Skip to main content

एकच प्याला, चार शक्यता, चार जोड्या!!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 06/01/2015 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
अर्धा भरलेला प्याला आणि त्यासंदर्भातला आशावाद/निराशावाद हे उदाहरण आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत. त्याबाबतचे माझे नवे विचार मी खाली मांडले आहेत: आपल्याला कल्पना आहेच की आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो तर निराशावादी "अर्धा अपूर्ण" आहे असे मानतो. पण आता दोन्ही प्रकारच्या व्यक्तीसंदर्भात दोन शक्यता वर्तवता येतात: (१) आपण प्रथम आशावादी मनुष्याचा विचार करू: (१-अ) आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो त्यामुळे त्यात तो समाधानी होतो आणि उरलेला अर्धा भरण्यासाठी कधी प्रयत्नच करत नाही. किंवा (१-ब) आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो त्यामुळे त्याचा आशावाद त्याला उरलेला अर्धा प्याला सुद्धा भरायला उद्युक्त करतो. (२) आपण आता निराशावादी मनुष्याचा विचार करू: (२-अ) निराशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा अपूर्ण" असे मानतो त्यामुळे त्यात तो समाधानी नसतो आणि त्याला तो पूर्ण भरण्याची ऊर्मी मिळते. किंवा (२-ब) निराशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा अपूर्ण" असे मानतो त्यामुळे तो अधिक निराश होवून प्याला पूर्ण भरण्याचा विचार सोडून देतो. तुम्हाला काय वाटते कोणती जोडी बरोबर आहे? जोडी १- (१-ब) आणि (२-ब): आशावादी असणे चांगले! जोडी २- (१-अ) आणि (२-अ): निराशावादी असणे चांगले??? (काय सांगता?) जोडी ३- (१-ब) आणि (२-अ): कोणताही "वादी" असले तरी परिणाम चांगलाच??? असे कसे? असे कसे? जोडी ४ - (१-अ) आणि (२-ब): कोणताही "वादी" असले तरी परिणाम वाईटच??? असे कसे? असे कसे?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3260
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

छान लिहिलंय. अतिशय मौलिक असे विचार आहेत तुमचे. जणू काही विचारमौक्तिकेच. या विचारमौक्तिकांना पुस्तकाच्या कोंदणात बसवा. येणार्या कित्येक पीढयांना हे विचारधन मार्गदर्शक ठरेल.

(२-क) निराशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा अपूर्ण" असे मानतो त्यामुळे तो अधिक निराश होवून तो पिऊन टाकतो आणि पूर्ण रिकामा करतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

त्या पेल्यात बहूधा रंगी-बेरंगी कडवट पेय असावे. आणि प्याला रिकामा झाल्यावर ती व्यक्ती बेभान होऊन
काठोकाठ भरु दया प्याला, फेस भराभर उसळू दया
असे साकीला* म्हणत असावी *साकी - साहित्यिक कीडा(आभार: नाद खुळा)

In reply to by नाखु

अहो, ते "चकणा" उपनावाच्या त्यांच्या दोस्तासाठी काय आणू ? असे आहे. :) (शारिरीक व्यंगावरून कोणाला नावे ठेऊ नयेत अशी तंबी द्यावी काय असा विचार चालू आहे.) ;)

अजून एक प्रकारचा माणुस असतो माझ्यासारखा. तो ह्या पेल्याकडे त्रयस्थ नजरेने पाहतो. पेला अर्धा भरलेला आहे ना ? आणि अर्धा रिकामा आहे ना ? असू दे, असू दे. जीवनातली घडी अशीच राहू दे.

आणि मग एक-दोन थेंब इकडे-तिकडे उडवून मग त्या ग्लासातल्या वारूणीचा आस्वाद घेतो... ग्लास अर्धा भरणे आम्हास नामंजूर आणि ग्लास अर्धवट भरलेला ठेवणे आम्हास नामंजूर...