सांज बावरी, सांजेला कळते ना काही
शांत बाह्यतः, आतुन ही घोंगावत राही
सांज बोचरी, काळोखाची पूर्वकल्पना
वर केशरिया, अंतरात दडल्यात वेदना
सांज विरहिणी अडखळलेली मावळतीशी
नेत्र पश्चिमी, मन पूर्वेच्या क्षितिजापाशी
सांज हरीच्या बाहूंमधली राधा भोळी
मोहनरंगी रंगुन बनते रात्र सावळी...
अदिती जोशी| लेखनविषय: |
|---|
वाचने
2038
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
आहा! सुन्दर !
खल्लास
मि.का. शी संपूर्ण सहमत!
In reply to खल्लास by मिसळलेला काव्यप्रेमी
+१
फारच छान
सांज विरहिणी अडखळलेली
खूप सुंदर!