फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल
फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल सगळीकडे गदारोळ सुरु आहे. हजारो लोक रस्त्यांवर आले आहेत "अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला", "आम्ही सगळे चार्ल्स हेब्डो", वैगेरे वैगेरे. आणि त्यातल्याच काही अतिउत्साही महाभागांनी परिसरातल्या मस्जीदी उध्वस्त करून आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बजावला. मृतांबद्दल सहानुभूती असणे योग्यच आहे पण ती किती योग्य ते जरा तपासून बघायला हवी. मी स्वतः एक कलाकार असून कट्टरवाद्यांच्या भूमिकेतून मी ह्या हल्ल्याचे समर्थन केले कारण कुणीतरी हा वेगळा दृष्टीकोन मांडणे आवश्यक आहे, जो काही धाडसी वार्तापत्रे मांडत आहेतच. जेणे करून ह्या हत्याकांडाच्या इतर बाबींवर प्रकाश पडावा व मुस्लिमांची जी एकच एक प्रतिमा रंगवली जात आहे तो प्रयत्न हाणून पाडवा. पण काही मित्रांना माझा हा पवित्रा खटकला आणि त्याचे चेपू वर पडसाद उमटले. तिथे उदधृत काही विचार माझ्यापेक्षा जास्त चांगला,व्यवस्थित आणि माहितीपूर्ण विचार करणाऱ्या जाणकार मिपाकारांसमोर ठेवत आहे. चर्चा अपेक्षित आहे.
"चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने केलेल्या खोडसाळपणाबद्दल आज कुणीही बोलत नाही कारण कुणाची हत्या होणे म्हणजेच फार भयंकर एवढेच सामान्यपणे लोक समजतात. ज्याची हत्या झाली तो भारी निष्पाप आणि मारणारा क्रूर अविचारी नराधम. त्याच वेळेस गोडसेच कसे बरोबर, गांधी कसे मारण्याच्याच लायकीचे होते हे गेली साठ वर्षे आपण चघळत आहोत. म्हणजेच काय तर मारणारा आणि मरणारा ह्यापैकी जो आपला त्याचीच बाजू बरोबर.
ह्यासंदर्भात आपण दोन अतिशय वेगळ्या गोष्टी लक्ष्यात घेतल्या पाहिजेत,
एक म्हणजे, "चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने फार खवचट आणि असंस्कृत अश्या व्यंगचित्रातून पैगंबरांचा अपमान केला. त्या साप्ताहिकाचा असे करण्यामागचा हेतू जाणून बुजून भावना दुखावून उचकवणे (provocative) असाच होता. माझा आक्षेप हा हत्याकांडाच्या पूर्वी झालेल्या बेजबाबदारपणाबद्दल आहे. लोक आज म्हणत आहेत कि "साधे एक चित्र काढले तर थेट गोळ्या घालायची काय गरज होती?" ते चित्र इतरांसाठी साधे असेल मुस्लिमांसाठी नाही हा एक मुद्दा,
त्यातल्या एका व्यंगचित्रकाराचे मत असे होते "माझ्यासाठी पैगंबर पवित्र वैगेरे काही नाही, मी काही कुराणाचा कायदा मानत नाही, मी फ्रेंच कायदा मानतो." म्हणजेच इतरांच्या श्रद्धास्थानाला घाणेरड्या पद्धतीने चितारणार, त्यांचा अपमान करणार, वरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गळे काढणार. म्हणजे त्याला ज्या पद्दतीने इतरांच्या आत्मसन्मानाची हिंसा करता येणार ते तो करणार, त्याच्यावर इतरांनी त्यांच्या पद्दतीने प्रतिकार केला तर चूक. हा काय तर्क आहे? शब्द आणि चित्रांचे वार जास्त घातक असतात. बंदुकीपेक्षा लेखणी ताकतवान ते उगाच नाही म्हणत. एक गोळी एका वेळेस एकाला मारते. एकच चित्र लाखोंना लाखो वेळा आणि आयुष्यभर मारते. त्यामुळे लेखणी चालवताना हजारदा विचार करावा लागतो.
दुसरी गोष्ट अशी कि जाणून बुजून केल्या जाणाऱ्या अपमानाचा बदला घेण्याची त्यांची ती रीत असेल, चांगली आहे कि वाईट आहे ह्यावर "आपण" कितीही काथ्याकुट केला तरी ते लोक बदलणार नाही. "हम करे सो कायदा" असाच सगळा प्रकार आहे तिकडे. जे काही बदलायचे आहे ते हेच बदलायचे आहे. जगातल्या सर्व मुस्लिमांना हे जाणवून देणे आवश्यक आहे कि "हम करे सो कायदा" हा प्रकार त्यांच्या जीवावर इतर मुठभर लोक करत आहेत. आणि आज तो शांतीप्रिय मुस्लिमांना व जगाला त्रासदायक ठरत आहे. ते करायचे सोडून तुम्ही जर पैगंबर आक्षेपार्ह स्थितीत दाखवले तर शांतीप्रिय मुस्लिम सुद्धा भडकून उठतील आणि जो उद्देश आहे तो उरणारच नाही.
माझा मुद्दा फार साधा आहे. दहशतवाद (कोणताही, कारण जगात मुस्लिम दहशतवाद सोडून इतर अनेक धर्माचे, देशाचे, समाजाचे दहशतवादी आहेत. मिडिया त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो हा भाग वेगळा) व त्याबद्दल लिहिताना किंवा चित्र काढताना किमान एक लक्ष्यात घेतले पाहिजे कि कुठल्याही दहशतवादाला केवळ एकच एक बाजू नसते. हजारो कारणे आहेत. एक कलाकार म्हणून तुम्हाला सर्वांगीण विचार किंवा समजूतदारपणा दाखवता येत नसेल तर तुम्ही मरण्याच्या लायकीचेच असाल. हुसैनला आपण हिंदुनी का भारताबाहेर घालवले मग? पिके विरुद्ध का आंदोलन चालू आहे?
जे चूक आहे त्याबद्दल जरूर लिहावे. लिहायला, छापायला मिळते म्हणून मर्यादा ओलांडू नये. साधीशी गोष्ट आहे. माझ्या-तुमच्या हातून काही गुन्हा घडला तर मला -तुम्हाला शिक्षा व्हावी किंवा ज्याने कुणी पाणउतारा करायचा त्याने माझा-तुमचा करावा. पण कुणी चारचौघात त्या गुन्ह्याला धरून आपल्या आई-बापावर अतिशय वाह्यात टीका केली तर ते तुम्ही किंवा मी सहन करू शकू काय? मुस्काट नाही का फोडणार त्याचे?
बाकी राज्यघटना आणि कोर्टस याबद्दल, तर खूप दिवसांपासून चारली हेब्दो ला त्याचे धंधे बंद करण्यास सांगितले होते, त्याने ऐकले नाही. त्याच्याविरुद्ध केस म्हणजे "अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी" म्हणून केस होत नव्हती. त्याचवेळेस स्वेच्छेने बुरखा घालणाऱ्या स्त्रियांवर बुरखा न घालण्याची सक्ती करून फ्रेंच सरकार एक वेगळ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत होते. (बहुतेक मुस्लिम स्त्रियांना बुरखा घालणे आवडते असे साधारणपणे वाचनात आले आहे, किंवा त्यांना ते त्यांचे दमन वैगेरे वाटतच नसेल कदाचित.)
आंतरराष्ट्रीय स्तरावर मुस्लिम समाजाबद्दल फार दुटप्पी कारभार आहे.
प्रत्येक कट्टरवादी आपलेच तेच खरे म्हणत असतो. तो धार्मिक असो वा कुठलाही.
दोन घटना सांगतो. माझ्या ओळखीतले एक वयस्कर दलित पोलिस इन्स्पेक्टर होते, ते मला म्हणाले तू एक चित्र प्रदर्शन भरव, तुला काय पैसा लागेल तो मी पुरवतो. पण चित्रे माझ्या संकल्पनेनुसार असली पाहिजेत. श्रीराम आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया याबद्दल अतिशय गलिच्छ प्रकारे त्यांनी वर्णन केले व म्हणाले हाच खरा इतिहास आहे. शबरी काही म्हातारी नव्हती तर ती एक तरणीताठी युवती होती, त्यांच्यात प्रेमालाप दाखव इत्यादी इत्यादी. त्यावेळेस मीसुद्धा देव वैगेरे मानणारा नव्हतो आणि रामायणातल्या असंख्य विसंगती मलाही दिसत होत्या. पण त्यांचे उद्दिष्ट वेगळे होते, त्यांना रामाचे जनमानसात असलेले पूज्यस्वरूप मलिन करायचे होते. कारण काय तर हिंदू धर्म कसा फालतू आहे हे सिद्ध करायचे. आणि "त्यांनी" स्वीकारलेला बौद्ध धर्म कसा श्रेष्ठ असे मिरवायचे. मी त्यांना सरळ नकार दिला कारण हे सगळेच बेसलेस आहे. मुद्दलातच चुकीचे आहे. एखाद्या धर्मात काही चुकीचे चाललेले असेल तर ते बदलण्याऐवजी त्यांच्या पुज्यस्थानावर हल्ला करा ते डळमळीत करा, हेच केले जाते. म्हणजे जे चुकीचे आहे ते तर चालू राहते, लोक मूर्ख राहतात आणि फ्रेममधला राम जाऊन बुद्ध किंवा जीजस येतो. कारण लोक शहाणे झाले तर सगळ्याच फ्रेम्स फेकून देतील, मग ह्या तमाम धर्मगुरुंचे कसे चालणार? पु ल देशपांडे यांचा एक अतिशय सुंदर वैचारिक लेख आहे यावर. त्यात त्यांनी धर्मश्रद्धांवरील आक्रमण आणि त्याचे माणसाच्या मनावर होणारे परिणाम याबद्दल लिहिले आहे.
दुसरी घटना. एकदा एका मित्राशी वाद झाला होता "भारतीय मुस्लिम शाळांमधून वन्दे मातरम म्हणत नाहीत" यावरून. त्यावेळी तो जो पेटला होता आणि त्याच्या डोळ्यांतून अक्षरश आग बरसत होती. मी म्हणालो कि त्यांना म्हणायचे कि नाही त्यांचे त्यांना ठरवू दे आपण त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत. त्यावर तू फारच चिडला होता. तेव्हा ते त्याचे वन्दे मातरम "लादणे" असेच होते. स्वतंत्र भारतात प्रत्येकाला आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे. कुणी एक त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत, हिंदू संघटना मुस्लिम शाळेतल्या वन्दे मातरम बद्दल फार संवेदनशील आहेत. जणू काही त्यांनी वन्दे मातरम नाही म्हटले म्हणजे ते देशद्रोही. मग आपले हिंदू धड राष्ट्रगीत ना म्हणू दे ना, तिकडे लक्ष नाही देणार. हा एक प्रकारचा पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन आहे. मोठ्या संख्येने मुस्लिम सैन्यात आहेत, शहीद होतात, देशात इतरही क्षेत्रात देशाचे नाव मोठे करतात, तरी त्यांच्यावर संशय घेतोच.
दोन धर्मात कुणीतरी दंगली घडवून आणतो, आपण एकमेकांची डोकी फोडतो. आणि दोघेही आयुष्यभर त्यांनी असे केले म्हणून आम्ही तसे केले म्हणत असतो. फायदा घेणारा फायदा घेऊन मोकळा.
आपले बरेच मुस्लिम मित्र असतील. कधी त्यांना फेस टू फेस विचारून बघा. त्यांना काय वाटते ते. ते काहीही बोलले तरी "ते आपल्याशी कधीच खरे बोलणार नाहीत" हाच गंड सर्वसामान्य हिंदू बाळगून असतो. दुर्दैवाने तो खरा कि खोटा हे कुणीच कधी सांगू शकणार नाही.
समाजसुधारणेचा आव आणणाऱ्या सर्वाना परिस्थितीचे पूर्ण भान आवश्यक आहे. समाजात सुधारणा करण्याची खरीच अपेक्षा व तळमळ असणारे कुणाची खिल्ली उडवत नाहीत. नाहीतर प्रकाश आमटे आदिवासींना नुसते "तुम्ही किती बावळट आणि मागासलेले आहात" असेच म्हणत राहिले असते कि झाली असती त्यांच्यात सुधारणा. आणि राजा राम मोहन राय यांनी घाणेरडी व्यंगचित्रे काढली असती तर सतीप्रथा बंद झाली असती. महात्मा फुले लोक मुलीना शिकवत नाहीत म्हणून लोकांना वाकुल्या दाखवत राहिले असते. इतरही अनेक उदाहरणे आहेत.
याउपरही हाच आणि असाच मार्ग असेल तर शेवटही असाच होईल. मुस्लिमांच्या शरिया ची भीती घातली जाते. इतर लोक छुप्या मार्गाने तेच करतात ते मात्र नामानिराळे.
दुतोंडी जे म्हणतो मी ते हेच. सगळीकडेच हे होत आहे. आपणच काहीतरी करायला पाहिजे दरी मिटवायला. नाही का?
जाता जाता: ज्या जगात अमेरिका सारखा देश आहे, त्याने कधीही शांततेने जगता येईल असा विचार करू नये. अमेरिका फार कुटीलतेने दोन राष्ट्र, दोन समूह, दोन समाजामध्ये तेढ व अविश्वास निर्माण करण्यासाठी व त्यातून आपला फायदा आणि वर्चस्व मिळवण्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या दोन महिन्यात तेल-जगतात काय चालले आहे ते बघावे आणि आस्ट्रेलिया व फ्रांस मध्ये झालेल्या हल्ल्यांचा संबंध जोडता येतो का ते पाहावे. घटना फार सरळ आणि उघड जरी असल्या तरी त्या तितक्या सरळ कधीच नसतात. माझे मत तर असे आहे कि नेहमीप्रमाणे मुस्लिम जगताविरुध्द जनमत तापवण्याचा हा प्रकार अमेरिका करत आहे. सदर दोन्ही हल्ले अमेरिका पुरुस्कृत आहेत. कारण दोन्ही हल्ल्यांच्या कार्यपद्धतीत फारच विसंगती आहेत. ज्या साधारणपणे आढळत नाहीत.
वाचने
123597
वाचनखूण
प्रतिक्रिया
358
मिपावरील मणीशंकर अय्यर?
नाही पटली मतं तुमची .
लेख आवडला.
In reply to लेख आवडला. by जेपी
इशारा उत्तम!
सुंदर लेख
(No subject)
काहि पटल. काहि नाहि पटल.
थोडे
In reply to थोडे by माईसाहेब कुरसूंदीकर
माई तुमच्या "ह्यांचा" चा.
@ओ माईसाहेब, शेम टु षेम
@संदीप डांगे, दाभोळकर यांच्या
In reply to @संदीप डांगे, दाभोळकर यांच्या by संचित
दाभोलकरांच्या हत्येबद्दल मत
त्या कार्टूनिस्टांना मरण
In reply to त्या कार्टूनिस्टांना मरण by नगरीनिरंजन
http://www.independent.co.uk
In reply to http://www.independent.co.uk by संदीप डांगे
त्यांनी जशी चित्रे काढली तशी
In reply to त्यांनी जशी चित्रे काढली तशी by नगरीनिरंजन
जीवाला घाबरून चित्रे काढूच
In reply to जीवाला घाबरून चित्रे काढूच by संदीप डांगे
उत्तरे
In reply to उत्तरे by हुप्प्या
http://www.misalpav.com/node
In reply to जीवाला घाबरून चित्रे काढूच by संदीप डांगे
पण त्याच वेळेस मुसलमानांना
In reply to पण त्याच वेळेस मुसलमानांना by नगरीनिरंजन
एका वाचकाची प्रतिक्रिया:
In reply to एका वाचकाची प्रतिक्रिया: by संदीप डांगे
He's also an extremist
In reply to He's also an extremist by नगरीनिरंजन
माझा लेख हा दुटप्पीपणाबद्दल आहे.
In reply to माझा लेख हा दुटप्पीपणाबद्दल आहे. by संदीप डांगे
आईनस्टाईनला आमचा नमस्कार
In reply to माझा लेख हा दुटप्पीपणाबद्दल आहे. by संदीप डांगे
धर्मांधांच्या वेडाचाराची
In reply to त्या कार्टूनिस्टांना मरण by नगरीनिरंजन
एकदम सहमत !
हा पण एक दृष्टीकोन आहे.
कोणी ते व्यंगचित्र इथे लावेल
In reply to कोणी ते व्यंगचित्र इथे लावेल by टवाळ कार्टा
ते चित्र इथे लावण्याच्या
In reply to ते चित्र इथे लावण्याच्या by संदीप डांगे
लिंक व्यनी करता का?
खास त्रिशतकासाठी काढलेला
In reply to खास त्रिशतकासाठी काढलेला by खटपट्या
अचूक भाकिताबद्दल तीनशे वेळा
In reply to अचूक भाकिताबद्दल तीनशे वेळा by श्रीगुरुजी
धागाकर्त्याने धाग्याच्या मूळ
In reply to धागाकर्त्याने धाग्याच्या मूळ by संदीप डांगे
आपण नमला नसाल तर करा सुरु परत
In reply to धागाकर्त्याने धाग्याच्या मूळ by संदीप डांगे
>>> कृपया स्वत:ला झालेले
In reply to >>> कृपया स्वत:ला झालेले by श्रीगुरुजी
त्यांचे म्हणणे बरोबर आहे
In reply to त्यांचे म्हणणे बरोबर आहे by मृत्युन्जय
बरं ठीक आहे. फक्त कबुलीजबाबच
थोडेफार.
हे प्रकरण...
In reply to हे प्रकरण... by अर्धवटराव
मला तरी एवढे सरळ आहे असे
समर्थन!
मी स्वतः एक कलाकार असून कट्टरवाद्यांच्या भूमिकेतून मी ह्या हल्ल्याचे समर्थन केलेकोणतीही भूमिका असो, हल्ल्याचे समर्थन समर्थनीय नाही! तुमची भूमिका तार्किक टोकाला नेली तर काय होईल हा विचारही थरकाप उडवणारा आहे. असो.In reply to समर्थन! by आतिवास
माझेच मत कायम बरोबर ह्या
In reply to माझेच मत कायम बरोबर ह्या by संदीप डांगे
तुमच्या बाजूने धमकी आलेली आहे
In reply to तुमच्या बाजूने धमकी आलेली आहे by स्पंदना
ताबडतोब सगळ्या धर्मियांनी
@संपादक,
In reply to @संपादक, by श्रीगुरुजी
या असल्या तद्दन गुडघ्यातल्या
In reply to @संपादक, by श्रीगुरुजी
+1
कट्टरवादी हे फक्त धार्मिक नसतात. निधर्मीपणाचा अतिरेक, साम्यवादाचा अतिरेक, राष्ट्रवादाचा अतिरेक, जुन्या रूढींना चिकटून राहणे हाही कट्टरपणाच आहे.+1In reply to @संपादक, by श्रीगुरुजी
गुर्जी
In reply to @संपादक, by श्रीगुरुजी
गुरुजी,
In reply to गुरुजी, by निशदे
दंडवत..
In reply to @संपादक, by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी,
In reply to श्रीगुरुजी, by संदीप डांगे
>>> माझ्या मते तरी जगात चूक
In reply to >>> माझ्या मते तरी जगात चूक by श्रीगुरुजी
ओके...
In reply to ओके... by संदीप डांगे
>>> हे पठाणी लोक म्हणजे
In reply to >>> हे पठाणी लोक म्हणजे by श्रीगुरुजी
भले शाब्बास…
In reply to भले शाब्बास… by संदीप डांगे
जिथे चार टाळकी वर बसून निव्वळ
In reply to जिथे चार टाळकी वर बसून निव्वळ by नगरीनिरंजन
हो, अगदी खरे आहे. हे प्रत्येक
In reply to जिथे चार टाळकी वर बसून निव्वळ by नगरीनिरंजन
परफेक्ट
In reply to परफेक्ट by आजानुकर्ण
सहमत
In reply to सहमत by पिंपातला उंदीर
साहेब
In reply to साहेब by सुबोध खरे
काय संबंध
In reply to काय संबंध by आजानुकर्ण
सहमत...
In reply to सहमत... by संदीप डांगे
>>> भारत सरकारविरुद्ध विविध
In reply to >>> भारत सरकारविरुद्ध विविध by श्रीगुरुजी
अहो गुरुजी
In reply to अहो गुरुजी by आजानुकर्ण
>>> बीसीसीआयवर भारत सरकारचे
In reply to >>> बीसीसीआयवर भारत सरकारचे by श्रीगुरुजी
श्री गुरुजी
In reply to श्री गुरुजी by सुबोध खरे
धन्यवाद! तांत्रिक मुद्द्यावर
In reply to श्री गुरुजी by सुबोध खरे
माफ करा
In reply to माफ करा by आजानुकर्ण
>>> बीसीसीआयने केवळ पैशासाठी
In reply to >>> बीसीसीआयने केवळ पैशासाठी by श्रीगुरुजी
गुरुजी, या टोपीवर कोणाचं नाव
In reply to गुरुजी, या टोपीवर कोणाचं नाव by अनुप ढेरे
सोयीस्कर
In reply to सोयीस्कर by कपिलमुनी
भारतातील क्रिकेटच्या
In reply to भारतातील क्रिकेटच्या by बाळ सप्रे
BCCI
In reply to भारतातील क्रिकेटच्या by बाळ सप्रे
सप्रेजी,
In reply to सप्रेजी, by संदीप डांगे
भारतीय क्रिकेट संघ हा भारतीय
In reply to भारतीय क्रिकेट संघ हा भारतीय by बाळ सप्रे
धन्यवाद! अगदी हेच माझेही मत
In reply to धन्यवाद! अगदी हेच माझेही मत by संदीप डांगे
माझेही
In reply to माझेही by आजानुकर्ण
कर्ण साहेब
In reply to कर्ण साहेब by सुबोध खरे
भ्रष्टाचारच म्हणणार
In reply to कर्ण साहेब by सुबोध खरे
+१
In reply to +१ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
देशाची नाचक्की होईल असे काम
In reply to देशाची नाचक्की होईल असे काम by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
>>> देशाची नाचक्की होईल असे
In reply to >>> देशाची नाचक्की होईल असे by श्रीगुरुजी
तुमच्या दृष्टीने असला तरी
In reply to सोयीस्कर by कपिलमुनी
अहो तिथे बरंच काही लिहिलंय.
In reply to गुरुजी, या टोपीवर कोणाचं नाव by अनुप ढेरे
ही टोपी परीधान केलेले खेळाडू
In reply to ही टोपी परीधान केलेले खेळाडू by श्रीगुरुजी
मालक आणि प्रायोजकमध्ये फरक आहे
In reply to मालक आणि प्रायोजकमध्ये फरक आहे by आजानुकर्ण
बरोबर. म्हणून तर टोपीवर
In reply to बरोबर. म्हणून तर टोपीवर by श्रीगुरुजी
बरं
In reply to बरं by आजानुकर्ण
जो संबंध भारताच्या ऑलिंपिक
In reply to जो संबंध भारताच्या ऑलिंपिक by श्रीगुरुजी
थोडक्यात
In reply to थोडक्यात by आजानुकर्ण
देशाच्या उन्नतीसाठी, देशाच्या
In reply to देशाच्या उन्नतीसाठी, देशाच्या by श्रीगुरुजी
हो पण ही तुमची व्याख्या झाली
In reply to हो पण ही तुमची व्याख्या झाली by आजानुकर्ण
>>> तुम्ही वर्गात शिकवताना
In reply to >>> तुम्ही वर्गात शिकवताना by श्रीगुरुजी
ओके मग ठीक आहे
In reply to ओके मग ठीक आहे by आजानुकर्ण
चालायचंच. कोणाला काय काय सवयी
In reply to चालायचंच. कोणाला काय काय सवयी by श्रीगुरुजी
बघायची हौस असेल तर बघा
In reply to हो पण ही तुमची व्याख्या झाली by आजानुकर्ण
गुरुजी आणि आम्हि सारखेच अडाणी.
In reply to ही टोपी परीधान केलेले खेळाडू by श्रीगुरुजी
धादांत चूक
In reply to धादांत चूक by अनुप ढेरे
बरं मग?
In reply to काय संबंध by आजानुकर्ण
हे वाचा आणि बीसीसीआय ही
In reply to साहेब by सुबोध खरे
>>> पण जेथे भारत विरुद्ध
In reply to >>> पण जेथे भारत विरुद्ध by श्रीगुरुजी
तो एकच तराजू आहे
In reply to तो एकच तराजू आहे by आजानुकर्ण
>>> आयपीएल आणि बीसीसीआय हा
In reply to >>> आयपीएल आणि बीसीसीआय हा by श्रीगुरुजी
विश्वचषक, चॅम्पियन्स अशा
In reply to विश्वचषक, चॅम्पियन्स अशा by खटपट्या
बरोबर. वेस्ट इंडिजचा संघ
In reply to >>> आयपीएल आणि बीसीसीआय हा by श्रीगुरुजी
धन्य आहात
In reply to धन्य आहात by आजानुकर्ण
>>> स्वतः बीसीसीआय (पैशासाठी
In reply to >>> स्वतः बीसीसीआय (पैशासाठी by श्रीगुरुजी
गैरसमजूत
In reply to गैरसमजूत by आजानुकर्ण
तुम्ही मला फक्त एवढंच सांगा
In reply to तुम्ही मला फक्त एवढंच सांगा by श्रीगुरुजी
भारतीय ऑलिंपिक संघटना?
In reply to भारतीय ऑलिंपिक संघटना? by आजानुकर्ण
>>> मात्र भारतीय ऑलिंपिक
In reply to >>> मात्र भारतीय ऑलिंपिक by श्रीगुरुजी
माहिती अधिकार?
In reply to माहिती अधिकार? by आजानुकर्ण
>>> काहीही फेकू नका. मी वर
In reply to >>> काहीही फेकू नका. मी वर by श्रीगुरुजी
रीडिंग कॉंप्रीहेन्शन
In reply to तुम्ही मला फक्त एवढंच सांगा by श्रीगुरुजी
भारतीय ऑलिंपिक संघटना
In reply to भारतीय ऑलिंपिक संघटना by आजानुकर्ण
बीसीसीआयच्या अधिकृत
In reply to बीसीसीआयच्या अधिकृत by श्रीगुरुजी
ठीकाय गुरुजी, तुम्ही जिंकलात!
In reply to ठीकाय गुरुजी, तुम्ही जिंकलात! by अनुप ढेरे
(No subject)
In reply to ठीकाय गुरुजी, तुम्ही जिंकलात! by अनुप ढेरे
(No subject)
In reply to ठीकाय गुरुजी, तुम्ही जिंकलात! by अनुप ढेरे
सहमत
In reply to सहमत by आजानुकर्ण
कर्ण साहेब
In reply to कर्ण साहेब by सुबोध खरे
खरे साहेब
In reply to खरे साहेब by आजानुकर्ण
आयपीएल मधील फिक्सिंग,
In reply to धन्य आहात by आजानुकर्ण
बीसीसीआय ही एक स्वायत्त
In reply to बीसीसीआय ही एक स्वायत्त by मृत्युन्जय
बरोबर. मी हेच वारंवार
In reply to बरोबर. मी हेच वारंवार by श्रीगुरुजी
क्रिकेट संघ भारताचा नसून BCCI
In reply to क्रिकेट संघ भारताचा नसून BCCI by बाळ सप्रे
फालतु प्रतिवाद
In reply to क्रिकेट संघ भारताचा नसून BCCI by बाळ सप्रे
रत्येक देशाचे प्रतिनिधित्व
In reply to रत्येक देशाचे प्रतिनिधित्व by थॉर माणूस
नियमाप्रमाणे हे खेळाडू त्या
In reply to नियमाप्रमाणे हे खेळाडू त्या by बाळ सप्रे
इंटरेस्टींग... हा नियम कुठे
In reply to नियमाप्रमाणे हे खेळाडू त्या by बाळ सप्रे
हुश्श्य... सापडले बरं का नियम
In reply to हुश्श्य... सापडले बरं का नियम by थॉर माणूस
बरोबर आहे. अनेक खेळाडू
In reply to बीसीसीआय ही एक स्वायत्त by मृत्युन्जय
मुद्दा भारताचा संघ आहे की नाही
In reply to मुद्दा भारताचा संघ आहे की नाही by आजानुकर्ण
मूळ मुद्दा
In reply to मूळ मुद्दा by कपिलमुनी
येवढं तिरकं घुसल्यावर मुळ
In reply to येवढं तिरकं घुसल्यावर मुळ by थॉर माणूस
+१
In reply to मुद्दा भारताचा संघ आहे की नाही by आजानुकर्ण
पैशाची अफरातफर व
In reply to पैशाची अफरातफर व by मृत्युन्जय
तुलना चुकीची आहे
In reply to भले शाब्बास… by संदीप डांगे
>>> क्रिकेटच्या सामन्यात
In reply to >>> क्रिकेटच्या सामन्यात by श्रीगुरुजी
श्रीगृरुजी व व संदीपजी
In reply to श्रीगृरुजी व व संदीपजी by निनाद मुक्काम …
धन्यवाद निनादजी,
In reply to श्रीगृरुजी व व संदीपजी by निनाद मुक्काम …
धन्यवाद!
In reply to >>> क्रिकेटच्या सामन्यात by श्रीगुरुजी
प्रतिवाद करायला सत्यावर
In reply to प्रतिवाद करायला सत्यावर by संदीप डांगे
>>> प्रतिवाद करायला सत्यावर
In reply to >>> प्रतिवाद करायला सत्यावर by श्रीगुरुजी
तुम्ही आपले प्रतिसाद नीट वाचा
In reply to तुम्ही आपले प्रतिसाद नीट वाचा by संदीप डांगे
>>> हे तुम्ही वाचले नाही
In reply to >>> हे तुम्ही वाचले नाही by श्रीगुरुजी
यात सत्यांश किती, पूर्वग्रह
In reply to यात सत्यांश किती, पूर्वग्रह by संदीप डांगे
+१
In reply to +१ by आजानुकर्ण
>>> स्वतः बीसीसीआय अगदी
In reply to >>> स्वतः बीसीसीआय अगदी by श्रीगुरुजी
अपेक्षापूर्ती
In reply to अपेक्षापूर्ती by आजानुकर्ण
बेशर्त अनुमोदन