Skip to main content

इनवेस्टमेंट

लेखक चित्रार्जुन यांनी सोमवार, 12/01/2015 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रानो. मला इनवेस्टमेंट .संदर्भात माहिती हवी आहे ती पण मराठीत कारणकी माझया मते सर्व साधारण मराठी कुटुंबात या बद्दल खूप कमी माहिती आहे ती सर्व सामान्य माणसाना कलावी या साठी हा धागा उघडला आहे म्हणून यावर लवकरात लवकर प्रतिसाद द्यावेत ही नम्र विनंती. गुंतवणूक हा एक अतिशय संवेदनशील विषय असल्याने यावर नकीच मिसळ पाव वर चर्चा होणे आपेखित आहे. यात गुंतवणुकीचे प्रकार, त्यातील वैविध्या उदा. लिक्विड फंड, शेर मार्केट, डेट फंड, कॅपिटल फंड, बॉन्ड्स, म्यूचुयल फंड, एट्सेटरा. त्यातील फायदे तोटे, एत्यादी माहिती द्यावी. तसेच त्यावरील मराठीतील पुस्तके, मराठीतील ब्लॉग्स, अर्थविषयक साप्ताहिके, किंवा संदर्भ ग्रॅंता विषयी माहिती द्यावी.

वाचने 66347
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

In reply to by सतिश गावडे

गावडे साहेब,तसे जवळच रहातो आपण,पायधुळ झाडावी एकदा... मग चर्चा करु निवांतपणे. काय म्हणता??

सामान्य (माझ्यासारख्या) लोकांचं शेअर बाजाराविषयी असणारं अज्ञान, पैसे कमावण्याचे मर्यादित स्त्रोत, कुठल्याही प्रकारच्या परताव्याची न मिळणारी हमी ह्या आणि अशा काही कारणांमुळे लोकं शेअर बाजारात पैसे गुंतवायला बिचकतात. मी आज एक एफडी केली की मला किती पैसे मिळणार हे लिहून, बँक मॅनेजरच्या सही सकट मिळते. सरकारी पर्यायांमधे टाकलेले पैसे बुडणार नाहीत ह्याची खात्री असते म्हणून ते पर्याय माझ्यासारख्यांना शेअर्स पेक्षा जवळचे वाटतात. 'आजपर्यंत नाही बुडाले, पण नेमके मी टाकले आणि बुडाले तर?' असा मराठी मध्यमवर्गीय विचार मनात असतो. आणि अशा प्रकारच्या गुंतवणुकींमधे पूर्वी फसवणूक झाल्याचा अनुभवही जमेस असतो. पहिल्या हफ्त्यातून १५ हजार रुपये आधी न कळवता कापून घेतल्याचा अनुभव स्वतः घेतला आहे. तोच रिकव्हर व्हायला २ वर्ष गेली. तुम्ही ह्या धंद्यात आहात म्हणून तुम्हाला हे सवयीचे आहे. इतरांना नाही. त्यामुळे ज्यांना त्या बद्दल साशंकता आहे त्यांची आणि सेफ गुंतवणूक पर्यायांची हेटाळणी करू नका. सगळ्यांचाच उद्देश घसघशीत नफा मिळवणे नसून काही जण पैसा सुरक्षीत रहावा म्हणूनही असे पर्याय निवडतात हे लक्षात ठेवा. मला नकोय वर्षाला ४०% परतावा म्हणून मी मूर्ख, गाढव आणि अगदीच ह्या... ठरत नाही. धोपट मार्गाने जाणार्‍यांना सौम्य भाषेत हिडीस फिडीस करू नका. @ हितेश भाऊ एकंदर प्रसाद भाऊंची लेखनशैली आणि प्रत्येक चर्चेचा शेवट 'भेटा मग बोलू' अशा प्रकारच्या वाक्यांनी होत असल्याने तुम्हाला जर ते मिपाचा वापर त्यांचा धंदा वाढवण्यासाठी करत आहेत अशी शंका आली तर त्यात चूक नाही. मला पहिल्याच लेखात आली. पण त्यांना भेटायचं की नाही हे प्रत्येकावर अवलंबून आहे. काही जणांना आवडेल काही जणांना नाही. तो पर्यंत झालेल्या चर्चेतूनही माझ्यासारख्यांना बरेच काही शिकायला मिळते आहे हे ह्या चर्चेचे फलित समजा.

In reply to by आदिजोशी

मी एजंट नाही. एखाद्याने एफडी मध्ये गुंतवले किंवा शेअरमध्ये गुंतवले तर जो काही फायदातोटा होईल त्यात माझा काहीही वाटा नाही. मात्र एफडीपुरती मानसिकता ही दीर्घकालीन संपत्तीनिर्मितीला नक्कीच हानीकारक आहे. भारतासारख्या देशांच्या शेअर बाजारात १०-१२ वर्षाच्या कालावधीसाठी पैसे गुंतवणे एफडीपेक्षा फारच फायदेशीर ठरु शकते. अर्थात इतकी वर्षे कळ काढण्याची तयारी पाहिजे. एकदोन वर्षात डाऊनपेमेंटसाठी/लग्नासाठी/गाडीसाठी पैसे हवे असतील तर एफडी निश्चितच योग्य पर्याय आहे. पण १० वर्षापेक्षा जास्त काळ गुंतवणूक करण्याची तयारी असेल तर शेअरबाजार अत्युत्तम. गेल्या ४० वर्षात (मुंबई शेअर बाजार सुरु झाल्यापासून) भारतात व जगात तेजी-मंदी-शेअर घोटाळे-अमेरिकेवर हल्ला अशा असंख्य उलथापालथी झाल्या आहेत. काहीही न करता केवळ पैसे गुंतवून ठेवल्यास १०० च्या इंडेक्सपासून ३०००० च्या इंडेक्सपर्यंत (३५ वर्षात ३० पट वाढ) संपत्तीनिर्मिती करण्याची क्षमता तुम्ही गुंठामंत्री किंवा मंत्र्यासंत्र्यांशी संबंध असलेले आयआरबी सारख्या कंपनीचे मालक असल्याशिवाय शक्य नाही. मागच्याच आठवड्यात मी वाचलेला आणि लक्षात राहिलेला हा परिच्छेद. अवश्य विचार करा
Over the past 10 years, a saving of Rs 20,000 a month at typical fixed income interest rates would have left you with Rs 36 lakh while a SIP in a typical equity fund would have left you with around Rs 1.2 crore. That’s the kind of differential that can change someone’s life.

In reply to by आदिजोशी

जोशी साहेब, मी ह्या धाग्याव्यतिरिक्तही येथे व अन्यत्र नियमित लिखाण केले आहे मात्र कधीही कोणाची हेटाळाणी वा कोणाला हिडीस फिडीस केल्याचे मला वाटत नाही. हो, मात्र माझी मते ठाम आहेत,ती अधीक अभ्यासाअंती बनवलेली आहेत आणि त्यांना आकडेवारीचा आधार आहे. माझ्या मतांचा प्रतिवाद न करता केवळ तुम्ही 'एजंट' आहात अशा आशयाची विधाने करणे ही माझी हेटाळणी नव्हे काय?? मी आज एक एफडी केली की मला किती पैसे मिळणार हे लिहून, बँक मॅनेजरच्या सही सकट मिळते......अशा अवासायनात गेलेल्या बॅंका, पतपेढ्यांच्या एफ. डीज चे/सह्यांचे काय झाले?? मार्क ट्वेन ने सही केलेल्या चेकप्रमाणे दुर्दैवाने ह्या सह्यांना बाजारात काही किंमत नसते ही वस्तुस्थिती आहे. एकुणांत 'धोका/जोखीम..' म्हणजे काय येथुनच आपल्याला सुरवात करावी लागते आणि माझ्या लेखातुन मी ती केली ही आहे सगळ्यांचाच उद्देश घसघशीत नफा मिळवणे नसून काही जण पैसा सुरक्षीत रहावा म्हणूनही असे पर्याय निवडतात हे लक्षात ठेवा....... गुंतवणुक हाही असा एक शब्द आहे ज्यात 'परतावा' हा अध्यहृतच आहे असा माझा समज आहे. वृद्धीसाठी केली जाते तीच 'गुंतवणुक' असे मी मानतो. सबब या मुद्द्यावर आपली मुळातच गफलत आहे असे माझे मत आहे. एकंदर प्रसाद भाऊंची लेखनशैली आणि प्रत्येक चर्चेचा शेवट 'भेटा मग बोलू' अशा प्रकारच्या वाक्यांनी होत असल्याने तुम्हाला जर ते मिपाचा वापर त्यांचा धंदा वाढवण्यासाठी करत आहेत अशी शंका आली तर त्यात चूक नाही.............माझ्या लेखांवरील बहुसंख्य शंकात्मक प्रतिक्रियांना मी जमेल तितक्या विस्ताराने उत्तरे दिली आहेत. मात्र 'शेयर बाजारात गुंतवणुक करायला "योग्य" सल्लागार असूच शकत नाही.... मी त्याला ५०००० रुपये दिले आणि सांगितले मला १५% इंटरेस्ट ने हे पैसे कधी परत करता येतील ते बघ . किती मुदतीत हे शक्य होईल याची खात्री कोण देतो का ?... अशा प्रतिक्रियांवर 'भेटुन बोलु' हेच उत्तर सयुक्तीक नाही काय ?? अर्थात मी व्यावसयिक आहे हे मी कधीच लपवुन ठेवलेले नाही. उद्या एखाद्या सर्जन बरोबर त्याने त्याची सारी व्यावसयिक कौशल्ये या अशा फोरमवर वापरुनच कार्यभाग उरकावा असेही कोणास वाटेल, पण व्यवहारात ते शक्य नाही. अर्थांत ह्यात सक्तीचा भाग नाही हे आपण लक्षांत आणुन दिले आहेच याबद्दल आपले धन्यवाद.

In reply to by आदिजोशी

जोशी साहेब, आपल्या प्रतिक्रियेच्या उत्तरादाखल दिलेली प्रतिक्रिया स्वतंत्रपणे प्रकाशित झाली आहे.. पहावी. क्षमस्व.

In reply to by आदिजोशी

चर्चेतुन बरीच माहिति मिळाली. सेफ गुंतवणुक हाही एक दृष्टीकोन आहे, त्याची अवहेलना करुन चालणार नाही. कारण उच्च रिटर्नची स्वप्ने दाखवण्या-या व ते खरे न झाल्यास स्वःताच्या खिशातुन पैसे देणारा एजंट अजुन पाहीला नाही. "होते असे कधी कधी" असे म्हणुन बहुतेक जण हात झटकतात.

मी गुंतवणूक तज्ञ नाही पण बरेच वरिष्ठ नागरिक माझ्याकडे येतात आणि आपले मन मोकळे करतात त्यातून काही गोष्टी लक्षात आल्या त्या अशा. बर्याच चांगल्या म्युच्युअल फंडानी २००८ ते २०१२ या कालावधी मध्ये डिव्हिडंड दिलेला नाही त्यामुळे त्याच्यात गुंतवणूक केलेल्या वरिष्ठ नागरिकांची पंचाईत झाली. आज बाजार चढत असताना त्या फंडाची चांगली किंमत येते आहे म्हणून बर्याच लोकांनी पैसे काढून राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवणे पसंत केले आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक लांब पल्ल्यात नक्कीच जास्त फायदेशीर ठरते परंतु असेही बरेच लोक पहिले कि ज्यांनी बाजार चढत असताना चांगल्या कंपन्यात गुंतवणूक केली. त्यातील काहीना घरगुती कारणासाठी उदा. मुलीच्या लग्नासाठी पैसे पाहिजे होते तेंव्हा बाजार पडलेला असल्याने त्यांना पडत्या बाजारात समभाग विकावे लागले आणि पैसा उभा करावा लागला उदा. एक गृहस्थ टाटा स्टील मध्ये त्यांनी केलेली गुंतवणूक २००५ ते २००८ मध्ये केलेली गुंतवणूक ३५० ते ७०० रुपये प्रतिसमभाग. २००९ मध्ये या समभागांची किंमत १५० रुपयावर घसरली. शेवटी बरीच कळ काढून त्यांनी २०१० मध्ये ५०० ते ६०० रुपये प्रतिसमभागाला विकून मोकळे झाले. म्हणजे पाच वर्षे पैसे बिनव्याजी ठेवून मुद्दल परत मिळाले यात समाधान मिळवणे आहे. हि परिस्थिती दर ४-५ वर्षांनी होत असते. तेंव्हा आपल्याकडे असलेला फक्त अतिरिक्त पैसा मध्यमवर्गीय माणूस बाजारात गुंतवतो यात नवल नव्हे. रिलायंस पॉवर मध्ये ४०० ते ५०० रुपयाला घेतलेले समभाग आज ६० ते ७० रुपयाला आहेत. यातहि ब्ल्यू चीप म्हणून गुंतवणूक केलेले आणि अडकलेले अनेक लोक माझ्या पाहण्यात आहेत. ज्या लोकांनी पी पी एफ मध्ये गुंतवणूक केली किंवा ते पैसे राष्ट्रीयीकृत बँकेत व्याजावर ठेवले त्यांना पाच वर्षात चक्रवाढ व्याजाने ५५ ते ६० टक्के परतावा मिळाला. शिवाय त्या वयाला आपले पैसे बुडतात कि काय हि चिंता दोन वर्षे पर्यंत खात राहणे हे कठीणच आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत किंवा पी पी एफ मध्ये पैसे ठेवल्यास मुळ गुंतवणूक हि १०० % सुरक्षित राहते( no capital erosion) हि वस्तुस्थिती आहे. आणि एका विशिष्ट वयानंतर आपले पैसे बुडाले हे मान्य करणे फारच कठीण आहे. या प्रश्नाची हि दुसरी बाजू म्हणून मी मांडत आहे डिसक्लेमर/ दावा -- माझी भांडवल बाजारात थोडीफार गुंतवणूक आहे आणि २००८-९ मध्ये हि गुंतवणूक मूळ मुदलाच्या २५ % इतकी( ७५ % तोटा) कमी झालेली होती तेंव्हा मी रोज समभागांचे भाव पाहत असे पण त्यामुळे माझ्या काळजाचा ठोका चुकला नाही याचे कारण मी ते पैसे बाजारात गुंतवताना पत्नीला सांगितले होते कि हे पैसे बुडाले असे समज.

In reply to by सुबोध खरे

रिलायन्स पॉवर (आणि इतर रिलायन्स कंपन्या) या ब्लू चीप नसून फक्त चीप कंपन्या आहेत. अहो बाजारात एल अँड टी, इन्फोसिस, विप्रो, हॅवेल्स, एचडीएफसी, आयसीआयसीआय, भेल, आयटीसी अशा अक्षरशः सोन्यासारख्या कंपन्या आहेत. अगदी दर तीन महिन्यांनी डिविडन्ड देतात. रोजच्या वापरात त्यांच्या वस्तू आपण पाहतो. रिलायन्स पॉवरचा एकही टॉवर कुठेही उभा नसताना ती ब्लू चीप कशी काय बॉ? लोकांनी आयपीओच्या नफ्याच्या लोभाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि बुडले. याचा दोष कुणाला देणार?
राष्ट्रीयीकृत बँकेत किंवा पी पी एफ मध्ये पैसे ठेवल्यास मुळ गुंतवणूक हि १०० % सुरक्षित राहते( no capital erosion) हि वस्तुस्थिती आहे
कॅपिटल इरोजन होत नाही हा भ्रम आहे. तुम्ही ठेवलेल्या १०० रुपयाची व्हॅल्यू इन्फ्लेशनमुळे हळूहळू कमीच होत जाते. फक्त आपल्याला तेवढा आकडा स्थिर असल्याचे दिसते इतकेच.

२०१३ सालातील हा दुवा पहा. म्हणजे मी काय म्हणतो आहे ते समजेल आज गेल्या ८ महिन्यात बाजार वधारला असल्याने कोणताही इ एल एस एस भरपूर परतावा दाखवतो आहे. पण त्याच फंडाची २०१४ मार्च पर्यंतची कामगिरी पाहिली तर ती बर्यापैकी निराशाजनक होती. यात उत्तम फंड सुद्धा येतात http://articles.economictimes.indiatimes.com/2013-04-15/news/38556016_1…

हा दुवा पहा. तीन फंड सोडून कोणत्याही फंडाने पाच वर्षात २० टक्क्याच्या वर परतावा दिलेला नाही http://www.moneycontrol.com/mutual-funds/performance-tracker/returns/el… माझा सर्व गुंतवणूक सल्लादाराना हाच प्रश्न आहे कि हे तीन सर्वोत्तम फंड कसे निवडायचे? मला याचे समाधानकारक उत्तर आजतागायत मिळालेले नाही.

In reply to by सुबोध खरे

एक तर पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही फक्त इलएसएस स्कीम्स का पाहताय? करबचत ही मुद्दा नसेल तर लार्ज कॅप (डायवर्सिफाईड), मल्टी कॅप किंवा बॅलन्स्ड फंड चांगले दुसरा मुद्दा असा आहे की या फंडांवर जो परतावा मिळतोय तो लाँग टर्म गेन्स असल्याचे गृहीत धरले तर पूर्णपणे करमुक्त आहे. एफडीचा ९ टक्के परताव्याचा दर हा प्री-टॅक्स आहे. म्हणजे तुम्ही ३० टक्के टॅक्स ब्रॅकेटमध्ये असल्यास तो साधारण साडेसहा टक्क्यापर्यंत येतो. एफडीच्या साडेसहा टक्के परताव्यापेक्षा जास्त परतावा देणारे किती फंड्स आहेत ते पाहा. २० टक्क्यापेक्षा जास्त परतावा मिळणे हा निकष आहे काय? तसे असेल तर स्वतःचीच कंपनी असणे चांगले. आणि सर्वोत्तमच फंड हवेत हे कशासाठी? वॉरन बफेलाही नेहमी सर्वोत्तम परतावा मिळत आलेला नाही. ;) अगदीच गाळात गेलेला फंड सोडला तर बहुतेक फंड्स एफडीपेक्षा चांगले रिटर्न्स देत आहेत. अ‍ाता साडेसहा टक्के बरे की सरासरी १२ ते १५ टक्क्यापर्यंत परतावा देणारे फंड्स बरे एवढाच विचार सामान्य गुंतवणूकदाराने करावा.

In reply to by आजानुकर्ण

PPF हा यातील तरलता आणि परतावा या दोन्ही बाबतीत पुर्णतः असमाधानकारक पर्याय आहे. थोडे स्पष्ट्च सांगावयाचे तर सर्वसामान्य गुंतवणुकदाराने या पर्यायाचा अजिबात विचार करु नये असे माझे मत आहे या भागवत साहेबांच्या मुद्द्याला दिलेला प्रतिसाद आहे

In reply to by सुबोध खरे

डॉ.साहेब, असहमत, आपली प्रतिक्रिया ही ''दीर्घकालीन गुंतवणुक म्हणजे 03 वर्ष काळाकरीता केलेली...' या गृहितकावर बेतलेली आहे. खरे म्हणजे या कालावधीला दीर्घकालीन म्हणणे सयुक्तीक होणार नाही. आपल्या पहिल्या ( ईकॉनॉमिक्स टाईम्स) धाग्यातही 05 मुदतीचे दाखविलेला परतावा हा तत्कालीन व्याजदरांच्या तुलनेने खराब म्ह्णता येणार नाही. आपले 'आज गेल्या ८ महिन्यात बाजार वधारला असल्याने कोणताही इ एल एस एस भरपूर परतावा दाखवतो आहे. पण त्याच फंडाची २०१४ मार्च पर्यंतची कामगिरी पाहिली तर ती बर्यापैकी निराशाजनक होती'.............. हे विधान ही खरे नाही. या ही काळांत 10 वर्षे वा अधिक कालावधीसाठी अनेक ELSS नी अन्य सर्व गुंतवणुक पर्यांयापेक्षा सरस परतावा दिलेला आहे. आपणच दिलेल्या ( मनीकंट्रोल) धाग्यावरुन मिळालेल्या माहितीवरुन असे दिसते की किमान 20 फंडसनी दिलेला परतावा हा 14% आणि त्याहुन जास्त आहे जो त्याची 'करमुक्तता' लक्षांत घेता 15% परताव्याच्या सर्वसामान्य अपेक्षा पुर्ण करतो सहाजिकच आपला बेंचमार्क हा 20% असण्याऐवजी 'उपलब्ध पर्यांयांत सर्वोत्तम' असा असेल तर अशी योजना शोधण्यास आपणास भरपुर वाव आहे, त्यकरिता कोणत्याही सल्लागाराची गरज भासु नये.

आजकाल मिपा आणि इतर संस्थळे यांवर लेख वाचत असताना वारंवार डोक्यात येणारा प्रश्नं म्हणजे इतकी गुंतवणूक का आणि कुठपर्यंत करावी? म्हणजे हेतू काय असावेत या गुंतवणुकीचे? १.सत्तराव्या वर्षी एवढे व्याज यावे नी तेवढे व्याज यावे म्हणून आता एवढी राशी जमा करा नी तेवढी जमा करा. आणि मग? सत्तराव्या वर्षी आपण मेल्यावर मुद्दल सगळं आपल्या वारसांना? माझ्या मते इतकीच गुंतवणूक करावी ज्या योगे मुलांची शिक्षणे व्यवस्थित होतील. किंवा व्यवसायाला सुरूवातीचे भांडवल देता येईल. त्यानंतर त्या मुला/मुलीचे घर, लग्नं, कार, परदेशप्रवास आणि मुलंबाळं त्यांचं त्यानी बघून घेतलं पाहिजे. हां एखाद्याचं मुल मानसिक्/शारिरीक विकलांग असेल तर त्याकरिता योग्य राशी जमवून ट्रस्ट बनवला पाहिजे. २.आजारपणे आणि शेवटपर्यंत व्यवस्था- यात आजारपणासाठी एखादा योग्य, बरिचशी आजारपणे कव्हर करणारा आणि आपल्या घराजवळच्या हास्पिटलातही कॅशलेस बेनिफिट मिळणारा प्लान घ्यावा. शेवटपर्यंतची व्यवस्था हा विषय जरा ट्रिकी आहे. कारण अगदी बेडरिडन अवस्थेत जर तुम्ही घरीच रहाणार असाल तर जवळच्या नातेवाईकांचा तेवढा सपोर्ट हवा. आणि जर तेवढा सपोर्ट करणारी मुलेबाळे असतील तर आपल्या साध्या गुंतवणूकीतून(दैनंदिन खर्चाकरिता केलेली तजवीज) एखादी प्रायवेट नर्स नक्कीच परवडेल. जर एखाद्या टर्मिनल केअर संस्थेत रहाणे चालणार असेल तर आपली इतकी गुंतवणूक असावी की दरमहा येणार्या व्याजातून किंवा बँक अकाऊंटमधून तो खर्चं वळता व्हावा. ३. पार्टनरसाठी- कमावता पार्टनर असेल किंवा त्याची/तिची स्वतःची योग्य गुंतवणूक असेल तर पार्टनरसाठी म्हणून अवाच्या सवा गुंतवणूक कशाला? एखादा योग्य टर्म इन्शुरन्स, हेल्थ पॉलिसी, एज्युकेशन फंड आणि रिटायरमेंट नंतरच्या दैनंदिन खर्चाची तजवीज यावर आपल्या भविष्यनिर्वाहाचा मुख्य भर असायला हवा. मग उरलेल्या पैशांचं काय- तर आत्ता रहायला चांगलंस घर. आत्ता होणारा खर्चं आत्ता करायची हौसमौज आणि पैसा कमवायला लागणार्या वेळाची काटछाट करून आत्ता कुटुंबियांत करता येणारी भावनिक गुंतवणूक. आपले आवडीचे छंद जोपासायला वेळ देणे आणि पैशापलीकडेही विचार करणे.

साती ताई आजच माझ्या सौ. च्या वर्गमित्राला भेटून आलो तो मुंबईत रुग्णालयात भरती झाला आहे ल्युकेमियासाठी AML M ४ ( अजून पूर्ण अहवाल आला नाही पण मोनोसाईट्स ७८% आहेत त्यामुळे प्राथमिक अहवाल M ४ आहे). माझ्या वर्गमित्राला embryonal cell Ca (एक प्रकारचा कर्करोग) झाला त्यातून तो पूर्ण बरा झाल्यावर ५ वर्षांनी त्याला NHL (दुसर्या प्रकारचा कर्करोग) झाल त्या निराश परिस्थितीत असताना मी आमच्या सरांना आयुष्याच्या अनिश्चीत्तेबद्दल प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी अत्यंत मोलाचा सल्ला दिला तो असा तुम्ही मिळवत असलेल्या मिळकतीचे १/३ पैसे दैनंदिन खर्चासाठी वापरा १/३ पैसे भविष्यासाठी ठेवा आणि १/३ पैसे आत्ता जीवन उपभोगण्यासाठी वापर कारण जीवन हे क्षणभंगुर आहे ते आज आहे तोवर उपभोगुन घ्या. जगलात तर उत्तम आहे. १/३ वाचवलेले असतील तर मुले बापाने कफल्लक करून ठेवले म्हणून बोटे मोडायला नको. या १/३ साठीच हा वरचा अट्टाहास. पण मरायची पाळी आली तर जगायचे राहून गेले हि खंत नको.१/३ उपभोगुन घ्या आणि हे मी अक्षरशः प्रत्यक्षात आणतो आहे.

In reply to by सुबोध खरे

मलाही साधारणपणे असेच काहीसे म्हणायचे आहे.

In reply to by साती

आईने कफल्लक करून ठेवले हे माझ्या कर्त्यासवरत्या मुलाने माझ्याविषयी म्हटले तर मला अज्जिबात वाईट वाटनार नाही. न कमावत्या मुलाने म्हणू नये म्हणून योग्य किंमतीचा टर्म इन्श्युरंस घ्यावा.

In reply to by सुबोध खरे

आमच्या पिताजींनी सांगितलेली गोष्ट आठवली. नोकरीच्या सुरुवातीला त्यांचा पगार होता वट्ट रू १५ फक्त. त्यातले रु ५ ते गावाला आईवडीलांकडे पाठवायचे, रु ५ मध्ये संसार चालवायचे आणि उरलेले रू ५ बचत म्हणून ठेवायचे. दोन मुले शिक्षण पूर्ण करून स्थिर झाल्यावर आणि स्वतः रिटायर झाल्यावर "पुरेसे पेन्शन व आवाक्यातल्या गरजा" असल्याने आईवडीलांनी मुलांकडे पैसे मागण्याचा एकही प्रसंग आला नाही. उलट आम्हा भावांना त्यांना काय खास भेटवस्तू द्यावी असा प्रश्न सतत पडत असे.

सध्या म्युचुअल फंडांच्या चांगल्या रीटर्न्स चे आकडे दिसत आहेत ते गेल्या ६ महीन्यात मार्केट ५० % वाढल्यामुळे आहेत. नाहीतर त्या आधी रीटर्न्स चे आकडे अतिशय वाईट होते. त्यात सर्व सल्लागार २०००, २००१ ह्या काळातल्या गुंतवणुकी वर आज कीती खुप खुप जास्त पैसे मिळत आहेत हे लिहीत आहेत. तेंव्हा ज्यांनी गुंतवणुक केली आणि थांबले ते नशिबवानच होते. पण त्याच प्रकारचा परतावा ह्या पुढच्या काळात मिळणे पण अवघड आहे. इथे सतत ब्ल्यु चीप कंपन्यांचे शेयर घेउन ठेवा म्हणजे काही प्रश्न नाही असे सरसकट विधान बर्‍याच लोकांनी केलेले दिसते आहे. पण गेल्या ५ वर्षातली ह्या शेयर्स ची कामगीरी बघा. सर्व प्रचंड निळे शेयर्स आहेत. टाटा स्टील, रीलायंस, ओएनगीसी, विप्रो, कोल ईडीया. डीएल्फ वगैरे तर लुटुनच गेले. ह्याचा अर्थ जनरली लागू होइल असा कुठला फॉर्म्युला नाही आणि असलाच तर तो सोप्पा पण नाही. फक्त घेउन ठेवले आणि १० वर्ष विसरुन गेलो असे करुन चालणार नाही.

In reply to by प्रसाद१९७१

(1)सध्या म्युचुअल फंडांच्या चांगल्या रीटर्न्स चे आकडे दिसत आहेत ते गेल्या ६ महीन्यात मार्केट ५० % वाढल्यामुळे आहेत. नाहीतर त्या आधी रीटर्न्स चे आकडे अतिशय वाईट होते............असहमत, 10 वर्षांचा कालावधीचा विचार केल्यास याही काळात म्युचुअल फंडस च्या प्रमुख योजनांनी अन्य गुंतवणुक पर्यायांपेक्षा सरस परतावा दिला आहे. (2) ज्यांनी गुंतवणुक केली आणि थांबले ते नशिबवानच होते. पण त्याच प्रकारचा परतावा ह्या पुढच्या काळात मिळणे पण अवघड आहे......... गुंतवणुक दीर्घकालीन असावी, हे तर मुख्य गृहितकच आहे, बाकी भविष्यकाळांतील परताव्याचे असे निराशाजनक भविष्य चितारण्याचे कारण नसावे. डीएल्फ वगैरे तर लुटुनच गेले...... याला,(तसेच रिलायन्स पॉवर ला) Blue-Chip कोणी ठरवले ??... टीममधील सगळेच खेळाडु फॉर्म मधे असतातच असे नाही,,म्हणुनच फोलिओत 12/15 ब्लुए चीप शेअर्स असावेत असे मी आधीच सुचविले आहे. असो, मुद्द्यांची होणारी पुनरावृती पहाता मी आता 'गुंतवणुक' यावर प्रतिसाद देणे थांबवतो.

मात्र 'शेयर बाजारात गुंतवणुक करायला "योग्य" सल्लागार असूच शकत नाही.... मी त्याला ५०००० रुपये दिले आणि सांगितले मला १५% इंटरेस्ट ने हे पैसे कधी परत करता येतील ते बघ
भागवत साहेब, हे विधान अतिषय विचारपूर्वक केलेले आहे. जर कोणाला वार्षिक २०% परतावा मिळवण्याची युक्ती अभ्यासानी सापडली असेल तर तो दुसर्‍यांना सल्ला देण्यात वेळ घालवेल का दुसर्‍यांकडुन १२ किंवा १५ टक्याने पैसे घेउन वरचे ५% मिळवेल? दुसर्‍यांच्या पैश्या बद्दल सल्ले देणे सोप्पेच असते हो. कोणाचे काय जातय त्यात. आणि परतावा कमी आला तर कायद्यात कुठे तरतुद आहे सल्लागाराला दंड करण्याची? कोणत्या स्टॉक मार्केट मधे खुप पैसे मिळवणार्‍या माणसानी सल्ला देण्याचे काम केले आहे?

In reply to by प्रसाद१९७१

कोणत्या स्टॉक मार्केट मधे खुप पैसे मिळवणार्‍या माणसानी सल्ला देण्याचे काम केले आहे?
अभ्यास वाढवा...

In reply to by अनुप ढेरे

@अनुप - तुम्ही च सांगा एक तरी नाव. बफेट च्या फिलॉसॉफिक बोलण्याला तुम्ही सल्ला म्हणत नसाल अशी अपेक्षा आहे. सल्ला म्हणजे - ह्या वेळेला तू हे कर असे स्पेसिफिक माणसाला स्पेसिफिक स्टॉक, म्यु.फं. वगैरे बद्दल स्पेसिफिक वेळेला सांगणे.

In reply to by प्रसाद१९७१

बसंत माहेश्वरी, संजय बक्षी वगैरे नावं शोधा गूगल वर. स्टॉक सल्यांची त्याची सर्वीस आहे. पूर्ण पॅकेजची वार्षिक फी एक लाख फक्त. अमुक शेअर आत्ता घ्या असा सल्ला असतो. मनीलाईफ वगैरे सायटींवरही सुविधा असतात अशा (मी वापरतो ही). वार्षिक ४-५ हजारात शेअरचे/ फंड्सचे सल्ले देणार्‍या. फुकट सल्ले देणार्‍याही सायटी असतात.

In reply to by अनुप ढेरे

अश्या बर्‍याच असतात हो सायटी. पुन्हा तेच. त्यांना जर इतके कळते तर स्वता का नाही पैसे मिळवत. असे थोड्याश्या किमतीला आपले नॉलेज विकुन का टाकतात? आणि ह्या कुठल्याही सल्लागारांची काहीही कमिटमेंट नसते.

In reply to by प्रसाद१९७१

अहो प्रसादराव, सल्ला ही एखादी भौतिक वस्तु असती आणि दुसर्याला दिल्याने ती संपत असती किंवा मुळ सल्ला देणाराकडे ती उरत नसती ( उदा. जमीन, आंबे, मिठाई ई) तर.... आपला "तर स्वता का नाही पैसे मिळवत. असे थोड्याश्या किमतीला आपले नॉलेज विकुन का टाकतात?".....हा मुद्दा खरा मानता आला असता. येथे दुसर्याला सल्ला देवुनही पैसे मिळतात, शिवाय स्वतः तो अधिक चांगल्या प्रकारे उपयोगांत आणता येतोच, असे नाही का ?? मुळातच गल्ल्त करताय तुम्ही.

In reply to by प्रसाद१९७१

स्वता का नाही पैसे मिळवत
कोण म्हणतं की स्वत: नाही मिळवत. नॉलेज विकतात कारण तो ऑलमोस्ट फुकट पैसा असतो. बिना जोखीम...
आणि ह्या कुठल्याही सल्लागारांची काहीही कमिटमेंट नसते.
शेअर बाजाराशी रिलेरटेड गुंतवणुकीची कोणीच कमिटमेंट देत नसते. कोणी देत असेल तर ती व्यक्ती फ्रॉड आहे हे नक्की. शेवटी आपणच डोकं चालवून, जालावर असलेल्या अगणित माहितीचा वापर करून निर्णय घ्यायचा असतो.

In reply to by प्रसाद१९७१

आपल्या वैचारिक भुमिकेबद्दल आदरच आहे मात्र व्यवसायाची गणिते वेगळीच असतात साहेब. उदा. मी माझ्या क्लायंटस कडुन सल्ला देण्याची माझी फी ही त्यांना 15% फायदा झाला तरच द्या असे सागुंन मिळवतो... आता सांगा तुमच्या म्हणण्याप्रमाणॅ एवढा खटाटोप करुन, भांडवल उभे करुन, जे पैसे मिळवायचे (तुम्हीच दिलेले उदाहारण घ्यावयाचे तर 5%) ते मला सल्ला देवुनही मिळतातच की.....मग मी सल्ला का देवु नये ?? दुसर्यां च्या पैश्या बद्दल सल्ले देणे सोप्पेच असते हो. कोणाचे काय जातय त्यात.......जातं ना, क्लायंटला नाही झाला अपेक्षित फायदा तर माझं उत्पन्न जात्ं ना..शिवाय वेळ आणि असमाधानी क्लायंट मुळे पुढचे संभाव्य क्लायंट्स जातात. आणि हो, ही माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली असल्याने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्या, तर मी आधीच क्षमा मागतो.

उदा. मी माझ्या क्लायंटस कडुन सल्ला देण्याची माझी फी ही त्यांना 15% फायदा झाला तरच द्या असे सागुंन मिळवतो... आता सांगा तुमच्या म्हणण्याप्रमाणॅ एवढा खटाटोप करुन, भांडवल उभे करुन, जे पैसे मिळवायचे (तुम्हीच दिलेले उदाहारण घ्यावयाचे तर 5%) ते मला सल्ला देवुनही मिळतातच की.....मग मी सल्ला का देवु नये ?? किती फी आहे ओ तुम्ची?

सर्व प्रथम या पोर्टल च्या निर्मात्याला माझा प्रणाम. मराठी भाषिकांसाठी केलेले हे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे. गुंतवणुकीचे खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत. उदारणार्थ शेर मार्केट, म्युच्युअल फंड, बँक सेविंग्स, एफ डी, आर डी, एल आय सी, सोने-चांदी, रिअल इस्टेट आदी गुंतवणुकीच्या पर्यायांचा यात मुखत्व समावेश होतो. कमी वेळेमध्ये जास्त किव्हा लवकर परतावा मिळण्यासाठी तुमच्यासमोर शेर मार्केट आणि म्युच्युअल फंड पर्याय येतात. म्युच्युअल फंड म्हणजे काय? याची संपूर्ण महिती या ब्लॉग मध्ये दिली आहे https://investica.com/blog/what-are-mutual-funds/ शेर मार्केट म्हणजे काय आणि त्यात कशी गुंतवणूक करायची याची महिती या ब्लॉग मध्ये दिली आहे https://mr.wikipedia.org/wiki/समभाग_बाजार https://choicebroking.in/blog/demat-account-opening-guide/