Skip to main content

फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल

लेखक संदीप डांगे यांनी रविवार, 11/01/2015 04:02 या दिवशी प्रकाशित केले.
फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल सगळीकडे गदारोळ सुरु आहे. हजारो लोक रस्त्यांवर आले आहेत "अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला", "आम्ही सगळे चार्ल्स हेब्डो", वैगेरे वैगेरे. आणि त्यातल्याच काही अतिउत्साही महाभागांनी परिसरातल्या मस्जीदी उध्वस्त करून आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बजावला. मृतांबद्दल सहानुभूती असणे योग्यच आहे पण ती किती योग्य ते जरा तपासून बघायला हवी. मी स्वतः एक कलाकार असून कट्टरवाद्यांच्या भूमिकेतून मी ह्या हल्ल्याचे समर्थन केले कारण कुणीतरी हा वेगळा दृष्टीकोन मांडणे आवश्यक आहे, जो काही धाडसी वार्तापत्रे मांडत आहेतच. जेणे करून ह्या हत्याकांडाच्या इतर बाबींवर प्रकाश पडावा व मुस्लिमांची जी एकच एक प्रतिमा रंगवली जात आहे तो प्रयत्न हाणून पाडवा. पण काही मित्रांना माझा हा पवित्रा खटकला आणि त्याचे चेपू वर पडसाद उमटले. तिथे उदधृत काही विचार माझ्यापेक्षा जास्त चांगला,व्यवस्थित आणि माहितीपूर्ण विचार करणाऱ्या जाणकार मिपाकारांसमोर ठेवत आहे. चर्चा अपेक्षित आहे. "चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने केलेल्या खोडसाळपणाबद्दल आज कुणीही बोलत नाही कारण कुणाची हत्या होणे म्हणजेच फार भयंकर एवढेच सामान्यपणे लोक समजतात. ज्याची हत्या झाली तो भारी निष्पाप आणि मारणारा क्रूर अविचारी नराधम. त्याच वेळेस गोडसेच कसे बरोबर, गांधी कसे मारण्याच्याच लायकीचे होते हे गेली साठ वर्षे आपण चघळत आहोत. म्हणजेच काय तर मारणारा आणि मरणारा ह्यापैकी जो आपला त्याचीच बाजू बरोबर. ह्यासंदर्भात आपण दोन अतिशय वेगळ्या गोष्टी लक्ष्यात घेतल्या पाहिजेत, एक म्हणजे, "चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने फार खवचट आणि असंस्कृत अश्या व्यंगचित्रातून पैगंबरांचा अपमान केला. त्या साप्ताहिकाचा असे करण्यामागचा हेतू जाणून बुजून भावना दुखावून उचकवणे (provocative) असाच होता. माझा आक्षेप हा हत्याकांडाच्या पूर्वी झालेल्या बेजबाबदारपणाबद्दल आहे. लोक आज म्हणत आहेत कि "साधे एक चित्र काढले तर थेट गोळ्या घालायची काय गरज होती?" ते चित्र इतरांसाठी साधे असेल मुस्लिमांसाठी नाही हा एक मुद्दा, त्यातल्या एका व्यंगचित्रकाराचे मत असे होते "माझ्यासाठी पैगंबर पवित्र वैगेरे काही नाही, मी काही कुराणाचा कायदा मानत नाही, मी फ्रेंच कायदा मानतो." म्हणजेच इतरांच्या श्रद्धास्थानाला घाणेरड्या पद्धतीने चितारणार, त्यांचा अपमान करणार, वरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गळे काढणार. म्हणजे त्याला ज्या पद्दतीने इतरांच्या आत्मसन्मानाची हिंसा करता येणार ते तो करणार, त्याच्यावर इतरांनी त्यांच्या पद्दतीने प्रतिकार केला तर चूक. हा काय तर्क आहे? शब्द आणि चित्रांचे वार जास्त घातक असतात. बंदुकीपेक्षा लेखणी ताकतवान ते उगाच नाही म्हणत. एक गोळी एका वेळेस एकाला मारते. एकच चित्र लाखोंना लाखो वेळा आणि आयुष्यभर मारते. त्यामुळे लेखणी चालवताना हजारदा विचार करावा लागतो. दुसरी गोष्ट अशी कि जाणून बुजून केल्या जाणाऱ्या अपमानाचा बदला घेण्याची त्यांची ती रीत असेल, चांगली आहे कि वाईट आहे ह्यावर "आपण" कितीही काथ्याकुट केला तरी ते लोक बदलणार नाही. "हम करे सो कायदा" असाच सगळा प्रकार आहे तिकडे. जे काही बदलायचे आहे ते हेच बदलायचे आहे. जगातल्या सर्व मुस्लिमांना हे जाणवून देणे आवश्यक आहे कि "हम करे सो कायदा" हा प्रकार त्यांच्या जीवावर इतर मुठभर लोक करत आहेत. आणि आज तो शांतीप्रिय मुस्लिमांना व जगाला त्रासदायक ठरत आहे. ते करायचे सोडून तुम्ही जर पैगंबर आक्षेपार्ह स्थितीत दाखवले तर शांतीप्रिय मुस्लिम सुद्धा भडकून उठतील आणि जो उद्देश आहे तो उरणारच नाही. माझा मुद्दा फार साधा आहे. दहशतवाद (कोणताही, कारण जगात मुस्लिम दहशतवाद सोडून इतर अनेक धर्माचे, देशाचे, समाजाचे दहशतवादी आहेत. मिडिया त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो हा भाग वेगळा) व त्याबद्दल लिहिताना किंवा चित्र काढताना किमान एक लक्ष्यात घेतले पाहिजे कि कुठल्याही दहशतवादाला केवळ एकच एक बाजू नसते. हजारो कारणे आहेत. एक कलाकार म्हणून तुम्हाला सर्वांगीण विचार किंवा समजूतदारपणा दाखवता येत नसेल तर तुम्ही मरण्याच्या लायकीचेच असाल. हुसैनला आपण हिंदुनी का भारताबाहेर घालवले मग? पिके विरुद्ध का आंदोलन चालू आहे? जे चूक आहे त्याबद्दल जरूर लिहावे. लिहायला, छापायला मिळते म्हणून मर्यादा ओलांडू नये. साधीशी गोष्ट आहे. माझ्या-तुमच्या हातून काही गुन्हा घडला तर मला -तुम्हाला शिक्षा व्हावी किंवा ज्याने कुणी पाणउतारा करायचा त्याने माझा-तुमचा करावा. पण कुणी चारचौघात त्या गुन्ह्याला धरून आपल्या आई-बापावर अतिशय वाह्यात टीका केली तर ते तुम्ही किंवा मी सहन करू शकू काय? मुस्काट नाही का फोडणार त्याचे? बाकी राज्यघटना आणि कोर्टस याबद्दल, तर खूप दिवसांपासून चारली हेब्दो ला त्याचे धंधे बंद करण्यास सांगितले होते, त्याने ऐकले नाही. त्याच्याविरुद्ध केस म्हणजे "अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी" म्हणून केस होत नव्हती. त्याचवेळेस स्वेच्छेने बुरखा घालणाऱ्या स्त्रियांवर बुरखा न घालण्याची सक्ती करून फ्रेंच सरकार एक वेगळ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत होते. (बहुतेक मुस्लिम स्त्रियांना बुरखा घालणे आवडते असे साधारणपणे वाचनात आले आहे, किंवा त्यांना ते त्यांचे दमन वैगेरे वाटतच नसेल कदाचित.) आंतरराष्ट्रीय स्तरावर मुस्लिम समाजाबद्दल फार दुटप्पी कारभार आहे. प्रत्येक कट्टरवादी आपलेच तेच खरे म्हणत असतो. तो धार्मिक असो वा कुठलाही. दोन घटना सांगतो. माझ्या ओळखीतले एक वयस्कर दलित पोलिस इन्स्पेक्टर होते, ते मला म्हणाले तू एक चित्र प्रदर्शन भरव, तुला काय पैसा लागेल तो मी पुरवतो. पण चित्रे माझ्या संकल्पनेनुसार असली पाहिजेत. श्रीराम आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया याबद्दल अतिशय गलिच्छ प्रकारे त्यांनी वर्णन केले व म्हणाले हाच खरा इतिहास आहे. शबरी काही म्हातारी नव्हती तर ती एक तरणीताठी युवती होती, त्यांच्यात प्रेमालाप दाखव इत्यादी इत्यादी. त्यावेळेस मीसुद्धा देव वैगेरे मानणारा नव्हतो आणि रामायणातल्या असंख्य विसंगती मलाही दिसत होत्या. पण त्यांचे उद्दिष्ट वेगळे होते, त्यांना रामाचे जनमानसात असलेले पूज्यस्वरूप मलिन करायचे होते. कारण काय तर हिंदू धर्म कसा फालतू आहे हे सिद्ध करायचे. आणि "त्यांनी" स्वीकारलेला बौद्ध धर्म कसा श्रेष्ठ असे मिरवायचे. मी त्यांना सरळ नकार दिला कारण हे सगळेच बेसलेस आहे. मुद्दलातच चुकीचे आहे. एखाद्या धर्मात काही चुकीचे चाललेले असेल तर ते बदलण्याऐवजी त्यांच्या पुज्यस्थानावर हल्ला करा ते डळमळीत करा, हेच केले जाते. म्हणजे जे चुकीचे आहे ते तर चालू राहते, लोक मूर्ख राहतात आणि फ्रेममधला राम जाऊन बुद्ध किंवा जीजस येतो. कारण लोक शहाणे झाले तर सगळ्याच फ्रेम्स फेकून देतील, मग ह्या तमाम धर्मगुरुंचे कसे चालणार? पु ल देशपांडे यांचा एक अतिशय सुंदर वैचारिक लेख आहे यावर. त्यात त्यांनी धर्मश्रद्धांवरील आक्रमण आणि त्याचे माणसाच्या मनावर होणारे परिणाम याबद्दल लिहिले आहे. दुसरी घटना. एकदा एका मित्राशी वाद झाला होता "भारतीय मुस्लिम शाळांमधून वन्दे मातरम म्हणत नाहीत" यावरून. त्यावेळी तो जो पेटला होता आणि त्याच्या डोळ्यांतून अक्षरश आग बरसत होती. मी म्हणालो कि त्यांना म्हणायचे कि नाही त्यांचे त्यांना ठरवू दे आपण त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत. त्यावर तू फारच चिडला होता. तेव्हा ते त्याचे वन्दे मातरम "लादणे" असेच होते. स्वतंत्र भारतात प्रत्येकाला आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे. कुणी एक त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत, हिंदू संघटना मुस्लिम शाळेतल्या वन्दे मातरम बद्दल फार संवेदनशील आहेत. जणू काही त्यांनी वन्दे मातरम नाही म्हटले म्हणजे ते देशद्रोही. मग आपले हिंदू धड राष्ट्रगीत ना म्हणू दे ना, तिकडे लक्ष नाही देणार. हा एक प्रकारचा पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन आहे. मोठ्या संख्येने मुस्लिम सैन्यात आहेत, शहीद होतात, देशात इतरही क्षेत्रात देशाचे नाव मोठे करतात, तरी त्यांच्यावर संशय घेतोच. दोन धर्मात कुणीतरी दंगली घडवून आणतो, आपण एकमेकांची डोकी फोडतो. आणि दोघेही आयुष्यभर त्यांनी असे केले म्हणून आम्ही तसे केले म्हणत असतो. फायदा घेणारा फायदा घेऊन मोकळा. आपले बरेच मुस्लिम मित्र असतील. कधी त्यांना फेस टू फेस विचारून बघा. त्यांना काय वाटते ते. ते काहीही बोलले तरी "ते आपल्याशी कधीच खरे बोलणार नाहीत" हाच गंड सर्वसामान्य हिंदू बाळगून असतो. दुर्दैवाने तो खरा कि खोटा हे कुणीच कधी सांगू शकणार नाही. समाजसुधारणेचा आव आणणाऱ्या सर्वाना परिस्थितीचे पूर्ण भान आवश्यक आहे. समाजात सुधारणा करण्याची खरीच अपेक्षा व तळमळ असणारे कुणाची खिल्ली उडवत नाहीत. नाहीतर प्रकाश आमटे आदिवासींना नुसते "तुम्ही किती बावळट आणि मागासलेले आहात" असेच म्हणत राहिले असते कि झाली असती त्यांच्यात सुधारणा. आणि राजा राम मोहन राय यांनी घाणेरडी व्यंगचित्रे काढली असती तर सतीप्रथा बंद झाली असती. महात्मा फुले लोक मुलीना शिकवत नाहीत म्हणून लोकांना वाकुल्या दाखवत राहिले असते. इतरही अनेक उदाहरणे आहेत. याउपरही हाच आणि असाच मार्ग असेल तर शेवटही असाच होईल. मुस्लिमांच्या शरिया ची भीती घातली जाते. इतर लोक छुप्या मार्गाने तेच करतात ते मात्र नामानिराळे. दुतोंडी जे म्हणतो मी ते हेच. सगळीकडेच हे होत आहे. आपणच काहीतरी करायला पाहिजे दरी मिटवायला. नाही का? जाता जाता: ज्या जगात अमेरिका सारखा देश आहे, त्याने कधीही शांततेने जगता येईल असा विचार करू नये. अमेरिका फार कुटीलतेने दोन राष्ट्र, दोन समूह, दोन समाजामध्ये तेढ व अविश्वास निर्माण करण्यासाठी व त्यातून आपला फायदा आणि वर्चस्व मिळवण्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या दोन महिन्यात तेल-जगतात काय चालले आहे ते बघावे आणि आस्ट्रेलिया व फ्रांस मध्ये झालेल्या हल्ल्यांचा संबंध जोडता येतो का ते पाहावे. घटना फार सरळ आणि उघड जरी असल्या तरी त्या तितक्या सरळ कधीच नसतात. माझे मत तर असे आहे कि नेहमीप्रमाणे मुस्लिम जगताविरुध्द जनमत तापवण्याचा हा प्रकार अमेरिका करत आहे. सदर दोन्ही हल्ले अमेरिका पुरुस्कृत आहेत. कारण दोन्ही हल्ल्यांच्या कार्यपद्धतीत फारच विसंगती आहेत. ज्या साधारणपणे आढळत नाहीत.

वाचने 123833
प्रतिक्रिया 358

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

प्रतिवाद करायला सत्यावर आधारित मुद्दे तुमच्याकडे नाहीत म्हणून तुम्ही वैयक्तिक व नाजुक विषयांकडे घसरत आहात. यावरूनच तुमची दुसऱ्याना माणूस म्हणून वागवणारी माणुसकी दिसून आली. मला सट्टा खेळायला आवडत नाही म्हणून आपल्या घामाचे पैसे जुगारावर लावत नाही. मेहनतीच्या चार पैश्यात समाधानी आहे. आणि मी काय प्यायलोय आणि नाही याचा इतिहास उगाळून तुम्हाला काय उपयोग? तुम्ही क्रिकेट आणि देशप्रेम याचा स्वत:चा स्वत: जो संबंध लावलाय किंवा मार्केटिंगच्या तंत्राने तुमचा जो काय ब्रेनवाश केलाय (किंवा लाखो लोक तसाच विचार करतात म्हणून ते बरोबर) त्यामुळे तुम्हाला क्रिकेटमधून देशप्रेमाच्या उकळ्या फुटतात. हे अत्यंत बेसलेस आहे. त्यामुळे दुसऱ्यांचे अज्ञान काढण्याआधी स्वत:चेच ज्ञान वाढवा आणि काही चुकीच्या कल्पना उराशी बाळगून राहू नका. कधी सत्य समजले ना तर फार मोठा धक्का बसेल. आपल्याला आवडतं तेच श्रेष्ठ आणि सत्य असाच कट्टरवाद्यांचा दावा असतो, तुम्ही पण त्यातलेच.

In reply to by संदीप डांगे

>>> प्रतिवाद करायला सत्यावर आधारित मुद्दे तुमच्याकडे नाहीत म्हणून तुम्ही वैयक्तिक व नाजुक विषयांकडे घसरत आहात. यावरूनच तुमची दुसऱ्याना माणूस म्हणून वागवणारी माणुसकी दिसून आली. तुम्ही तर निष्पापांना अतिरेक्यांनी मारण्याचे समर्थन करून अतिरेक्यांना पाठिंबा देत आहात, यातच तुमचीही माणूसकी दिसून आली. >>> मला सट्टा खेळायला आवडत नाही म्हणून आपल्या घामाचे पैसे जुगारावर लावत नाही. मेहनतीच्या चार पैश्यात समाधानी आहे. तुम्ही आपले प्रतिसाद नीट वाचा. क्रिकेट तुम्हाला आवडत नाही आणि तुम्ही क्रिकेटचा तिरस्कार करता. तरीसुद्धा तुम्हाला क्रिकेटमधल्या अगदी बिनचूक टिप्स माहिती आहेत आणि त्यावरून तुमच्या एका मित्राने म्हणे एक कोटी मिळविले. या हास्यास्पद दाव्यावर मी किंवा इतर कोणी काय प्रतिसाद द्यावा अशी तुमची अपेक्षा आहे. जाता जाता, एप्रिलमध्ये आयपीएल सुरू होतंय. आम्हालाही २-४ टिप्स द्या ना. थोडे पैसे कमावीन म्हणतो. >>> आणि मी काय प्यायलोय आणि नाही याचा इतिहास उगाळून तुम्हाला काय उपयोग? तुम्ही क्रिकेट आणि देशप्रेम याचा स्वत:चा स्वत: जो संबंध लावलाय किंवा मार्केटिंगच्या तंत्राने तुमचा जो काय ब्रेनवाश केलाय (किंवा लाखो लोक तसाच विचार करतात म्हणून ते बरोबर) त्यामुळे तुम्हाला क्रिकेटमधून देशप्रेमाच्या उकळ्या फुटतात. ब्रेनवॉश तुमचाच झालाय आणि तो अतिरेक्यांच्या आंधळ्या प्रेमाने झालाय. तुम्ही चक्क माणसे मारायचे समर्थन करताय. देशाचे प्रतिनिधित्व करताना फसवणूक करणे हा देशद्रोह आहेच. >>> हे अत्यंत बेसलेस आहे. त्यामुळे दुसऱ्यांचे अज्ञान काढण्याआधी स्वत:चेच ज्ञान वाढवा आणि काही चुकीच्या कल्पना उराशी बाळगून राहू नका. कधी सत्य समजले ना तर फार मोठा धक्का बसेल. तुम्हाला सत्याचा आविष्कार झालेला दिसतोय. जरा इतरांनाही सांगा ना सत्य काय आहे ते. >>> आपल्याला आवडतं तेच श्रेष्ठ आणि सत्य असाच कट्टरवाद्यांचा दावा असतो, तुम्ही पण त्यातलेच. तुम्ही पण त्यातलेच.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही आपले प्रतिसाद नीट वाचा. क्रिकेट तुम्हाला आवडत नाही आणि तुम्ही क्रिकेटचा तिरस्कार करता. तरीसुद्धा तुम्हाला क्रिकेटमधल्या अगदी बिनचूक टिप्स माहिती आहेत आणि त्यावरून तुमच्या एका मित्राने म्हणे एक कोटी मिळविले. या हास्यास्पद दाव्यावर मी किंवा इतर कोणी काय प्रतिसाद द्यावा अशी तुमची अपेक्षा आहे.
तिथे प्रत्यक्ष सर्वात वरच्या वर्तुळात मी काम केले आहे. कोण किती पाण्यात आहे, कोण किती धुतल्या तांदळाचा आहे ते पण बघितले. त्यामुळे आत काय आहे आणि बाहेर काय आहे याचा पुरेपूर अनुभव आहे हे तुम्ही वाचले नाही बहुतेक.

In reply to by संदीप डांगे

>>> हे तुम्ही वाचले नाही बहुतेक. मी तुमचं बरंच काही वाचलंय हो. तुम्ही कुठल्या वर्तुळात आणि किती खोलवर गेलात तेही वाचलंय. पण त्यात सत्यांश किती, पूर्वग्रह किती आणि कल्पनेच्या भरार्‍या किती हे सांगता का जरा.

In reply to by श्रीगुरुजी

यात सत्यांश किती, पूर्वग्रह किती आणि कल्पनेच्या भरार्‍या किती हे सांगता का जरा.
आता खरंच वाटतंय, तुम्हाला वादासाठी वाद घालत आहात. तुम्हाला सत्य सांगीतले तरी तुम्ही म्हणाल आम्हाला हे मान्यच नाही तर काय करणार? तुमच्यासाठी सत्य हे तुम्ही काय मानता यावरच अवलंबून आहे. तुमच्या मताविरुद्ध मत मांडतोय म्हणून तुम्ही तर संदीप डांगे नावाचा व्यक्ती अस्तित्वातच नाही असेही म्हणाल. किंवा माझ्या डोक्यावरच परिणाम झालाय त्यामुळे मी काहीही बरळतो असे तुम्ही म्हणाल. मी जे बीसीसीआय मध्ये सुमारे वर्षभर काम केले तो माझा भास आहे, भ्रम आहे असेही तुम्ही म्हणाल. तुम्हीच वकील, तुम्हीच जज, तुम्हीच जल्लाद अशा वातावरणात तुम्हाला काही सांगायची मला काहीच गरज नाही. तुम्ही काही अर्जुन नाही कि मी काही कृष्ण नाही तुम्हाला सत्याचे याचिदेही याचिडोळा अनुभव द्यायला. तुमचे सत्य, कल्पनेच्या भराऱ्या तुमच्यापाशी. माझ्या माझ्यापाशी. तुमच्या आंधळ्या क्रिकेटप्रेमाची खिल्ली उडवली तर तुम्ही माझ्यावर चक्क खोटारडेपणाचे आरोप करत आहात. म्हणजेच तुम्ही चिडला असून आपण मानत असलेल्या धर्मावर कुणी चिखल उडवला म्हणून तुम्ही फार व्यथित झाला आहात. हेच होत असते गुरुजी. आपण मूर्ख ठरवलो जातोय असे वाटले कि माणसे चिडतात. नाहीतर क्रिकेट हे देशप्रेम कसे हे तुम्ही सांगत बसला नसता. आज मी क्रिकेटचा तिरस्कार करतो म्हणजे जन्माला आल्यापासून करत होतो असा त्याचा अर्थ होत नाही, तुम्ही आज जेवढे आहात त्याच्या कैकपटीने मी क्रिकेटवेडा होतो. प्रेमामध्ये लोक आंधळे असतात. ठेच लागली कि सत्य कळते. तुम्ही क्रिकेटचा आनंद घ्या, बाकीचा विचार करू नका. फक्त एकच - क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हटले जाते. पण ते तसे प्रत्येक वेळी असतेच असे नाही. क्रिकेट व देशप्रेम किंवा देशद्रोह यांचा काही संबंध नाही. तुम्ही मानत असाल पण देशाचे कायदे असे मानत नाहीत. तसे असते तर फिक्सिंग करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून संजय दत्तसारखे जेलमध्ये टाकले असते. क्रिकेट या विषयावर मला पुढे बोलायची गरज वाटत नाही त्यामुळे इथेच थांबतो. तुमचं चालू द्या.

In reply to by संदीप डांगे

क्रिकेट व देशप्रेम किंवा देशद्रोह यांचा काही संबंध नाही. तुम्ही मानत असाल पण देशाचे कायदे असे मानत नाहीत. तसे असते तर फिक्सिंग करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून संजय दत्तसारखे जेलमध्ये टाकले असते.
सहमत. स्वतः बीसीसीआय अगदी निःसंग्दिग्ध शब्दात सांगते आहे की आमचे खेळाडू हे भारताचे अधिकृत खेळाडू नाहीत. आम्ही भारताचा झेंडा वापरत नाही. भारत सरकारचा आणि आमचा काहीही संबंध नाही तर गुरुजींचा दावा आहे की बीसीसीआयच खोटे बोलत आहे. इतका हास्यास्पद दावा याआधी वाचला नव्हता. भारताचे नागरिक काहीही म्हणतील. उदा. मी भारताचा नागरिक आहे आणि मी म्हणतोय बीसीसीआय द. आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करते. या माझ्या म्हणण्याला कुठल्याच कोर्टात काडीचीही किंमत नाही. स्वतः बीसीसीआय (आणि भारत सरकार) त्या संघटनेबाबत काय म्हणते आहे हेच अधिकृत मत आहे. त्याचप्रमाणे अझरुद्दीन किंवा जडेजा काय करतात त्याला देशद्रोहाऐवजी बलात्कार म्हणण्याची मागणी 'भारताचे नागरिक' करतील. त्यालाही कोर्ट काडीचीही किंमत देणार नाही.

In reply to by आजानुकर्ण

>>> स्वतः बीसीसीआय अगदी निःसंग्दिग्ध शब्दात सांगते आहे की आमचे खेळाडू हे भारताचे अधिकृत खेळाडू नाहीत. आम्ही भारताचा झेंडा वापरत नाही. भारत सरकारचा आणि आमचा काहीही संबंध नाही तर गुरुजींचा दावा आहे की बीसीसीआयच खोटे बोलत आहे. इतका हास्यास्पद दावा याआधी वाचला नव्हता. अहो, कसाबने सुद्धा निसंदिग्ध शब्दात सांगितले होते की त्याने नागरिक मारले नाहीत म्हणून. पण वस्तुस्थिती काय होती? प्रत्येक सामन्यात भारताचा ध्वज, भारताचे राष्ट्रगीत वापरून सुद्धा जर बीसीसीआय सांगत असेल की आमचे खेळाडू हे भारताचे अधिकृत खेळाडू नाहीत, आम्ही भारताचा झेंडा वापरत नाही तर हा दावा खोटा आणि हास्यास्पद नाही का? स्वतःच्या अधिकृत संकेतस्थळावर बीसीसीआय लिहिते क्रिकेट संघाचा उल्लेख हा स्वतःचा संघ असा एकदाही न करता भारतीय संघाने अमुकतमुक मालिका जिंकली किंवा भारतीय संघ अमुकतमुक मालिकेत चांगला खेळला असा उल्लेख करते आणि त्याचवेळी 'आमचे खेळाडू हे भारताचे अधिकृत खेळाडू नाहीत' असा दावा करते, त्यावेळी या दोन गोष्टींमधील विरोधाभास व खोटारडेपणा कोणाच्याही सहज लक्षात येईल. तुमच्यासारख्या काही जणांच्या तो लक्षात येत नाही हे दुदैव आहे किंवा तुम्ही जाणूनबुजून असे करत आहात. _____________________________________________________________________________ बीसीसीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरील या पानातील http://www.bcci.tv/about/2015/history ही खालील वाक्ये वाचा. he Provisional Board met in Mumbai in December 1928 during the Quadrangular tournament, to discuss the next course of action. It was at this meeting that Govan and De Mello prevailed upon the others to reconsider the decision taken at the previous year's meeting. They did not want India to miss out on the opportunity to host South Africa in 1929 and tour England in 1931! Their persistence paid off. The Provisional Board was deemed to have finished its work, and the Board of Control for Cricket in India established. Govan was the first President, and De Mello the first Secretary. Five months later, the ICC admitted India as a Full Member. १९२८ मध्ये "भारताला" (बीसीसीआय ला नाही) आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचा पूर्ण वेळ सदस्य करून घेण्यात आले. Govan and De Mello tried their best to convince Kumar Shri Duleepsinhji, nephew of 'Ranji,' to lead the Indian team to England in 1932. इथेही "भारतीय संघ" असा उल्लेख आहे (बीसीसीआय चा संघ असा उल्लेख नाही) हे लक्षात घ्या. क्रिकेट संघाचे "भारताचा संघ" असा उल्लेख केलेली अजून काही वाक्ये (संपूर्ण संकेतस्थळावर कोठेही हा संघ बीसीसीआय चा संघ आहे असा उल्लेख नाही). On the eve of the inaugural Test, which was played at Lord's in 1932, both Porbandar and Limbdi pulled out, and Col. C.K. Nayudu, the premier cricketer in the squad, was awarded the honour of becoming India's first Test captain. India first won a Test series abroad in 1967-68, when the New Zealanders were beaten 3-1 on their own pitches. Three seasons later, the Indian team went several steps further, winning back-to-back series in the West Indies and England. हा क्रिकेटचा संघ भारताचा संघ नसून आमचा म्हणजे बीसीसीआयचा संघ आहे व आम्ही भारताचा ध्वज वापरत नाही हे बीसीसीआय चे दावे तद्दन खोटे आणि हास्यास्पद आहेत हे आता तुमच्या लक्षात आलं असावं अशी इच्छा आणि अपेक्षा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

बीसीसीआय चे दावे तद्दन खोटे आणि हास्यास्पद आहेत हे आता तुमच्या लक्षात आलं असावं अशी इच्छा आणि अपेक्षा आहे.
होय गुरुदेव. बीसीसीआयचे सर्वच दावे तद्दन खोटे व हास्यास्पद आहेत. तुमचे दावे अत्यंत खरे आहेत. (खरे या शब्दाचा डॉ. साहेबांशी काहीही संबंध नाही. नाहीतर त्यांना वाटेल मी वितंडवाद घालतोय.) दुर्दैवाने देशभक्त खेळाडूंना बीसीसीआयसारख्या खोटारड्या व हास्यास्पद दावे करणाऱ्या कंपनीची चाकरी करावी लागत असल्याने तत्काळ या संघाचे राष्ट्रीयीकरण करण्यात यावे व क्रिकेटप्रेमाला देशप्रेम न समजणाऱ्यांस देशद्रोही समजण्याचा अध्यादेश मोदीमजकुरांनी काढावा अशी मागणी मी या माध्यमातून याठिकाणी करत आहे.

In reply to by आजानुकर्ण

आमचे या मागणीस बेशर्त अनुमोदन आहे बाद्वे, क्रिकेट, देशप्रेम, देशद्रोह, बेटिंग आणि फिक्सिंग असा वेगळा धागा काढावा का? ("मेलो… नक्क…………ओ " इति समस्त मिपाकर)

In reply to by संदीप डांगे

काढा की. अजून मजा येईल. पण धागा काढल्यानंतर काही दिवसांनी माझं चुकलं, मी असं म्हणायला नको होतं, मी अशी चुकीची भूमिका घेतल्याबद्दल माफी मागतो ... असा कबुलीजबाब देऊ नका.

In reply to by आजानुकर्ण

>>> तत्काळ या संघाचे राष्ट्रीयीकरण करण्यात यावे व क्रिकेटप्रेमाला देशप्रेम न समजणाऱ्यांस देशद्रोही समजण्याचा अध्यादेश मोदीमजकुरांनी काढावा अशी मागणी मी या माध्यमातून याठिकाणी करत आहे. अनुमोदन

In reply to by श्रीगुरुजी

*WALL* शोभता अनुयायी. :D नको हो नको... बास करा आता. नाही, करमणूक उत्तम होतेय, पण विषयांतराला आणि या प्रतिसादांच्या तिरक्या रांगांनासुद्धा सीमा आहे. त्यामुळे खरंच वेगळा धागा काढा यासाठी.

In reply to by संदीप डांगे

>>> आता खरंच वाटतंय, तुम्हाला वादासाठी वाद घालत आहात. तुम्हाला सत्य सांगीतले तरी तुम्ही म्हणाल आम्हाला हे मान्यच नाही तर काय करणार? तुम्ही सांगताय हे सत्य कशावरून? काही पुरावे देता का? >>> तुमच्यासाठी सत्य हे तुम्ही काय मानता यावरच अवलंबून आहे. तुमच्यासाठी देखील सत्य हे तुम्ही काय मानता यावरच अवलंबून आहे. >>> मी जे बीसीसीआय मध्ये सुमारे वर्षभर काम केले हे नवीनच ऐकतो मी. ऐकावे ते नवलच! >>> तुम्हीच वकील, तुम्हीच जज, तुम्हीच जल्लाद अशा वातावरणात तुम्हाला काही सांगायची मला काहीच गरज नाही. तुमच्याही बाबतीत अगदी तसंच आहे. >>> तुमचे सत्य, कल्पनेच्या भराऱ्या तुमच्यापाशी. माझ्या माझ्यापाशी. तुमच्या आंधळ्या क्रिकेटप्रेमाची खिल्ली उडवली तर तुम्ही माझ्यावर चक्क खोटारडेपणाचे आरोप करत आहात. म्हणजेच तुम्ही चिडला असून आपण मानत असलेल्या धर्मावर कुणी चिखल उडवला म्हणून तुम्ही फार व्यथित झाला आहात. हेच होत असते गुरुजी. आपण मूर्ख ठरवलो जातोय असे वाटले कि माणसे चिडतात. तुमच्या आंधळ्या क्रिकेटद्वेषाची खिल्ली उडवली, तुमचे सट्टा आणि टिप्स याविषयींच्या दाव्यांची खिल्ली उडवली, अतिरेक्यांनी मारून टाकलेल्या निष्पाप नागरिकांच्या हत्येचे समर्थन करणार्‍या तुमच्या भूमिकेला मुद्देसूद विरोध केला म्हणून तर तुम्हाला संताप आलेला आहे व त्या संतापातून वैफल्य आलेलं आहे. >>> नाहीतर क्रिकेट हे देशप्रेम कसे हे तुम्ही सांगत बसला नसता. देशासाठी केलं जाणारं प्रत्येक काम हे निष्ठापूर्वक व फसवणूक न करता करणे हे देशप्रेमच असतं. जाऊ दे, तुम्हाला कळणार नाही ते. >>> क्रिकेट व देशप्रेम किंवा देशद्रोह यांचा काही संबंध नाही. तुम्ही मानत असाल पण देशाचे कायदे असे मानत नाहीत. तसे असते तर फिक्सिंग करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून संजय दत्तसारखे जेलमध्ये टाकले असते. संबंध आहे. दुर्दैवाने क्रिकेटचा आंधळा तिरस्कार करणार्‍या तुमच्यासारख्यांच्या लक्षात नाही येत ते. पोलिस खटला दाखल करताना ज्या कलमाखाली गुन्हा नोंदवितात त्या कलमांखालीच खटला चालतो. जर खटल्यासाठी देशद्रोहाचे कलम न लावता किरकोळ कलम लावले असेल तर देशद्रोहाच्या कलमाखाली खटला चालविलाच जात नाही. फिक्सिंग करणारे क्रिकेटपटू हे सेलेब्रिटी असल्याने पोलिस त्यांना शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतात व त्यामुळेच देशद्रोहाचे कलम लावले गेले नव्हते. एखाद्याने अपघात करून कोणाला मारले तरी निष्काळजीपणे केलेला अपघात किंवा परिस्थितीमुळे अपरिहार्य असलेला अपघात अशापैकी ज्या कलमाखाली गुन्हा नोंदविला जातो त्यानुसार खटला चालून शिक्षा होते. सेलेब्रिटीज ना अर्थातच सौम्य कलमे लावली जातात व किरकोळ शिक्षेवर ते सुटतात. काही वर्षांपूर्वी जुना चित्रपट अभिनेता राजकुमारचा मुलगा पुरू राजकुमार याने फुटपाथवर गाडी घालून ३ लोकांना जीवे मारले व इतर दोघांचे पाय तुटले. हा पुरू जेमतेम ९०००० रूपयांच्या दंडावर सुटला कारण पोलिसांनीच त्याची केस अत्यंत सौम्य कलमांखाली दाखल केली होती. फिक्सिंग केलेले क्रिकेटपटू असेच थोडक्यात सुटले. निव्वळ क्रिकेट फिक्सिंग नव्हे, तर बोफोर्स तोफांच्या सौद्यात पैसे खाणे हा सुद्धा देशद्रोह होता. परंतु रा़ज्यकर्त्यांच्या कृपेमुळे हा देशद्रोह पचविला गेला. असो. क्रिकेट या विषयावर मला पुढे बोलायची गरज वाटत नाही त्यामुळे इथेच थांबतो. तुमचं चालू द्या.

In reply to by श्रीगुरुजी

चला म्हणजे तुम्ही दिलेल्या उदाहरणांवरून असे दिसते कि पोलिस, कोर्ट, वकील वैगेरे देशद्रोह्यांना मदत करतात. म्हणजे कोर्टात न्याय होईलच असे नाही. त्यामुळे कुणाला न्याय मिळवायचा असेल तर त्यासाठी पोलिस, कोर्ट, खटले ही काही आदर्श व्यवस्था नाही कारण ती वाकवता येउन त्यातून सही सलामत सुटता येते. म्हणजे गुन्हा कोर्टात सिद्ध झाला नाही तर तो दोषी आहे कि नाही कसे ठरवणार? एकीकडे तुम्ही शर्ली एब्दोच्या बाबतीत कायदेशीर लढाईचे समर्थन करता त्याचवेळेस क्रिकेटर्सच्या बाबतीत देशाच्या कायदा व्यवस्थेवर अविश्वास दाखवता. म्हणजे तुमच्या मते परत तुम्हाला काय वाटते हेच महत्वाचे नाही का?

In reply to by संदीप डांगे

>>> चला म्हणजे तुम्ही दिलेल्या उदाहरणांवरून असे दिसते कि पोलिस, कोर्ट, वकील वैगेरे देशद्रोह्यांना मदत करतात. म्हणजे कोर्टात न्याय होईलच असे नाही. त्यामुळे कुणाला न्याय मिळवायचा असेल तर त्यासाठी पोलिस, कोर्ट, खटले ही काही आदर्श व्यवस्था नाही कारण ती वाकवता येउन त्यातून सही सलामत सुटता येते. म्हणजे गुन्हा कोर्टात सिद्ध झाला नाही तर तो दोषी आहे कि नाही कसे ठरवणार? एकीकडे तुम्ही शर्ली एब्दोच्या बाबतीत कायदेशीर लढाईचे समर्थन करता त्याचवेळेस क्रिकेटर्सच्या बाबतीत देशाच्या कायदा व्यवस्थेवर अविश्वास दाखवता. म्हणजे तुमच्या मते परत तुम्हाला काय वाटते हेच महत्वाचे नाही का? पुन्हा एकदा अत्यंत हास्यास्पद प्रतिसाद. माझा आधीचा प्रतिसाद नीट वाचा, विचार करा आणि नंतर प्रतिसाद लिहा. तुम्हाला मी काय लिहिले आहे ते कळलेले नाही आणि आपण काय खरडत आहोत ते देखील समजलेले नाही.

In reply to by श्रीगुरुजी

जर खटल्यासाठी देशद्रोहाचे कलम न लावता किरकोळ कलम लावले असेल तर देशद्रोहाच्या कलमाखाली खटला चालविलाच जात नाही.
म्हणजे देशद्रोहाचे कलम लावायची मनमानी चालढकल ते लोक सेलिब्रिटी आहेत म्हणून पोलिसांतर्फे केल्या जाते असेच तुमचे म्हणणे आहे ना? म्हणजेच सेलिब्रेटिना देशद्रोह करायची पोलिसांतर्फे मुभा आहे असाच अर्थ होतो. आपण काय लिहितो आहोत तेच आधी पूर्ण विचार करून लिहा. मग ठरवू काय हास्यास्पद आहे ते

In reply to by संदीप डांगे

>>> म्हणजेच सेलिब्रेटिना देशद्रोह करायची पोलिसांतर्फे मुभा आहे असाच अर्थ होतो. आपण काय लिहितो आहोत तेच आधी पूर्ण विचार करून लिहा. मग ठरवू काय हास्यास्पद आहे ते कोणत्याही वाक्याचा सरळ अर्थ लावणे अपेक्षित असताना आपल्याला सोयिस्कर असा अत्यंत अतार्किक आणि हास्यास्पद अर्थ लावण्याचे तुमचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. असेच अर्थ काढत चला आणि आमची करमणूक करत रहा.

In reply to by श्रीगुरुजी

कोणत्याही वाक्याचा सरळ अर्थ लावणे अपेक्षित असताना आपल्याला सोयिस्कर असा अत्यंत अतार्किक आणि हास्यास्पद अर्थ लावण्याचे तुमचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे.
तुम्हीच आमचे गुरुजी. तुमच्यापासूनच शिकलो

In reply to by श्रीगुरुजी

तुमच्या माहिती साठी सांगतो खेळाचे फिक्सिंग हे देशद्रोहाच्या कायद्यात बसत नाही. असे कुठले कलम असेल तर सांगा. पोलिस फक्त सट्टेबाजी आणि व्यवहारात केलेल्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकतात. तुम्ही बोफोर्स तोफांचा भ्रष्टाचार, जो लष्कराच्या व पर्यायाने देशाच्या सबलतेच्या व अर्थकारणाच्या दृष्टीने घातक आहे तो, रस्त्यावर अपघातात जाणारे जीव आणि मनोरंजनासाठी खेळल्या व बघितल्या जाणाऱ्या क्रिकेटचा जो काही बादरायण संबंध जोडताय तो खास विनोद आहे. वरील दोन (लष्कर व रस्तेसुरक्षा) गोष्टींमध्ये प्रत्येक भारतीयाच्या जीवनमरणाचा व कररूपी पैश्यांचा प्रश्न आहे आणि तो तितकाच सर्वव्यापी आहे. तुम्ही तुमच्या पैश्यातून कुठलेही मनोरंजन करू शकता, त्याच्यावर जिवाभावाने प्रेम करू शकता, त्यात फसवणूक झाली तर संतापू शकता. पण सर्वच भारतीयांनी तो तुमच्या मनोरंजनातून आलेला तुमचा संताप आपलाच समजावा हा अट्टाहास का आहे. ती फक्त खेळामधली फसवणूक आहे, देशद्रोह वैगेरे काही नाही. क्रिकेटच्या अतिप्रेमापायी तुम्हाला फार भ्रम झालेले आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ तुम्ही काहीच्या काही हास्यास्पद तर्क लढवताय.

In reply to by संदीप डांगे

एकंदर देशभक्ती आणि क्रिकेटचा संबंध वाचून Patriotism is the last refuge of a scoundrel हे आठवले.

In reply to by आजानुकर्ण

देशाकरीता केलेले कोणतेही काम हे देशभक्तीच असते आणि देशाविरूद्ध केलेले कोणतेही कृत्य हे देशद्रोहच असतो. तुम्हाला पटो न पटो.

In reply to by संदीप डांगे

>>> क्रिकेटच्या अतिप्रेमापायी तुम्हाला फार भ्रम झालेले आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ तुम्ही काहीच्या काही हास्यास्पद तर्क लढवताय. आणि क्रिकेटच्या अतिद्वेषापायी तुम्हालाही भ्रम झालेले आहेत आणि आपले भ्रम हेच एकमेव अंतिम सत्य आहे हे समजावून देण्यासाठी तुम्ही जीवाचा आटापिटा करत आहात.

In reply to by श्रीगुरुजी

याचा खुलासा द्या बाकीचे सोडा
तुम्ही तुमच्या पैश्यातून कुठलेही मनोरंजन करू शकता, त्याच्यावर जिवाभावाने प्रेम करू शकता, त्यात फसवणूक झाली तर संतापू शकता. पण सर्वच भारतीयांनी तो तुमच्या मनोरंजनातून आलेला तुमचा संताप आपलाच समजावा हा अट्टाहास का आहे. ती फक्त खेळामधली फसवणूक आहे, देशद्रोह वैगेरे काही नाही.

In reply to by श्रीगुरुजी

प्रत्येकवेळी सापेक्ष असतेच असे नाही.
म्हणजेच ते सापेक्ष असते. सापेक्षताचा अर्थ जरा विश्वकोषात बघून घ्या. तुम्ही रोज नेहमीच्या सवयीने जे करता ते इतरांसाठी घृणास्पद असू शकते. क्रूरही असू शकते. माझा एक हुच्च्भ्रू हिंदू मित्र माझ्यासमोर बीफ खात होता. ते मला किळसवाणे वाटले. त्याच्याच समोर मी दात कोरत बसलो तर ते त्याला किळसवाणे वाटले. पण तो मला तसे वाटावे किंवा मी त्याला तसे वाटावे म्हणून बीफ खात नव्हता ना मी दात कोरत नव्हतो. तसे असते तर ते दोन्ही बाबतीत सारखेच क्रूर आणि घृणास्पद आहे.
उदा. तान्हे मूल हे निरागस आहे ही भावना सापेक्ष नाही. ती व्यक्तीनुसार, अनुभवानुसार किंवा विचारानुसार वेगळी असूच शकत नाही. किंवा पेशावरमधील १३२ शाळकरी मुलांना मारण्याचे कृत्य हे अत्यंत क्रूर असून ते करणारे नराधम आहेत हा विचार सापेक्ष असूच शकत नाही किंवा ही भावना व्यक्तीनुसार, अनुभवानुसार किंवा विचारानुसार वेगळी असूच शकत नाही.
तान्हे मुल हे कुणाचे आहे, मुलगा आहे कि मुलगी आहे, औरस आहे का अनौरस आहे यावरून लोक त्याची निरागसता ठरवतात गुरुजी. नाहीतर तान्ह्या मुलींना राजरोस दुधाच्या भांड्यात बुडवून किंवा उशीखाली दाबून मारले नसते लोकांनी. आतातर जन्मायच्या आधीच मारून टाकतात आणि ह्यास आपले काही तथाकथित उच्चशिक्षित आणि सन्माननीय डॉक्टर्स सामील असतात. तेंव्हा तुम्ही म्हणताय तसे "वेगळी असूच शकत नाही." जर टोकाचं विधान आहे. १२३ मुले ही शत्रूंची आहेत म्हणून मारल्या गेलीत, स्वतःची नाही मारली. किंवा शत्रूशिवाय इतर कुणाची नाही मारली. मी त्या हत्याकांडाचे अजिबात समर्थन करत नाही. फक्त तुम्हाला सापेक्ष हे सापेक्षच असते त्यात पर्याय नसतो हे सांगायचे आहे.

In reply to by संदीप डांगे

>>> म्हणजेच ते सापेक्ष असते. सापेक्षताचा अर्थ जरा विश्वकोषात बघून घ्या. तुम्हीच तो अर्थ बघा आणि पॅरिसमधील १६ निरपराध नागरिकांची हत्या किंवा पेशावरमधील १३२ शाळकरी मुलांची हत्या ही काहीजणांसाठी दु:खदायक तर काही जणांसाठी आनंददायी अशी सापेक्ष असू शकेल का ते सांगा? >>> तान्हे मुल हे कुणाचे आहे, मुलगा आहे कि मुलगी आहे, औरस आहे का अनौरस आहे यावरून लोक त्याची निरागसता ठरवतात गुरुजी. नाहीतर तान्ह्या मुलींना राजरोस दुधाच्या भांड्यात बुडवून किंवा उशीखाली दाबून मारले नसते लोकांनी. आतातर जन्मायच्या आधीच मारून टाकतात आणि ह्यास आपले काही तथाकथित उच्चशिक्षित आणि सन्माननीय डॉक्टर्स सामील असतात. तेंव्हा तुम्ही म्हणताय तसे "वेगळी असूच शकत नाही." जर टोकाचं विधान आहे. कोणत्याही तान्ह्या मुलांना कोणीही व कशाही प्रकारे मारले तरी ते घृणास्पदच आहे. ही भावना सापेक्ष असूच शकत नाही. परंतु तुमच्यासारखे मारणार्‍याचा धर्म बघून त्यावर आपली भूमिका ठरविणारे त्याला अपवाद आहेत. >>> १२३ मुले ही शत्रूंची आहेत म्हणून मारल्या गेलीत, स्वतःची नाही मारली. किंवा शत्रूशिवाय इतर कुणाची नाही मारली. किती क्रूर आणि विकृत मनोवृत्ती आहे ही. >>> मी त्या हत्याकांडाचे अजिबात समर्थन करत नाही. फक्त तुम्हाला सापेक्ष हे सापेक्षच असते त्यात पर्याय नसतो हे सांगायचे आहे. प्रत्येकवेळी भूमिका ही सापेक्ष असतेच असे नाही.

आज जगात काय चालले आहे, त्या बाबतीत लेखकाला काही ही माहित नाही. त्या मुळे प्रतिसाद देण्याचा प्रश्न येत नाही.

In reply to by विवेकपटाईत

नक्कीच आवडेल जगात काय चाललंय हे जाणून घ्यायला कारण आम्ही या जगात राहातच नाही. आमच्या ज्ञानात भर घाला, आम्ही भटकलो आहोत, योग्य मार्गावर आणा.

सुंदर लेख... ...

अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाने आक्रोश करणार्‍या इथल्या दुतोंड्यांची मते एम एफ हुसेनच्या धाग्यावर काय होती हेही जरा तपासता आले तर मनोरंजनात अजुन भर पडेल. कुण्वेतरी हुसेनच्या धाग्याची लिंक द्या रे

फ्रान्स ही व्यक्तीस्वातंत्र्याची काशी आहे (मक्का म्हणा हवे तर!). व्हॉल्टेअर फ्रेंच ह्या विचारवंताने फार पूर्वी असे विधान केले होते की "मला तुझे विचार आजिबात पटले नाहीत. पण तुला ते मांडायची मोकळीक मिळावी म्हणून मरेपर्यंत लढायला मी तयार आहे". ही संस्कृती जिथे निर्माण झाली आहे, जिथे रुजली आहे त्या फ्रान्समधे अशी सोवळ्याओवळ्याची भाषा कशी पटेल? कुणी एखादे व्यंगचित्र मुद्दाम चिडवायला काढले का विचार प्रबोधन करायला काढले हे कुणी आणि कसे ठरवायचे? फक्त अस्सल सोवळे (हलाल), कुणाच्याही भावना न दुखावणारेच व्यंगचित्र काढायचा फतवा काढला तर बहुधा अशा व्यंगचित्रामुळे कुणाला हसूही येणार नाही. दुसरा मुद्दा असा आहे की हा एक निसरडा उतार आहे. एकदा का बंदी घालण्याची भाषा सुरू झाली की त्याला नव्या वाटा फुटून मग अमका धर्म नाही, अमके पुस्तक नाही, अमकी व्यक्ती नाही अशा प्रकारे बंधने वाढत जातील आणि मग मुस्कटदाबी सुरू होईल. सगळ्या मुस्लिमबहुल देशात हे दिसते आहे.

१. सगळ्या व्यक्तींनी समाजसुधारणेत झोकून द्यावे वगैरे अपेक्षा गैर आहे. विनोदी लिखाण वा व्यंगचित्र अनेकदा थोडक्यात ते सांगून जाते जे अनेक भाषणांनी वा अन्य कार्यक्रमांनी होणार नाही. आर के लक्ष्मण वा पु.ल. देशपांडे ह्यांच्या चित्रा वा लेखावरून तसे वाटत नाही का? माझे पौष्टीक जीवन ह्यात पोस्टातील गैरसोयींची जी खिल्ली उडवली आहे ती वाचून पोस्टात काय सुधारणा कराव्यात हे सहज कळते. आर के ची आणीबाणी व नंतर जनता पक्षा आल्यावर जी व्यंगचित्रे आली तीही अशीच डोळ्यात अंजन घालणारी होती. २. पण मुळात जर फ्रेंच सरकारने नागरिकांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याला अबाधित ठेवण्याचे व्रत जपलेले असेल तर ते ह्या इथे भंग करावे अशी अपेक्षा का? व्यंगचित्रकाराने निव्वळ टर उडवायला चित्र काढले तर काय त्याला मारून टाकायचे? ही परंपरा पाश्चात्य विचारांची नाही. ४०० वर्षापूर्वी असेल. आधुनिक पाश्चात्य जगात नाही. संवैधानिक निषेध, मोर्चे, संबंधित मासिक जाळणे वगैरे प्रतिकात्मक निषेध करता येतो. आणि तसाच तो झाला पाहिजे. असली मासिके विकत घेऊ नका, वर्गणी भरू नका वगैरे प्रचार करता येतो. पण इस्लामी अतिरेक्यांनी मशीनगन जमवल्या आणि बेछूट्पणे गोळीबार करुन लोक मारले. असली सवंग आणि हिंसक इस्लामी भक्ती करायची तर योग्य त्या मुस्लिम देशात जाऊन रहावे. फ्रान्सने मुस्लिमांना बरे वाटावे म्हणून आपल्या मूलभूत तत्त्वांना तिलांजली द्यावी अशी अपेक्षा म्हणजे त्या अरबाची गोष्ट आठवते. आपल्या लाडक्या उंटाला थंडी वाजू नये म्हणून त्याने त्याचे डोके तंबूत आणले मग एक पाय, मग दुसरा आणि असे करता करता सगळा उंटच आत आला आणि अरबाला तंबूच्या बाहेर झोपावे लागले. भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी ही ही म्हण लागू पडेल. तर असे मागण्याचा इस्लामी लोकांना काय अधिकार आहे?

थोडा धागाकर्त्यासार्खाच व्ह्यू मांडणारा हा लेख . लेखातच आक्शेर्पाह कार्टून्स ची पण लिंक आहे ती पण नक्की बघावी । एकूणच सगळ्यांनी आवर्जून वाचावा असा लेख http://rbk137.blogspot.in/

काय अडाण** लेख आहे. एक मिपाकर म्हणून खरेच शरम आली. (संपादकांनो, तो शब्द जमल्यास आहे तसाच राहू द्या प्लीज़. प्रामाणिक प्रतिक्रिया आहे.)

एम एफ हुसेन आणि चार्ल्स हेब्डो एकाच तराजू मधले का ?

In reply to by कपिलमुनी

एम एफ हुसेन आणि चार्ल्स हेब्डो एकाच तराजू मधले का ?
नक्कीच! ज्यांना शार्ल्स हेब्डोला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे असे वाटते, त्यांना एम एफ हुसेनचेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य असावेच (मी ह्या गटातील). अर्थात ह्याचा व्यत्यास - ज्यांना शर्ल्स हेब्डोला मिळालेली शिक्षा योग्य वाटते, त्यांना एम एफ हुसेनला मिळालेली वागणूकदेखिल मान्य असावी (मी ह्या गटातील नाही) ज्यांना त्यातील एक योग्य आणि दुसरे अयोग्य वाटते ते दुतोंडी (मी ह्या गटात अर्थातच नाही!)

In reply to by सुनील

काही फरक लक्षात घ्यावेत १. एम एफ हुसेन हा चार्ली हेब्दोप्रमाणे सर्व धर्मांचा अपमान करत नाही. राधेचे व सीतेचे बीभत्स चित्र काढतो पण महंमदाचे, फातिमाचे वा आयेशाचे काढू धजला नाही. २. तो खुद्द अशा धर्माचा अनुयायी आहे ज्या धर्मात त्या धर्माच्या मानबिंदूंचा अपमान सहन केला जात नाही. तेव्हा अन्य धर्माला दुखवताना विचार करणे आवश्यक होते. ३. सगळ्यात महत्त्वाचे: भारतीय सरकारने अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर काय भूमिका घेतली होती? सॅटेनिक व्हर्सेस व निकाह सारखे सिनेमे ह्या प्रकरणात त्यांनी असे स्वच्छ दाखवून दिले की अभिव्यक्तीस्वातंत्र्यापेक्षा धर्मभावनांचे दुखवले न जाणे जास्त महत्त्वाचे आहे. तेव्हा ह्या पार्श्वभूमीवर हिंदूंनाही आपल्या भावना जास्त हळव्या कराव्याशा वाटल्या तर चूक कसे? सरकारने अशा गळचेपीचा पायंडा पाडला होता. आम्ही मुस्लिमांच्या भावना अगदी हळुवार जपणार. मात्र हिंदूंनी आपल्या धर्माची विटंबना, मानखंडना गुपचूप सहन करावी हा काय दुटप्पीपणा आहे? एम एफ हुसेन चालायला पाहिजे तर सलमान रश्दीही चाललाच पाहिजे.

In reply to by हुप्प्या

आम्ही मुस्लिमांच्या भावना अगदी हळुवार जपणार. मात्र हिंदूंनी आपल्या धर्माची विटंबना, मानखंडना गुपचूप सहन करावी हा काय दुटप्पीपणा आहे? एम एफ हुसेन चालायला पाहिजे तर सलमान रश्दीही चाललाच पाहिजे.
हा दुटप्पीपणा नाही. शिंपल कारण म्हणजे 'ते' मुसलमान आहेत व 'आम्ही' हिंदू. जर हिंदूही 'तशीच' प्रतिक्रिया देणार असतील तर हिंदूंनाही मुसलमानच म्हणावे ना! उगीच पुरोगामी परंपरा वगैरे पिरपीर नको.

In reply to by आजानुकर्ण

१. सगळे भारतीय आहेत. एकाच संविधानाला मानणारे आहेत. तेव्हा हे आणि ते चा भेदभाव नको. निदान सरकारकडून तरी नकोच नको. २. एकदा का एका गटासाठी एक पायंडा पडला की दुसर्‍या गटालाही तोच न्याय हवा. नाहीतर कधी ना कधी ह्या भेदभावाविरुद्ध उद्रेक होणारच. अमका गट हळवा आणि तमका समजूतदार अशी आगाऊ गृहिते धरून न्याय देणे हे लहान मुलाकरता योग्य ठरेल फारतर पण देशाकरता घातक आणि भेदभावकारक आहे.

In reply to by हुप्प्या

रश्दीच्या पुस्तकावरील बंदीला विरोध करण्याऐवजी त्या बंदीचा न्याय हुसेनच्या चित्रांना लावावा अशी अपेक्षा आहे का?

In reply to by अनुप ढेरे

सरकारने रश्दीवर बंदी घातली ती काय विचाराने? अभिव्यक्तीपेक्षा धार्मिक भावना महत्त्वाचा. जर सरकारला तसे करणे बरोबर वाटत होते तर तसाच न्याय हुसेनच्या चित्रांनाही हवा. जे काही करायचे ते धोरण सर्वांना समान असावे. कुणाचे उपद्रवमूल्य किती, कुणाची मतपेटी किती मोठी यावर अवलंबून नसावे.

In reply to by हुप्प्या

एम एफ हुसेन चालायला पाहिजे तर सलमान रश्दीही चाललाच पाहिजे.
नक्कीच! ज्यांना एक चालतो पण दुसरा नाही ते दुतोंडीच!

In reply to by सुनील

हेच बोल्तो...

In reply to by सुनील

१. मला कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणारे लेखन अथवा अभिव्यक्तीस्वातंत्र्य मान्य नाही. परंतु एखादा जर एखाद्या धर्मातील अवडंबरावर किंवा दांभिकपणावर हल्ला करत असेल तर त्या संदर्भातील अभिव्यक्तीस्वातंत्र्य मला मान्य आहे. २. अयोग्य पद्धतीच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मी नक्कीच निषेध करेन. पण त्यासाठी त्या माणसाचा जीव घेणार नाही. असे कोणी केलेले मला मान्य नाही. ३. एखादा माणूस जर सिलेक्टिवली एकाच धर्माची विटंबना करत असेल तर मला ते मान्य नाही. असे करणार्‍याने त्याच्या पार्श्वभागात दम असेल तर सगळ्याच धर्मांची विटंबना करुन दाखवावी (हे ही मला मान्य नसेल. पण किमान त्या माणसाच्या पार्श्वभागात दम आहे, तो दांभिक नाही, प्रामाणिक आहे हे तरी मी मान्य करु शकेन (परिस्थितीवर अवलंबुन) ) चार्ली हेब्दो (किंवा शार्ली हेब्दो किंवा जे काही असेल ते) आणी हुसेन यांची तुलना मी करु शकत नाही कारण: १. चार्ली हेब्दो सर्व धर्मातल्या दांभिकतेविरुद्ध होते / आहे असे दिसते. पण हुसैनला मात्र पद्धतशीरपणे हिंदु देवतांना नागडे उघडे दाखवण्यात रस होता असे दिसते. मुस्लिम व्यक्तिरेखा मात्र पुर्ण कपड्यातल्या असतात. २. एखादी व्यक्ती नग्नावस्थेत दाखवणे हे त्या व्यक्तीच्या लाचारीला आणी घ्रुणास्पद अवस्थेला अधोरेखित करण्याचे प्रतीक आहे असे हुसैनला दाखवायचे होते असे दिसते. त्यामुळेच सरस्वतीचे नग्न चित्र अमान्य आहे. चार्ली हेब्दोचा उद्देश मात्र अतिरेकी धर्मांधतेला आणी त्यातील दांभिकतेला उघडे पाडणे हा आहे / होता. एखाद्या कृती मागचा उद्देश नेहमीच महत्वाचा असतो. ३. हुसैनला कोणीही गो़ळ्या घातल्या नाहित. चार्ली हेब्दोला घातल्या. ४. चार्ली हेब्दो न्यायिक प्रक्रियेतुन सहीसलामत सुटला तर हुसैन मात्र कायदेशीर कारवाईला घाबरुन ढुंगणाला पाय लावुन पळुन गेला. चार्ली हेब्दो वरील हल्ला हा भ्याड, हिंसक आणी प्राणघातक हल्ला होता. ती एक थंडपणे आणी कृरपणे केलेली कृती होती. हुसैनचा विरोध लोकांनी कायदेशीर आणी सनदशीर मार्गांनी केला. त्याला तोंड देण्यापेक्षा पळुन जाणे हुसैनला जास्त बरे वाटले.

In reply to by मृत्युन्जय

@एखादी व्यक्ती नग्नावस्थेत दाखवणे हे त्या व्यक्तीच्या लाचारीचा अत्यंत बालिश विचार आपल्याकडे भारतात जे जे स्कूल ऑफ आर्ट सारख्या कॉलेज मध्ये नग्न मोडेल समोर ठेवून चित्रे काढतात , नग्नता ही पाहण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते मात्र भारतात लोक देवांच्या बाबतीत जास्त संवेदनशील असून देवांना मजेचा किंवा इतरत्र केलेला वापर त्यांना खटकतो हे आपले सांस्कृतिक वैशिष्ट्ये आहे. परदेशात त्यांच्या राष्ट्र ध्वजाच्या वीतभर चिंध्या अंगावर अडकवून फिरतात म्हणून भारतात असे कुणी भारतीय राष्ट्र ध्वजा बाबत करू शकत नाहीत तो कायद्याने गुन्हा ठरतो , परदेशी असे कोणी केले तर आपण नक्कीच चिडू , दांभिकतेचा प्रहार करायचा असेल तर तो करतांना किमान तारतम्य बाळगणे आवश्यक आहे त्यांच्या धर्मात पैगंबर चे चित्र काढत नाही हे माहिती असून मुद्दामहून ते काढणे म्हणजे खाजवून खरुज काढण्यासारखं आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

अत्यंत बालिश विचार बालिश असतील तरी माझे नाहित. चित्र काढणार्‍याचे असे विचार असावेत असे म्हणणे आहे. आपल्याकडे भारतात जे जे स्कूल ऑफ आर्ट सारख्या कॉलेज मध्ये नग्न मोडेल समोर ठेवून चित्रे काढतात , जगभरात सगळीकडेच नग्न मॉडेल्स समोर ठेवुन चित्रे काढतात. इस्लामिक देशात नसतील काढत बहुधा, नग्नता ही पाहण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते मात्र भारतात लोक देवांच्या बाबतीत जास्त संवेदनशील असून देवांना मजेचा किंवा इतरत्र केलेला वापर त्यांना खटकतो हे आपले सांस्कृतिक वैशिष्ट्ये आहे. आपणा एका भारतीय चित्रकाराने काढलेल्या चित्रांबद्दल बोलतो आहोत की जो केवळ हिंदु देवतांना नग्नावस्थेत दाखवतो. मुस्लिम मात्र पुर्ण कपड्यात असतो. परदेशात त्यांच्या राष्ट्र ध्वजाच्या वीतभर चिंध्या अंगावर अडकवून फिरतात म्हणून भारतात असे कुणी भारतीय राष्ट्र ध्वजा बाबत करू शकत नाहीत तो कायद्याने गुन्हा ठरतो , परदेशी असे कोणी केले तर आपण नक्कीच चिडू , दांभिकतेचा प्रहार करायचा असेल तर तो करतांना किमान तारतम्य बाळगणे आवश्यक आहे त्यांच्या धर्मात पैगंबर चे चित्र काढत नाही हे माहिती असून मुद्दामहून ते काढणे म्हणजे खाजवून खरुज काढण्यासारखं आहे. त्यांच्या धर्मात फक्त इतर धर्मीय देवतांचे नग्नावस्थेतले फोटो दाखवतात हा दांभिकपणाचा कळस आहे आणी हे न कळणे हा पण एक दांभिकपणाच आहे. बादवे हिंदु धर्मातही सरस्वतीचे नग्न चित्र काढत नाहित हा. माहिती नसेल तर सांगतो बाकी काही नाही.

In reply to by मृत्युन्जय

लज्जागौरी सारखे दैवते आपल्या हिंदु धर्मात पुजली जात होती . नग्नतेचा वावडे प्राचीन हिंदु संस्कृतीला मुळीच नव्हते .

लेख आवडला. काही मते पटली नाहीत. मात्र मुद्दाम केलेला खोडसाळपणा व समाजसुधारणेच्या दृष्टीने घेतलेली रिस्क यात फरक आहेच. हत्याकांडाचा तीव्र निषेध.

आणि धार्मिक वेड यात मूलभूत फरक असतो तो तारतम्याचा. धार्मिक आक्रमण हे प्रत्येक वेळी शस्त्रांच्याच आधारावर होत नाही तर वैचारिक आधारावर देखील होत असते. केवळ शस्त्र हाती घेऊन इतर धर्मियांना मारत सुटणारी माणसेच धर्मवेडी नसतात. इतर धर्मियांवर वैचारिक आक्रमण करून त्यांच्या विचारांना आणि संस्कृतीला संपवणारी माणसेही तेवढीच धर्मवेडी असतात. मानवी इतिहासात जेत्यांनी जितांचे धार्मिक साहित्य आणि परंपरा यांना समूळ नष्ट करणे हे कार्य अविरतपणे चालू ठेवलेले दिसते. कधी उघड आक्रमण करून तर कधी बुद्धिभेद करून तर कधी राजकीय सामाजिक पिळवणूक करून हे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न झालेला आढळतो. धर्मवेडाची खरी शक्ती ही शस्त्रांमध्ये नव्हे तर धार्मिक आक्रमणाचे वैचारिक समर्थन करण्यात दडलेली आहे. भारतभूमीवर आजवर जे काही धर्मवेडाचे आक्रमण झाले त्या प्रत्येक आक्रमणाला पिढ्यानपिढ्या भारतातील महनीय व्यक्तिमत्वांनी आणि महावीरांनी प्रती धर्मवेडाने नव्हे तर संयमानेच प्रत्युत्तर दिलेले आहे. म्हणूनच आज देखील भारत स्वत:चे भारतीयत्व टिकवून आहे.

​जेंव्हा हिंसा होते आणि त्यात कायदा हातात घेतला जातो, तेंव्हा त्याचा निषेध करावा का त्याला बळी पडलेलेच कसे जबाबदार होते असे म्हणत हिंसेचे समर्थन करावे? दुर्दैवाने तुषार गांधी आणि इतर (मुस्लीम आणि गैरमुस्लीम) अनेक जण त्या हिंसेस केवळ जबाबदार बळी पडलेल्या व्यक्ती कशा होत्या हेच दाखवत बसतात.... अर्थात यालाच स्युडोसेक्युलॅरीजम असे म्हणतात! खालील चित्र पहाण्यासारखे आहे: Tushar Gandhi मी स्वतः कुठल्याही धार्मिक/अधार्मिक समुहाला अपमानास्पद वाटेल असे वागण्याच्या अथवा वागणार्‍यांच्या तत्व म्हणून विरोधात आहे. पण त्याच बरोबर एखादा समुह जर स्वतःच्या समुहाचे कायदे वरचढ ठरवत, राष्ट्राचे कायदेच मानत नसला तर त्याला त्या संदर्भात विरोध करण्यात काही हरकत नाही. आता हा विरोध हा विनोद रुपी शस्त्राने कोणी केला तरी त्यत काही हरकत नसावी, हे केवळ धार्मिक आणि ते देखील मुस्लीम समाजापुरतेच मर्यादीत नाही. नक्षलवादी देखील स्वतःचे कायदे मोठे समजतात आणि तेच कम्युनिस्ट चळवळ्यांच्या बाबतीत थोडक्यात अधार्मिकांच्या बाबतीतही लागू होऊ शकते. ​त्यातल्या एका व्यंगचित्रकाराचे मत असे होते "माझ्यासाठी पैगंबर पवित्र वैगेरे काही नाही, मी काही कुराणाचा कायदा मानत नाही, मी फ्रेंच कायदा मानतो." ...वरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गळे काढणार. कायदा हा राष्ट्राचा मानावा की धर्माचा? या बाबत आपले काय म्हणणे आहे? फ्रान्स हा अतिशय लिबरल देश आहे. पण त्या देशात रहात असताना, आम्हाला सार्वजनिक तरणतलाव हे अथवा त्यांच्या वेळा या स्त्री-पुरुषांसाठी वेगळ्या असाव्यात असा हट्ट देखील चालू आहे. मग काय येथे धर्माचे कायदे मान्य करायचे? अजून एक महत्वाची गोष्टः कॅथलीक चर्चच्या विरुद्ध देखील शार्ल हेब्दोने व्यंगचित्रे काढली होती. चर्चने काय करावे. गेल्या दोन वर्षात त्यासंदर्भात या वृत्तसंस्थेविरुद्ध १४ खटले दाखल केले. ते असे नाही म्हणत बसले की बायबलचे कायदे हे फ्रान्सच्या कायद्यापेक्षा महत्वाचे म्हणून! या संदर्भात शार्ल एब्दो चे विनोद हे केवळ इस्लामपुरतेच मर्यादीत नव्हते. इतरही धर्मांची त्यांनी थट्टा केली आहेच... ते विनोद चांगले का वाईट हा मुद्दा व्यक्तीगत आहे. पण तो हक्क त्यांना त्यांच्या राज्यघटनेने नक्कीच दिला आहे. "चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने केलेल्या खोडसाळपणाबद्दल आज कुणीही बोलत नाही ...त्याच वेळेस गोडसेच कसे बरोबर, गांधी कसे मारण्याच्याच लायकीचे होते हे गेली साठ वर्षे आपण चघळत आहोत. दोन्ही मधे केवळ मारेकरी आणि कायदा हातात घाऊन निशस्त्र माणसांचा खून केला याच्यावरच चर्चा आणि निषेध होणे जरूरीचे आहे. शार्ल हेब्दोचे मारेकरी अथवा गोडसे यांना का करावेसे वाटले हा मुद्दा चघळणे योग्य नाही. जे करतात ते चूकच आहेत. मात्र त्याच बरोबर कोणी गांधीजींच्या (हत्येचे समर्थन न करता) राजकीय कारकिर्दीतील कुठल्याही निर्णय/वागण्यावर टिका केली म्हणजे ते नथुरामवादी म्हणणे हे देखील तितकेच चूक आहे. कारण त्यांना देखील भाषण स्वातंत्र्य नाकारले जाता कामा नयेच. दुसरी गोष्ट अशी कि जाणून बुजून केल्या जाणाऱ्या अपमानाचा बदला घेण्याची त्यांची ती रीत असेल, चांगली आहे कि वाईट आहे ह्यावर "आपण" कितीही काथ्याकुट केला तरी ते लोक बदलणार नाही. येथे एक लक्षात ठेवावे की त्यांनी ज्यूंच्या किराणा मालाच्या दुकानावर पण हल्ला केला आणि चार ज्यूंना मारले. आता देखील ज्यूंच्या शाळांना धमकी दिली गेली आहे. ज्यूंचे धर्मस्थळ त्यांना दुसर्‍या महायुद्धानंतर प्रथमच बंद ठेवावे लागले होते. आता त्यांचा काय दोष होता? हुसैनला आपण हिंदुनी का भारताबाहेर घालवले मग? पिके विरुद्ध का आंदोलन चालू आहे? हुसैन आणि पिके संदर्भातील विरोध मला पटत नाहीत. हुसैन यांची काही चित्रे मला कदाचीत (विरोध म्हणून नाही पण) आवडणार देखील नाहीत... पण, म्हणून त्यांच्यावर जर बंदी घातली असती तर ती देखील पटणार नाही. पण त्यासंदर्भात कुणाला न्यायमार्गाने विरोध करायचा असला आणि तसा केला असला तर तो मान्य का नसावा? हुसैन यांना देश सोडून जायला कोणी सांगितले होते? त्यांच्या विरुद्ध केवळ न्यायालयाचे दरवाजेचे ठोठावले होते ना? तो विरोध करणार्‍यांचा (मग तो विरोध कितीही चुकीचा असला तरी) हक्क नाही का? पण तेथे मात्र लगेच "हिंदूंनी घालवले" बोलणे किती योग्य आहे?

येथे एक लक्षात ठेवावे की त्यांनी ज्यूंच्या किराणा मालाच्या दुकानावर पण हल्ला केला आणि चार ज्यूंना मारले. आता देखील ज्यूंच्या शाळांना धमकी दिली गेली आहे. ज्यूंचे धर्मस्थळ त्यांना दुसर्‍या महायुद्धानंतर प्रथमच बंद ठेवावे लागले होते. आता त्यांचा काय दोष होता?
दोष एवढाच की या अतिरेकी धर्माविरुद्ध ते पुरून उरले आहेत.

उद्याच्या अंकात पुन्हा एकदा व्यंगचित्रे येणार. अतिरेक्यांच्या धमक्यांना व रक्तपाताला आपण अजिबात घाबरत नाही हेच चार्ली हेब्दोला दाखवून द्यायचे आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/international/charlie-hebdo-retu…

तूम्ही हत्याकांडाचे समर्थन करण्यापेक्षा चित्रांचा धिक्कार केला असता तर ते जास्त माणूसकीला धरून वागलात असे वाटले असते.

In reply to by कंस

हत्याकांडाचे समर्थन केल्याशिवाय चित्रांमधली दाहकता लोक समजून घेत नाहीत. इथे बरेच प्रतिसाद अजूनही त्याच धाटणीचे आहेत कि काढले एखादे चित्र तर त्यात काय एवढे मनावर घ्यायचे. मूळ पार्श्वभूमी कुणाला समजूनच घ्यायची नसेल तर नाइलाज आहे. निनाद ह्यांनी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे पैगंबर यांच्यासारखेच शिवाजी महाराजांचे चित्र संभाजी ब्रिगेडला चिडवून दाखवण्यासाठी काढले तर काय गहजब होईल. प्रत्येक समाजाची, व्यक्तीची सहनशीलता व विचारक्षमता आपल्यासारखी असावी हा हट्ट अनाठायी आहे. बऱ्याच लोकांनी असे म्हटले कि चारली हेब्डो ने इतर धर्मियांना पण लक्ष्य केले पण इतर धर्मीय हे मुसलमानाइतके कट्टर नाहीत हेहि सत्य आहे. विशिष्ट समाजाचा अपमान आपल्याच पद्दतीने करावा आणि त्याचा निषेधही आपल्याच पद्दतीने व्हावा हा दुटप्पीपणा आहे. पैगंबराचे ते चित्र किंवा उल्लेख हे आपण मुस्लिम नसल्याने आपणास त्यात काही आक्षेपार्ह न वाटणे साहजिक आहे. हुसैन ने काढलेली चित्रे आणि चारली ची चित्रे यात तुलना होऊ शकत नाही असेही येथे कुणीतरी म्हटले आहे, हाच तो दांभिक दुटप्पीपणा आहे. कोण कोणास मारतंय यावर आपली भूमिका लगोलग बदलवणारे ढोंगी जगात आहेत.

In reply to by संदीप डांगे

>>> हत्याकांडाचे समर्थन केल्याशिवाय चित्रांमधली दाहकता लोक समजून घेत नाहीत. या व्यंगचित्रात नक्की काय दाहक व अपमानास्पद होते ते सांगता का जरा. दरवर्षी अनंतचतुर्दशीच्या मिरवणुकीनंतर अनेक वर्तमानपत्रात गणपतीवर व्यंगचित्रे येतात. त्यात गणपती गोंगाटामुळे, मिरवणुकीतील हिडीस प्रकारामुळे, गणेशोत्सवातील व्यापारीकरणामुळे वैतागलेला दाखविलेला असतो. अशा व्यंगचित्रात गणपतीचा अपमान होतो का? किंबहुना अशा व्यंगचित्राबद्दल हिंदू समाजातून कोणतीही प्रतिक्रिया येत नाही. जर अशा व्यंगचित्रात गणपती स्वतः काहीतरी घाणेरडे कृत्य करताना दाखविला असता तर ते नक्कीच आक्षेपार्ह आहे. परंतु तसे नसेल तर त्याविरूद्ध इतका गहजब करण्याचे कारण नाही. तरीसुद्धा एखाद्याला आक्षेप असेल तर कायदेशीर मार्गाने कारवाईचा आग्रह धरता येतो. इथे सर्व मार्ग टाळून थेट १६ लोकांना मारून टाकण्यात आले आहे. चार्ली हेब्दोच्या व्यंगचित्रात नक्की काय अपमानास्पद होते की ज्यामुळे थेट १५-१६ निरपराध लोकांना गोळ्या घातल्या गेल्या? बादवे, व्यंगचित्र कितीही दाहक असले तरी दिसेल त्याला थेट मारुन टाकणे हे रानटीपणाचे व असंस्कृतपणाचे लक्षण आहे व अशा गोष्टींचे समर्थन करणारे तितकेच रानटी आणि असंस्कृत आहेत. >>> इथे बरेच प्रतिसाद अजूनही त्याच धाटणीचे आहेत कि काढले एखादे चित्र तर त्यात काय एवढे मनावर घ्यायचे. बरोबर आहे. अनेक धर्मातील अनेकांची व्यंगचित्रे काढली जातात. जोपर्यंत व्यंगचित्रातून सामाजिक परिस्थितीवर उपहासात्म्क भाष्य केलेले असते तोपर्यंत त्यात काहीही आक्षेपार्ह नाही. >>> मूळ पार्श्वभूमी कुणाला समजूनच घ्यायची नसेल तर नाइलाज आहे. सांगा ना मूळ पार्श्वभूमी. >>> निनाद ह्यांनी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे पैगंबर यांच्यासारखेच शिवाजी महाराजांचे चित्र संभाजी ब्रिगेडला चिडवून दाखवण्यासाठी काढले तर काय गहजब होईल. पूर्वी शिवाजी महाराज सुद्धा अनेक व्यंगचित्रातून सामाजिक परिस्थितीबद्दल भाष्य व चिंता करताना दाखविले आहेत. त्याबद्दल कोणीही गहजब केलेला नाही. जेम्स लेनने केला तसा अत्यंत निराधार व घाणेरडा आरोप जर कोणी केला किंवा व्यंगचित्रातून दाखविला तर ते नक्कीच आक्षेपार्ह आहे. मागील आठवड्यातील चार्ली हेब्दोच्या व्यंगचित्रात काहीही आक्षेपार्ह नव्हते. परंतु आपल्या धर्मातील कोणाचेही व कोणत्याही स्वरूपातील चित्र चितारायचे नाही या शरीयतसारख्या कर्मठ मानसिकतेतून मुस्लीम समाज टोकाला जातो. मी पूर्वी ८ वी च्या इतिहासाच्या पुस्तकाचे उदाहरण दिले आहे. त्यात गुरू नानक, गौतम बुद्ध, महंमद पैगंबर इ. धर्मसंस्थापक हे कोणत्याही आक्षेपार्ह स्थितीत दाखविले नसताना सुद्धा मुस्लिमांनी प्रचंड मोर्चे काढून शेवटी ते पुस्तक रद्द करायला लावले होते. >>> प्रत्येक समाजाची, व्यक्तीची सहनशीलता व विचारक्षमता आपल्यासारखी असावी हा हट्ट अनाठायी आहे. तशी ती नसतेच आणि म्हणूनच दोन समाजात, संस्कृतीत, धर्मात, विचारसरणीत थेट संघर्ष होऊन नये यासाठी राज्यघटना, कायदे व न्यायालय असते. >>> बऱ्याच लोकांनी असे म्हटले कि चारली हेब्डो ने इतर धर्मियांना पण लक्ष्य केले पण इतर धर्मीय हे मुसलमानाइतके कट्टर नाहीत हेहि सत्य आहे. विशिष्ट समाजाचा अपमान आपल्याच पद्दतीने करावा आणि त्याचा निषेधही आपल्याच पद्दतीने व्हावा हा दुटप्पीपणा आहे. ज्या क्रूर पद्धतीने मुस्लिम समाजाने निषेध केला आहे ती पद्धत कायदेशीर नाही आणि म्हणूनच अशा हत्याकांडाचा निषेध करणे यात कोणताही दुटप्पीपणा नाही. >>> पैगंबराचे ते चित्र किंवा उल्लेख हे आपण मुस्लिम नसल्याने आपणास त्यात काही आक्षेपार्ह न वाटणे साहजिक आहे. हुसैन ने काढलेली चित्रे आणि चारली ची चित्रे यात तुलना होऊ शकत नाही असेही येथे कुणीतरी म्हटले आहे, हाच तो दांभिक दुटप्पीपणा आहे. हुसेनची चित्रे आणि चार्लीची चित्रे यात तुलना होऊ शकत नाही हे बरोबर आहे. चार्लीने व्यंगचित्रे छापली होती. त्यात आक्षेपार्ह काहीही नव्हते. हुसेनने फक्त हिंदू देवदेवतांची नग्न चित्रे व ते अत्यंत आक्षेपार्ह अवस्थेत बसलेल्या स्थितीत काढली होती. ती चित्रे अत्यंत बीभत्स असून त्यात अगदी उघडउघड हिंदू देवदेवतांचा अपमान केला होता. त्या चित्रात कलाकाराचे अभिव्यती स्वातंत्र्य, अमूर्ततेचा कल्पक आविष्कार असे काहीही नव्हते. जगातले इतर सर्व धर्म सोडून फक्त हिंदू धर्मावरच त्याने आघात केला होता. परंतु तरीसुद्धा त्या चित्रांविरूद्ध त्याला गोळ्या न घालता निषेधकर्त्यांनी कायद्याचा मार्ग चोखाळला होता. आपल्याला शिक्षा होणार या भीतिने दाऊद इब्राहिमसारखा हुसेनदेखील भारतातून फरारी झाला होता. >>> कोण कोणास मारतंय यावर आपली भूमिका लगोलग बदलवणारे ढोंगी जगात आहेत. त्याला कोण काय करणार? भारतात सुद्धा काही जण मरणार्‍याचा धर्म बघतात तर काही जण मारणार्‍याचा. जग हे असेच असणार. आपल्या धर्मावर टीका होऊ नये असे वाटत असेल तर मुस्लिमांनी इतर धर्मांचा आदर केला पाहिजे. मुस्लिम कलाकारांना इतर कोणत्याही धर्माच्या देवदेवतांची चित्रे काढण्याचे स्वातंत्र्य पाहिजे पण आपल्या धर्मातील कोणाचेही चित्र काढायचे नाही. मुस्लिम जगातल्या कोणत्याही देशात जाऊन तिथल्या स्थानिक मशिदीत जाऊन नमाज पढू शकतात, आपले सण साजरे करू शकतात, पण सौदी अरेबिया/मालदीव व इतर काही देशात कोणत्याही इतर धर्मियांना त्यांच्या धर्माचे पालन करण्यावर बंदी. मुस्लिम जगाच्या पाठीवर कोठेही स्वतःच्या पद्धतीने उपासना करणार पण इतर धर्मियांच्या उपासना पद्धतीला विरोध करून त्यांची देवळे तोडणे, मूर्ती नष्ट करणे असे संतापजनक प्रकार करणार. मुस्लीम स्वत:च्या देशात सर्व धर्माच्या नागरिकांवर स्वतःचे कायदे लागू करणार, पण भारतासारख्या देशात यांना स्वतःचे वेगळे कायदे हवेत. मुस्लिमांचे अशा तर्‍हेचे दुटप्पी वर्तन जोपर्यंत सुरू राहील तोपर्यंत इतर धर्मीय या धर्माला झोडपत राहतील. बादवे, काही दिवसांपूर्वीच सौदी अरेबियातील एका ब्लॉगरला इस्लामची नालस्ती केल्याबद्दल १५ वर्षे तुरूंगवास व १००० चाबकांच्या फटक्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. २-३ दिवसांपूर्वीच त्यातले पहिले ५० फटके त्याला मारण्यात आले. तुमच्या दृष्टीने ही शिक्षा सुद्धा समर्थनीय असणार.

In reply to by श्रीगुरुजी

मागील आठवड्यातील चार्ली हेब्दोच्या व्यंगचित्रात काहीही आक्षेपार्ह नव्हते.
ह्याबदल त्यांचा द्रूष्टीकोन वेगळा होता . एकाद्या धर्मामध्ये इश्वराला अमूर्त मानायची प्रथा असेल आणि काही लोकांनी त्याच मूर्ती किंवा चित्र काढले तर त्यांच्या दृष्टीने ते महापाप आहे. भले तुमच्या दृष्टीने नसेल

In reply to by कपिलमुनी

त्यांच्या धर्माच्या दृष्टीने तुम्ही इतर धर्माचं असणे हेच मुळी महापाप आहे. त्याचं काय? ====संपादित)======

In reply to by काळा पहाड

पण तुमच्या म्हणण्यात थोडे तथ्य आहे.
त्यांच्या धर्माच्या दृष्टीने तुम्ही इतर धर्माचं असणे हेच मुळी महापाप आहे. त्याचं काय?
इतर धर्म महापाप असण्याबद्दल त्यांचे पैगंबर सांगून गेले तो काळ अतिशय वेगळा होता, त्या काळात प्रचंड रानटी आणि क्रूर असा अरब समुदाय होता. त्यांच्या चालीरीती, संकल्पना न मानता अल्लाह ने सांगितलेल्या म्हणजेच पैगंबराने सांगितलेल्या मार्गावरून चालणे अपेक्षित होते. काफिर म्हणजे त्या काळात पैगंबरांचा आदेश न मानणारे अरब. पण हे सर्व "त्या विशिष्ट" काळात. त्या काळात जगात इतर काही धर्म अस्तित्वात आहेत किंवा काही याची काही एक अडाण्या अरबांना कल्पना नव्हती. तेंव्हा १५०० वर्षा आधीचे संदर्भ उकरून काढून मुलतत्ववाद्यांनी आधीच कर्मठ असेलेल्या मुस्लिमांना अजून भडकावले आहे. जगात इतर अनेक मुस्लिम धर्मगुरू आणि प्रसारकर्ते इस्लामच्या योग्य आणि काळानुरूप धर्मपालनाचे तत्व प्रसारित करत आहेत. पण त्यांच्या ढीगभर प्रयत्नांपुढे हे अतिरेकी हल्ले अधिक उठून दिसत आहेत. मला बरेच मुस्लिम मित्र होते आणि अजूनही आहेत, त्यात शिया सुन्नी दोन्ही आहेत, बऱ्याच मुस्लिमांसोबत व्यवसाय पण केला आहे. माझे नाशिकचे ऑफिस खुद्द गाढ मुस्लिम वस्ती असलेल्या भागात होते. ठाण्यात असताना सुद्धा काही काळ मुस्लिम वस्तीमध्ये रहिवास होता. या सर्व अनुभवामध्ये कुणी मला काफिर म्हणून वागणूक दिली नाही कि माझा धर्म बदलण्याचा सूचक प्रयत्नही केला नाही किंवा कुठल्याही प्रकारे आपल्या धर्माचा कट्टरपणा, रानटीपणा दाखवला नाही. माझे मूळ शहर अकोला येथे हिंदू मुस्लिम ऐक्य हे १९९२-९३ पर्यंत अबाधित होते. त्यानंतर सगळे बदलत गेले. आधी हिंदू मुस्लिम नंतर बौद्ध मुस्लिम अशा दंगली होऊन शहराचे अक्षरश: दोन तुकडे पडले. १९९२ आधी ज्या गल्ली बोळातून फिरताना अजिबात भीती वाटत नव्हती तिकडे फिरकण्याच्या विचाराने सुद्धा भीती वाटते. काही अघटीत होईल असे नाही पण एक मनावर भीती बसली आहे सगळ्यांच्या. आजचा मुस्लिम आतंकवाद उफाळण्यामागे फक्त मुस्लिमांचा कट्टरपण कारणीभूत आहे असा विचार करणाऱ्यांनी अमेरिका-रशिया शीतयुद्ध व त्याभोवतीचा इतिहास तपासून पाहावा. मला कायम एक आश्चर्य वाटत आले आहे कि सातशे वर्षे भारतावर अनिर्बंध सत्ता गाजवून सुद्धा इतक्या कट्टर मुस्लिमांना भारताचे संपूर्ण इस्लामीकरण का जमले नाही?