Skip to main content

इनवेस्टमेंट

लेखक चित्रार्जुन यांनी सोमवार, 12/01/2015 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रानो. मला इनवेस्टमेंट .संदर्भात माहिती हवी आहे ती पण मराठीत कारणकी माझया मते सर्व साधारण मराठी कुटुंबात या बद्दल खूप कमी माहिती आहे ती सर्व सामान्य माणसाना कलावी या साठी हा धागा उघडला आहे म्हणून यावर लवकरात लवकर प्रतिसाद द्यावेत ही नम्र विनंती. गुंतवणूक हा एक अतिशय संवेदनशील विषय असल्याने यावर नकीच मिसळ पाव वर चर्चा होणे आपेखित आहे. यात गुंतवणुकीचे प्रकार, त्यातील वैविध्या उदा. लिक्विड फंड, शेर मार्केट, डेट फंड, कॅपिटल फंड, बॉन्ड्स, म्यूचुयल फंड, एट्सेटरा. त्यातील फायदे तोटे, एत्यादी माहिती द्यावी. तसेच त्यावरील मराठीतील पुस्तके, मराठीतील ब्लॉग्स, अर्थविषयक साप्ताहिके, किंवा संदर्भ ग्रॅंता विषयी माहिती द्यावी.

वाचने 66347
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

गुंतवणूकीसाठी माझी पहिली पसंत आहे ती म्हणजे पी पी एफ { लोक भविष्य निधी } सुरवातीची मुदत जरी १५ वर्षे असली तरीही वर्षभरात किमान ५०० रुपये आणि कमाल १,५०,०००/- ( १ एप्रिल २०१४ पासुन वाढवलेली मर्यादा )रुपये यात भरता येतात पंधरा वर्षानंतर वाटले तर मुदत आणखी पाच पाच वर्षे वाढविता येते पोष्टासह राष्ट्रीयकरण झालेल्या सर्व बँकेत खाते उघडता येते आयकरात सुट मिळते खाते सुरु केल्यानंतर पहिली सहा वर्षे काहीही रक्कम काढता येत नसली तरीही शक्यतोवर यातून रक्कम काढण्यापेक्षा , भरण्यावरच भर द्य्यावा हे उत्तम दर महिन्याच्या पाच तारखेच्या आत रक्कम जमा केली, तर त्या महिन्याचे व्याज खात्यात जमा होते सध्या यात जमा होणार्‍या व्याजावर ८.५० % टक्के दराने व्याज मिळते महत्वाची बाब म्हणजे या रकमेवर कोर्टाची जप्ती आणता येत नाही म्हणून अधिक सुरक्षित आहे. मी १९८९ पासून खाते सुरु केले आहे आणि पाच पाच वर्षे वाढवीत , आता इतकी रक्कम गुंतविली आहे कि मला येथुन पुढे दर वर्षी एक लाख रुपये निव्वळ व्याजापोटी मिळत रहातील. पुर्वी एजंट लोकांना कमिशन मिळत असे , आता तेही बन्द केले असल्याने , एजंट याबाबत अधिक माहिती सांगावयास तयार होत नाही एका व्यक्तीस एकच खाते सुरु करता येते कळत नकळत या खात्यामध्ये धीरे धीरे भरपूर बचत होते आमच्या दहा जणांच्या कुटुंबात नऊ जणांच्या नावे पी पी एफ ची खाती मी सुरु ठेवली आहेत तेंव्हा बचतीची सुरवात पी पी एफ पासून करावी हे उत्तम

ज्यांच्या पगारातून भविष्य निधी { सह वर्गणी द्वारा ) म्हणजे जितकी रक्कम कर्मचार्र्‍याची कपात केली जाते , तितकीच रक्कम जर मालकाकडून कर्मचार्‍याच्या खात्यात जमा केली जात असेल तर , रिटायरमेंटला काही वर्षे शिल्लक असतांना साधारण ३ वर्षे अगर ५ वर्षे आपल्याला झेपेल एव्हढी रक्कम , स्वत:ची म्हणुन जादा कपात करुन घेण्याची व्यवस्थापकास लेखी विनंती करावी.त्यामुळे गुंतवणुक तर होते, वर व्याजही मिळू शकते. ही रक्कम सुद्धा सुरक्षित असते मी शेवटच्या तीन वर्षात रु.३०००/- ते ७०००/ ज्यादा भविष्य निधी मध्ये ( एकतर्फी ) गुंतविली होती, त्यावर मला घसघशीत व्याज मिळाले, जर खरोखर गरज नसेल तर , ९०% भविष्य निधी साठी लगेचच अर्ज करु नये. व दहा टक्के सुध्दा मागू नये लक्षात ठेवा तुम्ही अर्ज केला तरच सरकारी यंत्रणा हालते , अन्यथा ती रक्कम तशीच पडून असते रिटायरनंतर मी दोन वर्षापर्यन्त थांबलो आणि घसघशीत व्याज प्राप्त केले आहे

In reply to by टवाळ कार्टा

समजले नाही. PF मध्ये पैसे तुम्ही भरतच नाही. कंपनी भरते. जर कंपनी सोडली तर भरणा बंद होईल. पैसे तसेच राहतील पण त्यावर व्याज नाही मिळणार.

In reply to by सुनील

PF मध्ये पैसे तुम्ही भरतच नाही. कंपनी भरते.
पैसे जरी कंपनी भरत असली तरी तो आपल्या "पॅकेज"चा भाग असतो. कंपनी काही त्यांच्या पदरचे पैसे देत नाही आपल्या पीएफ खात्यात. :)

In reply to by टवाळ कार्टा

ओके. PPF मध्ये पहिले १५ वर्षे भरणा करीत रहावाच लागतो. त्यानंतर ५-५ वर्षांसाठी मुदतवाढ घेत राहता येते. मुदतवाढीत तुम्हाला पर्याय असतो - भरण्यासहित अथवा भरण्याविरहीत. मात्र एकदा एका पद्धतीने मुदतवाढ घेतली की ५ वर्षांपर्यंत त्यात बदल करता येत नाही. व्याज दोन्ही बाबतीत मिळते.

In reply to by जयन्त बा शिम्पि

मी पूर्वी काम करीत असलेल्या कंपनीमध्ये माझा भविष्य निधी जमा होत असे. आता मी कंपनी सोडली. आता मी सेवा उद्योगात आहे. मात्र निधी तसाच आहे. तो मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज वगैरे उपलब्ध आहे का? असल्यास माहिती द्यावी. नसल्यास निधी मिळविण्यासाठी काय पद्धत आहे याची माहिती द्यावी, ही विनंती.

बहुतेक ब्यान्कातुन हल्ली सेविंग अकाउंटला एफ एफ डी किंवा स्वीप इन / आउट फ्यासिलिटी मिळते. त्यामुळे सेविंगच्या पैशावर एफ डी चा व्याजदर मिळतो.

वर सांगितल्याप्रमाणे पी पी एफ हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित उपाय आहे. जर ३० वर्षांसाठी दरवर्षी १ एप्रिल ला ७०००० रु. गुंतविले तर आपली गुंतवणूक २१००००० एवढी होते. ३० वर्ष पूर्ण झाल्यावर आपल्याला एकरकमी ८४००००० रु . मिळतील. पण पी पी एफ मध्ये पैशे अडकून पडतात आणि गरज असल्यावर काढता येत नाहीत हा एक तोटा आहे . म्यूचुयल फंड हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे . एकरकमी गुंतवणे शक्य नसल्यास Systematic investment Planning (SIP) द्वारा दरमहा गुंतवणूक करावी. मला या गुंतवणुकी द्वारे जवळपास ३०% रिटर्न मिळालेत . गुंतवणूक करण्याआधी अभ्यास जरूर करावा

In reply to by चिनार

मी नुकताच एक SIP प्लान एका ब्यांकेकडून घेतला. एका मित्राशी चर्चा केली असता तो म्हणाला की माझा प्लान "रेग्युलर" प्लान असून तुझ्या परताव्याचा काही भाग दलालास जातो. मी म्हटले की मी हे ब्यांकेत जाऊन केले यात दलाल कुठे आला. त्याच्या म्हणण्यानुसार ही ब्यांकेची मखलाशी आहे. रेग्युलर प्लानसोबत दलाल येतो. त्याने यावर सुचवलेला उपाय म्हणजे मी माझा रेग्युलर प्लान "डायरेक्ट प्लान" मध्ये रुपांतरीत करून घ्यावा. याबद्दल अधिक माहिती देऊ शकाल का?

In reply to by सतिश गावडे

तुमच्या मित्राचे म्हणणे बरोबर आहे. "रेग्युलर" प्लान मध्ये आपण त्या म्यूचुयल फंड कंपनीशी दलालाद्वारे व्यवहार करतो . साहजिकच त्याला कमिशन मिळते ( जवळपास ०.५ %). "डायरेक्ट प्लान" मध्ये आपण थेट कंपनीशी व्यवहार करतो. आता तुम्ही "डायरेक्ट प्लान" मध्ये रुपांतरीत करताना काही आर्थिक नुकसान होते का याविषयी मला माहिती नाही. जर होत असेल तर मी असं सुचवेल की रुपांतर करू नका . मात्र पुढल्या वेळेस काळजी घ्या .

In reply to by चिनार

Birla Sun Life Frontline Equity Fund - Plan A - Growth HDFC Equity Fund - Growth Kotak Select Focus Fund - Grow SBI Magnum Bluechip Fund - Growth HDFC Mid-Cap Opportunities Fund - Growth ICICI Prudential Value Discovery Fund - Growth ICICI Prudential Dynamic Plan - Gro Reliance Equity Opportunities Fund - Growth Axis Long Term Equity Fund - Growth ICICI Prudential Taxplan - Growth Reliance Tax Saver (ELSS) Fund - Growth

In reply to by सतिश गावडे

ICICI Prudential Value Discovery Fund - Growth हा फंड चांगला आहे . त्यातून मला ३८% रिटर्न मिळाले . अर्थात पुढील वाटचाली विषयी सांगता येणार नाही . ICICI prudential focussed blue chip fund-Growth, Birla Sunlife frontline equity fund-Growth हे सुध्दा चांगले आहेत

In reply to by चिनार

माझा एकच हप्ता गेला असल्यामुळे आता होणारे नुकसान हे एकुण नुकसानीच्या तुलनेत खुपच कमी असेल. त्यामुळे हे रुपांतरण मी आताच करून घेईन.

http://www.jagoinvestor.com/ येथे आपल्याला गुन्तवणुकीबद्दल साद्यंत माहिती मिळेल. वेळ काढून वाचत रहा.

In reply to by सुबोध खरे

आर्थिक साक्षरतेसाठी हे एक उत्तम संकेतस्थळ आहे. त्यांचे स्मार्टफोन ऍप असून त्यात या संकेत्स्थळावरील १०० ताज्या नोंदी उतरवून घेता येतात. अतिशय साध्या सोप्या भाषेत विविध आर्थिक बाबींवर चर्चा तसेच विश्लेषण असते.

जीवन विमा पॉलिसी ही आर्थिक गुंतवणूक नव्हे. समजा कुणी मनीबॅक किंवा एंडोवमेंट प्रकारातील पॉलिसी गुंतवणूक + विमा अशी घेतली असल्यास त्यातील परतावा अतिशय कमी आहे (साडे तीन चार टक्के)

In reply to by सतिश गावडे

जीवन विमा पॉलिसी ही आर्थिक गुंतवणूक नव्हे.!!!! १००% मान्य ! पण मानसिक समाधान आणी कुटुंबियाच्या सुरक्षेसाठी जीवन विमा पॉलिसी नक्की काढावी असं माझं मत आहे आणी कुटुंबियांना त्याची कल्पना आणि माहिती द्यावी !

In reply to by चिनार

कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी "टर्म पॉलिसी" हा जीवन विम्याचा प्रकार निवडावा. मनीबॅक आणि एंडोवमेंट प्रकारातील पॉलिसी आपल्या गळयात मारण्याचा प्रयत्न करणार्‍या एजंटना फाटयावर मारावे. जो पैसा आपण मनीबॅक आणि एंडोवमेंट पॉलिसीत टाकणार असू तो गुंतवणुकीच्या इतर चांगल्या पर्यायात टाकावा.

..लहान आकाराच्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करायची असल्यास कुठे जास्तीतजास्त वाव आहे? (सध्या किंमत कमी आणि चांगले वाढीचे पोटेन्शियल) साधारण दरही माहीत असल्यास शेअर करावेत आपापल्या गावातले. टुरिस्ट लोकेशन्समधे घर घेणे हे बरे की तापदायक?

म्यूचुयल फंड बद्दल काही शंका - माझे काही सिप म्यूचुयल फंड चालु आहेत . आता मला १ ,२ डिविडन्ड बेसड म्यूचुयल फंड सिप चालु करायचे आहेत . तर त्यासाठी चांगले डिविडन्ड बेसड म्यूचुयल फंड कसे ठरवायचे / निवडायचे ? सध्या कोणते डिविडन्ड बेसड म्यूचुयल फंड चांगले आहेत ? डिविडन्ड बेसड म्यूचुयल फंड यामध्ये सिप पर्याय का लम्प्सम पर्याय चांगला ? जीवन विमा पॉलिसीमध्ये माझी मनीबॅक पॉलिसी गेली १० वर्षे चालु आहे . तर आता त्यातुन बाहेर पडता येइल का ?

In reply to by सिरुसेरि

म्हणजे काय Mf मधे ग्रोथ आणि dividend ऐसा पर्याय असतो. जर दर वर्षि पैसे ( व्याजा प्रमाणे ) लागणार नसतील तर ग्रोथ पर्याय घ्यावा. कारण dividend दिला की काही % administrative charges म्हणून वाजा होते. ग्रोथ मधे तुम्हला गरज असेल तेंव्हा आणि तेव्हढि यूनिट्स तुम्ही विकू शकता

In reply to by सिरुसेरि

जीवन विमा पॉलिसीमध्ये माझी मनीबॅक पॉलिसी गेली १० वर्षे चालु आहे . तर आता त्यातुन बाहेर पडता येइल का ?
होय. जीवन विमा पॉलिसीमधून केव्हाही बाहेर पडता येते. पर्याय साधारणपणे असे असतात: १. तीन वर्षांचे हप्ते पुर्ण भरावयाच्या आत बाहेर पडल्यास आपली पॉलिसी बंद होते. आपल्याला काहीही मिळत नाही. तीन वर्ष भरलेले हप्ते वाया जातात. २. दुसरा पर्याय पॉलिसीचे हप्ते तीन वर्ष भरुन नंतर पॉलिसी बंद करता येते. यात पहिल्या वर्षी भरलेले विम्याचे हप्ते विमा कंपनी एजंटचे कमिशन तसेच इतर चार्जेस म्हणून पुर्णपणे कापून घेते. आणि उरलेल्या पैशांच्या विशिष्ट टक्के रक्कम आपल्याला मिळते. पॉलीसी तीन वर्षांनंतर लगेच बंद केल्यास ही रक्कम आपण तीन वर्ष भरलेल्या हप्त्यांच्या एकुण रकमेच्या तुलनेत नगण्य असते. ३. तिसरा पर्याय असतो पॉलिसी पेड अप करणे. यात तीन वर्षांपर्यंत पॉलिसीचे हप्ते भरुन नंतर केव्हाही हप्ते भरणे बंद करायचे. आणि भरलेले पैसे पॉलिसीचा कालावधी पुर्ण होईपर्यंत विमा कंपनीकडेच ठेवायचे. असे केल्याने पॉलिसी "पेड अप" आपोआप अवस्थेत जाते मध्ये जाते. पेड अप पॉलिसीवर भरलेल्या हप्त्यांच्या प्रमाणात रिस्क कव्हर मिळते. आणि पॉलिसीची मुदत संपताच ती पॉलिसी मनी बॅक किंवा एंडोव्हमेंट पॉलिसी असल्यास भरलेल्या हप्त्यांच्या प्रमाणात पैसे मिळतात. या तिन्ही प्रकारात विमा कंपनीचा लॉयल्टी बोनस मिळत नाही. तुमच्या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये "पॉलिसी टर्मिनेशन" चा क्लॉज असेल. किंवा विमा कंपनीला फोन करुन त्यांना पॉलिसी क्रमांक सांगून ती पॉलिसी बंद करायची असल्यास कोनते पर्याय आहेत ते विचारा. ** ही सर्वसाधारण माहिती आहे. पॉलिसी टर्मिनेशनचे क्लॉजेस विमा कंपनी आणि पॉलिसीनुसार बदलू शकतात. नेमक्या माहितीसाठी विमा कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करणे.

सर्व साधारण पणे १०० - तुमचे वय = जी संख्या येईल तेव्हडी % गुंतवणूक मार्केट मध्ये ( म्हणजे जास्त जोखीम आणि जास्त परतावा) . मार्केट म्हणजे शेअर्स , मुचुअल फंड etc उरलेली गुंतवणूक सुरक्षित, जसे कि बँक मुदत ठेवी, पोस्ट, PPF etc मध्ये, जिथे परतावा तुलनेने कमी, पण जोखीम पण खूपच कमी असते. हा अर्थातच जनरल नियम आहे. तुमच्या जोखीम घेण्याच्या हिंमती प्रमाणे हे सूत्र बदलू शकते. मुच्युअल फंड निवडताना शक्यतो sector फंड टाळावेत . कारण इकोनॉमी ची नस सापडणे कठीण असते. म्हणजे कुठला सेक्टर वरती जाइल , हे भाकित अवघड असते. त्यामुळे diversified फंड निवडावेत .

शक्यतो sip हा पर्याय चांगला . कारण त्यामुळे आपली गुंतवणुक सरासरी ने होते. आपण एकदम मोठी रक्कम गुंतवली आणि त्यानंतर मार्केट पडले तर आपले नुकसान जास्त होते. ते SIP मध्ये कमी होते कारण तुम्ही थोडी थोडी रक्कम ठराविक काळाने गुंतवता . त्यामुळे सरासरी वर गुंतवणूक होते

खूपच माहितीपूर्ण सल्ले आहेत. पण गुंतवणूक म्हणजे भविष्याचा विचार. त्यामुळे भविष्यात काय होऊ शकते त्याचा सध्याच्या ट्रेंडवरुन अदमास बांधला पाहिजे आधी. पुढची पंचविस वर्षे गेल्या पंचवीस वर्षांसारखीच असतील असे नाही. त्यामुळे येत्या पंचवीस वर्षात काय-काय होऊ शकते ते ढोबळ मानाने कोणी सांगू शकेल काय?

In reply to by नगरीनिरंजन

कारण भले भले तत्ज्ञ्य भविष्यात काय होणार हे नक्की सांगू शकत नाहीत त्यामुळे असे गृहीत धरू कि भविष्य काल हा सर्व साधारण असेल. जर काही फार वेगळे , जसे कि तिसरे महायुद्ध, घडले तर तसे हि आपल्या प्लानिंग चा काहीही उपयोग नाही. dont put all eggs in one basket , हे कायम लक्षात ठेवावे. साधारण गुंतवणूक ३ भागात करावी ० - ५ वर्षे : शोर्ट टर्म ५ ते १५ वर्षे : मिडीयम टर्म १५ ते पुढे : लॉंग टर्म

.

स्कॉट अॅडम्स (dilbert.com) यांचा खालील सल्ला उत्तम आहे. Everything you need to know about financial planning* Make a will. Pay off your credit cards. Get term life insurance if you have a family to support. Fund your 401(k)/IRA/PF 1 to the maximum. Buy a house if you want to live in a house and you can afford it. Put six months’ expenses in a money market fund. Take whatever money is left over and invest 70% in a stock index fund and 30% in a bond fund through any discount broker and never touch it until retirement. 1. PF/PPF चा पर्याय अमेरिकेतील 401(k) आणि IRA सारखाच आहे.

च्रर्चा छान चालु आहे, पण मराठितील पुस्तके सुचवलितर खुप छान.. "आर्थिक साक्षरतेसाठी हे एक उत्तम संकेतस्थळ आहे. त्यांचे स्मार्टफोन ऍप असून त्यात या संकेत्स्थळावरील १०० ताज्या नोंदी उतरवून घेता येतात. अतिशय साध्या सोप्या भाषेत विविध आर्थिक बाबींवर चर्चा तसेच विश्लेषण असते." कुठला अ‍ॅप जरा लिन्क देता का?

८०'c करिता ४ दिवसांपूर्वी MF - axis bank long term ELSS - growth मध्ये १,००,०००/- गुंतवणूक केली आहे. मला त्यांनी सांगितले कि lumpsum तुमच्यासाठी जास्त योग्य पर्याय आहे कारण SIP मध्ये तुम्हाला ८०'c tax बेनिफेत मिळणार नाहि (विश्वास ठेवला) मी PPF मध्ये हि २५K टाकले आहेत. share बाजारात सुद्धा गुंतवणूक करण्याची इच्चा आहे (स्वतः deal). मागच्या वर्षी मोठ्या उत्साहात एका नामांकित बँकेत ट्रेडींग खात पण चालू केल पण नीट माहित नसल्याने १ वर्षात बंद केल. (काही न करता :( ) सुरुवातीला शिकण्यासाठी का होईना पण ३००० - ५०००/- नुकसान सुद्धा मला चालेल … पण नक्की सुरुवात कुठून आणि कशी करायची तेच काळत नाही. त्या बद्दल थोड मार्गदर्शनाची अपेक्षा ….

In reply to by योगेश९८८१

सुरुवातीला शिकण्यासाठी का होईना पण ३००० - ५०००/- नुकसान सुद्धा मला चालेल … पण नक्की सुरुवात कुठून आणि कशी करायची तेच काळत नाही. त्या बद्दल थोड मार्गदर्शनाची अपेक्षा ….
मी पण याच्याच शोधात आहे

In reply to by योगेश९८८१

कारण SIP मध्ये तुम्हाला ८०'c tax बेनिफेत मिळणार नाहि
ही चुकीची माहिती आहे. त्या एजंटने कमिशनसाठी चुकीची माहिती दिली आहे. एसआयपी हे काही वेगळे प्रॉडक्ट नाही. पैसे गुंतवणुकीचे डिस्ट्रीब्युशन आहे. याच न्यायाने मग पीपीएफवरील फक्त एकाच हप्त्यावर ८०-सी चा फायदा मिळाला पाहिजे. SIP चा प्रत्येक हप्ता वेगळी गुंतवणूक समजली जाते व ELSS साठी ह्या प्रत्येक हप्त्यातून मिळालेले युनिट्स ३ वर्षे रिडीम करता येत नाहीत. मात्र प्रत्येक हप्ता हा ८०-सी साठी पात्र आहे.

In reply to by योगेश९८८१

>>> ट्रेडींग खात पण चालू केल पण नीट माहित नसल्याने १ वर्षात बंद केल. (काही न करता ) सुरुवातीला शिकण्यासाठी का होईना पण ३००० - ५०००/- नुकसान सुद्धा मला चालेल … पण नक्की सुरुवात कुठून आणि कशी करायची तेच काळत नाही. त्या बद्दल थोड मार्गदर्शनाची अपेक्षा …. नवीन गुंतवणूकदार असाल तर सुरवातीला २-३ वर्षे फक्त ब्ल्यू चीप शेअर्समध्येच गुंतवणू़क करा. टाटांच्या बहुतेक कंपन्या (टीसीएस, टाटा मोटर्स, टाटा टी, टाटा केमिकल्स, टाटा स्टील इ.) तसेच मारूती-सुझुकी, हीरो होंडा, बजाज, इन्फोसिस, लार्सन अ‍ॅण्ड टूब्रो, स्टेट बँक, कोल इंडिया इ. कंपन्या कायमच नफा मिळवून देतात. कधीकधी काही काळ यांच्या शेअर्सचा भाव कमी होतो, परंतु काही काळातच तो उसळी घेऊन वर येतो. या कंपन्यांच्या भावावर रोज लक्ष ठेवा. प्रत्येक कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा सर्वाधिक व सर्वात कमी भाव दिलेला असतो. खरेदी करताना शक्यतो ५२ आठवड्यातील सर्वात कमी भावाच्या जवळ खरेदी करा व विकताना शक्यतो सर्वात जास्त भावाच्या जवळ विका. येस बँक व अ‍ॅक्सिस बँक या खाजगी बँकांचे शेअर देखील चांगला नफा मिळवून देतात. खूप जास्त कंपन्यात गुंतवणू़क करू नका. उदा. टीसीएस किंवा इन्फोसिस, मारूती, येस बँक किंवा अ‍ॅक्सिस बँक, स्टेट बॅन्क ऑफ इंडीया, हीरो होंडा किंवा बजाज, लार्सन अ‍ॅण्ड टूब्रो अशा मोजक्याच ५-६ कंपन्यात गुंतवणूक करा. एका कंपनीत स्वतःच्या बजेटप्रमाणे २५-५० हजारापेक्षा जास्त गुंतवणूक नको. चांगल्या फायद्यासाठी एकूण किमान सव्वा ते दीड लाख रूपयांचे शेअर्स असावेत. त्यावर एका वर्षात २०-३० टक्के नफ्याचे लक्ष्य असावे. वरील कंपन्या मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खूप चांगल्या आहेत. वरील कंपन्यात १-२ महिन्यात २० हजाराचे ३० हजार होणार नाहीत. परंतु १-३ वर्षाच्या अवधीत २० हजाराचे नक्कीच ३० हजार किंवा जास्त होतील व या व्यतिरिक्त थोडा लाभांश सुद्धा मिळेल. नशीब चांगले असल्यास बोनस शेअर्स किंवा शेअरचे विभाजनसुद्धा होईल. सध्या टीसीएस, इन्फोसिस, एल अ‍ॅण्ड टी, मारुती इ. कंपन्यांचे शेअर्स पुढील काळात बर्‍यापैकी वाढण्याची शक्यता आहे. ज्या दिवशी शेअर बाजाराचा इंडेक्स खूप उतरला असेल, त्या दिवशी हे किंवा वर नमूद केलेले शेअर्स जितक्या कमी भावात मिळतील तितक्या कमी भावाला खरेदी करा. शेअर बाजारात रोज किंवा दर आठवड्याला शेअर खरेदी केलेच पाहिजेत किंवा विकलेच पाहिजेच असे नसते. मात्र रोज नियमित दिवसातून अनेक वेळ भावावर लक्ष ठेवा. मनीकंट्रोलच्या साईटवर स्वतःचा पोर्टफोलिओ बनवून ठराविक कंपन्यांचे शेअर्स कायम बघता येतात. इक्विटीमास्टर वर देखील असेच करता येते. तुम्हाला ज्या कंपन्यांवर लक्ष ठेवायचे आहे त्या कंपन्यांचा पोर्टफोलिओ बनवून रोज अनेकवेळा भाव बघत रहा व ज्या दिवशी भाव खूप पडले असतील तेव्हा चटकन खरेदी करा. एकदम गुंतवणूक टाळा. कमीतकमी १ शेअर घेतला तरी चालतो. समजा आज इन्फोसिसचा एक २०८९ रूपयांना मिळाला. २-३ दिवसांनी अजून ५ शेअर्स कदाचित २०८० किंवा कमी भावात मिळतील. असे करून काही दिवसांनी तुमच्याकडे अंदाजे ३०,००० रूपये गुंतवून सरासरी २०७० किंवा अशाच भावाने घेतलेले १५ शेअर्स असतील. जेव्हा भाव १०-१५ टक्क्यांनी वाढेल तेव्हा विकून टाका किंवा पैशाची लगेच गरज नसेल तर न विकता अजून भाव वाढण्याची वाट बघा.

In reply to by श्रीगुरुजी

मोजक्याच ५-६ कंपन्यात गुंतवणूक करा
याचं कारण सांगू शकाल? मला वाटतं की डायव्हर्सीफाईड गुंतवणूक चांगली असते. मी जर प्रत्येक सेक्टरचे २ (उदा: फार्मा, आयटी, इन्फ्रा, ऑटो आणि बँकींग) अशा १० कंपन्यात १५००० गुंतवले तर धोका वाटला जाणार नाही का?

In reply to by काळा पहाड

एकदम एवढ्या जास्त कंपन्यांच्या शेअरकडे लक्ष ठेवणे अवघड असते...शिवाय त्यांनी तो सल्ला नवख्या माणसासाठी दिला आहे. पाच सहा कंपन्या - वेगवेगळ्या सेक्टरमधल्या असल्या म्हणजे सुद्धा पुरेसे वेल डायव्हर्सिफाइड झाले.

In reply to by असंका

+१ बरोबर. हा सल्ला नवख्या गुंतवणुकदारासाठी आहे. अनुभवी गुंतवणुकदार वेगवेगळ्या सेक्टरमधल्या १५-२० कंपन्यात गुंतवणुक करतो. २-३ वर्षे शेअरबाजाराचा अनुभव घेतल्यानंतर आपोआप इतर गुंतवणूकयोग्य कंपन्या सापडायला लागतात. तोपर्यंत तरी सावध गुंतवणूक करावी.

In reply to by योगेश९८८१

ज्यांना शेअर बाजाराचे ज्ञान नाही त्यांनी म्युचूअल फंड मध्येच जास्त गुंतवणूक करावी . मी सुद्धा त्यापैकीच एक !! ज्ञान असलं तरी बाजाराविषयी अचूक आडाखे बांधणं भल्याभल्यांना जमत नाही. PPF मध्ये गुंतवणूक जरूर करावी .

गुंतवणुकीचे मुल्यमापन करताना विचारांत घ्यावयाच्या सुरक्षीतता, तरलता आणि परतावा या कसोट्यांचा तौलनिक विचार करायला हवा आणि PPF हा यातील तरलता आणि परतावा या दोन्ही बाबतीत पुर्णतः असमाधानकारक पर्याय आहे. थोडे स्पष्ट्च सांगावयाचे तर सर्वसामान्य गुंतवणुकदाराने या पर्यायाचा अजिबात विचार करु नये असे माझे मत आहे.( खाते जरुर उघडावे, प्रतिवर्षी ५०० रु. ही गुंतवावेत, यापेक्षा जास्त नको.) जप्ती येत नाही....या मुद्द्यास अवास्तव महत्व देण्याचे कारण नाही. मध्यंतरी मीच लिहिलेल्या धाग्यावर या विषयाची चर्चा सुरु झाली होती परंतु वेळेअभावी मी PPF का नको याविषयीची प्रतिक्रिया लिहु शकलो नाही. नंतर एकेदिवशी PPF ने शेअर बाजाराच्या निर्देशांकापेक्षा अधिक परतावा दिल्याचे प्रतिपादन करणारा एक लेख ईकॉनॉमिक्स टाईम्स मधे छापुन आल्याने पुन्हा या विषयला उकळी फुटली. त्याचा साधार प्रतिवाद करणारे लेखही आले, यामुळे मीही याविषयीची आकडेवारी गोळा करित असताना नेमके याच वेळी SBI आणि HDFC म्युचुअल फंडांकडुन या विषयावर वेगवेगळी पण अतिशय निर्णायक स्वरुपाची सादरीकरणे झाली ज्यातुन PPF हा एक गुंतवणुक पर्याय म्हणुन कसा निष्प्रभ आहे हे कळते. अगदी PPF प्रमाणेच करबचत करणारी ELSS नावाची दुसरीही योजना अस्तित्वात आहे. भारतांतील किमान 20 फंडाच्या ELSS योजनांची 2,3,5,7,10,12 अशा वेगवेगळ्या कालावधीकरिता PPFमधील गुंतवणुकीबरोबर केलेली तुलना माझ्या संग्रही आहे ज्यातुन असे दिसते की या 20 च्या 20 ही योजनांनी बहुतेक सर्व वेळा PPF पेक्षा खुपच सरस परतावा दिला आहे. मी एक व्यावसायिक गुंतवणुक सल्लागार असल्याने व फंड व्यवस्थापकांनी अतिशय अभ्यासाने केलेली अशी सादरीकरणे वा माहिती जाहीरपणे देणे कितपत योग्य आहे हे माहित नसल्याने येथे देण्याचे मी टाळतो आहे मात्र माझ्या prasadbhagwat@vsnl.net या मेलवर संपर्क केल्यास मी या विषयीची आणि अन्यही माहिती देवु शकेन.

In reply to by प्रसाद भागवत

पी पी एफ बद्दल नकारात्मक लिहिताय म्हणज तुम्ही कसले तरी एजंट आहात ही शंका तुमचा पेअतिसाद शेवट्पर्यंत वाचल्यावर खरी ठरली. तुम्ही दहा लोकाना दहा फंड सांगितले तर ते सगळेच पीपीएफ पेक्षा फायद्याचे ठरतील का ? कुठला तरी एक फंड आउअटपर्फॉर्मर ठरला तर त्याची फूटपट्टी कर्य्न पी पी एफ ला क्षुल्लक ठरवणे योग्य नव्हे

In reply to by hitesh

PPF चे वस्तुनिष्ठ मुल्यमापन करणे एवढे महाभयंकर पाप असेल याची कल्पना नव्हती. व्यासायिक सल्लागाराने एजंटगिरी केलीच पाहिजे असा नियम आहे हे ही ठावुक नव्हते. "तुम्ही दहा लोकाना दहा फंड सांगितले तर ते सगळेच पीपीएफ पेक्षा फायद्याचे ठरतील का ? कुठला तरी एक फंड आउअटपर्फॉर्मर ठरला तर त्याची फूटपट्टी कर्य्न पी पी एफ ला क्षुल्लक ठरवणे योग्य नव्हे....................." मी येथे २०पेक्षा अधिक फंडांचा संदर्भ देवुन या 20 च्या 20 ही योजनांनी बहुतेक सर्व वेळा PPF पेक्षा खुपच सरस परतावा दिला आहे असे लिहिले आहे.... या वाक्याचा अर्थ लागणे एवढे कठीण आहे हे ही नव्यानेच कळले. आता खुलासा करावयासच हवा की मी PPF योजना विकणारा एजंट ही आहे. ईच्छुकांनी संपर्क करावा. एकुणातच कसलाही अभ्यास न करता अतार्किक युक्तीवाद करण्याचे, आणि झापडबंद विचारांच्या अधीन जावुन अतिशय ठाम मते बनविण्याचे कौशल्य आत्मसात करावयाला हवे तर.

In reply to by प्रसाद भागवत

प्रसाद भागवत सर , आपलं म्हणणं पटत असलं तरी "mutual funds are subjected to market risk" या वाक्याची भीती वाटते. पुढील पाच वर्षात बाजार उच्चांकाचे विक्रम गाठेल असं तज्ञ म्हणतात. याविषयी आपलं मत काय ?

In reply to by प्रसाद भागवत

व्यावसायिक सल्लागारांबद्दल लोकांचं एवढं नकारात्मक मत का आहे ते वरील एसआयपी ला ८० सी लागू होत नाही वगैरे सल्ले देणार्‍यांबद्दल अनुभवातून स्पष्ट व्हावं. बाकी पीपीएफ ला एजंट असण्याची गरज काय आहे? एसबीआय मध्ये खातं उघडायचं आणि पैसे भरायचे एवढं सरळ आहे. तीच गोष्ट म्युच्युअल फंडाबद्दल. direct म्युच्युअल फंड हे एजंट द्वारे विकल्या जाणार्‍या म्युच्युअल फंडापेक्षा चांगला परतावा देतात ही गोष्ट बर्‍याच लोकांना ठाऊकच नसते. एकूणच एजंट ही संकल्पना आता कालबाह्य होत आहे.

In reply to by प्रसाद भागवत

पीपीएफ मध्ये परताव्याची १००% गॅरंटी आहे, ती म्युचुअल फंडामध्ये आहे का ? तसेच व्याज कर मुक्त असल्यामुळे फायदा दर्शनी दिसणार्‍या व्याज दरा पेक्षा जास्त असतो.

In reply to by मराठी_माणूस

http://www.personalfn.com/knowledge-center/financial-planning/tutorials… इ एल एस एस मध्ये सुद्धा मिळणारे डिव्हिडंड आणि होणारा क्यापिटल गेन करमुक्त आहे. पण इ एल एस एस मधून तुम्हाला पैसे पाहिजेत त्यावेळेस जर बाजार पडलेला असेल तर परतावा बराच कमी होऊ शकतो ( अर्थात बाजार वर असेल तर तो बरच जास्त असू शकतो) शहाणी माणसे मध्यम मार्गी असतात म्हणजे अर्धे पैसे भविष्य निर्वाह निधीत आणि अर्धे इ एल एस एस मध्ये टाकतात असे आढळून आले आहे. शेवटी स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हे खरे.

म्युच्युल फंडच्या सिस्टेम्याटि़क इन्वेस्टमेन्ट प्लान सारखाच शेअर्समध्ये गुंतवणूकीसाठी सिस्टेम्याटि़क ईक्विटी प्लान सुद्धा असतो.. तुम्ही यात शेअर्स आणि ईटीएफ मध्ये गुंतवणूक करू शकता. परतावा उत्तम मिळण्यासाठी गुंतवणूक डायव्हर्सिफाय करावी, टारगेट ठेवून गुंतवणूक करावी, सगळे पैसे एकाच ठिकाणी गुंतवू नयेत आणि आपली तोटा सह्न करायची क्षमता लक्षात घेऊनच गुंतवणूक करावी.

मुळात PPF आणि मुच्युअल फंड यांची तुलना अस्थानी आहे . MF मधली गुंतवणूक हि जोखिमी चीच आहे. आणि PPF मधली बिन जोखिमी ची. पण M F हे कायम PPF पेक्षा जास्त परतावा देतात हे खरे आहे. पण जोखीम हि जास्त आहे. मुद्दल देखील बुडू शकते जे PPF मध्ये होणे नाही त्यामुळे तुमचे पैसे विभागून ठेवावे. इथे १०० - तुमचे वय , हा थम्ब रूळ वापरावा . किंवा ८०- तुमचे वय, हा थोडा जास्त सुरक्षित नियम थोडे MF मध्ये, काही PPF मध्ये, काही debt फंडात , काही बँक FD , काही सोने इत्यदि. सोने हा देखील एक अत्यावश्यक भाग आहे गुंतवणुकीचा . liquid asset म्हणून

धोका किंवा जोखीम ही कल्पनाच मुळात कालसापेक्ष/ व्यक्तीसापेक्ष आहे. काच ही पारदर्शक आहे किंवा नाही या प्रश्नाप्रमाणेच. वॉरेन बफेट त्यांनी म्हटलेच आहे की गुंतवणुकदारांसाठी घरामधील केलेली गुंतवणुक बहुधा फायद्याची ठरते कारण ते त्यांच्याकडील चांगले शेअर्स घराप्रमाणे दीर्घ्काळ बाळागत नाहीत. येथेही PPF एवढा दीर्घकालीन विचार केला तर आकडेवारीनिशी सिद्ध करता येते की असे एक दोन नव्हे तर डझनावारी चांगले फंड्स आहेत ज्यानी तुलनात्मक खुप अधिक परतावा दिला आहे. आणि ही गोष्ट जर गेल्या 10/12/15 वर्षांत 100 पैकी 97/98/99 वेळा तावुन सुलाखुन तपासुन बघीतली गेली अहे तर आपणच असे काय पाप केले आहे की आपण म्युचुअल फंड्स मधे गुंतवणुक केली आणि परिस्थिती उलटली ??...कोणतीही मोठी शस्रक्रिया करताना आपण संभाव्य धोक्याची कल्पना आहे वगैरे 'डिक्लरेशन' देतोच ना की त्याकडे पाहुन शस्रक्रिया टाळतो. रस्त्यावर प्रवासात अपघात होण्याचा धोका आहे म्हणुन आपण ते टाळतो का?? उत्तम दर्जाचे, निर्देशांकात महत्वाचे स्थान असलेले,भरपुर लाभांश देणारे असे शेअर्स समविष्ट असणारी योजना दीर्घकाळांत PPF/NSE/FD अशा पर्यायांपेक्षा उजवे रिटर्न्स का देइल याची अन्य ही अतिशय तर्कशुद्ध कारणे आहेत. अनेक परिसंवाद, कार्यशाळंमधुन आलेल्या अनुभवांतुन खात्रीने सांगतो गुंतवणुक दारांनी घेतलेल्या धोक्यामुळॅ झालेल्या नुकसानाईतकेच (किंबाहुन जास्त) नुकसान धोका न पत्करण्यानेही होतेच की. "अरे चांगला मोक्याचा प्लॉट मिळत होता रे २५,००० रुपयांत, २/४हजाराची धवपळ केली असती ना तर भाड्यावर जगलो असतो रे आरामशीर" हे असे संवाद ऐकले नाहीत का कधी ?? तेंव्हा उगीच साप साप म्हणुन भुई धोपटण्याने काहीही होणार नाही याची जाणीव बाळागावी ,कधी धोका न पत्करणे हीच सर्वाधिक धोकादायक गोष्ट आहे हेच खरे.