मुसाफीर
शेवटी "मुसाफीर "वाचायला मिळालं . परत एकदा गोडबोले सरांची "range "बघून अवाकलो . त्यांचं प्रत्येक पुस्तक मराठी माणसाला घडवतंय . त्यांना आणि त्यांच्या व्यासंगाला आपला कुर्निसात .
किमयागार , अर्थात ,बोर्डरूम ,मनात, मुसाफिर हि पुस्तकं प्रत्येक मराठी घरातल्या कुंकवाच्या करंड्या इतकीच महत्वाची आहेत .
आधी "बालकांड" आणि आता "मुसाफीर "एकूणच "मनुवादी "(म्हणजे आडनावाने "मनुवादी"… विचारांनी नाही म्हणत मी)आत्माचारीत्रांना बरे दिवस आलेत असं दिसतंय .
एवढ्या सगळ्या गोष्टी शिकताना ,अनुभवताना वेळ कसा मिळतो ? हे मला खरोखरच इंजिनीरिंग च्या कित्येक विषयान सारखं अनाकलनीय आहे . त्यांच्या घडयाळया मध्ये नक्कीच दिवसाचे ५६ तास असावेत .
पण खरं सांगतो बाकी पुस्तकां सारखी मजा नाही आली राव . आई शप्पत काही काही वेळेला पुस्तक लई डोक्यात गेलंय .
पुस्तकाचं नाव खरंतर "प्रथम पुरुषी-एक वचनी " ठेवायला पाहिजे होतं . किती वेळेला मी ...मी ….? कंटाळा येतो. मान्य आहे आत्मचरित्र आहे "स्व " भोवतीच केंद्रित पाहीजे वगैरे वगैरे . पण ठीकठिकाणी केलेल्या आत्मस्तुतीच्या "ओकाऱ्या " प्रचंड वास मारतात . आता "नादवेध"लिहिताना स्वताची ओळख CEO वगैरे करून द्यायची काय गरज असते ? असं लिहिण्यानी पुस्तकाची gravity वाढणार आहे ? एक मात्र आहे गोडबोले सर स्वताच्या झालेल्या चुका हि प्रांजळ पणे मान्य करतात पण हे मान्य करणं आत्मस्तूतीच्या वांत्या काढण्याचं समर्थन होऊ शकत नाही .
"आत्मस्तुती "करणारा मुर्ख असतो असे रामदासांनी म्हंटल आहे. पण रामदास IIT मध्ये शिकलेले नसल्या मुळे कदाचित गोडबोले सरांना त्यांचं म्हणणं पटणार नाही.
अर्थात त्यांचा "संत " मंडळीं वर राग आहेच . ते शास्त्रीय दृष्टीकोनाच समर्थन करताना पु लं. च एक वाक्य आजू बाजूचा संदर्भ गाळुन उधृत करतात "इथे जेवढे संत जन्माला आले तेवढे नोबेल विजेते जन्मले असते तर आपण जास्ती सुखी झालो असतो ".
माफ करा सर नाही पटलं .तुलनाच बरोबर नाही .फक्त नोबेल पारितोषिकच समाजाची श्रीमंती दाखवतात ?
मग त्याच न्यायाने तीन तीन तास माईक घशात कोंबून गाणी बजावणी करणारे पण निरुपयोगी ठरतील . आपण अस म्हणायच का ? जेवढे गवैये जेवढे तब्बलजी ,भारतात जन्माला आले त्या ऐवजी नोबेल विजेते असते तर आपण सुखी झालो असतो ?
पण सर अस म्हणणार नाहीत. कारण गाणं ऐकणं हे त्यांच्या दृष्टीने intellectual activity, आहे.
संत लोक जन्माला येतात ते त्या त्या वेळेच्या परिस्थितिच प्रतिबिंब म्हणून . नाहीतर नोबेल च्या स्पर्धेत तुम्हाला आसारामच मिळणार .
पुस्तक वाचून माझा अजून एक समज झालाय IIT मध्ये शिकलेला माणूसच कर्तृत्ववान असतो आणि बाकी सगळे "झंडू बाम "आहेत. (ह्या वाक्याचा आणि माझ्या शैक्षणिक कारकीर्दीचा काहीही संबंध नाही …:-). मी पुस्तकं वाचून सैरभैर झालोय मला प्रचंड नैराश्य आलंय कारण सरळ आहे IIT मध्ये नाही शिकलो :-)गेला बाजार एखाद नोबेल तरी मिळवायला पाहिजेल राव .
पुस्तकात प्रत्येक ठीकाणी स्वतःच नावं मोठ्या मोठ्या लोकां बरोबर जोडण्याचं ओंगळवाण प्रदर्शन वात आणत.
सर तुम्ही "स्वयंप्रकाशित "आहात . तुम्ही प्रकाश देत रहा. उसने घेणारे आम्ही आहोत.
पुस्तका ला एवढ्या लोकांची स्तुतीपत्रे जोडायची काय गरज होती ?एखाद्याच तेवढ्याच वकुबाच्या व्यक्तीची प्रस्तावना जास्ती शोभली नसती ?
मला तर असे वाटते की अच्युत गोडबोले I. T मधले "सचिन पिळगावकर" आहेत :-)… किंवा "सचिन पिळगावकर" dance मधले "अच्युत गोडबोले " आहेत.
पुस्तक हे अनेक नाट्यमय घटनांनी भरलेले असून सुद्धा त्यातील थरार वाचका पर्यंत पोचत नाही .त्याला कित्येकदा माहिती पत्रिकेच स्वरूप येतं . असो IIT मधील syllabus मध्ये मराठी लेखन हा विषय नसावा .
एकूणच काय तो मजा तो पंच नाही आला राव .
ता . क .:- त्यांचं नवीन गणिती हे पुस्तक प्रकाशन पुर्व किमतीत उपलब्ध होत . मी तीन copies घेतल्या. घरात कुंकवाचा करंडा नको ?
याद्या
2783
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
डु आयडि?
+1
In reply to डु आयडि? by अनन्त अवधुत
+२
In reply to +1 by शिद
ठ्ठो!!!
.
कोन गडबोले?
काय हे?