लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!
लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!
आता तयार व्हावे लढण्यास लेखणीने
रक्षण अबोलतेचे करण्यास लेखणीने
अभ्यास चिंतनाला शास्त्रात घोळवावे
कसदार शब्दशेती फुलण्यास लेखणीने
वास्तव चितारण्याची अवगत कला करावी
भक्कम नवीन पाया रचण्यास लेखणीने
नवज्ञान निर्मितेला जेथे उभार तेथे
आशय हळूच न्यावा भिजण्यास लेखणीने
भाकड-वृथा कथांच्या कक्षेपल्याड जावे
अभिजात सृजनाला पुजण्यास लेखणीने
लटकी-पुचाट वाणी शिरजोर होत आहे
यावे रणात गच्ची धरण्यास लेखणीने
जेव्हा चहूदिशांनी वादळ विराट तेव्हा
द्यावे अभय दिव्याला जळण्यास लेखणीने
- गंगाधर मुटे 'अभय'
--------------------------------------------------
आता तयार व्हावे लढण्यास लेखणीने
रक्षण अबोलतेचे करण्यास लेखणीने
अभ्यास चिंतनाला शास्त्रात घोळवावे
कसदार शब्दशेती फुलण्यास लेखणीने
वास्तव चितारण्याची अवगत कला करावी
भक्कम नवीन पाया रचण्यास लेखणीने
नवज्ञान निर्मितेला जेथे उभार तेथे
आशय हळूच न्यावा भिजण्यास लेखणीने
भाकड-वृथा कथांच्या कक्षेपल्याड जावे
अभिजात सृजनाला पुजण्यास लेखणीने
लटकी-पुचाट वाणी शिरजोर होत आहे
यावे रणात गच्ची धरण्यास लेखणीने
जेव्हा चहूदिशांनी वादळ विराट तेव्हा
द्यावे अभय दिव्याला जळण्यास लेखणीने
- गंगाधर मुटे 'अभय'
--------------------------------------------------
लेखणी आणि तलवार
मुटे कुल-सुताची ही स्वीकार मुक्त कविता!
तुमची कविता मी 'गे माय भू
सुखकर्ता-दुखःहर्ता ची चाल
आनंदकंद वृत्त
"अए दिल मुझे बता दे, तू किस
"आठशे खिडक्या नऊशे दारं" ही
अल्ताफ राजाच्या "तुम तो ठेहरे
मी तर 'या गो दांड्यावरना नवरा
याचा अर्थ "हे राष्ट्र
आनंदकद
मला वाटतय ,
नवीन लेखकांना देखील असे ५०
स्कोअर सेटल चाल्लय
+१
ओके . पॉईट टेकन
आशय हळूच न्यावा...
सहमत
व्वा, छान.
धन्यवाद सर. आभारी आहे.
वा वा वा वा !
धन्यवाद सर. आभारी आहे.
छान कविता
धन्यवाद मॅडम. आभारी आहे.
धन्यवाद मॅडम. आभारी आहे.
खुप वर्षानी आपली कविता वाचली.
न्यावा शिवाररानी जागर