मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

((सहज..))

सतिश गावडे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
p शब्दाने वाढला शब्द कडाक्याचे भांडण झाले मी सुन्न आणि स्तब्ध अन, ती निघून गेली न मागे वळून पाहणे न माघारी ते फिरणे वादातून तुटला धागा आता उरले ते झुरणे मी आशा का ठेवावी? की जीवनी असेच व्हावे साथ ही सुखाची नेहमी मनाजोगे घडावे ती निघून गेली आता तिच्या एकल्या मार्गाने कोमेजून गेली स्वप्ने मी व्याकुळ इथे विरहाने भेटेल कुणी कधी तिला तो मार्ग चालता चालता दाटूनी कंठ माझा आला मज काही न ये बोलता आता माझ्याही नशिबी हे थांबणे निश्चित आहे या स्तब्ध आयुष्याचा मी सहप्रवासी आहे. ============== संकटग्रस्त.. (चित्र जालावरुन साभार)

वाचने 3757 वाचनखूण प्रतिक्रिया 21

मित्रहो Sun, 01/04/2015 - 00:06
भारी आवडल.
मी आशा का ठेवावी? की जीवनी असेच व्हावे साथ ही सुखाची नेहमी मनाजोगे घडावे
जबरी.

नाखु Mon, 01/05/2015 - 09:12
जरा भीत्-भीतच उघडला कारण (धूम्-१,धूम्-२,धूम-३ हा चढत्या भाजणीने भिकार@@ होता). *DASH* *WALL* पण सुखद झुळुक यावी तशी कवीता अलगद समोर आली याला विडंबन म्हणण्यापेक्षा "सु"डंबन जास्त समर्पक वाटते. मूळ अवांतर : कवीता झक्का$$$$$$$$$$स आहे.