लोकमान्य चित्रपट ! हिप्पीछाप रिमिक्स
लोकमान्य टिळक एक युगपुरुष !
प्रियाताई बापट
आजच्या काळातला कुणी एक तरुण. टिळक त्याच्या मनात घुसतात. त्याच्या डोक्यात केमिकल लोच्या होतो. लगे रहो मुन्नाभाई किंवा मी शिवाजीराजे भोसले बोलतोयप्रमाणे. चिन्मय माडलेकर हा तो तरुण, त्याची प्रिया बापट मैत्रीण. चिन्मय टिळकांचं पुस्तक हातात घेतो आणि टिळक त्याच्या डोळ्यापुढे यायला सुरुवात होते. आता इथे टिळकच पाहीजेत असेही नाही. इथे टिळक, सावरकर, गांधी, विवेकानंद, सुभाषबाबू कुणीही असते तरी फारसा फरक पडला नसता.

दिग्दर्शक
एखादा चित्रपट केवळ लोकमान्यांवर बनवला आहे म्हणून त्याला चांगलेच म्हटले पाहीजे असे नाही. चित्रपट म्हणून तो कसा आहे हेही पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बर्याचदा अशा प्रकारचा विषय निवडणे हेदेखील मोठे धाडस आहे. पण ते शेवटालाही नेले पाहीजे. इथे प्रेक्षकाला सखोल चिंतन सापडत नाही. लोकमान्यांच्या जीवनातल्या ढोबळ घटना इथे मांडलेल्या आहेत. उदा. लोकमान्य आणि विवेकानंद भेट होते त्यामधे विवेकानंदांचा विचार पोचत नाही. तर वेषभूशेवरून ते विवेकानंद आहेत एवढेच आपल्याला समजते. अजित परब यांनी विवेकानंद यांची भूमिका केलेली आहे. दोघेही काही सेकंदात एकमेकांना हाय आणि बाय करतात, भेट संपते. टिळक आगरकर, टिळक आगरकर आणि चिपळूणकर, टिळक आणि ब्रूइन, टिळक आणि चाफेकर, टिळक आणि गांधी, टिळक आणि जोतिबा फुले. अशा अनेक लोकांशी टिळकांच्या भेटी होतात. त्याला स्पर्श केलेला आहे.

लोकमान्य
जोतिबा फुले टिळक आगरकरांचा सत्कार करतात त्या प्रसंगात जोतिबांचे व्यक्तिमत्त्व खूप मोठे दाखवायला हवे होते. या उलट टिळकांच्या सत्कराला आलेला एक सामान्य पुणेकर असे जोतिबा दाखवलेले आहेत. वास्ताविक जोतिबा हाच एका संपूर्ण चित्रपटाचा विषय आहे. असो. या चित्रपटाला कथा नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकाला गुंतवून ठेवेल असे कथानक नाही. चला हवा येऊद्या मधे लोकमान्यचे कलाकार आले होते. दिग्दर्शकही आला होता. त्याला पाहूनच त्यावेळी या दिग्दर्शकाने हाताळणी कशी केली असेल याबद्दल धाकधूक होती. यात संवाद आहेत. पण एक अत्यंत रिमिक्सछापाचा प्रयोग केलेला आहे. संवादाला संगीत दिलेले आहे. धूम धाड ठक ठो धूडूम टग डग टग डग टग डग धूम धडाड असे आवाज तर कधी रामूच्या पिक्चरमधल्यासारखे फायटिंगचे आवाज असे संगीत संवादाला दिलेले आहे. म्हणजे आधी डायलॉग टाकायचे नंतर ते ऐकू नयेत म्हणून संगीत द्यायचे हा नवीन प्रयोग आहे. त्यामुळे तो मूकपटच समजायला हरकत नाही. वाया घालवायला एवढा पैसा कुठून येतो. रामगोपाल वर्माच्या सरकारनामा, शिवा या चित्रपटांचा प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे दिग्दर्शकाने यात डायलॉग ऐवजी किंवा डायलॉगच्या जोडीला फायटींग, बुक्की, ठोसे यांच्या आवाजाचे रिमिक्स केलेले आहे. दिग्दर्शनाची ही हिप्पीछाप हाताळणी म्हणावी लागेल. याचा परिणाम म्हणून अति अपेक्षेने आलेले ज्येष्ठ नागरीकही अर्धा पाउण तासाने चूळबूळ सुरू करतात आणि बाहेरची वाट धरतात. रँड म्हणून कवट्या महांकाळछाप कुणीसा घेतला आहे. टिळकांच्या वाड्यातली एक लहान मुलगी(वय१०, ११) पण लग्न झालेली. माहेरी येते. ती म्हणते नवर्याची भिती वाटते. तर त्यावर तिथली एक आत्या म्हणता येइल अशी तरुणी जी विधवा असते ती सांगते. हिच्या नवर्याला रात्र झाल्यावर काय होते कुणास ठाऊक त्याच्या अंगात राक्षसच संचारतो. मग ती त्या मुलीला समजावते. अगं सुरुवातीला भिती वाटते पण नंतर तेच हवं हवसं वाटायला लागतं. हे एवढे संवाद मात्र कुठल्याही व्यत्ययाविना दिग्दर्शकाने पोचवलेले आहेत. वा ! क्या बात है... टिळक गांधी भेट होते. गांधी म्हणतात आपण अहिंसेच्या मार्गाने लढू. टिळक म्हणतात हिंसेला पर्याय नाही. गीतारहस्य लिहीणारा माणूस इतक्या चीप पद्धतीने व्यक्त होइल. कदापि शक्य नाही. गांधीजीही इतके अपरिपक्व दाखवण्याचे काहीच कारण नव्हते. या चित्रपटात जमेच्या बाजू नाहीतच का... १. सुबोध भावेचे लोकमान्यांप्रमाणे दिसणे. (पण रिमिक्समुळे संवाद नाहीतच) २. यात दाखवलेले 'सध्याच्या काळातले प्रसंग पाहता' हा दिग्दर्शक फायटिंग, गुंडगिरी, टोळीयुद्ध असे रामगोपाल वर्मा छाप चित्रपट उत्तम करू शकेल. पण रामूच्या चित्रपटातले मागचे आवाज आणि टिळकांचे संवाद असले रिमिक्स मात्र करू नये. ३. चित्रपट पहायला कधीही जा. तिकिटाच्या रांगेत तुमचाच नंबर पहीला... ashu jog
वर्गीकरण
प्रतिक्रिया
...
बाकी
चला हवा येऊद्या मधे
...
तुमचा अधिकार
...
पूर्वग्रह
+१
...
अहो "हवा येऊ द्या" बघुन
तो दिग्दर्शक कोण तर भा.कु.
बहुतांश सहमत. इम्मॅच्युअर
...
चे गव्हेरा?
चे गव्हेराचे फोटो असलेले टी
+१
...
+१
डोपॅमाईन मिळतंय म्हटल्यावर
:)
चे गव्हेराचे टी शर्ट
तो दिग्दर्शक कोण तर भा.कु.
मुलगा
मी तरी परीक्षणं चांगली/खूप
माझे मत
...
मुळातचंं टिळक काय, आगरकर काय
जरी
ऐतिहासीक चित्रपट
अवांतर
...
आशु जोग, कर्मधर्मसंयोगाने
...
चित्रपट ४ जानेवारीला पाहिला.
टिळक आगरकर
होय
.