॉस आणि उत्तम माणुस} एकदा गप्पा मारताना त्यांचा मुलगा डोरेमॉन पाहतो ते सांगत होते... त्यांनी डोरोमॉनची नक्कल करुन दाखवली... त्यानंतर आम्ही जवळपास १५ मिनीटे फक्त हसत होतो. :)

मदनबाण.....

Piddly Official Song :- { Shamitabh }
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 01/09/2015 - 12:24

Permalink

कार्टून नेटवर्क वरचं माझं

कार्टून नेटवर्क वरचं माझं आवडतं (शेवटचं! :-/ ) कार्टून.. जस्टीस लीग! टायटल साँग पण कित्ती भारी आहे त्याचं..बघताना खूप बरं वाटायचं. पण का.ने.वरहि सगळ्या चिनी/जपानी कार्टुनांनी अतिक्रमण केल्यापासून मी का.ने.बघणं सोडून दिलं. Image removed. ================================ (चिनी/जपानी कार्टूनं दू दू आहेत! :-/ )
  • Log in or register to post comments

Submitted by कहर on गुरुवार, 01/15/2015 - 14:23

In reply to कार्टून नेटवर्क वरचं माझं by अत्रुप्त आत्मा

Permalink

मला जपानी कार्टून मधले फक्त

मला जपानी कार्टून मधले फक्त Beyblade आवडले सर्व सिरीज । यू गी ओ आणि dragonball च्या सुरवातीच्या सिरीज जरा interesting होत्या पण नंतर बारगळले … पण का ने च्या ९० च्या दशकातील ओरिगिनल dexter, johny Bravo, KND , Centurian, मास्क , Tweety वगैरे ला तोड नाही …
  • Log in or register to post comments

Submitted by Pain6 on गुरुवार, 01/15/2015 - 14:36

In reply to कार्टून नेटवर्क वरचं माझं by अत्रुप्त आत्मा

Permalink

अत्रुप्त आत्मा

आणि जुना लोगो बदलण्याचा अक्षम्य अपराध विसरलात?
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on गुरुवार, 01/15/2015 - 15:28

In reply to अत्रुप्त आत्मा by Pain6

Permalink

सहमत

सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 01/09/2015 - 12:47

Permalink

आणि FTII चं मोलू .......

आणि FTII चं मोलू ....... आणि गायब
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 01/09/2015 - 12:53

In reply to आणि FTII चं मोलू ....... by अत्रुप्त आत्मा

Permalink

गायब आया गायब आया किसीको

गायब आया गायब आया किसीको हसाने आया किसीको सताने आया.. गाय्बाय्गाय्बायगाय्बाय्गाय्बाय गायबाय गायबाय.. झालस्तर.. शर्ली मॅक और जोनेथन.. चमत्कारी टेलेफोन.. हे आठवणं कठीण आहे. पिंगू क्ले थ्रीडी तोही आठवला.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रन्गि पाउस on Fri, 01/09/2015 - 12:57

Permalink

चिंटू

अचानक थांबला ...थांबला तो थांबलाच...
  • Log in or register to post comments

Submitted by थॉर माणूस on Fri, 01/09/2015 - 14:13

In reply to चिंटू by अत्रन्गि पाउस

Permalink

सकाळ मधे थांबला पण मला वाटतं

सकाळ मधे थांबला पण मला वाटतं त्यांनी फेसबूक वर परत चालू केले आहे चिंटू.
  • Log in or register to post comments

Submitted by साबु on Fri, 01/09/2015 - 13:40

Permalink

अल्लादिन..

हा कसा काय विसरलात? काय एक एक व्हिलन असाय्चे....
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Fri, 01/09/2015 - 17:05

In reply to अल्लादिन.. by साबु

Permalink

तुमचं सदस्यनाम पाहून "चाचा

तुमचं सदस्यनाम पाहून "चाचा चौधरी" कॉमिक्स आठवलं. :)
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Fri, 01/09/2015 - 14:14

Permalink

हीमॅन विसरले का लोक? शिवाय

हीमॅन विसरले का लोक? शिवाय फ्लॅश गॉर्डनही.
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on Fri, 01/09/2015 - 14:41

Permalink

राज कॉमिक्स....

लहानपणी कॉमिक्स वाचायची फार आवड होती. फार पुर्वी लोकमत कॉमिक्स यायचे त्यावेळी त्याचा दर्जा खुपच छान होता.विशेष म्हणजे रामायण, महाभारत, शिवाजी महाराज, येशू, रविन्द्रनाथ टागोर आणि अश्याच अनेक मोठ्या लोकांबाबत त्याच कॉमिक्स मध्ये वाचलेलं आठवतं सोबत, हेन्री , फॅन्टम आदी होतेच तसेच लोकमत कॉमिक्सचा रोबो अमिताब आणि पिंकी सुध्दा प्रसिध्द होते. पुढे राज कॉमिक्सच्या दुनियेत मी ठार वेडा झालो होतो. त्यातही सुपर कमांडो ध्रुव माझा आवडता. त्याचे कुठल्याही समस्येवर बुध्दीचातुर्याने मात करने आवडायचे.... एखादे संकट समोर आल्यावर त्याच्या बाबत विचार करत असतानाच नेहमीची.... एक मिनीट.... असे म्हणून मग त्यावर उत्तर त्याला सुचायचे. अनुपम सिन्हाचे हे पात्र होते. तसेच विठ्ठ्ल कांबळे नावाचा मराठी मानुस त्याचे इकींग करायचा. राज कॉमिक्सचे अन्य हिरो सुध्दा मस्तच होते. नागराज, डोगा, परमाणु, तिरंगा, शक्ती, भोकाल, तुरीन, अतिक्रुर, भेडीया, आदी तसेच उल्लेख करावाच लागेल असे पात्र म्हणजे बांकेलाल... याशिवाय डायमंड कॉमिक्सचे चाचा चौधरी, साबु, पिंकी आदी होते. एक खुप आधी डिटेक्टीव्ह राम रहीम होते. लोट पोट होते तसेच तुलसी कॉमिक्सचे तौसी आठवते. हवालदार बहादुर सुध्दा आठवते. ह्या कॉमिक्सच्या जगात काहीही होऊ शकतं. आणि नावं तर इतकी भन्नाट असतात की काय सांगावं? नागराज और थोडांगा की जंग, ध्रुव और बौना वामन, डोगाचे चाचा असेच, अदरक चाचा, हल्दी चाचा, कालीमिर्च चाचा.... आदी. वर लिहीलेला लेख खुप आवडला हे वेगळे सांगायला नको.... अप्रतिम आणि मनाला स्पर्श करून गेलेला लेख. - नीलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Fri, 01/09/2015 - 15:29

In reply to राज कॉमिक्स.... by नीलकांत

Permalink

नीलकांत आपले कॉमिक्स गोत्र

नीलकांत आपले कॉमिक्स गोत्र एकाच आहे . लोकमत कॉमिक्स ची आठवण ताजी करून दिल्याबद्दल धन्यवाद .
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on गुरुवार, 01/15/2015 - 02:54

In reply to राज कॉमिक्स.... by नीलकांत

Permalink

नागराज चे काबुकी का खजाना ,

नागराज चे काबुकी का खजाना , जादुगार शकुरा. अशी अनेक नावे होती. तौसी माझे विशेष लाडके होते त्याचा जी ९ नावाचा खलनायक जो मेल्यावर परत जन्म घेतो व अधिक शक्तिमान होतो. असाच उल्लेख करावा लागेल तावूजी चा ठकठक मधील बन्या पण झकास असायचा. ध्रुव ची बहिण चंडिका ध्रुव चे एक कॉमिक्स मस्त होते मैने मारा ध्रुव को ह्यात ध्रुव चे सर्व खलनायक आळीपाळीने येउन त्यांनीच ध्रुव ला कसे मारले हे सांगत असतात कारण ध्रुव ला ज्याने मारले त्यास मोठे बक्षिसच ठेवले असायचे
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 01/15/2015 - 20:03

In reply to राज कॉमिक्स.... by नीलकांत

Permalink

विठ्ठ्ल कांबळे नावाचा मराठी

विठ्ठ्ल कांबळे नावाचा मराठी मानुस त्याचे इकींग करायचा.
मालकांचे नॉलेज लैच जब्रा. ईंकींग बिंकिंग सारखे आमचे शब्द अन ते करणारा माणूस पण लक्षातेय म्हणजे पक्का कॉमिक्सवेडा. लोकमत टाइम्सातला फ्लॅश गार्डन पण भारी असायचा. बाकी वेताळ, मँड्रेक, स्पायडरम्यान, रिप किर्बी ह्या कॉमिक्साने तर चित्रांची गोडी लागली. निम्मी अ‍ॅनॉटॉमी ली फाक अन सी बेरीची चित्रे पाहुन पक्की झाली होती. त्यांचे मसल्स वगैरे काढायची अन ती फ्लॅट रंगात दाखवायची स्टाईल मी जशीच्या तशी उचलली होती. ड्रॉईंग कॉलेजाचा मास्तर पण म्हणायचा तुझे स्केचेस इथले दिसत नैत. ;) दिसणार कशी म्हणा. स्केचेस महाद्वारात बसून केलेली. माणसे दिसायची युरोपातली. लै उपकार आहेत पण या कॉमिक्सचे. बालपण श्रीमंत तर केलेच. अजून त्यावर खातोय. :)
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on गुरुवार, 01/15/2015 - 20:44

In reply to विठ्ठ्ल कांबळे नावाचा मराठी by अभ्या..

Permalink

(No subject)

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
  • Log in or register to post comments

Submitted by सविता००१ on Fri, 01/09/2015 - 15:02

Permalink

मला

या वरच्या कार्टून्सशिवाय मला पिंगू, थॉमस द इंजिन, ऑसवल्ड, हे पण आवडतात
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 01/09/2015 - 15:08

Permalink

टॉम & जेरी, डक टेल्स, विन्नी

टॉम & जेरी, डक टेल्स, विन्नी द पूह, अजून काही तर आठवत पण नाहीत. दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत सकाळी आठ ते दहा आणि संध्याकाळी साडेपाच ते सात रिमोट आमच्या ताब्यात. झी टिव्हीवर तेव्हा डक टेल्स, विन्नी द पूह,अल्लादिन वैगरे टेलिकास्ट व्हायचं. पुढे कार्टून नेटवर्क वरचा मास्क, स्कूबी डु.....काय काय आठवायला लावलं ह्या लेखाने. आता यातले एक तरी डाऊनलोड करुन बघणे आले.
  • Log in or register to post comments

Submitted by Pain6 on गुरुवार, 01/15/2015 - 13:57

In reply to टॉम & जेरी, डक टेल्स, विन्नी by सूड

Permalink

हे बहुदा २००० च्या नंतर झाले आहे

मास्क आणि इतर काही कार्टून्सचे वैशिष्ट्य म्हणजे ती निव्वळ डब न करता त्याचे एकदम भारतीयीकरण करून टाकले होते. Stanley Ipkiss चे सचिन सबनीस, somebody stop me चे रोक सको तो रोक लो तर खलनायकांची नावे पाणीपुरी, मिसेस पनीरवाली वगैरे औरच!
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on गुरुवार, 01/15/2015 - 15:29

In reply to हे बहुदा २००० च्या नंतर झाले आहे by Pain6

Permalink

ही एक नवीन माहिती मिळालि

ही एक नवीन माहिती मिळालि
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on गुरुवार, 01/15/2015 - 16:19

In reply to हे बहुदा २००० च्या नंतर झाले आहे by Pain6

Permalink

+१

'डॉयल'च गोयल, केलवे'च केळकर मस्तं होतं ते डबींग
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com