महालक्ष्मी सरस २०१५.
मागचा अनाहीताचा महालक्ष्मी सरस कट्टा मिसला आणि नंतर सविताचा कट्ट्याचा वृतांत वाचल्यापासुन कट्टा मिसल्याची हुरहुर लागली. शनिवारी संध्याकाळी ५ वाजता अजयाने महालक्ष्मी सरस ला रविवारी येणार का विचारल्यावर लगेचच होकार देउन टाकला. रात्री आरोहीने सांगितले ती ही येणारे मग तर तिला भेटायची उत्सुकता लागुन राहीली. रविवारी सकाळी लवकर उठुन ८.५० ची लोकल पकडुन ११ वाजेपर्यंत बांद्रा रीक्लेमेशन ला पोहोचले सुद्धा, अजया आणि आरोही या १२.३० पर्यंत येतो असं म्हणाल्या त्यामुळे मी एकटीनेच फीरायला सुरुवात केली.
गेटच्या बाहेर उजव्या बाजुला फुलझाडांची छोटीशी नर्सरी होती तर डाव्या बाजुला लहान मुलांना खेळण्याची सोय केलेली होती. गेटमधुन आत घुसल्या घुसल्या आधी श्री. गणेशाची मुर्ती होती मागे कारंजे उडत होते.
आणी समोर मोठ्ठा लांबच्या लांब मांडव उभारला असुन खुप सारे स्टॉल्स दिसत होते. सुरुवातीलाच एका बचत गटाच्या महीला हाताने गोधडी शिवत बसल्या होत्या. त्यांच्या संमतीने त्यांचा फोटो काढला.
नंतर चा स्टॉल हाताने शिवलेल्या बॅगांचा होत्या, अतिशय सुंदर अशा कापडी, जुट्च्या पिशव्या टांगलेल्या होत्या.
.
पुढे हाताने कलाकुसर केलेल्या पणत्यांचा स्टॉल होता.
विविध प्रकारची लोणची यांच्यासाठी बरेच स्टॉल होते.
एका भागात विविध प्रकारची पिठे , कुरडया, शेवया, सांडगे, कडध्याने, पोहे होते.
एक स्टॉल तर खास मांसाहार करण्यार्ंसाठी स्पेशल होता, सर्व प्रकारचे सुकट इथे मिळत होते.
आयुर्वेदीक सुगंधी अगरबत्त्या , अत्तरे , काजळ यासाठी ही बरेच स्टॉल्स होते.
राजस्थानी पारंपारीक वस्तुंसाठी एक राजस्थानी स्टॉल होता.
कोकण स्पेशल आमसुले, आंबा वडी, चिंचवडी, सरबते, आमरस.
मंडपाछ्या बाहेरच्या बाजुलाही काही वस्तु विक्रीसाठी ठेवल्या होत्या
तिथेच हा वासुदेवही भेटला.
.
.
हाताने केलेल्या अजुन काही कलाकृती
.
वेगवेगळ्या राज्यातील साड्या, ड्रेस मटेरीयल्स
बाकीच्या काही वस्तुंचे स्टॉल्स
.
.
.
.
.
पुर्ण मंडप फिरुन झाला, साधारण १२.१५ झाले , फिरुन फिरुन भुक लागली होती म्हणुन कैरीचे पन्हे घेतले.
पुन्हा एकदा अजयाला फोन केला तर ती जवळ जवळ पोहोचलीच होती. गेटपाशी आले तोवर अजया, आरोही आणि तिचं गोड पिल्लु अद्वेय आत आले. आल्या आल्या आरोहीच्या पिल्लुचे लक्ष लहान मुलांच्या खेळांकडे गेले तसा तो तिथे जायला अधीर झाला. अजया ने कुरडया, लोणची घ्यायला सुरुवात केली. पण आधी जेवुन घ्यायचे ठरले, बाजुलाच खाण्याचे स्टॉल्स लागले होते. पोटपुजा केल्या नंतर आरोही अद्वेय च्या हट्टापायी त्याला खेळायला घेउन गेली तोवर मी आणि अजया पुन्हा फीरु लागलो. अजया ने बरीच खरेदी केली. आरोही गेल्याच रविवारच्या कट्ट्याला खरेदी करुन गेली असल्याने आणि मी माझी फिरण्याची, फोटो काढ्ण्याची आणि या दोघींना भेटण्याची हौस पुर्ण करुन घेतल्याने छोटीमोठी खरेदि केली. फिरत असतानाच तिथे माझ्या साठी खुपच आदरणीय असे आणखी दोन मिपाकर (मोक्षदा आणि नुलकरजी ) भेटले, भेटुन खुपच आनंद झाला, ३ वाजले होते, शेवटी ताजा स्ट्रॉबेरी मिल्क शेक पिउन आम्ही आपापल्या वाटा धरल्या.
आणी समोर मोठ्ठा लांबच्या लांब मांडव उभारला असुन खुप सारे स्टॉल्स दिसत होते. सुरुवातीलाच एका बचत गटाच्या महीला हाताने गोधडी शिवत बसल्या होत्या. त्यांच्या संमतीने त्यांचा फोटो काढला.
नंतर चा स्टॉल हाताने शिवलेल्या बॅगांचा होत्या, अतिशय सुंदर अशा कापडी, जुट्च्या पिशव्या टांगलेल्या होत्या.
.
पुढे हाताने कलाकुसर केलेल्या पणत्यांचा स्टॉल होता.
विविध प्रकारची लोणची यांच्यासाठी बरेच स्टॉल होते.
एका भागात विविध प्रकारची पिठे , कुरडया, शेवया, सांडगे, कडध्याने, पोहे होते.
एक स्टॉल तर खास मांसाहार करण्यार्ंसाठी स्पेशल होता, सर्व प्रकारचे सुकट इथे मिळत होते.
आयुर्वेदीक सुगंधी अगरबत्त्या , अत्तरे , काजळ यासाठी ही बरेच स्टॉल्स होते.
राजस्थानी पारंपारीक वस्तुंसाठी एक राजस्थानी स्टॉल होता.
कोकण स्पेशल आमसुले, आंबा वडी, चिंचवडी, सरबते, आमरस.
मंडपाछ्या बाहेरच्या बाजुलाही काही वस्तु विक्रीसाठी ठेवल्या होत्या
तिथेच हा वासुदेवही भेटला.
.
.
हाताने केलेल्या अजुन काही कलाकृती
.
वेगवेगळ्या राज्यातील साड्या, ड्रेस मटेरीयल्स
बाकीच्या काही वस्तुंचे स्टॉल्स
.
.
.
.
.
वाचने
8965
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
मस्त व्रुत्तांत...
छान झालाय वृ.
मोक्षदाताई आणि नुलकर पुन्हा
In reply to मोक्षदाताई आणि नुलकर पुन्हा by स्पंदना
नुलकर्स फक्त चौथ्यांदा आले
In reply to नुलकर्स फक्त चौथ्यांदा आले by अजया
ओह! फक्त का?
हही हही हही .. वासुदेव
कविता..
मस्त वृत्तांत
छान लिहिलंय
वा वा..केवढे मस्त मस्त फोटो.
मस्त कविता ,फोटो मस्त आलेत ..
छान लिहिलंय
खादाडीचे फोटो
In reply to खादाडीचे फोटो by मोक्षदा
म्हणून ७ जन्माचे भुकेले
In reply to म्हणून ७ जन्माचे भुकेले by टवाळ कार्टा
अहो ट.का. तुमच्या सारखे ७
In reply to अहो ट.का. तुमच्या सारखे ७ by कविता१९७८
अहो ट.का. तुमच्या सारखे ७
In reply to अहो ट.का. तुमच्या सारखे ७ by टवाळ कार्टा
जावईशोध कशासाठी ??
In reply to जावईशोध कशासाठी ?? by कविता१९७८
जावईशोध कशासाठी ??
In reply to जावईशोध कशासाठी ?? by टवाळ कार्टा
अच्छा ! विनोदला सवय आहे का
In reply to म्हणून ७ जन्माचे भुकेले by टवाळ कार्टा
बहुतेक 7 जन्मावर विश्वास नसवा
In reply to बहुतेक 7 जन्मावर विश्वास नसवा by जेपी
आगगागागागा
In reply to बहुतेक 7 जन्मावर विश्वास नसवा by जेपी
खिक्क
In reply to खिक्क by टवाळ कार्टा
जेपी
In reply to बहुतेक 7 जन्मावर विश्वास नसवा by जेपी
जेपी यांणा गेल्या जन्मीचा
In reply to जेपी यांणा गेल्या जन्मीचा by सस्नेह
(No subject)
In reply to जेपी यांणा गेल्या जन्मीचा by सस्नेह
अण्णाभावासाठी मागचा जन्म
In reply to अण्णाभावासाठी मागचा जन्म by जेपी
म्हणजे ?
अग मुलींनो यावेळी शतकी
In reply to अग मुलींनो यावेळी शतकी by आरोही
जास्त वेळ ना घालवु
In reply to जास्त वेळ ना घालवु by जेपी
गल्लत होतेय जेपी काका
झालं? निघा आता.छान होता विनोद
In reply to झालं? निघा आता.छान होता विनोद by अजया
आमी नाय पाठिमागे बोंबा मारत..
अरेरे !
छान झालेला दिसतोय